'बनू मै' चे हे काय नवीन परवा पर्यन्त मी विद्या नी सागरला जीवंत पाहीले. त्यांचा झाडावर आपटून आक्षीजन( accident ) होतो मग आता काय मेमरी गेली काय त्यांची?? का चेहरा बदलून येतात?? दोन भागात एवढे बदल. हाय रे रामा....
|
i cant stand that स्मृती इरानी(तुलसी 'क्योंकी सास ची') डोक्यात जाते, ते डोळे मोठे करणे, भुवया वर करून तीचे सदानकदा फंडे सांगणे.
|
Mbhure
| |
| Tuesday, March 04, 2008 - 10:26 pm: |
| 
|
नाग आणि कॉफीचा संबंध काय माहित नाही पण त्यामुळे मी Starbucks मध्ये जात नाही. मी कॉफी तर पीतच नाही (हुश्श... म्हणजे नाग Catagory तुन सुटका) पण कधी केक वगैरे घ्यायलाही जाणे बंद केले. न जाणो, दुधाची कॉफी दिली म्हणुन एखादा / दी चिडलेली नाग / नागिण आपल्याला चावायची.
|
Ajjuka
| |
| Wednesday, March 05, 2008 - 3:01 am: |
| 
|
या बीबी चे सगळे पोस्टस आहेत त्या क्रमात ठेवून तशीच मालिका बनवली तरी ते लॉजिकल ठरेल इतक्या या सगळ्या मालिका अ. अ. आहेत. नाग आणि कॉफी.. ह ह पु वा!!
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 05, 2008 - 4:06 am: |
| 
|
नाग आणि कॉफ़ी सगळ्याच पोस्ट जबरा आहेत. BTW चंद्रमुखि नावाचा रजनीकांतचा एक नवीन (की जुना) पिक्चर आहे. त्याचे प्रोमोज आता येत आहेत. पाहिलेत का??? लयी भारी आहेत. नक्की बघा.
|
Hemantp
| |
| Wednesday, March 05, 2008 - 5:23 am: |
| 
|
हो, मी पाहीले ते प्रोमोज... अगदी ठरवुन बघणार मी तो.
|
Sayonara
| |
| Wednesday, March 05, 2008 - 2:33 pm: |
| 
|
मैत्रेयी, नवीन चेहर्याचे सागर्- विद्या कोण आहेत? बरे आहेत का दिसायला?
|
Prachee
| |
| Wednesday, March 05, 2008 - 2:35 pm: |
| 
|
झकासराव, हा 'चंद्रमुखी' म्हणजे 'भुलभुलैय्या' चा Original सिनेमा. 'भुलभुलैय्या' हा रीमेक होता.
|
Maitreyee
| |
| Wednesday, March 05, 2008 - 3:23 pm: |
| 
|
सायो, अग तेच सागर अन विद्या(कलाकार तेच), फ़क्त नव्या गेटप मधे असतील आता चेहरे तेच फ़क्त अवतार नवे!!
|
Apurv
| |
| Wednesday, March 05, 2008 - 4:47 pm: |
| 
|
star माझा यावरील star city बातम्या. दोन दिवसच पाहतो आहे...त्या सुद्धा अ. अ. आहेत. एक पत्रकार चक्क आनि पानि करत होता. बातम्या देणारीला धुक्याची बातमी सांगताना काय बोलायचे न कळल्याने थांबत थांबत बोलत होती आणि जे काही मनात येईल ते बडबडत होती. बोलताना तर भयंकर चूका केल्या जातात. कुठे इंग्रजी शब्दांचे मराठी करण तर कुठे इंग्रजी शब्द देवनागरीतून. काहीच ताळमेळ नाही. हेडलाइन्स अस देवनागरीतून लिहीलं होतं. ठळक बातम्या म्हणण्याचे बंद केले का? बातम्यांचे स्वरूप आणि त्यातली पोकळता हा अमेरीकेचा गुणधर्म पुर्णपणे अंगीकारला आहे.
|
Ankyno1
| |
| Thursday, March 06, 2008 - 5:29 am: |
| 
|
स्टार माझा वरच्या निवेदकांचा लाडका शब्द.... "निश्चितच..." कधीही, कुठेही, केंव्हाही, कसाही वापरतात....
|
Ashbaby
| |
| Thursday, March 06, 2008 - 6:36 am: |
| 
|
सगळ्यात मजेशीर म्हणजे, ते निवेदक जेव्हा दुस-या स्टुडिओतुन बोलणा-यांचे ऐकत असतात तेव्हा मान उभी-आडवी हलवतात.. कधीकधी लिन्क लागत नाही, दुस-या बाजूने कोणीही बोलत नसतो, पण यांचे आपले माना डोलावणे चालूच असते.
|
बापरे आत्ताच काही मिनिटे बनु मै तेरी दुल्हन पाहिला आणी काय आश्चर्य सागर आणी त्याची बायको मेली म्हणून त्या कुटुम्बाला भेटायला इतर सर्व सिरियल मधली पात्रे पान्ढरे शुभ्र कपडे घालून येतात. ह ह पु वा
|
Sayonara
| |
| Friday, March 07, 2008 - 2:15 pm: |
| 
|
हो, हल्ली झी टिव्हीवर हे नवीनच आहे.दोन आठवड्यापूर्वी मी कोणत्यातरी सिरीयलमध्ये सागर आणि विद्या मेल्याचं ऐकलं. झीवर मज्जा मज्जा बघावी तेवढी थोडीच!!!!
|
Dakshina
| |
| Wednesday, March 12, 2008 - 6:55 am: |
| 
|
अरे लिहा की हा बी बी बंद का पडलाय?
|
एक अस्सल अचाट अतर्क्य पिक्चर घ्या. दस नंबरी. सत्तरीच्या दशकात येऊन गेला. इतका आचरट पिक्चर कधी पाहिला नाही म्हणणार होतो पण इथे बरेच उमेदवार आहेत त्यामुळे राहू दे. मनोज कुमार नामक तथाकथित अभिनेता कायम काळा गॉगल व १० आकडा पाठीवर लिहिलेले ज्याकेट घालून वावरतो. ठार काळोखातही हा गॉगल का घालतो देव जाणे. आपल्याला अभिनय येत नाही हे लपवायची युगत बहुतेक! अजून कुणी पाहिलाय का हा प्राचीन नमुना?
|
Ankyno1
| |
| Thursday, March 13, 2008 - 6:47 am: |
| 
|
हो... पाहिलाय तर... त्या दहा च्या आकड्यात १ हा मोठ्या फाँट साइझ मधे तर ० जरा लहान साइझ मधे टॉप अलाइन केलेला....
|
निदान तो दहा आकडा लिहिताना सुबक लिहावा. पण नाही. बहुधा मनोज कुमारने स्वहस्ते लिहिला असेल. असो. त्यातील गाण्याची सुरवात बहुधा अशी आहे कहत कबीर सुनो भाई साधो बात कहू मैं खरी ये दुनिया एक नंबरी तो मैं दस नंबरी! संत कबीर असे काही भलते सलते म्हणाला असेल असे वाटत नाही. त्यात प्रेमनाथ नामक रेड्यासारख्या मधुर आवाजात बोलणारा इसम खलनायक आहे. त्याच्या अड्ड्यावर कायम लाल प्रकाश असतो. आणि जरा हायटेक वाटावे म्हणून चक्क रंगिबेरंगी बल्ब उगाचच चमकत ठेवलेले असतात. मग ते परदेशी तस्करांशी संधान साधणे. हिरोने तिकडे जाऊन खलनिर्दालन करणे वगैरे. अजून आठवले की भर घालीन. हा प्रकार बघून बरीच वर्षे झाली.
|
Farend
| |
| Friday, March 14, 2008 - 12:50 am: |
| 
|
अमिताभ चे चित्रपट पॉप्युलर होऊ लागल्यावर इतरही अनेक नटांनी मग कानावर केस वगैरे वाढवून action वाले रोल करणे चालू केले होते (आठवा, "खून..." वगैरे मधला सुनील दत्त) त्यापैकी वाटतो हा दस नंबरी. त्या मुकेश च्या गाण्याच्या त्या दोनच ओळी लक्षात आहेत.
|
Farend
| |
| Friday, March 14, 2008 - 12:59 am: |
| 
|
अज्जुका, मैने प्यार किया वर लिहीन तेव्हा लिहीन तोपर्यंत हे बघ त्या रेल्वे प्लॅटफॉर्म वर नाचतोय का कवायत करतोय का जमिनीखालचे पाणी शोधतोय असे वाटवणारा सलमान आणि हळदीकुंकवाला जाताना सहज उटी लेक वर आलेली भाग्यश्री आम्ही तेव्हा म्हणायचो तो प्लॅटफॉर्म वरचा खांब कुत्र्याला घाबरत नसेल एवढा सलमानला घाबरतो. या लेक जवळ एक मंदीरही निघते (जेथे फक्त बायका शाळेतील विद्यार्थ्यांसारख्या नीट जागा वगैरे सोडून एकामागोमाग एक बसलेल्या असतात), तसेच एकदम रंगपंचमी चालू ही होते आणि बरेच काय काय होते. ती एक्स्ट्रॉ मधली एक मुलगी फ्रूटी पिताना एवढी काय लाजते कळत नाही
|