Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 25, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » मै प्रेम की दिवानी हूं! » Archive through March 25, 2008 « Previous Next »

Ajjuka
Friday, March 21, 2008 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतका सुंदर सिनेमा ना.. पाह्यला आणि अगदी धन्य झाले.
अगदी नावापासूनच दिग्दर्शकाची बुद्धिमत्ता दिसून येते हो.
असं कॉय करतॉ.. सिनेमाच्या नावातच श्लेष नाही का!! (इंग्लिश मिडियमचे दिसताय श्लेष अलंकार माहीत नाही मेला!!). प्रेम की दिवानी म्हणजे प्रेम्/ प्यार इत्यादी गोष्टीची आणि प्रेम नं १ व प्रेम नं २ ची पण कसलं सॉल्लिड डोकं आहे राव. जमेल का दुसर्‍या कोणाला!!
(नमनाचं घडाभर ओतून झालं आता पुढे!)
तर एक कॉन्वेंटची शाळा असते. फक्त मुलींची. तिथल्या शिक्षिका बर्‍याचश्या संतीणी असतात. मुली पण अगदी गो SSSSS ड असतात. पापण्यांची झपझप, तोंडांचे चंबू कित्ती गोड गं बाई!
तर यांच्या शाळेचा सेंडॉफ असतो. कसला भारी सेंडॉफ हो. पार्टीच मोठी.
नाहीतर आमचा हुजूरपागेचा सेंडॉफ.. हुशार हुशार मुली शाळेची मान नुसती उंच करण्यासाठी टपलेल्या असल्यासारखी भाषणं ठोकत होत्या आणि बाकी काही रडतही होत्या. पण मजा म्हणून अशी कायच नाय! ना नाच ना गाणी
पण या पार्टीत मात्र या मुली नाच करून दाखवतात. तो पण कसला भारी.
'पापा की परी हू मै!' कित्ती गो SSS ड.
आणि हो ती करीना नाच करून दाखवायच्या आधी काय सांगते की आता पुढची वाट लग्नाची आहे. बधा कॉन्व्हेंटमधली असून चाड आहे संस्कृतीची. उगाच करीअर, पुढचं शिक्षण याच्या मागे नाही लागत बसत.
अरे हो एक राह्यलंच अगदीच काही शाळेनंतर लग्गेच नाही हं लग्न. ती शाळा नसतेच खरंतर ते कॉलेज असतं पण त्या एवढ्या संतीणी दिसल्यामुळे मला वाटलं शाळा.
तर मुलगी मॅट्रिक नाही ग्रॅज्युएट झाल्यावर लग्नाचा विचार करतेय बरंका! अगदी आजच्या काळाला साजेसं हो!
अशी सगळी पार्टी करून घरी आल्यावर त्या लेकीच्या मातेला मुलीच्या लग्नाची स्वप्ने पडू लागतात. आणि मोठ्या लेकीचा फोन येतो. धाकटीसाठी रिश्त्याचं बघितलंय. मुलगा पैसेवाला आहे. भारतातला बिझनेस बघायला भारतात येतोय आणि तेही आपल्याच गावात तर धाकटीचं सूत जुळवून द्या. (किती ती आदर्श भारतीय कन्या सूत पण स्वतःचं स्वतः जुळवायला जात नाही)
इतकी छान आनंदाची बातमी कळल्यावर मातेला गगन ठेंगणे होईल तर नवल नाही. त्यामुळे प्रेम नं १ च्या आगमनासाठी काय करू आणि काय नको असं तिला होतं. मग ते ती मुलीला सांगते.
मग त्या मुलीला अचानक काय होतं माहीत नाही अचानक लग्न करायचं नाही म्हणू लागते. पण ही माता पण काही साधीसुधी नाहीये चांगली हिमानी शिवपुरी आहे हिन्मनी शिवपुरी!
चट मुलीला लायनीवर आणायच्या तयारीला लागते. मुलीला लाजायचं शिक्षण देते. मुलीचं जीन्स घालणं बंद करते. गाण्याची प्रॅक्टीस करायला लावते.
बिचारी एकटी बाइ कुठे नी किती खपेल. नवरा तर काहीच म्हणत नसतो. अधून मधून लेकीन, पर असे उद्गार टाकून नाट मात्र लावत असतो. आणि मुलगी येताजाता त्याच्या गळ्यात पडत असते. (एवडई घोडी झाली तरी बापाच्या अंगाशी करते.. लाज नाही मेलीला!) पण तएरे बाई नेटाने हे लग्न पार पाडायच्या मगे लागते.
अरे हो यांच्या घरामधे एक गो SSSS ड पंचरंगी पोपट असतो कार्टून मधल्या सारखा. तो मात्र या बाईच्या बाजूचा असतो.
तर होता होता प्रेम नं १ येण्याचा दिवस उजाडतो.

क्रमशः!


Sayonara
Friday, March 21, 2008 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच सुरुवात झालीये अज्जुका. येऊ दे पुढचं

Zakki
Friday, March 21, 2008 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, हे बाहेरगावाहून येणारा प्रेम नं १ नि प्रेम नं २ म्हणजे मागे अमोल पालेकरचा एक चित्रपट आला होता, ज्यात गोरी तेरा गाव बडा प्यारा, हे गाणे होते, तसा तर नाही ना? म्हणजे पहिल्या प्रेमलाच सगळे 'खरा' प्रेम समजतात, मग खरा प्रेम येतो नि काय काय होते, तोपर्यंत मला छान झोप लागते ती चित्रपट संपल्यावर उठा आता म्हणेस्तवर!

Ajjuka
Friday, March 21, 2008 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलले!! फोडलं ना सगळं!!

Ajjuka
Friday, March 21, 2008 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर पुढे..
तर होता होता प्रेम नं १ येण्याचा दिवस उजाडतो.
तो येतो मग त्याला बघून ती चहाटळ पोरगी तोंडासमोर दोन हात धरून लाजून दाखवते, अगदी डोळे चकणे करून नी एक दात काळा करून. कित्ती गमतीशीर स्वभाव म्हणायचा तो!
पण आपला प्रेम नं १ ते सगळं नजरेआड करतो.
ती मुद्दामून बेसूर गाते तो छान छान म्हणतो.
मातेच्या स्वैपाकाची स्तुती करतो.
आल्या आल्या एकदम त्या मातेला पार म्हणजे पारच जिंकूनच टाकतो.
मग त्याला शहरात फिरवण्याची जबाबदारी करीनावर येते.
तिच्या शाळेच्या फंक्शनला पण तो उपस्थित रहातो.
त्या शाळेतल्या बाईंशी पण इतकं गोड बोलतो ना की अगदी गहिवरायला होतं हो!
पण नुसतंच सगळं गोड गोड नाहीये हं. अधूनमधून करीना मात्र कधी त्याला चिडव, कधी त्याची गंमत कर, कधी त्याच्याशी वाद घाल असं काय काय करत असतेच.
तिच्या आवडीनिवडी आणि त्याच्या आवडीनिवडी अजिबात जुळत नाहीयेत हा साक्षात्कार तिला झालेला असतोच (करायच्यात काय जुळून! त्यानं काही अडत नाही संसारात असं वरच्या काकू म्हणाल्या होत्या!)
असं थोडंस खारट आंबट चवीचं पण आहे हो सिनेमात.
एव्हाना होतं असं आवडीनिवडी सारख्या यःकश्चित गोष्टी बाजूला सारून करीना त्याच्या प्रेमात पडते आणि तोही तिच्या. मातेने जावई म्हणून त्याला निश्चित केलेला असतोच पण चक्क बाबाही लेकीन किंवा पर असं काही म्हणत नाहीत.
मग करीना आणि मातेचं लाजणं आणि डोळ्यात पाणी आणणं respectively होतं.
आ SSS णि तडीताघात व्हावा तसा मोठ्या लेकीचा फोन येतो.
ती सांगते प्रेम नं १ च्या शेड्यूलमधे बदल झालाय आणि त्यामुळे तो आता उद्या पोचेल.
इकडे मातेच्या पायाखालची जमीन सरकते. आभाळ फिरतं. कोण हा बहुरूपी ज्याने माझ्या डोळ्यात धूळ फेकली, कोण हा बहुरूपी ज्याने माझ्या मुलीला नादाला लावलं!
दुःख दुःख दुःख... (अगदी डोळे भरून आले हो!)
तर ते बाबा म्हणतात काहीतरी गैरसमज झाला असेल. म्हणजे लेकीन आणि पर!
तर ते त्याला भेटतात तेव्हा त्यांना कळतं की हा प्रेम नं २ आहे. प्रेम नं १ च्या हपिसात कामाला आहे. आणि प्रेम नं १ नेच त्याला इथे लवकर पाठवलंय आणि प्रेम नं १ च्या येण्याच्या नादात आपणच खत्री करून घेतली नाही. त्यांना बरं वाटतं.
इथे दिग्दर्शकाचं कसब दिसतं हो! बडजात्या भावोजी कित्ती हुशार तुम्मी!
श्रीमंत जावई गमावला म्हणून मातेचा शोक वाढतच जातो.
प्रेम नं २ नेहमीप्रमाणे लाडीगोडी करायला जातो मातेशी तर ती माता स्वतःच्या हाताने बनवलेले स्पेशल sandwitches पण त्याला देत नाही.
करीनाला तिने सांगितलेलं असतं की तू त्याच्याशी मैत्री तोड. खर्‍या खर्‍Yआ प्रेम नं १ शी तुझं लग्न होईल म्हणून(आईचं हृदय ते, मुलगी गरीबाघरी पडलेली कसं बघावं त्या माउलीने!). त्यामुळे करीना सतत डोळे मोठे करून त्याच्याकडे पहात असते. प्रेम नं १ च्या येण्याच्या आनंदात्प्रेम नं २ च्य अते लक्षातही येत नाही.
प्रेम नं १ येतो. त्याला पहिल्या भेटीतच रडवेली करीना आवडते.
मग अचानक लक्षात येतं प्रेम नं १ आणि करीनाच्या आवडीनिवडी सारख्याच आहेत.
आणि इतकं असूनही तिला तो प्रेम नं २ च आवडत असतो. आहे की नाही नाठाळ पोरगी.
खरंच ग बाई दिवानी!! (ब. भाउजी कित्ती कित्ती हुशार हो तुम्मी!)
मग पेर्म नं १ आणि करीनाचं लग्न ठरतं. साखरपुड्याच्या दिवशी ती प्रेम नं २ ला भेटायला जाते. तो म्हणतो की मेरा बॉस मेरा सब कुछ है. मी त्याला दुखवू शकत नाही इत्यादी. आणि ती त्याला सांगते की तू आज इतके वाजेपर्यंत ये आणि मला घेऊन जा. काय करणार प्रेमाने आंधळी झाली ना मुलगी!
मग तेवढे वाजत आलेले दिसतात आणि सजलेली करीना दिसते.
मग अचानक प्रेम नं १ आणि करीना बदाम बदाम बदाम असं चित्र काढताना दिसतात आणि बक्षिसही मिळवतात.
मग ती अर्थातच breaking news बनते त्यामुळे चॅनेलवाले त्यांना विचारतात की प्रेम नं १ तुमचं हिच्यावर प्रेम आहे पण हिचं लग्न तर प्रेम नं २ शी झालंय हे कसं काय?
तेव्हा आपल्याला कळतं की ते तेवढे वाजायच्या आधी तो प्रेम नं २ येऊन पोचला होता.
मग प्रेम नं १ गो SSS ड हसू फेकतो. आणि सिनेमा संअपतो.
कित्ती progressive दाखवलीये ही करीना. आपल्यावर प्रेम करणारे दोन पुरूष अगदी आजूबाजूला. एक नवरा आणि एक आवडीनिवडी सारख्या असणार्‍आ मित्र. कश्श्याची म्हणून कमी नाही!
गोड तरी progressive असा हा चित्रपट बघून मला तर बाई बडजात्या भावोजींचे पायच धरावेसे वाटले होते!!


Mrinmayee
Friday, March 21, 2008 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच! वाचून मज्जा आली!
बदाम बदाम बदाम.. लई भारी!!!
तो म्हणतो की मेरा बॉस मेरा सब कुछ है... बराच प्रोग्रेसिव्ह सिनेमा!:-)


Upas
Friday, March 21, 2008 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जूका..
मी म्हणणारच होतो हा तर अमोले पालेकरचा चितचोर.. पण प्रकोपभयाने गप्प बसलो :-O
इतकं copy cat कसं असू शकतं कोणी..


Zakki
Friday, March 21, 2008 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा अंदाज बरोबर होता. पण फोडायला नको होता.

पण अर्थातच तो आमच्याकाळचा चित्रपट (चितचोर). तो कुणि पाहिला नसेल. शिवाय त्यात कुणि प्रेम नसतात बहुतेक. म्हणजे नवीनच की हा चित्रपट पण.

तेंव्हा झोपल्यामुले शेवटी काय झाले ते कळले नव्हते. (जणू काही माहितच नव्हते शेवटी काय होणार ते!) पण आता खात्री झाली की वाटले तसेच झाले. धन्यवाद गोष्ट इथे लिहील्याबद्दल.

असेच इथे निरनिराळ्या चित्रपटांबद्दल लिहीत जा. म्हणजे बघायची शिक्षा वाचेल!

ते वर हम साथ का काय ते लिहीले आहे ते वाचून सुद्धा गोंधळलो. चित्रपट पाह्यला पाहिजे होत. उलटी खोपडी सुलट झाली असती!


Suyog
Friday, March 21, 2008 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jayacha uphaar aani madhuricha abodh copy aahet match the following

Ankyno1
Saturday, March 22, 2008 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या सिनेमात करीना चं एक गाणं आहे....

बनी बनी बनी रे बनी....
प्रेम दिवानी बनी.....

या ऐवजी....
बनी बनी बनी रे बनी....
मै हूं बग्ज बनी....

असे शब्द असते तरी फरक पडला नसता....


Deepanjali
Monday, March 24, 2008 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या सिनेमातला तो भयानक बोलका पंचरंगी पोपट का काय होता तो कसला अचात आणि अतर्क्य प्रकार होता !
आणि ते करीनाचं सुंदरनगर तर लहानसं गाव पण अतिशय अचाट अतिशय हाय टेक !
Scuba diving, entertainment centres,bungee jumping हे खेळ तर तिथे भातुकली इतके common



Zakasrao
Monday, March 24, 2008 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण अर्थातच तो आमच्याकाळचा चित्रपट (चितचोर).>>>>
अहो त्या चितचोर मध्ये खुपच छान गाणी आहेत. :-)
बनी बनी बनी रे बनी....
मै हूं बग्ज बनी.... >>>
Scuba diving, entertainment centres,bungee jumping हे खेळ तर तिथे भातुकली इतके common >>>>>>>>>



Vinaydesai
Monday, March 24, 2008 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि त्यात ती करीना..
ती 'चमेली' (हा एकच रोल तिला जमला होता म्हणे) सारखी आयुष्यभर वेडीवाकडी तोंडे करत फिरत असते...



Nandini2911
Tuesday, March 25, 2008 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, हे लिहिल्याबद्दल धन्यवाद. बडजात्याचा पिक्चर त्यात ह्रितिक.. म्हणून पाचशे रुपयाचे तिकीटे काढून पहायला गेलेली ( First Day First Show ) :-(:-(:-(:-(

त्यामधे अजनबी ओ अजनबी गाण्यापर्यंत आम्ही पार पकलो होतो आणि इतक लोकाच्या अंगावर पॉपकॉर्न टाकणे. इत्यादि उद्योग करायला लागलो होतो.

पिक्चरपेक्षाही त्यावेळेला मारलेल्या कमेंट्स जास्त लक्षात आहेत. तो पोपट कुत्र करीनाचे विआकारण लाडिक बोलणं. ह्रितिकची over acting आणि शांत अभिषेक म्हणजे सतत रेस हरोन आलेल्या माणसासारखा चेहरा. करीनाच्या घरातले ते डोक्यात जाआरे नोकर... एक सीन झाला की गाणं गाणं संपलं की परत गाणं.. इतकी गाणी की करीना आणि ह्रितिक कपडे बदलत नाहीत. गाणं चालू असतानाच काढतात exchange करतात.

असले पिक्चर पाहून आमच्या बामविप होतील असं आम्हालाच वाटायला लागलं होतं..


Giriraj
Tuesday, March 25, 2008 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सूरज भावोजी हे राजश्रीच्या जुन्याच चित्रपटांना नव्या आणि आधुनिक आणि अतिशय महागड्या पॅकिंगमध्ये गुंडाळून पेश करतात. चितचोर हा राजश्रीचाच आहे. तसेच माधुरीपटही त्यांच्याच एका जुन्या चित्रपटाचा रिमेक आहे.. त्या चित्रपटात सचिनने 'प्रेम'ची भूमिका केलेली. नाव 'नदिया के पार'.. कोणताही अविर्भाव न दाखवणारा चांगला चित्रपट होता तो!

Farend
Tuesday, March 25, 2008 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिले आहे वर्णन :-) कोणता प्रेम कोण ते लिहिले नाही- विसरलीस, की त्याने काही फरक पडत नाही म्हणून? तो प्रेम तिच्या फंक्षन ला येतो तो फिल्मी रिवाजाप्रमाणे सर्वात नंतर येऊनही त्याचीच वाट बघत असलेल्या पहिल्या रांगेतील सर्वात मधल्या सीटवर बसतो का? हा आपला एक अन्दाज कारण बडजात्या वगैरे यात काही वेगळेपणा दाखवतील असे वाटत नाही.

आणि हा हृतिक वाला काय? मी समजत होतो की अभिषेक आणि अक्षय कुमार. मग बहुधा धडकन आणि याची गडबड झाली माझ्या डोक्यात. दोन्ही पाहिलेले नाहीत फक्त येथे दर शनिवारी सतत आदळत होते 'नमस्ते अमेरिका' सारख्या कार्यक्रमातून त्यावेळी.

हृतिक चे नाच वगैरे कसे आहेत? नुसता इकडून तिकडे जात असला तरी वेगवेगळे अंगविक्षेप करत नाचत जायची त्याची सवय यात ही असेलच ना?

करीनाचा तर सगळ्यात इरिटेटिंग रोल कोणता यावर वेगळा बीबी काढता येईल. " Whatever " कभी खुशी कभी गम पहिला असेल बहुधा.

त्यामानाने चितचोर काय मस्त होता? बहुधा तोही राजश्री चाच होता ना?


Nandini2911
Tuesday, March 25, 2008 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेड़, तो हा मैने भी प्यार किया है... त्यात करिष्मा होती. तो ए भयाण चित्रपट आहे.
चितचोर राजश्रीचाच होता. बाय द वे, OSO मधे बडजात्याची सही टिंगल उडवली होती. :-)

यामधे ह्रितिक नाचला असता तर चालले असते. विनाकारण काहीतरी स्कूबा डायव्हिंग हॉर्स र्‍अयडिंग वगैरे करत चिवित्र भाव देत बसतो. त्याला पाहणं म्हणजे वैताग ठरतं (हे मी बोलतेय... लक्षात घ्या :-):-):-)


Ajjuka
Tuesday, March 25, 2008 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारेंडा,
अरे खूप दिवस झालेत बघून त्यामुळे अनेक तपशील सुटलेत.
पण प्रेम नं १ म्हणजे खरा खुरा पैसेवाला प्रेम म्हणजे अभिषेक आणि प्रेम नं २ म्हणजे डॉक्यात जाइल इतका मनमिळावू प्रेम म्हणजे हृतिक. (डॉक्यात ही शुद्धलेखनाची चूक नसून. डोक्यात चे superlative समजावे!)

कभी खुशी कभी गम!!
करेक्ट.. मी वाटच पहात होते या जोहरपटाची कुणी आठवण काढेल याची. आगामी आकर्षण तेच असायला हवे इतका अचाट अतर्क्य आणि भयावह गोSSSSड आहे!


Shraddhak
Tuesday, March 25, 2008 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, अगदी LOL .

तर यांच्या शाळेचा सेंडॉफ असतो. कसला भारी सेंडॉफ हो. पार्टीच मोठी.
नाहीतर आमचा हुजूरपागेचा सेंडॉफ.. हुशार हुशार मुली शाळेची मान नुसती उंच करण्यासाठी टपलेल्या असल्यासारखी भाषणं ठोकत होत्या आणि बाकी काही रडतही होत्या. पण मजा म्हणून अशी कायच नाय! ना नाच ना गाणी
पण या पार्टीत मात्र या मुली नाच करून दाखवतात. तो पण कसला भारी.
'पापा की परी हू मै!' कित्ती गो SSS ड.
आणि हो ती करीना नाच करून दाखवायच्या आधी काय सांगते की आता पुढची वाट लग्नाची आहे.<<<<<
मृदुलताई पण यांच्याच शाळेतली असणार. ( सिनेमातल्या) करीनालाही ' माणूस ' भेटला असता तर ' मै प्रेम की दीवानी हूं ' घडलाच नसता. केवढे हे करीनाचे सुदैव.

आम्ही मैत्रिणी पण रविवारच्या संध्याकाळच्या शोला गेलो नि लगेच तिकिटे मिळाली यावरून काय ते समजायला हवे होते. पण नाही. ' विनाशकाले विपरीत बुद्धी ' ते हेच!

हृतिक केवळ डोक्यात जातो आणि त्या करीनाच्या मैत्रिणीही. प्रेम नं २ ला ' लव ( म्हणजे इंग्रजी प्रेम! लव कुश वाला लव नाही) भैया ' म्हणणे म्हणजे केवळ संतापजनक. हृतिक हा चांगला मुलगा आहे की नाही यासाठी त्याच्या हाता पायांची, डोळ्यांची (?) तपासणी करणे, मग त्याच्या चारित्र्याची तपासणी करणे, इत्यादी महान प्रकार! नंतर मैत्रिणींची त्याच्याबद्दल खात्री पटल्यावर त्यांनी सारखे करीनाला त्याच्या दिशेने ढकलणे!

बडजात्या अंकलने करीनाला सिनेमात घेतले पण पूर्ण सिनेमात अंगभर कपडे घालून का ती वावरणार? एरवी संस्कृतीचे गोडवे गाणार्‍या ब. अंकलने मग ' ओ अजनबी ' ( रोमॅंटिक मूड) हे गाणे घुसडले. पण म्हणून सुंदरनगर या हिलस्टेशनला समुद्र????????????? ( तिथल्या पोरांना शाळेत भूगोलाच्या पुस्तकात ' सुंदरनगर: समुद्रसपाटीपासून ० किमी उंचीवर असलेले थंड हवेचे पर्वतीय ठिकाण ' असले वाचावे लागत असेल. मग असले शिक्षण देणार्‍या तिथल्या कॉलेजात शिकलेल्या मुलींना नोकरी मिळण्याची शक्यता खुंटल्याने लग्नाची वाट बघत बसणे आले.) आणि बहिणीला जीजी म्हणणारी ही सोज्वळ बडजात्यापटकुलीन बालिका तिथे रात्री उशिरा जाऊन काय काय करते.

हृतिक रोशनच्या चेहर्‍यावर कायम विनोदी पात्रासारखे हसू! भयंकर ओव्हर ऍक्टिन्ग! साधे हॉलमधून स्वयंपाकघरात जायचे तेही धावत धावत. प्रेमव्याकुळ भाव चेहर्‍यावर आणताना पोटशूळ उठल्यासारखा चेहरा! अरेरे अरेरे!

लव्हबोट का असल्याच कुठल्यातरी चीप नावाच्या हॉटेलचा तो सेमि आंधळा मालक नि त्याची ती सेक्रेटरी...

रीमा लागू आणि हिमानी शिवपुरी या सार्‍याला सरावलेल्याच आहेत त्यामुळे त्या आपली भूमिका विनातक्रार पार पाडतात. पण बाकीच्यांचं काय? त्यांना असल्या सिनेमात काम करायची अवदसा का आठवली असावी?

असो. लिहावे तेवढे थोडे....


Psg
Tuesday, March 25, 2008 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंय.. अगदीऽऽऽऽ बोर चित्रपट!! बडजात्या आणि ही आख्खी सुपरस्टार टीम कोणाच्या जादूटोण्याखाली होते की काय नकळे हा सिनेमा करताना :P ते सुंदरनगरच अचाट आणि अतर्क्य आहे.. डीजे म्हणली तसं बन्जी जंपिंग, समुद्र सगळं एकाच ठिकाणी सेवेस हजर!!! आणि ती करीना काय विचित्र चेहरे आणि हालचाली करत असते सारखी? हृथिक आणि अभिषेक या सिनेमात एकत्र असूनही आवडले नाहीत! :-( नंतर तर अभिषेकला सांगावेसे वाटते, लेका तुझी होणारी बायको घेऊन जातोय तो, आता तरी तोंड उघडून बोल की गड्या! नुस्तं हसत, सॉरी स्मित करत बसलाय! बावळट्ट! पंकज कपूरनी हा बापाचा रोल का केला असावा याचं उत्तर त्याला तरी मिळालं असेल का? बिचारा!

बरं, क्लायमॅक्सला हातावरच्या टॅटूमुळे काहीतरी गुपित उघडं पडतं ना की खोटा प्रेम नं १ आणि करीनाचं सूत जुळलंय ते??? नक्की काय सीन आहे तो, आठवतोय? तोपर्यंत सहनशक्ति संपुष्टात आली होती त्यामुळे तो सीन अंधुकसाच आठवतोय


आपल्यावर प्रेम करणारे दोन पुरूष अगदी आजूबाजूला. एक नवरा आणि एक आवडीनिवडी सारख्या असणार्‍आ मित्र. कश्श्याची म्हणून कमी नाही!
हे जबरी लिहिलं आहेस अज्जुका! हाऊ लक्की शी इज नो???? ह्म्म्म्म्म्म्म्म्म

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators