Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 01, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » यादें » Archive through April 01, 2008 « Previous Next »

Zakki
Thursday, March 27, 2008 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूवी असला तरी चार चार वेळा पाहायला.

अहो, 'पहायला' जात नव्हते ते!!
असल्या अचाट मूवीला गर्दी अजिबात नसते.

म्हणजे तिथे जरा निवांतपणा मिळतो म्हणून जातात.

छ्या:! काय हे? हे पण आता मीच सांगायचे का? अहो जोड्याने जायचे ते 'चित्रपट पहायला' नाही.


Ajjuka
Friday, March 28, 2008 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं ए आवर श्र! हसून हसून माझी खुर्ची तुटायला आली!

Giriraj
Friday, March 28, 2008 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझी खुर्ची पण हसते का?
माझी खुर्ची हसण्यासाठी काय करावे लागेल?
हसणारी खुर्ची पुण्यात मिळेल का?


Farend
Friday, March 28, 2008 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तूनेऽऽऽ..... मुझसेऽऽऽ.... वफा नही कीऽऽऽऽ तुझको कैसे वफा मिलेगी? तूनेऽऽऽ.... मुझकोऽऽऽ.... दर्द दिया हैऽऽऽऽ तुझको कैसे दवा मिलेगी

श्रद्धा, परफेक्ट, ते आर्त कळवळणे बरोब्बर आठवले. आणि आनंद बक्षी सुद्धा गायिकेचा श्वास टिकेपर्यंत ओळी जोडत गेला आहे, "किसिने ये जाना नही, किसिने य माना नही, किसिको बताना नही, दर्द छुपा है कहॉ"

एकूणच यात कोणत्याही गाण्यात एखादा शब्द तरी बर्‍याच वेळा म्हणायचा अस दंडक दिसतो. ते आणखी एक अचाट गाणे "ओये बेबी, चम चम चम चम चम चमकती शाम है..."


Manuswini
Friday, March 28, 2008 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते गाणे आहे ना, तुने मुझको दर्द दीया ह्या गाण्याच्या वेळी काही मागे बसलेली मुलगी एकीला हेच सांगत होती की, whatever bad you do, comes to you शब्द्श conversion ,

आमची हसून वाट.. काय ते शिव्या शाप देणे छे!.


Shraddhak
Friday, March 28, 2008 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि आनंद बक्षी सुद्धा गायिकेचा श्वास टिकेपर्यंत ओळी जोडत गेला आहे, "किसिने ये जाना नही, किसिने य माना नही, किसिको बताना नही, दर्द छुपा है कहॉ"<<<<<<<<<
आणि ट्रिक बघ हां.... आधी ती म्हणते;
' ऐ दिलऽऽऽऽऽ ' यानंतर पूर्ण श्वास भरून घेत असणार.
मग पुढची लांबण.... "किसिने ये जाना नही, किसिने य माना नही, किसिको बताना नही, दर्द छुपा है कहॉ"
प्राणायामाचा अभ्यास करता येईल हे गाणं गाऊन.
:-P

एकूणच यात कोणत्याही गाण्यात एखादा शब्द तरी बर्‍याच वेळा म्हणायचा अस दंडक दिसतो.<<<<<
अगदी अगदी.

यादें याद आती है: शब्द: यादें
एली रे एली: तुरुरुम, तुरुरुम.... तुरुरुम, तुरुरुम....
कुछ साल पहले दोस्तों ये बात हुई थी: वाहे वाहे.. झुम झुम झुम... वाहे वाहे
( यात तो
' बारिश मे सडकपर... हां छत्री पकडकर...
वो जा रही थी यूं... मै आ रहा था यूं... '
या ओळीनंतर बर्‍याच वेळा ' यूं यूं यूं ' म्हणतो. पण ते फ़ारच अवमानकारक वाटेल म्हणून ते धरूया नको.)
जब दिल मिले: मिले मिले मिले....
चमकती शाम है: चम चम... छल छल... गल गल... ओये बेब्बे...
ऐ दिल दिल की दुनिया मे: तू लिहिले आहेसच.
चंदा तारे: तेरी यादों मे हम सोये जागे... सोये जागे....

एखादं गाणं राह्यलंय का?
:-P

हसून हसून माझी खुर्ची तुटायला आली<<<<<<<<
अज्जुका, म्हणून भारतीय बैठक बरी पडते. :-)



Chinnu
Friday, March 28, 2008 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... ... ... ...


Psg
Friday, March 28, 2008 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं, ही अशी शब्द रीपीट असलेली गाणी असली की आपसुक 'याद' राहतात ना.. 'यादें' की याद, 'यादें' के सब गाने याद वगैरे वगैरे वगैरे! :P

३-४ वेळा? अचाट आहेस तूच आता!
~D

Shraddhak
Friday, March 28, 2008 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यात काय पूनम? कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये कुठेही बाहेरगावी जाता आलं नाही; की मी आणि माझी मैत्रीण आपापल्या घरी बसून आत्मपीडनासाठी असले सिनेमे बघायचो.
मग सुट्टी संपवून कॉलेजमध्ये भेटल्यावर ' कुठले सिनेमे पाहिले? ' याची चर्चा चालायची.
मी: प्रेम अगन
ती: लोफर ( अनिल कपूर जुही वाला)
मी: इतिहास
ती: प्रेमग्रंथ
..... असेच पुढे!


Prachee
Friday, March 28, 2008 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, अगदी अगदी... कधी कधी वेळ घालवायला म्हणुन असे सिनेमे बघते मी देखील. एक बरे असते. मध्येच उठुन दार उघडणे, कुकर लावणे,फ़ोन घेणे अशी कामेही करता येतात. नाहीतर चांगला सिनेमा असला की सगळी कामं पडुन राहतात.

Dakshina
Friday, March 28, 2008 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' बारिश मे सडकपर... हां छत्री पकडकर...
वो जा रही थी यूं... मै आ रहा था यूं... '
या ओळीनंतर बर्‍याच वेळा ' यूं यूं यूं ' म्हणतो. पण ते फ़ारच अवमानकारक
वाटेल म्हणून ते धरूया नको.) >>>>
श्रद्धा.... तुझ्या विनोदबुद्धीला माझा अक्षरशः सलाम..





Amruta
Friday, March 28, 2008 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला मी आता यादे पहायला घेते. :-)

Amruta
Friday, March 28, 2008 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच कि त्याला कोकच व्यसन आहे. स्टोर मधे पण पितोय मेला. आणि तो दुपारच्या वेळेचा शॉपिंगचा सिन एवढा दुख्:द असुन श्र फक्त तुझ्यामुळे जाम हसायला येतय. :-)


Zakasrao
Friday, March 28, 2008 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच कि त्याला कोकच व्यसन आहे. स्टोर मधे पण पितोय मेला.>>>>>>>>>
हम्म ह्याचा अर्थ आहे की कोक ची ऍड आहे त्यात. थोडक्यात काय तर ही भयानक फ़िल्म बनवण्यासाठी कोकने पैसे दिले.
त्या कोकच्या बैलाला...........:-)


Chafa
Saturday, March 29, 2008 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मी ह्या परिक्षणाचा printout काढुन मग cinema बघायला बसते

>>> LOL स्टोर्वी.

मी चित्रपट बघितलेला नाही पण 'एली रे एली' हे गाणे मात्र नक्कीच श्रवणीय आहे. कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, हेमा सरदेसाई, व उदित नारायण यांनी ते सुरेख गायले आहे. शब्दही काही एवढे वाईट नाहीत. या गाण्याबद्दल लिहिलेले सगळे खटकले. :-( गाण्याच्या चित्रिकरणाबद्दल मला अजिबात कल्पना नाही, पण गाणे माझे आवडते आहे.


Mukund
Monday, March 31, 2008 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा... LOL! नेहमीप्रमाणे मस्तच...:-)

पण मला दिवा घ्यायला सांगुन मला विनोदबुद्धी नाही असे तुला म्हणायचे आहे का?:-(


Nyati
Monday, March 31, 2008 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Next attraction :-)

SATHIYA

kay mhanata mandali??

Ajjuka
Tuesday, April 01, 2008 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साथिया तितकासा येत नाही हो अचाट आणि अतर्क्य मधे.

आगामी आकर्षण्:
कभी खुशी कभी गम हा जोहरपटच हवा!
इतका लाडीगोडी चित्रपट पाह्यला नव्हता.
मी व्होल्वो मधे आणि टिव्ही वर तुकडे तुकडे मिळून बघितलाय नाहीतर मीच लिहिलं असतं!


Deepanjali
Tuesday, April 01, 2008 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आगामी मधे कोणी तरी ' ओम जय जगदिश ' घ्या बरं !
सॉफ़्टवेअर हॅकर ला पिझ्झा पोचवण्याच्या निमित्ताने नारायण मूर्तिं ची भेट , मग कुठल्या अत्री problem सोडवण्या साठी अभिषेकचं सर्वां पुढे presentation आणि काय त्या खान्दानि घराचा नाट्यमय लिलाव काय , मग सर्वात नालायक बेटा येउन घर स्वत : च विकत घेणे etc..etc. भरपूर आहे लिहायला !
श्र किंवा इतर कोणी तरी लिहा !


Nandini2911
Tuesday, April 01, 2008 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी लिस्ट.
विवाह, दिल तो पागल है, मोहब्बते, नील ऍन निक्की, कभी खुशी कभी गम, आप मुझे अच्छे लगने लगे, जमीन, जमीर(हा कुणी पाहिलाय का?) तुमको ना भूल पायेंगे, चंद्रमुखी....
अजून आठवले की लिहिते
याचे परीक्षण लिवा रे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators