|
Runi
| |
| Wednesday, March 26, 2008 - 5:41 pm: |
| 
|
ह. ह. पो. दु.
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 26, 2008 - 5:47 pm: |
| 
|
जबरा लिहिलय. बर झाल मी पाहिला नाहिये ते हा चित्रपट. ते टायटॅनिक टाइप एक दृष्य आहे ना करीना आणि ह्रितिक च?? फ़कस्त तिथे समुद्र आणि जहाज नसेल. माझा एक दोस्त (जो हा चित्रपट बघुन पश्चाताप पावला होता) तो म्हणायचा की त्या एलि रे एलि मध्ये दोघींची लग्न होतात आणि बाकीचा चित्रपट म्हणजे करीनाच लगीन कस होत नाही ह्यावरच आहे
|
Storvi
| |
| Wednesday, March 26, 2008 - 9:44 pm: |
| 
|
ह. ह. पु. वा. श्र. मानलं बुवा. आता मी ह्या परिक्षणाचा printout काढुन मग cinema बघायला बसते 
|
Farend
| |
| Thursday, March 27, 2008 - 12:09 am: |
| 
|
बापरे, केवढी लांब कथा आणि तेवढाच डीटेल रिव्यू! महान लिहिला आहे पण!
अगदी पन्नास च्या दशका पासून असलेले फिल्मी stereotypes यात वापरले आहेत. ती कोण "रशियन नावाची भारतीय आईबापांची" (श्रद्धा, पुढच्या वेळेपासून संक्षिप्त नावे देत जा ) मुलगी काहीतरी लग्न ठरल्या ठरल्या हृतिक का कोणाला की "तिला बाळ वगैरे लगेच नकोय" आणि इतर फिल्मी मॉडर्न मुलींचे ड्वायलॉग मारते ना? तसेच मुली मोठ्या झाल्या की वाईट सवयी लागू नये म्हणून भारतात येणे हा एक विनोदच आहे. हृतिक म्हणे कोणत्यातरी डॉट कॉम मधे असतो ना? '९९ मधे वेब साईट मुळे प्रसिद्ध असणार्या (आणि त्याशिवाय दुसरे काहीच नव्हते हे नंतर निष्पन्न झालेल्या) कंपन्यांना डॉट कॉम म्हणायची पद्धत होती पण जसे वर्षानुवर्षे आपल्या कडे नोकरी करत असलेल्या ड्रायवर ला "ड्रायवर गाडी रोको" म्हणणार नाहीत तसे लोक स्वत:च्या कंपनीचे नाव न घेता नुसतेच डॉट कॉम कसे म्हणतील असा प्रश्न प्रत्येक वेळा तो शब्द ऐकताना पडला होता. ए ली रे ए ली आणि टायटल सॉंग खरे म्हणजे चांगल्या चाली शब्दांमुळे वाया गेल्या (आणि दिल मिले हे बरे वाटले होते). "ओये ओये कोई देखे मेरी ये अटखेली" अशी गहन अर्थपूर्ण वाक्ये असलेले हे गाणे "शब्द वगळले तर श्रवणीय आहे" पुन्हा "बाते भूल जाती है यादे याद आती है" हा "बाते" आणि "यादे" मधी मूलभूत फरक ऐकून ज्ञानात भर पडली. हे चित्रपटात दूरदर्शन वरच्या क्रिकेट मॅच च्या दरम्यानच्या जाहिरातींसारखे दर दोन मिनिटांनी वाजते. एवढे होऊन कमी पडले म्हणून एकदा घईसाहेब गद्यात आपल्याला सांगतात. पण हा चित्रपट लोक विसरल्यामुळे याचे नाव यादे च्या ऐवजी "बाते" हवे होते ते मलेशियातील सायकलिंग ही अफाट होते आता नीट आठवत नाही. तो यशस्वी काका म्हणजे अमरीश पुरी का? आणि शेवटी ते मर्जर साठी आलेले शेअर होल्डर्स सुद्धा हिरवे आणि लाल वगैरे निशाण घेऊन कधी हे तर कधी ते दाखवत बसतात. मग शेवटी काय होते लक्षात नाही, शेअरहोल्डर्स ची मान्यता मिळाल्यावर लग्न होते काय? करीना चा असा एखादा चित्रपट आहे का की जो अ. आणि अ. नाही?
|
श्र भन्नाट .. ..
|
Maanus
| |
| Thursday, March 27, 2008 - 3:28 am: |
| 
|
.. .. .. ..
|
Kedar123
| |
| Thursday, March 27, 2008 - 3:43 am: |
| 
|
जबरदस्त लिहीलय श्र. एकदम धमाल
|
Giriraj
| |
| Thursday, March 27, 2008 - 4:19 am: |
| 
|
श्र,हे सगळं लिहितांना स्वतचं हसू आवरतं का? नसेल तर इतकं लिहून होतं कसं? जबरी!
|
Mi_anu
| |
| Thursday, March 27, 2008 - 4:41 am: |
| 
|
छान लिहिले आहे. यादे ची गाणी तशी चांगली होती. त्यातले ज्याकी श्रॉफ कोकाकोला ची जाहिरात केल्यासारखे कोक चा टिन कुरवाळत गाणे म्हणतो आणि ह्रितिक आणि कोरस 'वाहे रे वाहे झुम झुम झुम ' असे काहीतरी म्हणतो ते अजून आठवते. आणि एली रे एलीमध्ये तिन्ही बहिणी नाचत नाचत 'तुरुतु, तुरुरु तुरुरु तुरुरु' च्या वेळी आपला पृष्ठभाग बराच वेळ दर्शकांसमोर हलवतात तेही नाईलाजाने आठवले. या चित्रपटात ज्याकी आणि कुटुंब नक्की कोणत्या वेळी कोणत्या देशात आहे, मुली कोणत्या देशात सासरी आहेत, ह्रितिक वाटेल तसा भारत आणि लंडनमधे आट्यापाट्या खेळून 'इश्क मुहब्बत डॉट कॉम' चा कारभार नक्की कधी सांभाळतो हा प्रश्न पडतो. एकंदर चित्रपटाने परदेशात बराच धंदा केला असे ऐकले होते. चांगली गाणी आणि ह्रितिक या मिश्रणाचा परिस बर्याच सुमार कथावाल्या चित्रपटांचे सोने करत असावा.
|
Shraddhak
| |
| Thursday, March 27, 2008 - 9:33 am: |
| 
|
श्रद्धा, पुढच्या वेळेपासून संक्षिप्त नावे देत जा<<<< संक्षिप्त नाव ' मोनिश्का ' . :-P सायो, मैत्रेयी... नाही, मी पुन्हा तो सिनेमा बघत नाही लिहिण्याआधी. हां पर मै इस जुर्म का इकबाल ( ?) करती हूं की मैने पहले वो सिनेमा ३ / ४ बार देखा है. ( " छे, फ़ारच अचाट नि अतर्क्य... काय अर्थच नाही " म्हणत तीन चार वेळा पाहायचा म्हणजे फ़ारच झालं ना!) लोक्स, धन्यवाद. आणि नवीन नवीन सिनेमांच्या फर्मायशी येताहेत, तर आपण हितगुज पोल घ्यायचं का त्यावर? :-P
|
Anaghavn
| |
| Thursday, March 27, 2008 - 9:55 am: |
| 
|
श्रध्दा, मस्तच. पण लोकहो हे एली रे एली काय आहे? अनघा
|
Shraddhak
| |
| Thursday, March 27, 2008 - 10:14 am: |
| 
|
अनघा, ' एली रे एली ' असे गाण्याचे शब्द आहेत. ' एली रे एली क्या है ये पहेली ऐसा वैसा कुछ क्यूं होता है सहेली... मेरी अंगडाईयां ( हरे राम! [वि. सू. हे माझे उद्गार आहेत. गाण्यातले नाहीत.]) मेरी तनहाईयां... कितनी अकेली... असल्या काहीतरी भीषण शब्दांनी बनलेलं गाणं आहे यादेंमध्ये. आणि दिल मिले हे बरे वाटले होते). <<<<< पण चित्रित काय भयाण केलंय. मध्येच करीनाच्या डोळ्यांत फ़रक झाल्यासारखे तिला एकाचे दहा, दहाचे शंभर हृतिक नाचताना दिसायला लागतात. ' इस इश्कमे ऐसी आग लगेऽऽऽ ' म्हणत तो सरदार शेकोटीपाशी लोळताना दिसतो. मध्येच हृतिक करीना अंतराळात नाचताना दिसतात. आणि करीनाने अंतराळवीरांगनेचा तसेच हृतिकने अंतराळवीराचा डिझायनर पोशाख घातलेला असतो. ते ' ऐ दिल, दिल की दुनियामे ऐसा हाल भी होता है... ' जरा बरे वाटते तर मध्येच ते किंचाळून शिव्याशाप दिल्यासारखे केल्याने गाणे ऐकावेसे वाटत नाही. ( तूनेऽऽऽ..... मुझसेऽऽऽ.... वफा नही कीऽऽऽऽ तुझको कैसे वफा मिलेगी? तूनेऽऽऽ.... मुझकोऽऽऽ.... दर्द दिया हैऽऽऽऽ तुझको कैसे दवा मिलेगी?; इत्यादी)
|
Itgirl
| |
| Thursday, March 27, 2008 - 10:31 am: |
| 
|
..तूनेऽऽऽ.... मुझकोऽऽऽ.... दर्द दिया हैऽऽऽऽ तुझको कैसे दवा मिलेगी?; ....
|
Swa_26
| |
| Thursday, March 27, 2008 - 11:21 am: |
| 
|
मध्येच करीनाच्या डोळ्यांत फ़रक झाल्यासारखे तिला एकाचे दहा, दहाचे शंभर हृतिक नाचताना दिसायला लागतात. >>>>> आईशप्पथ श्रद्धे.... .. ... .
|
Asami
| |
| Thursday, March 27, 2008 - 6:53 pm: |
| 
|
' इस इश्कमे ऐसी आग लगेऽऽऽ ' म्हणत तो सरदार शेकोटीपाशी लोळताना दिसतो.>इश्कात आग लागली असेल म्हणून ग बाकी अमोलला अनुमोदन चांगल्या चाली फ़ुकट गेल्यात. घई special !!!
|
Manuswini
| |
| Thursday, March 27, 2008 - 7:26 pm: |
| 
|
अरे बापरे! नाव ठेवत एकच 'अचाट' चित्रपट चार वेळा बघणे म्हणजे अतीच हां तरीच एवढे तपशील लक्षात. श्र, दिवे घे हां. ह्याच्यावरून आठवले, माझी एक मैत्रीण जोड्याने(प्रेमजोडी अर्थात) जायची कीतीही अचाट मूवी असला तरी चार चार वेळा पाहायला.
|
Storvi
| |
| Thursday, March 27, 2008 - 9:22 pm: |
| 
|
>>माझी एक मैत्रीण जोड्याने(प्रेमजोडी अर्थात) जायची>>जोडी ने गेल्यावर असल्या भिषण सिनेम्याला नेल्याबद्दल जोडीदार जोडे हाणतो म्हणुन जोड्याने म्हणालीस का? 
|
Asami
| |
| Thursday, March 27, 2008 - 9:24 pm: |
| 
|
माझी एक मैत्रीण जोड्याने(प्रेमजोडी अर्थात) जायची कीतीही अचाट मूवी असला तरी चार चार वेळा पाहायला>>जोडा म्हटले त्यातच सर्व आले ना
|
Manuswini
| |
| Thursday, March 27, 2008 - 10:02 pm: |
| 
|
हो पण मला हे सांगायचे होते की ते GF-BF असताना. छ्या! माझे मराठी कधी कधी मार खाते. . ते लग्न झाले नसताना 'दील' रखना पडता है बहुतेक. मग चार काय दहा वेळा ते 'यादे' बघतील. आणि मूवी कसा का असेना, त्याना(जोड्याना) काय फरक पडतो? स्टो, lol
|
माझी एक मैत्रीण जोड्याने(प्रेमजोडी अर्थात) जायची कीतीही अचाट मूवी असला तरी चार चार वेळा पाहायला तीच खरी चतुर म्हणायला हवी. असल्या अचाट मूवीला गर्दी अजिबात नसते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|