|
Gs1
| |
| Monday, March 24, 2008 - 12:54 pm: |
|
|
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद, शनिवारी महिमंडणगडाला कोण कोण येणार आहेत त्यांनी लवकर हात वर करा...
|
Dineshvs
| |
| Monday, March 24, 2008 - 4:44 pm: |
|
|
जी एस, जरा मार्ग आणि कार्यक्रम इथे पोस्ट कर. म्हणजे ठरवता येईल.
|
Ashbaby
| |
| Tuesday, March 25, 2008 - 5:06 am: |
|
|
जीएस, आमचे हात वरच आहेत. सोबत गाडीही आहे. त्यामुळे, मुंबईहुन (म्हणजे बेलापूर) अजुन तिघांना बरोबर घेऊ शकतो. कोणी असल्यास कळवावे. साधना
|
Gs1
| |
| Tuesday, March 25, 2008 - 5:30 am: |
|
|
महिमंडणगड कार्यक्रम. सध्य एकूण जमलेले लोक बघता मुंबईहून एक आणि पुण्याहून एक अशा दोन गाड्या निघतील शनिवारी सायंकाळी. मुंबईला पुरेसे लोक नाही जमले तर पुण्याला यायचे ठरवावे लागेल. रात्री दहाच्या आत खेड [चिपळूणच्या अलिकडचे] येथे पोहोचता येईल असे बघावे. जेवणाची सोय वाटेत बघावी. रात्रीच घाट चढून महिमंडणगडाच्या पायथ्याशी कोयनेच्या जंगलातल्या शिंदी या गावात जायचे आहे. तिथेच देवळात मुक्काम. पहाटे उठून महिमंडणगड, नंतर चकदेव. सगळा जंगलाचाच भाग आहे. तिथून ज्यांना कोकणात पायी खाली उतरायचे आहे ते शिडीच्या वाटेने उतरतील. बाकीचे गाडी घेऊन पायथ्याशी पोहोचतील. सायंकाळी खेडहून निघून रात्रीपर्यंत आपापल्या घरी परत. शूज, सॅक, टॉर्च, पाणी, पांघरूण अत्यावश्यक.प्रत्येकाने थोडे स्वयंपाकाचे साहित्य बरोबर आणावे लागेल ते कळवतो.
|
मी येऊ का??? चार शब्द
|
Giriraj
| |
| Tuesday, March 25, 2008 - 7:08 am: |
|
|
दोन अटी: १) एकमताने जे ठरेल ते ऐकावे लागेल! २) डोळे उघडून यावे लागेल!
|
मी गांधारीसारखं डोळ्यावर पट्टी बांधून येणार होते. गिरीच्या या अटीने माझी भारीच पंचाईत झालिये. जी एस, मी सध्या आईबाबाबरोबर राहत असल्याने शूज सॅक पाणी खाऊ इत्यादि गोष्टी मला घरात सापडतील (नाही सापडल्या तर आई शोधून देइल. ) साधना, बेलापूरमधे कुठे राहतेस? मी सेक्टर पंधराला दोन वर्षं होते.
|
Ashbaby
| |
| Tuesday, March 25, 2008 - 9:57 am: |
|
|
नंदिनी, मी बेलापुरवासीय नावाचीच आहे. माझे सेक्टर २१-२२ (आयकर वसाहत) पारसिक हिल च्या तळाला आहे. त्यामुळे बेलापुर आणि नेरुळच्या सीमारेषेवर आहे मी. मागे एकदा कर्नाळ्याचा ट्रेक होता तेव्हा बोललो होतो आपण, पण आम्हाला यायला जमले नाही त्या ट्रेकला शेवटी. आता महीमंडणला भेटुच... साधना
|
Upas
| |
| Tuesday, March 25, 2008 - 6:21 pm: |
|
|
जी. एस. मस्तच रे.. धमाल करा लेको! :-)
|
कय हे gs1 इतके दिवस नाही इतके महिने मी भारतात होते तेव्हा नहि सांगितलेत हात वर करायला...आता मी दोन्ही -२ हात वर केलेत पण काय उपयोग बर जा सगळेजण मजा करुन या......मी फोन करेनच...त्या शिवाय तुमचा ट्रेक पुर्ण कसा होणार ता. क. इतके दिवस घरी होते त्यामुळे म्याव करायला पण वेळ नव्हता आता ओफिस मधे वेळच वेळ आहे
|
Itsme
| |
| Monday, March 31, 2008 - 2:47 pm: |
|
|
फोन आलाच नाही शेवटी ...
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|