|
Sheshhnag
| |
| Saturday, November 03, 2007 - 11:13 am: |
| 
|
कांदेपोहे फॉर डमीज हा हा हा हा अफलातून.
|
Anaghavn
| |
| Friday, January 11, 2008 - 7:25 am: |
| 
|
जेव्हा आणि ज्याच्या बरोबर व्हायचे असते ते अचानकच होतं. psg पटलं एकदम. नव्हे अनुभवच आहे माझा तसा. आमच लग्न ठरण्याच्या किती तरी आधी पसुनच मी आमच्या "ह्यांना" वळखत होते. पण "ह्योच तो" अस मला वाटल नव्हतं. पण तो मात्र माझ्यावर fielding लाउन होता. शेवटी त्याची प्रतिक्षा फळाला आली आणि मासोळीचा मावस भाउ गळाला लागला. आणि आता मी त्याच्या घरात राहते. त्याची वाट बघत्--म्हणजे साहेब सारखे फिरती वर असतात ना, आधी तो माझ्या वाटेकडे डोळे लाउन असायचा आता मी.
|
माझ्या एका मित्राचा किस्सा. महाशय एकदा सातार्याला मुलगी बघायला गेले होते. जाताना दोन तीन तासाचा प्रवास. मधे अधे थांबुन "फ़्रेश" होवुन जायचे सुचले नाहि. तसेच मुलीकडच्यांच्या घरि पोचले. तिथे यथोचित स्वागत झाले. पाणी, चहा, थोडा फराळ. त्यात आमच्या मित्राचा पहिलाच प्रसंग त्यामुळे तो जरा टेन्सच होता. मग जरा वेळाने दोन्हिकडच्या घरचे म्हणाले आता जरा दोघांना एकत्र राहु दे. म्हणुन घरातले सगळे जवळच्याच एका मंदिरात दर्शन करुन यावे म्हणुन निघाले. हा जाम टेन्स झालेला कारण जोरात एक नंबरला आलेली. काय करायचे कळतच नव्हते, मग महाशय तीला म्हणाले काय घर नाहि दाखविणार का आम्हाला? तिला बिचारीला कळेना इन मीन चार खोल्यांचे घर त्यात काय दाखवायचे. तरिपन नाहि कसे म्हणनार चला म्हणुन घेउन गेली बिचारी, सगळं घर दाखाविले तरि याला कळेना कि टाॅयलेट कसे नाहि घरात, मग त्याला प्रकाश पडला कि कदचित बाहेर असेल मग घरामागे बाग आहे का वगैरे विचारायला सुरुवात, मग परसबाग बघायला गेले तर तिथे कोपर्यात त्याला एकदाचे टाॅयलेट दिसले. " एक मिनिट हा आलोच" म्हणत हा पठ्ठ्या सरळ आत घुसला. बाहेर आल्यावर कशाबशा जुजबी गप्पा मारल्या इकडच्या तिकडच्या. त्यांचे लग्नहि जुळुन आले दोन्हि कडुन होकार आल्यावर. अजुनहि वहिनी आम्हाला त्याचि धांदल रंगवुन रंगवुन सांगतात. सगळ्यांसोबत कुठे बाहेर जायचे असले कि मुद्दाम विचारतात अहो निघायचे का? "काहि" राहिले आहे का परत एकदा विचार करा......
|
Ladtushar
| |
| Wednesday, January 23, 2008 - 9:25 am: |
| 
|
ह. सु. ह. सु. पु. वा. :D
|
Monakshi
| |
| Wednesday, January 23, 2008 - 10:13 am: |
| 
|
अभिजित महान मित्र आहे तुमचा आणि त्याहूनही महान तुमची वहिनी.
|
Divya
| |
| Wednesday, January 23, 2008 - 1:55 pm: |
| 
|
अभीजीत, खुप हसले, मजेशीर किस्सा. 
|
Farend
| |
| Wednesday, January 23, 2008 - 8:17 pm: |
| 
|
"काहि" राहिले आहे का परत एकदा विचार करा...... सही अभिजीत!
|
>>>> एक मिनिट हा आलोच" म्हणत हा पठ्ठ्या सरळ आत घुसला.        त्याच धाडस खरच मानल पाहीजेल! वाईट्ट, वाईट्ट परिस्थिती होते अशा वेळी! या बीबी चा विषय नाही, पण यावरुन आठवले, मी सद्ध्याच्या कम्पनीत इन्टरव्ह्युला आलो होतो १९९४ मधे, तेव्हा बराच वेळ म्हणजे काही तास मला AC रिसेप्शन मधे बसावे लागले, अशीच वेळ आलेली, पण काऊन्टरवरच्या सुन्दर रिसेप्सनिश्टला कसे बरे विचारावे की लॅटरीन कूठे आहे याची फिकीर पडल्याने मी तिला सरळ सान्गितले की मी जरा जावून येतो बाहेर, मग बाहेर अर्धा किलोमीटरवर मला माहीत असलेल्या सार्वजनिक ठिकाणी जावुन परत आलो, पुन्हा गेटपास वगैरे सोपस्कार उरकुन. ती बया माझ्या कडे विचित्र नजरेने बघत होती की याला असे काय झाले एकदम मधेच उठुन निघुन जायला! छ्या छ्या छ्या, वैर्यावर देखिल असा प्रसन्ग येवु नये!
|
Slarti
| |
| Thursday, January 24, 2008 - 5:18 am: |
| 
|
अभिजीत असे प्रसंगावधान दाखवल्यामुळेच कदाचित तुझ्या मित्राला होकार मिळाला असेल. लिंबू, तुमची झाली का हो निवड त्या कंपनीत ?
|
Amruta
| |
| Thursday, January 24, 2008 - 2:25 pm: |
| 
|
मी सद्ध्याच्या कम्पनीत इन्टरव्ह्युला आलो होतो १९९४ मधे>>> तेव्हापासुन ते त्या कंपनीला चिकटले आहेत बहुदा. पण आतातरी माहित्ये न ती जागा कुठे आहे ते? की अजुनही त्या बाहेरच्या सार्वजनीक मधे?? 
|
Yog
| |
| Thursday, January 24, 2008 - 11:39 pm: |
| 
|
>>पण काऊन्टरवरच्या सुन्दर रिसेप्सनिश्टला कसे बरे विचारावे की लॅटरीन कूठे आहे याची फिकीर पडल्याने लिम्ब्या तुझ्यासारखा मायबोलीचा mouth piece इतका भिडस्त? काय राव. 
|
Maanus
| |
| Sunday, February 03, 2008 - 9:15 pm: |
| 
|
http://www.youtube.com/watch?v=syNMlZH4XnQ .. .. .. ..
|
Psg
| |
| Monday, February 04, 2008 - 8:50 am: |
| 
|
काय सही व्हीडीयो आहे माणसा बरं तुला काय काय सापडत असतं ते! लोक तुला काहीही म्हणोत, तू फ़ारसं मनावर घेऊ नकोस, आणि नवे बीबी, चांगले व्हिडीयो, अगम्य बातम्या वगैरे देत जा आम्हाला.. उपरोधानी नाही म्हणत.. एकदम सिरीयस!
|
लींबु.. अश्या येळी कस ईचारायच म्हाईती हाय?... " व्हेर ईज रेस्टरुम म्याम " ... आस काईतरी तोंडातल्या तोंडात बडबडायच... " सेकंड डोर टो लेफ़्ट " आसल उत्तर येत.. पर तोंडातल्या तोंडात हा... आनि आस दाकवायच की जल्मान ह्ये पयल्यांदाच बगा.. मग थित जावुन उरकायच... रेष्ट रुम म्हनल की आपन बी माडर्न आन मेन प्राब्लेम बी सुटतो... फुडच्या येळला लक्षात ठीवा... टॉयलेट म्हनायचे न्हाई... रेष्ट रुम म्हनायचे.
|
धोन्डोपन्त, LOL लक्षात ठेविन बरका हा सल्ला! व्ह्येअर इज रेष्ट्ट रुम..... वा वा वा! स्लार्टी, हो झाली, अन अजुन तिथच हे! अमृता, न माहित करुन सान्गतो कुणाला? अगदी शॉप फ्लोअरवरच्या समद्या जागा पण हुडकुन हुडकुन काढुन लक्षात ठेवल्यात! योग, तस नाय रे भाऊ, पण ती रिसेप्शनिस्ट मी र्हातो त्याच्या दोन गल्ल्या पल्याडच्या गल्लीत रहाणारी होती! (तस ९४ मधे काही उपयोग नव्हता म्हणा!.... आमचे सूप आधीच वाजले होते! ) 
|
माणसा, अरे ती स्टेफी काय उत्तर देते रे अन कशाला? मला काही कळलच नाही, नुस्ती खरखर आणि गोन्गाटात किन्चाळण ऐकू आल बाकी स्टेफी दिसते क्युट हं 
|
Sheshhnag
| |
| Tuesday, February 05, 2008 - 10:29 am: |
| 
|
धमाल! ह. ह. पु. वा. पण हे सगळे `कांदापोहे अनुभव' वाटत नाहीत!? दिवे घ्या हो मंडळी!!
|
Steffi, will you marry me... . . . How much money do you have? कळले का रे लिंब्या...
|
काल ऐकलेला विनोद... मुलगी पहायला गेलेला एक वरपिता मुलीला भेटल्यावर... वरपिता: जरा तुमच्या आईला बोलवा.., वीस पंचवीस वर्षानी सून कशी दिसेल त्याच्या अंदाज येईल... मुलगी: मग थांबा, मी आज्जीला पण बोलावते... वरपिता: आज्जीला कशाला..... मुलगी: नाही, चाळीस पन्नास वर्षांनी तुमचा मुलगा वर गेल्यावर मी कशी दिसेन तेही आत्ताच बगून घ्या...
|
Zakki
| |
| Tuesday, February 05, 2008 - 4:26 pm: |
| 
|
वीस पंचवीस वर्षानी सून कशी दिसेल त्यावर दुसरे उत्तर: (मुलाच्या वडिलांकडे पाहून), शी:! म्हणजे वीस पंचवीस वर्षांनी हा तुमच्या सारखा दिसणार? (दु:खित स्वराने), आणखी काय बघायला लावशील देवा, तुलाच माहित!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|