सिनेमा: पुराना मंदिर. सामरी ( म्हणजे काय?)हा क्रूरकर्मा राजाच्या हाती सापडल्यानंतर त्याला शिक्षा फ़र्मावायचे ठरते. तेव्हा राजपुरोहित जीव तोडून सांगत असतो, ' इसे पवित्र अग्नी मे जला दो. ' तर तो राजा उगीचच ' मलाही डोके आहे निर्णय घ्यायला... ' अशा थाटात ' नको, आगीत नको. त्याचा शिरच्छेद करा नि धड पुराना मंदिराच्या बाजूला पुरा नि डोके पेटीत घालून वर त्रिशुळाचे सील लावून माझ्या राजवाड्यात पुरा ' असा हुकूम देतो. आता असे केले नसते तर पुराना मंदिर तिथेच संपला असता, हे खरे. पण असे करण्यामागे राजाचा नक्की काय विचार असतो, याचे स्पष्टीकरण देणे रामसे बंधूंनी गरजेचे समजले नाहीये. त्यांना भुताटकी दाखवायची घाई झाली असावी. 
|
Chchotu
| |
| Friday, March 14, 2008 - 8:54 am: |
| 
|
मैने प्यार किया मधील त्या गान्यात एक बेडुक पन दाखवला आहे, पन तो उड्या वगैरे मारत नाही. (कदाचीत ते काम सलमानलाच करु देत आपल्यापेक्शा चान्गले करील त्ये पोरगं असा विचार असेल त्याचा).
|
काल बनू मै तेरी मध्ये मला वाटलेच असे काहीतरी अचाट असणार, चक्क विद्या आता modern विद्या बनून सिंदूराच्या मुलाची gf , bTW काही भाग नित्य नेमाने बघत नसल्याने हा सम्राट कोण आणि तो कधी होतो सिंदूराला?? सिंदूराला आधी आणखी एक मुलगा दाखवला असतो ना जो सागरला mr ocean म्हणायचा? काय होते त्याचे नाव? मध्येच सम्राट कोण आला? जरा ह्या सीरीयलचे जे कोणी भक्त आहेत ते स्पष्ट करतील का?
|
Mbhure
| |
| Friday, March 14, 2008 - 6:14 pm: |
| 
|
काल घरी होतो. सोनीवर " मिलाप " नावाचा नाग - नागिन सिनेमा होता. बरीच "Complecation" होती; जसे आधीच नाग आणि त्यात पुनर्जन्म. ते ही शरीर(म्हणजे दिसणे वगैरे)शत्रुघ्न सिन्हाचे पण आत्मा एका नागामध्ये. पण तो नाग मरुन १०० वर्षे झाली असल्यामुळे, हा latest नाग(ज्यात तो आत्मा आहे) तो इछधारी आणि काही करु शकणारा आहे. हिरोला जब चाहे मुका किंवा आंधळा करतो..... बरेच गोंधळ. बी. आर. इशाराचा सिनेमा असुनही त्यात रेहाना सुल्तान नव्हती आणि " तसे " काहीही नव्हते. एकच सुखकर म्हणजे मुकेशचे गाणेः कई सदियों से, कई जनमों से तेरे प्यार को तरसे मेरा मन आ जा
|
Bhidesm
| |
| Saturday, March 15, 2008 - 12:45 am: |
| 
|
सर्वात भन्नाट म्हणजे 'अन्यायाचा प्रतिकार' हा चित्रपट आणि त्यातील रामदास आठवले यांचा अभिनय. कॅमेरा समोर असूनही यांची मान सतत वर, नजर एका कोपर्यात आणि एकसूरी आवाज.
|
Tonaga
| |
| Saturday, March 15, 2008 - 3:13 am: |
| 
|
याच मिलाप मध्ये बजरियाके बीच मै नजरिया चुराऊँगी, मिला तू अकेला मै गले लग जाऊँगी हे आशा भोसले यांचे सुन्दर गाणे आहे. सन्गीत ब्रिज भूषण
|
Ajjuka
| |
| Saturday, March 15, 2008 - 5:35 am: |
| 
|
सागर आणि विद्या मेल्यावर सिंदुराला एक साधू भविष्य सांगतो की तुझा अंत करणारा तुझ्याच घरात जन्माला येईल. तेवढ्यात महुवाला दिवस जातात आणि मुलगा होतो पण. महुवाचा नवरा राजीव घाबरून मूल बदलतो नाहीतर आपल्याच मुलाला सिंदुरा मारून टाकेल. राजीव सिंदुराला विनंती करतो की आम्ही तुमच्यापासुन दूर जातो. पण याला मारून टाकू नका. सिंदुरा डोळे वेडेवाकडे करून एक निर्णय घेते आणि मुलाचं नाव सम्राट ठेवते आणि राजीव व महुवा ला अट घालते की मी म्हणेन तेच तुम्ही केलं पाहिजे नाहीतर मी याला मारीन. ते मान्य करतात आणि तिथे रहातात. इकडे ज्या जोडप्याचा तो खरा मुलगा असतो ते लोक बदललेला मुलगा घेउन निघून जातात आणि राजीवला सापडत नाहीत. हा नेमका एपिसोड मी बघितला होता.. म्हणजे आता महुवा आणि राजीवचा खरा मुलगा जो त्या दुसर्या बनारसी जोडप्याकडे आहे तो आहे सागर असणार. सम्राट असाच.. आणि नवीन मॉड विद्या(तिला ते अजिबात जमत नाही! ) नवीन सागर भेटताच या सम्राटला डच्चू देणार.
|
Maitreyee
| |
| Saturday, March 15, 2008 - 11:49 am: |
| 
|
हो तो सागर अता अमर या नावाने बनारस का छोरा म्हणून येणार म्हणे हा सम्राट आहे त्याचा काहीतरी -ve रोल आहे! अन सिन्दूराचा तो लहान मुलगा, (पळून जातो म्हणे!)शालू, चिनू इ इ पात्रे गायब केली, म्हणजे कधीही कोणत्याही प्रकारे कसल्याही गेटप मधे त्यांना परत आणायला हे मोकळे काल झी वर एक रॉक एन रोल फ़्यामिली म्हणून नवा डान्स शो(?!) सुरू झाला. त्यात नाहर अन मौली हे ऍंकर्स आहेत! ती मौली कथकली चे ते नर्तक असतात ना, साधारण तेवढी ढोली दिसत होती!! मला वाटलं माझ्या टीव्ही चे सेटिन्ग बिघडले का काय म्हणून चेक केले पण नाही!!असे काय खायला घालतात ते झी वाले स्पर्धकांना!!उज्जैनी, संचिता, निहिरा, अन आता ही मौली!!
|
Sayonara
| |
| Saturday, March 15, 2008 - 12:29 pm: |
| 
|
हाहाहा अज्जुका. म्हणजे तू पण बघतेस तर सागर्-विद्या. मला विद्या त्या नवीन गेट अप मध्ये मुळीच कंफर्टेबल वाटत नाही. तिचा सोज्वळ चेहरा साडी आणि सलवार कमीझ मध्येच फीट बसतो. आणि काय तो तिचा बालीश फ्रॉक. मला वाटतं ते चाचा-चाची, शालू आणि ती चंद्रा यांना आता डच्चू द्यायला हरकत नाही. कसा आहे गं तो नवा डान्स शो? काल बघायला मिळाला नाही.
|
>> काल झी वर एक रॉक एन रोल फ़्यामिली म्हणून नवा डान्स शो.. तेवढी ढोली .. काय खायला घालतात .. श्या मला वाटलं तनुजा, काजोल असले आगाऊ लोक असताना काहीतरी सनसनाटी घडेल. हे एवढंच फक्त सांगण्यासारखं दिसतंय. मौली म्हणजे ती सारेगमप वाली दवे का? आणि सागर विद्या... कुणीतरी त्या वहिनीसाहेबवर पण लिहा की. ट्रेलरच जबरी आहे त्याचा.
|
Sayonara
| |
| Saturday, March 15, 2008 - 3:04 pm: |
| 
|
हो हो तीच मौली. म्हणजे त्या डान्स शो मध्ये काजोल आणि अजय देवगण नाहीच आहेत कां?
|
Ajjuka
| |
| Saturday, March 15, 2008 - 3:42 pm: |
| 
|
मग बघते तर.. आत्मपीडनाची हौस भारी गो बायो!! पण फक्त पुण्यात असतानाच. मुंबईत घरात टीव्ही च घेतला नाहीये अजून.. सध्या ऑफिस आणि घर एकच असल्याने ती गरजही पडली नाहीय.
|
Zakki
| |
| Saturday, March 15, 2008 - 7:03 pm: |
| 
|
सागर आणि विद्या मेल्यावर सिंदुराला एक साधू भविष्य सांगतो <.....> व्वा, काय पण अत्यंत नवीन कल्पना!! असे आपल्या इतिहासात, पुराणात, अगदी महाभारतात तरी घडले होते का? अरे हो. कोण तो 'कृष्ण नि कंस' का कोण ते? त्यांची गोष्ट याच सागर विद्या वरून चोरून घेतलेली दिसते आहे!!

|
Manuswini
| |
| Saturday, March 15, 2008 - 8:38 pm: |
| 
|
अज्जुके, धन्यवाद ग बाई, मला केवढे वाईट वाटत होते की की नेमके टर्नींग पॉंईट मी मिसला का काय आता रोज नाही हा बघत मी बाई दुसर्यासारखे पण टच ठेवते हां. असो, btw ती सिंदूरा काय मुरूमेवाली आहे. कायच्याकाय पेंट असतो नै? पण तो तीचा सक्खा मुलगा पळून जातो? ह्म्म्म म्हणजे मध्येच कोणतरी आणखी बनून येणार. ...
|
Ajjuka
| |
| Sunday, March 16, 2008 - 7:11 am: |
| 
|
सख्खा मुलगा पळून जातो हे नव्हतं मी पाह्यलं. सगळे धगे कसे अर्धवट सोडायचे म्हणजे पाहिजे तेव्हा पाहिजे तो उचलून कुठेही घुसडता येतो.. हैक्का नाय डॉक्यालिटी!! अगदी बरोबर झक्की व्यासांनी इथूनच उचलली असावी ही कल्पना!
|
Ajjuka
| |
| Sunday, March 16, 2008 - 7:13 am: |
| 
|
खरंतर 'व्यासोच्छिष्टम जगत सर्वम!' ही उक्ती अशी उलट्या बाजूने आहे हो की नाही!! (दिवे नाहीतर आबुदोस!)
|
Sayonara
| |
| Sunday, March 16, 2008 - 12:21 pm: |
| 
|
हो ना. तिचा सख्खा मुलगा 'भारत' घर सोडून जातो ना. तिचा नवरा एवढा म्हातारा दाखवलाय नी ही आहे तशीच. आत्ताच्या नवीन हेअरस्टाईल नी ब्लाऊजच्या फॅशनमध्ये अजिबात चांगली दिसत नाही ती. मनु, कधी एखादा एपिसोड मिस केलास तर इथे येऊन विचार ग. मी अजिबार मिस करत नाही. लगेच अपडेट करेन तुला. 
|
तो नाहर सात फ़ेरे मधे बराच ठोकळेबाज वाटतो त्यापेक्षा ऍंकर म्हणून बरा वाटतोय btw काही मराठी स्पर्धकांशी काजोल अन तनुजाने अगदी सहज अस्खलित मराठीत संवाद केला पण शरद केळकर उर्फ़ नाहर मात्र काही एक शब्द सुद्धा मराठी बोलला नाही!
|
D_ani
| |
| Sunday, March 16, 2008 - 6:41 pm: |
| 
|
Anchoring बरेच चांगले करतो शरद केळकर. मराठी नाही पण गुजराती (तेही चुकीचे) बोलला ना तो.
|
Sayonara
| |
| Monday, March 17, 2008 - 2:33 am: |
| 
|
मराठी लोकांनाच मराठी बोलायची लाज वाटते हाच तर आपला प्रॉब्लेम आहे ना.
|