|
Zakki
| |
| Friday, February 29, 2008 - 5:22 pm: |
| 
|
तर परत मूळ विषयाकडे वळून, परवा Vantage Point बघितला. बघायचा असेल, तर इंद्रियांच्या सर्व शक्ति एकत्र करून, (रजनीकांतच्या बंदुकीच्या गोळीने द्विभागून) , कर्णांच्या नि नयनांच्या जागी साठवाव्यात नि मगच पहावा हा चित्रपट. आता काय होते चित्रपटात ते सांगत नाही. पण मी मात्र बघताना खुर्चीला खिळून बसलो होतो, नि जराहि डुलकी घेतली नाही, या वरून काय ते समजा!
|
Maanus
| |
| Friday, February 29, 2008 - 5:40 pm: |
| 
|
Twelve Monkeys काल पाहीला, चांगला sci-fi चित्रपट आहे. Bard Pitt ची वेड्याची भुमीका मस्त एकदम. रामा रामा क्या है ड्रामा, timepass आहे.
|
Sas
| |
| Friday, February 29, 2008 - 6:04 pm: |
| 
|
'रामा रामा क्या है ड्रामा' DVD आणुन बघावा, चित्रपट-गृहात जाण्याची गरज नाही 
|
Ankyno1
| |
| Saturday, March 01, 2008 - 5:26 am: |
| 
|
डी.जे..... सर्वात आवडता रंग म्हणून लाल रंग वापरतो.... इतर कहीही कारण नाही....
|
Runi
| |
| Monday, March 03, 2008 - 10:57 pm: |
| 
|
कालच Vantage point बघितला. एकदम जबरदस्त थरारनाट्य. पुर्ण दीड तास एकाच जागी खिळवुन ठेवतो, क्षणाचीही उसंत मिळु देत नाही. ज्यांना thriller आणि action सिनेमे बघायला आवडतात त्यांनी नक्कीच बघायला हवा.
|
Ankyno1 ने लाल फ़ाॅन्टची कल्पना 'द बर्निंग ट्रेन' च्या लाल साडीवरून उचललेली दिसतेय.
|
Mbhure
| |
| Tuesday, March 04, 2008 - 6:26 pm: |
| 
|
मिथ्याः चांगल्या कल्पनेवरील साधारण चित्रपट आहे. सिनेमात विनोद, नाट्य, अभिनय हे सर्व चांगले असले पण त्यामानाने सिनेमा हवा तसा रंजक नाही वाटला. रामा रामा क्या है ड्रामाः पाहिला नाही तरी चालेल. राजपाल यादव मला तरी डोक्यात गेला. चांगल्या अभिनेत्याला किती अचरट चाळे करायला लावतात. त्याचा " मैं मेरी पत्नी... " छान होता.
|
Maanus
| |
| Thursday, March 06, 2008 - 5:11 am: |
| 
|
<Iron man trailer .. http://www.firstshowing.net/2008/02/28/another-full-iron-man-trailer-launches-holy-sht/>
|
Michael Clayton:मोठ्या नावांमुळे अपेक्षा जास्त होत्या म्हणून की काय, पण फ़ार काही ग्रेट वाटला नाही.बराच predictable . अशा प्रकारचे विषय बरेच वेळा हाताळले गेलेत म्हणूनही असेल.जॉर्ज क्लुनीसाठी म्हणून बघायला बरा आहे.
|
Farend
| |
| Sunday, March 09, 2008 - 6:35 pm: |
| 
|
मैत्रेयी, कालच बघणार होतो पण कॉमेडी आणावा म्हणून Death at a funeral आणला, तो ही बघायचा राहिलाय. कोणे बघितलाय का? ब्रिटिश आहे बहुधा.
|
Giriraj
| |
| Monday, March 10, 2008 - 12:32 pm: |
| 
|
Vantage Point जबरदस्त आवडला... अतिशय वेगवान चित्रपट!
|
Farend
| |
| Tuesday, March 11, 2008 - 4:06 am: |
| 
|
Darjeeling Limited पूर्ण डोक्यावरून गेला. बहुधा इतरांचे रिव्यू वाचून अर्थ लावावा लागणार. एका ठिकाणी ते बॅगा टाकून गाडी पकडतात म्हणजे जुने बॅगेज टाकून दिले वगैरे वगैरे उकल करत बघितला तर कळेल बहुधा. आणि हे भारतीय गाडीचे इंग्रजी नाव दिसते, कारण limited हे नाव गाड्यांना आपल्याकडे पाहिले नाही कधी. ती हीरॉइन बघून असे वाटले की यांनी (हॉलीवूड) भारतीय मुलींचा 'सरिता चौधरी' लूक फिक्स केलेला दिसतो Adaptation नंतर हा एक total bouncer
|
Maanus
| |
| Friday, March 14, 2008 - 1:53 pm: |
| 
|
दादा कोंडके यांच्यावर special लेख http://www.esakal.com/esakal/03142008/FeatureCF323511F0.htm
|
Mbhure
| |
| Friday, March 14, 2008 - 5:56 pm: |
| 
|
काल Checking Out नावाचा चित्रपट पाहिला. Broadway वरील नाटकावर आधारीत आहे. एक जुना जाणता खुशाल अभिनेता आपल्या नव्वदाव्या वाढदिवसाला एक मोठी पार्टी ठरवतो. आणि त्याच पार्टीनंतर आत्महत्या करणार असल्यासे डिक्लेअर करून टाकतो. त्या पार्टीसाठी तो आपल्या तीन मुलाना बोलावून घेतो. मुले त्याला आत्महत्येपासुन परावृत्त करण्याचा सर्वपरीने प्रयत्न करतात...... एक चांगली कॉमेडी आहे. ह्यावर मराठीत चांगला सिनेमा होऊ शकेल.
|
Farend
| |
| Monday, March 17, 2008 - 10:40 pm: |
| 
|
Death at a funeral मस्त ब्रिटिश कॉमेडी आहे. एकदा नक्कीच बघण्यासारखा.
|
Maanus
| |
| Tuesday, March 18, 2008 - 5:29 pm: |
| 
|
१०००० BC हा एक नंबरचा टुकार सिनेमा आहे. चुकुन सुद्धा नका बघु, धड लहान मुंलाचा नाही ना धड मोट्या माणसांसाठी. काहीच अर्थ नाही.
|
No Country for Old Man - एक क्लासीक चित्रपट आहे. सुरुवातीच्या ५ मिनीटात हा चित्रपट पकड घेतो तर चित्रपट संपल्यावर निदान अर्धातास आपण चित्रपटातच असतो. Javier Bardem नी काय अभिनय केलाय. सही. ध्यासपर्व पाहीला. र धों चे कार्य माहीत होते पण ईतके डिटेल मध्ये नक्कीच माहीत न्हवते. संतंती नियमन हा शब्द त्यांनी रुढ केलाय. त्यांनी जे गेल्या शतकात सांगीतले त्याकडे आजही भारताचे पुर्ण लक्ष नाही. कार्लीटोज वे. अल पचिनो चा एक सुंदर चित्रपट. एक वेगळाच अल पचिनो दिसतो यात. आवडला.
|
Farend
| |
| Tuesday, March 18, 2008 - 10:31 pm: |
| 
|
Maanus मी कालच बघणार होतो, पण आधी एक दोन परीक्षणे वाचल्यामुळे त्या ऐवजी Vantage Point बघितला. एकदम जबरी. काही 'विलक्षण योगायोग' आहेत, पण एकूण वेगात घडणार्या कथानकामुळे चालून जातात.
|
Runi
| |
| Wednesday, March 19, 2008 - 1:36 pm: |
| 
|
हो रे माणसा 10,000 BC एकदमच फालतु आहे. मी बघुन पस्तावले. अमोल तु वाचलास, चुकुन बघीतला असतास तर तु नक्कीच तो अचाट आणि अतर्क्य सिनेमाच्या बी बी वर लिहायला घेतला असतास.
|
Maanus
| |
| Wednesday, March 19, 2008 - 2:22 pm: |
| 
|
सौदागरची कॉपी वाटतेय, अनुपम खेर बॅगराउंड मधे स्टोरी सांगत असतो, हा तीला २ वर्शाचा असल्यापासुन सांगतो की त्या ध्रुव तार्यासारखी तु माझ्या हृदयात रहानार वैगेरे वैगेरे... आणि त्या वाघाला तर काही कामच नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|