Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 07, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Radiochya junya aathawani » Archive through March 07, 2008 « Previous Next »

Athak
Thursday, March 06, 2008 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुमरुतलैयासे फर्माईश करते है .....
खुपदा चौकशी केली की हे झुमरुतलय्या नक्की कुठे आहे का :-)


Marhatmoli
Thursday, March 06, 2008 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या महिन्यात देशात असताना मला नागपुर airport ला एक माणुस भेटला त्याने "मै झुमरितल्लय्यासे हु" अशि स्वत्: चि ओळख करुन दिलि. अर्थातच मी त्याला हे कुठे आल हा अनेक दिवसांपासुन छळत असलेला सनातन प्रश्न विचारला त्यावर त्याने बिहार मध्ये आहे म्हणुन सांगितल (दुसर्या कुठल्या जागि असु शकत का :-)).

नवर्याचे मत मात्र त्या माणसाने माझा पोपट केला अस आहे.


Shendenaxatra
Thursday, March 06, 2008 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक प्राचीन जाहिरात. (जाहिरात हा फारसी शब्द आहे मात्र तो हिंदीत न येता डायरेक्ट मराठीत घुसला हे नवल आहे.)

आवाज१ आई गं! वैतागले मी या केसांना
आवाज२: (समजूत घालत) अगं पण प्रकाशचे माक्याचे तेल नियमित का वापरत नाहीस? त्यामुळे केस गळायचे थांबून भरपूर तर वाढतातच शिवाय डोकंही शांत राहून झोपही छान लागते.

आवाज३ : (घोषणा) प्रकाशचे माक्याचे आयुर्वेदिक तेल म्हणजे प्रकाश ट्रेडिंग कंपनी यांचे उत्पादन.





Tonaga
Thursday, March 06, 2008 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विविध भारतीची काही ठराविक गावे असत. त्यातले झुमरितलैय्या हे एक. हे गाव खरेच आहे. मला वाटते ते आता झारखन्ड मध्ये गेलेय. राजनन्द गाव एक. हे राज नन्दगाव नागपूरच्या पुढे छत्तीसगढ मध्ये जिल्हा आहे. आम्हाला ते रांजणगाव असे ऐकू येई. मग आमच्या गावाजवळ एक रांजणगाव आहे तिथला तो माणूस असावा असे वाटून आम्हाला भारीच आश्चर्य वाटे.
भाटापारा, कामटीसे बाबूराव चकोले, बीडसे बदरुद्दीन बागवान, जिला खन्डवा मध्यप्रदेशसे रीना टीना, मीना और उनकी सहेलियाँ, मधुबनि, खामगाव,पान्ढरकवडा,बाराबंकीसे, सिवनी, कटीहार,दुर्गसे अमित भावसार, नितीन भावसार,अजीत भावसार और उनके परिवारके सभी सदस्य, मलाड बम्बैसे आशा, उषा और कपबशा...


Athak
Thursday, March 06, 2008 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रश्मी , हे झुमरुतलैय्या आहे खरच बिहार मधे अस मी पण ऐकल तेव्हा तुझा पोपट नाही झाला :-)
शेंडेनक्षत्र , त्या जाहीराती ला आम्ही पुढे म्हणायचो ' वैतागले मी या केसांना ..... मग कापुन का टाकत नाहीस ' :-)
टोनगा , एकदम सही :-) अमरावतीसे पण असायचे बर का त्यात :-)


Tonaga
Thursday, March 06, 2008 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



चान्दणी रात्र,
थन्ड हवा
वेळ्:- रात्री दहा


छायागीत,...

सुननेवालोको कब्बन मिर्झाका आदाब,


कहते है की प्यार करनेवाले दिलोमे बहुत कम जगह होती है,

गैरोके क्या अपनोंके साये भी न आने पाते है....

हा.. हा.. हा.. हा..
आहा हा हा... आहा हा हा
ठन्डी हवायें sssss
, लहेराके आये... ssss


Tonaga
Thursday, March 06, 2008 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या कब्बन मिर्झाचे रजिया सुलतान मध्ये आयी जंजीरकी झनकार खुदा खैर करे. हे गाणे होते. घशाच्या कॅन्सरने गेला तो. शेवटी त्याला बोलता यायचे नाही. मुम्ब्र्याला रहायचा....

Gobu
Thursday, March 06, 2008 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुमरुतलैया सारखेच एका गावाचे नाव नेहमी यायचे... धाधरापाडा....
मला अजुनही प्रश्न आहे हा धाधरापाडा आहे कुठे?


Tonaga
Thursday, March 06, 2008 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबूजी ते धाधरापाडा नसून मी वर लिहिलेले भाटापारा आहे. हे गाव छत्तीसगडमध्ये आहे...

Bee
Friday, March 07, 2008 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाशवाणी माझा सर्वात प्रिय. सकाळी उठल्यानंतर ती जी धून ऐकायला यायची तेथून दिवसाची सुरवात व्हायची. ती धून मी हल्ली तनुजाचा 'अनुभव' चित्रपट बघताना ऐकली.

'हा अर्चना भक्तीसंगीताचा कार्यक्रम आहे. सकाळचे साडे सहा वाजले आहेत.' अशी काहीशी सुरवात असायची.

आणि ती एक जाहीरात,

१) झुळ झुळ पाणी, आणायचे कुणी, सांगतो राणी.. फ़िलोलेक्सनी आणले पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी. फ़िनोलेक्स.


Dineshvs
Friday, March 07, 2008 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैतागले मी या केसाना, यातले दोन्ही आवाज निलम प्रभुंचेच आहेत. आयत्यावेळी दुसरी कलाकार आली नाही म्हणुन त्याना हि जाहिरात करावी लागली होती. पण आवाजची फ़ेक कशी असावी, याचा त्या आदर्श आहेत.
त्यानी एका कथेचे वाचन केले होते, त्या कथेच नाव होते. ओ आर ए एल, ओरल म्हणजे तोंडी, या कथेतील लहान मुलगा, आई, बाबा, आजी, आजोबा या सगळ्यांचेच आवाज त्यानी काढले होते. मरणगंध नावाची एक दिर्घकविता, त्यानी एकटीनेच सादर केली होती.
दूरदर्शनवर सादर झालेल्या, पुलंचा एका रविवारची कहाणी मधे, पुलंच्या पत्नीच्या भुमिकेत त्या होत्या. त्यांच्या आवाजात काहि कथाकथनाच्या ध्वनिफ़िती पण बाजारात आल्या होत्या.

रेडिओवरच्या निवेदनात एक खानदानी आब होता, अजुनही तो आहे. केवळ आवाजामुळेच ते अगदी जवळचे वाटतात. त्यांच्या निवेदनात कुठलीच कृत्रिमता नसल्याने, त्यानी दिलेल्या बातम्याही विश्वासार्ह वाटतात.

रेडिओ श्रेणीचा कलाकार असणे हे फ़ार मानाचे मानले जात असे. तो मान मिळावा म्हणुन अनेकजण धडपडत असत. हार्मोनियम ला मत्र बरेच दिवस तशी मान्यता नव्हती.
पुर्वी आकाशवाणी संगीत सम्मेलन भरत असे. त्यात अनेक मोठे कलाकार गात असत. त्यापैकी काहि कार्यक्रमाच्या सीडीज, गोव्यातील आकाशवाणीने विक्रीसाठी उपलब्ध करुन दिल्या होत्या. पंडीत पलुस्करांचे वगैरे छान रेकॉर्डिंग आहे ते.

बुधवारी रात्री साडेदहा वाजता, नाट्यपराग नावाचा छान कार्यक्रम असे. त्यावेळी बाजारात असणार्‍या नाट्यगीतांच्या तबकड्या फ़क्त तीन मिनिटांच्या असत, पण या कार्यक्रमात मात्र एका कलाकाराला पंधरा मिनिटे मिळत असत. या अवधित कलाकार, गायनात मनाप्रमाणे रंग भरत असत. हिराबाई, जयमालाबाई, पंडितराव यांचे गायन अजुन कानात रुंजी घालतेय.

दिवाळीच्या घरच्या फ़राळाबरोबर आकाशवाणीवरचे किर्तन हवेच. याशिवाय माझे दिवाळीचे कल्पनाचित्र पुर्ण होतच नाही. अजुअन्ही आम्ही आवर्जुन ते किर्तन ऐकतो.

रेडिओवरची पत्रोत्तरेदेखील खुपच सुंदर असतात. मला आठवतेय, गृहिणी मधे ज्योत्स्ना देवधर, उत्तर देताना, यानी मुद्दाम आपल्याला पत्रं लिहुन कळवलय बरं का, अशी वाक्यरचना करत असत, त्यामुळे पत्रलेखकाला खुपच छान वाटत असणार. त्या काळात, त्या लेखनही करत असत, घरगंगेच्या काठी, हि कादंबरी त्याच काळातली. यावर पुढे सिनेमाहि निघाला. पण त्यांचे त्या काळातले लेखन, खुपच चाकोरीबद्ध होते, पुढच्या काळातले लेखन मात्र खुपच वेगळे आणि वास्तव होते.

शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी, गम्मत जम्मत, असा लहान मुलांचा कार्यक्रम असे. हा कार्यक्रम आणि लोकसत्ताची किशोरकुंज पुरवणी हे आम्हाला घरात रोखुन धरत असत. या कार्यक्रमाचे शीर्षकगीत, झिन चॅक झिन, असे होते आणि ते आजच्या प्रख्यात शास्त्रीय गायिका, श्रुती सडोलीकर, यानी गायले होते.


Zakasrao
Friday, March 07, 2008 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच सुरु आहे हा बीबी.
मी फ़क्त वाचतोय कारण आमच्या घरी रेडिओ नव्हता त्यामुळे माझ्या अशा खास आठवणी नाहियेत.
गजानन ते फ़िनोलेक्स आहे रे.
आणि GS चहा ला आम्ही काय उन पाणी पितोय हे वाक्य नव्हत. ते मगदुम चहालाच होत.
GS चहा साठी फ़क्त ती जिंगलच होती. :-)
आपली आवडच्या आधीच ते संगीत मला प्रचंड आवडायच. :-)
कधी कधी त्यात कन्नड कन्नड असे शब्द आहेत असा भास होत होता. :-)
झुमरितल्लेय्या हे गाव खरोखर अस्तित्वात आहे.
बरेच महिन्यापुर्वी एक लेख आला होता लोकसत्ता ह्या संदर्भात.
मला लहानपणी अस वाटत होत रेडिओ मध्ये आवाज येतो म्हणजे त्यात आत बसुन माणस गाणी म्हणतात आणि मग आपल्याला ऐकु येत :-)
आता मध्ये कोल्हापुरला गेलो होतो ८ दिवस.
मग टाइम पास म्हणुन रेडिओ वर मी भावाने ट्युन केलेले रेडिओ मिर्ची (नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा ह्या म्हणीच खर्रखुर्र उदाहरन आहे )च्या ऐवजी पुढारी ने सुरु केलेल टॉमॅटो नावाच FM लावुन बसलो.
फ़ार अपेक्षा नव्हतीच पण मला सुखद धक्का बसला.
चक्क दुपारी छान मराठी बोलणारी रसिका नावाची निवेदिका होती. कार्यक्रमाच नाव होत "ह्या फ़ुलांच्या गंधकोषी"
आणि ती बिलकुल आचरट बडबड करता एकसे बढकर एक अशी मराठी नवी जुनी गाणी लावत होती. ग्रेट :-)
मला वाटल होत ही गाणी रिपिट होत असतील म्हणून दुसर्‍या दिवशी वेगळी गाणी (ती हि सगळी छान) लावली होती. :-)
मस्त वाटल.
बाकीचे त्याॅहे कार्यक्रम काही फ़ार उत्तम आहेत अस नाही.
पण हा खुपच छान आहे. :-)


Hkumar
Friday, March 07, 2008 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना शतशः धन्स. आधी मी हा बा.फ. 'सं व समाज' मध्ये सुरू केला होता अन केवळ १ प्रतिसाद पाहून खट्टू झालो होतो. आता असं दिसतयं जणू श्रोते आकाशवाणीवर पत्रांचा पाऊसच पाडताहेत!!!

Hkumar
Friday, March 07, 2008 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'वाॅशिंग पावडर निरमा' नक्की किती साली सुरू झाली? रेडिओच्या खूप जाहिराती आपण मस्तपैकी गुणगुणायचो. आता TV च्या मात्र डोकं फिरवतात आणि आपण आवाजच बंद करतो!

Shailaja
Friday, March 07, 2008 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रेडिओ सिलोन वरील "दो पहलु एक रंग" हा कार्यक्रम नेहमी ऎकाची(रात्री १०-१०-३० ला आठ्वड्यातुन १ -२ असायचा) या मधे एकच गाण २ गायकांच्या आवाजातील असायचे जसे "न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने ते "ओ साथी रे तेरे बिना भी क्या जिना" फ़ारच छान गाणी लावत असत. आता तर सिलोन निट लागत नाही व त्यांनी हिंदी गाण्यांचे कार्यक्रमा च्या वेळाही बद्लेल्या व कमी केलेल्या आहेत. तसेच आता अशी दो रंग वाली गाणी सुध्धा ऎकिवात नाहीत.
पुणे केंद्रावर एक "निरोध" ची जाहिरात लागायची तिचे शब्द काहिसे असे असत "अरे .. आता बाळ २ वर्शाचे झाले ... त्याची पण खुप गंमत वाटायची.

Shendenaxatra
Friday, March 07, 2008 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी रेडियोवर टिनोपॉल ची जाहिरात लागायची. ती कुठल्याशा प्रसिद्ध पाश्चात्य धुनीच्या चालीवर म्हटली जात होती असे आता कळले.

http://en.wikipedia.org/wiki/She'll_Be_Coming_'Round_the_Mountain

टिनोपॉल टिनोपॉल टिनोपॉल
कपडे उजले और सफेद
बोलो क्या है उसका भेद
वो है टिनोपॉल

त्याचा नंतर रानिपॉल झाला आणि तोही बहुधा नामशेष झाला.
एके काळी पॉश कपडे, पाश्चात्य राहणि वगैरेला तुच्छतेने टिनोपॉल संस्कृती म्हटले जायचे.

आकाशवाणी मुंबई केंद्रावर नेहमी ऐकू येणारी गाणी म्हणजे देशभक्तीपर समूहगीते. त्यात होंगे कामयाब, आता उठवू सारे रान आणि अशी अनेक गाणि असायची. संगितकार बहुधा नेहमीच कानु घोष. चांगली गाणी असायची. आता असतात का माहित नाही.
आणीबाणीच्या काळात आई तुझी वीसही स्वप्ने आम्ही पुरी करू असे एक समुहगीत ऐकले होते! बहुधा २० कलमी कार्यक्रमाला उद्देशून आणि इंदिरा गांधींना उद्देशून असावे.



Sas
Friday, March 07, 2008 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रेडियो वर 'चित्रलेखा' या हिंदी कादंबरिच वाचन एकलेल, अगदी उत्साहाने वाट बघायचे मी ह्या कार्यक्रमाची, माझे सुरुवातिचे भाग miss झाले होते, किति ते माहित नाही, पण मधुनच कथा एकायला सुरवात केली तरी, कथेत मन गुंतल.

किति सुरेख, मनस्पर्शी, आणी डोळ्यांपुढे कथेत काय घडतय याच वर्णन उभ करणार असत वि. भा. वर कथा-कादंबरी वाचन.

'चित्रलेखा' च्या लेखकाच नाव ही सांगायचे वि.भा. वर पण मी विसरले, कुणाला माहीत असल्यास Please सांगणे.

Sas
Friday, March 07, 2008 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हूऊऊऊऊऊऊउ I m soooo happy, after longggg time I heard 'All India Radio' :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-)

रेडियोवरच्या बातम्या एकायच्या असल्यास click on:
http://www.newsonair.com/
बातम्यांबरोबरच: २००८ बजेट, वाद संवाद, Current Affairs, सुर्खीयों में.....असे अनेक Daily, Weekly, Special Broadcast हि आहेत ह्या link वर. :-)

मुळ Site: http://www.allindiaradio.org/index.html :-)


Vijaykulkarni
Friday, March 07, 2008 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपली आवड च्या आधी लागणारे सन्गीत मला ऐकायचे आहे.
पुर्वी घरात रेडिओ ठेवायचा तर सरकारी परवाना आणी वार्षिक फ़ी पण असायची

कुणीतरी दिवाळी च्या सकाळच्या किर्तनाची आठवण काढली आणी मझ्या डोळ्यात टचकन पाणी आले.



Raviupadhye
Saturday, March 08, 2008 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hkumar तुम्ही केलेल्या स्थलांतरांनंतर श्री गणेशा मी केला.थोडेसे श्रेय माझे हं!!! गंमत हं!!!-:-)
सर्वांनाच केवढा आनंद होतोय. दिवाळीच्या दिवशी कीर्तन पहाटे साडेचारलाच सुरू व्हायचे.पन्धरा ऑगस्ट व सव्विस जानेवारी ला परेड चे धावते वर्णन असायचे.त्या आधी बिस्मिल्लाखानांन्ची सनई लाईव्ह असायची
एवढा निर्भेळ आनंद देणारा बा फ कदचित फक्त हा अन बीजिन्ग ऑलिंपिक हा दुसरा असावा


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators