Manjud
| |
| Tuesday, January 29, 2008 - 10:24 am: |
| 
|
उर्फा, माझी अगदी 'बाप'च निघालीस तू. त्या उकळत्या पाण्यात सोडलेल्या मोदकांचा 'अवतार' काय झाला असेल ह्याची कल्पनाच नाही करवत... आणि क्णी लिहायच्या आत म्हणजे तुझा वेंधळेपणा लिहिणारं इथे अजून पण कोणी आहे का?
|
Zakasrao
| |
| Tuesday, January 29, 2008 - 1:49 pm: |
| 
|
अभिजित मन थार्यावर नाहिये. काय भानगड आहे?? मंजु तु सुगरण झालीस की. नवीन डिश बनवली आहेस. (माझ्या तिखट रव्याच्या खीरीसारखीच ) उर्फ़ा मोदक विसर्जन केले थोडक्यात तुम्ही योगेश असाच एक महान किस्सा घडलाय खरा पण मी लिहिणार नाही "तो" लिहिल
|
Chaffa
| |
| Tuesday, January 29, 2008 - 2:31 pm: |
| 
|
आता नाईलाजास्तव लिहायलाच लागेल एकदा एका संस्थेचा फ़ोन नंबर काही कारणास्तव मला पुन्हा हवा होता, आपल्या एका मायबोलीकरानेच तो मला आधी दिला होता मग म्हंटल चला त्यालाच विचारु म्हणुन एकदा चॅटवर असताना. ह्या बबड्याने मला मस्तपैकी दोन दोन वेळा लिहून पाठवला. मी ईकडे गडबडलेला, हा विचारतो "मिळाला का भौ नंबर?" मी आणखी बुचकळ्यात की काय म्हणतात तसा पडलो कारण हा बहाद्दर जो नंबर पाठवत होता तो माझाच. आणि मुख्य म्हणजे त्याने त्या संस्थेच्या नावावर त्याच्या मोबाईल मधे सेव्ह करुन ठेवलेला. आता हा मायबोलीकर दुसरा तिसरा कुणीच नाही तर आपला झकासच हो!!!!!!!
|
Zakasrao
| |
| Tuesday, January 29, 2008 - 3:04 pm: |
| 
|
आणि चाफ़्या पुढचा अर्धा भाग लिहिला नाहिस रे??? ह्या चाफ़्याकडे दोन नं आहेत. दुसर्या नं वरुन ह्या भल्या माणसाने हा नं डायल केला आणि ज्यावेळी "डॉन को पकडना मुश्किल हि नहि नामुमकीन है" अस ऐकु आल तेव्हा शहाणा झाला
|
Chaffa
| |
| Tuesday, January 29, 2008 - 4:55 pm: |
| 
|
हां यार ते लिहायचं राहुनच गेलं. खात्री करुन घ्यायला मी तो नंबर डायल केला दुसर्या फ़ोन वरुन तर झकास म्हणतो तसा डायलॉग ऐकायला आला तो माझाच डायलर टोन आहे आता एखादी सेवाभावी संस्था (त्यातुन आम्ही कॉल करत होतो ती तरी ) असला काही डायलर टोन ठेवणार नाही ना!
|
Anaghavn
| |
| Thursday, January 31, 2008 - 12:00 pm: |
| 
|
ताजा ताजा वेंधळेपणा Gtalk वर बोलत होते, एक या office मध्ये आणि एक आमच्याच पण दुसर्या ठिकाणी. खुपच Bore गाणं लावल होत म्हणुन आमच्या office मधल्या एकाला लिहिलं, "kiti boooore gaana aahe, jara "next" kar na"!!! तिकडुन दुसर्या office मधली मैत्रिण विचारतेय Gtalk वर "काअआअआअय्य्य?" चुकुन तिलाच पोस्ट केला मेसेज.
|
कार्यालयात गाणी वगैरे मजा आहे. कुठे काम करता हो तुम्हि?
|
Anaghavn
| |
| Friday, February 01, 2008 - 6:53 am: |
| 
|
पुण्य नगरी मध्ये करते------
|
Anaghavn
| |
| Friday, February 01, 2008 - 6:54 am: |
| 
|
म्हणजे पुण्यात बर का!! नाहीतर पेपर समजाल.
|
काल आमच्या Outlook mailbox मध्ये एक निरोप आला... xyz is not well, won't come in today. CC to HR dept. रजेचा निरोप वाचला, आणि कामाला लागलो. थोड्या वेळाने बाॅस चा रिप्लाय्- " routine check-up ke liye laaye gaye hain. (ABC ki info) " (हे ABC म्हणजे एक खूप मोठे रिपोर्टर) आम्ही बुचकळ्यात्- आमचीच एक कलीग आजारी पडते, आणि तिची बातमी आमचेच वरिष्ठ track करतायत्- काय आहे काय? मग त्यांचाच मेल येतो... "Sorry- Balasahab Thackerey ke health update ko reply karna tha..."
|
Kedar123
| |
| Saturday, February 02, 2008 - 1:45 pm: |
| 
|
एकदा क्लायंट कडे असताना एक किस्सा घडला. क्लायंट कडे एक जूना पुराणा (गंजलेला) स्टेपलर होता. मी कसल्या तरी एका पेपरला म्हणून स्टेपलर पिन मारली. पिन मारल्याचा आवाज आवाज झाला पण पेपर वर पीन कुठेच दिसत नव्हती. सहज पाहील तर ती पीन छान पैकी माझ्या बोटात जाउन बसलेली आनंदात. मी आणि माझा मित्र विचारमग्न (माझा मित्र पिन बोटात गेली कशी ह्या विचारात आणि मी ती पिन काढायची कशी ह्या)
|
Anaghavn
| |
| Friday, February 15, 2008 - 12:00 pm: |
| 
|
केदार धनुर्वाताचं इंजेक्शन घेतलस ना रे बाबा?
|
Kedar123
| |
| Monday, February 18, 2008 - 11:50 am: |
| 
|
नाही घेतल अजून (१० वर्ष झाली ह्या गोष्टीला) हा आणखी एक वेंधळेपणा.
|
Dhanu66
| |
| Thursday, February 21, 2008 - 7:07 am: |
| 
|
एकदा मी माझी स्कुटी ऑफ़ीस बाहेर विसरुन पायी घरी आले. स्कुटी तिथेच रात्र भर. दुसर्या दिवशी शोध शोध शोधली. शेवटी पोलीसात जायचा का असा विचार करतांना आठवल. दुसर्यादा माझ्या स्कुटी ची कील्ली दुसर्याच स्कुटी ला लावत बसले, किल्ली लागेना तर वैतागले. तेवढ्यात त्या स्कुटी चा मालक आला आणी ओरडला माझ्यावर तर त्यालाच झापायला लागले. त्यानी त्याची किल्ली लावली मग माझ्या लक्षात आले. त्या नंतर त्या दुकानात जायची इतकी लाज वाटायची.
|
Chyayla
| |
| Saturday, February 23, 2008 - 11:08 am: |
| 
|
पाउस मला खुप आवडतो, आज तर तो मस्त रीमझीम बरसत होता, एकदम रोमॅंटीक वातावरण... मी माझ्या आवडीचे मिलिंद इंगळेचा "गारवा" अगदी मन लावुन ऐकत होतो आणे प्रत्येक गाण पावसाच्या थेंबांच्या लयीने अनुभवत होतो. त्यामुळे आठवणीचा एक कवडसा अलगद उघड झाला. ती अशीच एक धुंद वादळाची, रात्र पावसाची असलेली आठवण ज्याला न कळत घडलेल्या वेंधळेपणाची मजेशिर किनार आहे. तसा फ़िनिक्स मधे पावसाळा नाहीच एखाद्या वेळेस बरसला तर बरसला, पण जेव्हा तो बरसतो आनंदाला एक उधाण आलेल असत. अशीच एक संध्याकाळ आणी मी रात्रपाळीकरता ऑफ़िस कडे निघालो. सोबतीला माझी मैत्रीणही आली आज आम्ही ठरवले ऑफ़िस मधे कार ने न जाता पायीच जाउ या पावसाची मजा घेत कारण तो अगदी हलकाच पडत होता, सोबत मातीचा मंद दरवळणारा सुवास ज्याला उरात भरभरुन घावेसे वाटत होते. माझ्या सारखा पाउस वेडा हा स्वर्गीय आनंद कसा सोडणार? तरी तीने सोबत छत्री घेतलीच. मी तर लहान उनाड मुलांसारखा मनसोक्त आनंद घेत निघालो तर ती छत्री घेउन भिजेल म्हणुन घाबरत होती व सोबत होती. आम्ही दोघेही बडबडे असल्यामुळे आमचा गप्पांचाही पाउस सुरु झाला. गप्पा मारण्यात ईतके धुंद की आम्ही तसेच ऑफ़िस मधे शिरलो, लांब कॉरिडॉर मधुन जाताना आम्हाला दोघाना पाहुन सिक्युरिटी गार्ड हसला. तसे या वेळेस ऑफ़िस मधे कोणीच नसत. ती: why he is laughing ? मी: Might be he is admiring us ती: No! he is laughing because of some other reason तेव्हा मी तीच्याकडे पाहिले तर तीच्या हातात छत्री तशीच डोक्यावर धरलेली आणी ऑफ़िस मधुन चालत होती मला ताडकन त्याच्या हसण्याचे कारण कळले मी जे खो खो हसत सुटलो, आणी मला काही केल्या हसु आवरेना मी ईशार्याने सांगितले तु छत्री डोक्यावर धरुन ऑफ़िस मधे चालत आहेस. ते तीच्या लक्षात आले आणी माझ्या पाठीवर हलकासा धपाटा घालत ती ही हसायला लागली. त्यानंतर आम्ही बराच वेळ आमच्या क्युब मधे नुसते हसत होतो... आज हा किस्सा एक आठवण म्हणुन मनाच्या कप्प्यात कायम स्मरणात राहीलाय.
|
Chaffa
| |
| Saturday, February 23, 2008 - 5:28 pm: |
| 
|
च्यायला असे किस्से आधी बरेचदा घडलेले पाहीलेत पण हा किस्सा वाचल्यावर नव्याने हसु आले रे!
|
Karadkar
| |
| Wednesday, February 27, 2008 - 7:28 pm: |
| 
|
काही दिवसांपुर्वी इथे costco मधे गेले होते. त्या अवाढव्य दुकानातुन मला खजुर आणायचे होते. तिथे काम करणारा एक साधारण २० एक वर्षाचा गोरा मुलगा होत. त्याला मी विचारले where can I find dates? तो माझ्याकडे विचित्र शंकेखोर नजरेने पहायला लागला. मला वाटले माझा accent त्याला कळला नाही म्हणुन मी परत तोच प्रश्न विचारला. तरी आपले तेच! मग माझी ट्युब पेटली आणि विचारले where can I find dried fruits? तेव्ह त्यने कुठे मिळेल ते ठिकाण सांगितले.
|
Zelam
| |
| Thursday, February 28, 2008 - 1:17 pm: |
| 
|
कराडकर माझ्या बाबतीतही अगदी हेच घडलं होतं. मी हा प्रश्न विचारल्यावर तिथला माणूस म्हणाला, 'Thanks, nobody has asked me for a date in a long time' आणि हसायला लागला. नंतर दाखवलं त्याने खजूर कुठे आहेत ते.
|
मागच्या शनिवारी आईने मला ओरडून ओरडून उठवलं. ऑफ़िसला सुट्टी असल्यामुळे लवकर उठायची गरज काय?? पण आई म्हणजे ना.. उठून हॉलमधे आले तरी अजून अंधार होता. लाईट लावला तरी लागला नाही. "इतक्या पहाटे लाईट गेली??" आई किचनमधे होती. मी इतक्या पहाटे का उठवलस आज ऑफ़िस नाहीये. अशी कुर कुर केली. आई हॉलमधे आली आणि म्हणाली. "ए बये डोळे उघड. सकाळचे दहा वाजलेत." जागं झाल्यावर मी डोळे उघडायलाच विसरले.
|
Zakki
| |
| Friday, February 29, 2008 - 5:34 pm: |
| 
|
अस्सं होय्. तरीच मागच्या शनिवारी तुम्ही काय लिहीले ते कळले नाही. बाकी इतर वेळी माझे डोळे उघडे नसतात, म्हणून कळत नाही ही गोष्ट वेगळी. गंमत म्हणून लिहीले आहे हो. आवडले नाही, अपमान झाल्यासारखा वाटला तर क्षमा करा! बंद डोळ्याने काय लिहीतो ते माझे मलाच कळत नाही कधी कधी! यात समस्त स्त्रीवर्गाविषयी असभ्य किंवा अपमानास्पद लिहिण्याचा उद्देश नाही. तसे वाटले असेल तर क्षमा करा. तसा हेतू नाही. मुद्दाम इंग्रजीत लिहीतो, म्हणजे इथे येणार्या इतरांनाहि कळेल. Please take it lightly, if it hurts you, please forgive. हुश्श. आता तरी इथे कुणाची मारामारी सुरु होऊ नये अशी आशा आहे. वाटल्यास त्या पहिल्या विधानाला माझा वेंधळेपणा समजा. म्हणजे चांगला नसला तरी निदान विषयाला धरून तरी होईल.
|