|
गिरी, एकदम बरोबर.. स्टार प्लसcअरच्या कार्यक्रमामधे त्या जयंतच्या डोळ्याचं इतकं रडगाणं लावायचे की बास!!! सारेगामामधे यावेळेला जजेस फ़ार चांगले होते. अजिबात ड्रामा केला नाही त्यानी. बाय द वे सोनु निगमचा मुलगा नेमका त्याच्या बापाच्या गाण्याच्या वेळेला भोकाड पसरून रडत होता. अनामिका विनर झाली याचे आशचर्य वाटले नाही, सुरुवातीपासून तिने छान परफ़ॉर्मन्स दिला होता. आमिरच्या भावाने जर पंधरा लाख मिळाले तर घर बांधू, बहीणीचे लग्न करू वगैरे सांगितले होते. त्यानंतर असा तमाशा करून त्यानी स्वत्:चे नुकसान केले, इतक्या चांगल्या मुलाचा त्यानी पैसे मिळवण्यासाठी उपयोग केला यापेक्षा दुर्दैव काय? आता छोट्या मोठ्या शहरामधल्या ऑर्केस्ट्रामधून गाणे हेच त्याचे भविषय बहुतेक!!!!
|
Sayonara
| |
| Sunday, March 02, 2008 - 5:12 pm: |
| 
|
exactly नंदिनी, मी पण काल अगदी हाच विचार केला. तमाशा करुन झीला काहीच फरक पडला नाही. पण आमीरचं किती नुकसान केलं त्यांनी.
|
Uday123
| |
| Sunday, March 02, 2008 - 6:10 pm: |
| 
|
सोनु निगमचा मुलगा नेमका त्याच्या बापाच्या गाण्याच्या वेळेला भोकाड पसरून रडत होता. ---पोराला लाज,किती वाईट्ट गाणे गातो हा.
|
Arch
| |
| Sunday, March 02, 2008 - 7:31 pm: |
| 
|
बरं सोनु निगम stage वर असताना कोण्या बाईवर camera focus करत होते ती कोण होती? अमीरच खरच वाईट वाटल. घरच्यांनी त्याच्या पायावर धोंडा मारून घेतला.
|
त्याची बायको.. बाय द वे, रोडीज कुणी बघतं का?? मागच्या वेळेपेक्षा यावेळेला धमाल येतेय. जबरदस्त टास्क्स आहेत.
|
Jayavi
| |
| Monday, March 03, 2008 - 9:18 am: |
| 
|
आर्च अगं ती सोनु निगम ची बायको होती.
|
Zakki
| |
| Monday, March 03, 2008 - 4:29 pm: |
| 
|
माझी सौ. नित्यनेमाने सारेगधा का काय तो प्रोग्रॅम बघते. त्यातल्या गाणार्या लोकांची नावे तिला माहित असतात, पण इतरांची नाहीत. परवा मी पण चॅलेंज शो बघितला. त्यात एक टोपी घातलेला नि दोन तीन दिवसाची दाढी वाढलेला एक ओंगळ माणूस, एक पाऽर चकोट केलेला, उंचा पुरा, गोटी दाढी ठेवलेला, नि एक दाढीवाला माणूस असे लोक होते. ते कोण? जसराज नि जगजित सिंग ओळखले. गाणी फारच छान म्हंटली मुला मुलींनी. पाकिस्तान्यानी सुद्धा गझल छान गायली!
|
Arch
| |
| Monday, March 03, 2008 - 6:18 pm: |
| 
|
अस आहे हो नंदिनी आणि जयावी. पण एक episode जेंव्हा त्याला dedicate केला तेंव्हा फ़क्त त्याचे वडील, आजोबा वगैरे दाखवले. सुरेश वाडकरची जशी बायको मुलगी दाखवले तसे त्या सोनु निगमची बायको मुलगा ह्यांचा उल्लेखही केला नव्हता. म्हणून विचारलं
|
Tulip
| |
| Monday, March 03, 2008 - 6:49 pm: |
| 
|
अगं मी बघतेय ह्यावेळचं रोडीज पहिल्यापासून. गेल्यावेळचं रिपिट पाहीलं इथे आल्यावर. ह्यावेळचे टास्क्स चांगले आहेत पण स्ट्रॉंग कंटेंडर्स ह्यावेळी किती लवकर बाहेर पडलेत सगळे. विक्रांत आणि वरुण दोघेही वोट आऊट झाल्यावर रोडीज स्पिरीटच गेलय. प्रभजोत एकच चांगली शिल्लक अहे. पण ती अगदीच बानी टू सिंन्ड्रोमवाली आहे. तिच्या इम्युनिटीच्या वेळी रघूने उगीच टांग घातली मधे. प्रभजोत तरी ठिक आहे. अनमोल आणि शांभवी काय फ़ुकट ऍटीट्युड दाखवतात देल्हीचे असल्याचा काय माहीत. इवन रणविजय हेट्स शांभवी. ह्यावेळी निहालचे जाण्याचे फ़ुलऑन चान्सेस आहेत.
|
Amruta
| |
| Monday, March 03, 2008 - 8:04 pm: |
| 
|
आजच मराठी सारेगमप मस्त झाल. माणिक वर्मांची गाणी गायली. मजा आली. गायकांची नाव काहि अजुन लक्षात नाहि आहेत पण पुरुष गायक मस्त गायले.
|
Sas
| |
| Monday, March 03, 2008 - 9:15 pm: |
| 
|
'एका पेक्षा एक' कुठल्या Site वर आहे का, 27 Jan नंतर चे भाग. youtube आणी 'आपली मराठी' वर 'जुने' भाग आहेत ते आता पहण्यात काय मजा वाटत न्हाय 
|
Bsk
| |
| Monday, March 03, 2008 - 11:08 pm: |
| 
|
techsatishdesi.com वर झी मराठी लाईव्ह पाहता येते. फुकट.. भारतीय वेळेप्रमाणे कार्यक्रम दिसतात.
|
Sas
| |
| Tuesday, March 04, 2008 - 3:13 am: |
| 
|
Thanks BSK... but आवाज Clear आहे मात्र चित्र पहातांना problems होतात vedio stops but audio goes on, or no vedio at all, only black screen मी Z मराठी लावल तेव्हा राशी भविष्य सुरु होत. 
|
Bsk
| |
| Tuesday, March 04, 2008 - 3:44 am: |
| 
|
oh .. amhi pahila teva ok vatla hota, awaj n video.. i mean, far gr8 quality nahi.. pan video stop hot navta..
|
परवा मी पण चॅलेंज शो बघितला. त्यात एक टोपी घातलेला नि दोन तीन दिवसाची दाढी वाढलेला एक ओंगळ माणूस, एक पाऽर चकोट केलेला, उंचा पुरा, गोटी दाढी ठेवलेला, नि एक दाढीवाला माणूस असे लोक होते. ते कोण? <<<<<झक्की , तुम्ही Challeneg 2007 चे repeat episodes पहात अहात बहुतेक . तर ही घ्या त्या judges ची नावं . त्यात एक टोपी घातलेला नि दोन तीन दिवसाची दाढी वाढलेला एक ओंगळ माणूस हिमेश रेशमिया एक पाऽर चकोट केलेला, उंचा पुरा, गोटी दाढी ठेवलेला: विशाल दादलानी नि एक दाढीवाला माणूस असे लोक होते. इस्माईल दरबार अजुन चौथा judge खूप normal दिसत असल्याने तुम्हाला लक्षात राहिला नाही बहुदा , तो एकमेव cute दिसणारा judge: शेखर
|
Btw, त्या स्टार प्लस च्या ' छोटे उस्ताद ' मधे सगळे केसाळ लोक बसलेले असतात ! प्रीतम चक्रवर्ती च्या दाढी मिशी , लांब सडक केसां मधून त्याच्या चेहेरा दिसतच नाही ! कुणाल गान्जावाला आणि अभास दाट जाड जूड भुवया अजुन च गडद करून येतात ! आणि कुणाल - अभास मधे किती साम्य आहे . बिछडे हुए भाई वाटतात परवा जो मुंबई चा contestant बाहेर गेला तो ही असाच जाड भुवया वाला .. तो पण गन्जावाला - आभास सारखाच दिसत होता ! 
|
काल (सोमवारी रात्रौ) झी मराठी वर सारेगम चा ४५ वर्षा वरील नागरीकां साठी (भाग घेण्यासाठी )आयोजीत कार्यक्रम पाहिला. हा"माणिक वर्मा विशेष" नावाच कार्यक्रम होता. त्यात भारती आचरेकर (माणिक ताईंची मुलगी) परिक्षक म्हणून होत्या. अत्यन्त सुन्दर व माणिकताईंच्या जुन्या सुरेल आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम!! गायिकांनीही माणिक ताईंच्या गायकीचा चांगला अभ्यास व तयारी केली होती. त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगला.भारती ताईंनी आईच्या अनेक सुन्दर आठ्वणी संगितल्या. अभिजात गायकीचा आणखी कुणी पाहिला असेल तर दुसर्या दोन परिक्षकांचे नाव सांगाल का? तसेच आपले अभिप्राय कळवाल का?
|
Psg
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:37 am: |
| 
|
रवी, 'आशा खाडीलकरांना' ओळखले नाहीत का? त्यांनी बहुदा या स्पर्धेसाठी यायचे म्हणून मेकओव्हर केला आहे, पण काल गायल्याही त्या.. काय मस्त आवाज आहे.. कसल्या खणखणीत ताना घेतात दुसरे जज आहेत नव्या पिढीचे संगीतकार-गायक सलील कुलकर्णी. कालच्या भागाच्या सुरुवातीलाच एका ८३ वर्षाच्या आजोबांनी गाणे म्हणले ते ऐकले का? इतका गोड आवाज होता त्यांचा बाकी, माणिक वर्मांची गाणीच अजरामर असल्यामुळे ती ऐकायला सुरेखच वाटतात. पण माझं (कदाचित अत्यंत बायस्ड) मत असं आहे, की या ४५+ च्या गायकांच्या आवाजांना खूपच मर्यादा आहेत, त्यामुळे स्पर्धा अशी ना वाटता, गाण्याचा कार्यक्रम वाटतो. अर्थात, त्यांच्या जिद्दीबद्दल कौतुकच आहे, पण तरूण लोकांच्या सारेगमप मधे जी चुरस येते, ती इथे जाणवत नाही. जुनी मराठी गाणी ऐकायला मिळतात, खास परिक्षकांकडून जुन्या आठवणी ऐकायला मिळतात, इतकेच.
|
माझी कार्यक्रमाची सुरुवात चुकली. अरेरे! काही अंशी गायकांच्या मर्यादांबद्दल मी सहमत आहे-पण गोंगाटाच्या या दुनियेत ती हरवलेली दुनिया वा माझे बाल्य व तारुण्य त्यानी पुन्: जागवीले म्हणून कदाचित त्याना मी handicap देत असेन. एक वेगळा प्रयत्न म्हणून कौतुक. मी आशा ताईंंचे काहीच ऐकले व कार्यक्रम पाहिले नाहीत हो!! ओशाळवाणे वाटते खरे!!! पण खरे आहे त्यांच्या गायकी ची झलक काल लुभावून गेली- It's never too late - नाही का?
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 04, 2008 - 8:32 am: |
| 
|
त्यात एक टोपी घातलेला नि दोन तीन दिवसाची दाढी वाढलेला एक ओंगळ माणूस हिमेश रेशमिया एक पाऽर चकोट केलेला, उंचा पुरा, गोटी दाढी ठेवलेला: विशाल दादलानी नि एक दाढीवाला माणूस असे लोक होते. इस्माईल दरबार >>>>>>>>>>>> झक्कीकाका तुम्हाला तिथेच आजु बाजुला बसलेला अजुन एक माणुस दिसला नाही का?? भप्पी लाहिरी btw तुम्हाला अजुन नाकेश सुरमियाची गाणी ऐकुन कोणी वात आणलेला दिसत नाहिये म्हणून तुम्ही त्याला ओलखत नसाल
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|