|
Ajjuka
| |
| Sunday, March 02, 2008 - 3:00 am: |
| 
|
>>आणि मुलगी मुलाचा ड्रेस घालून लगेच मुलगा बनून अगदी स्वत्:च्या आई वडिलांसकट सगळ्यांना फ़सवू शकते. कोणाला संशयही येत नाही.<< श्या ट्यु! सामान्यज्ञान अगदीच कमी पडायला लागलं बघ तुझं..(दिवे घे!) अगं हे त्या विल्यमबाबाने(तोच तो शेक्सपिअरांचा उफराटा कार्टा!) करून ठेवलंय. एलिझाबेथ (पहिली) राणीच्या दरबारात. आठव आठव Twelth Night . मुलगी आपल्या जुळ्या भावाचा वेष धेऊन येते! मला तर ती अनु वाली आणि इतर तसल्या सिरीयल्सचे काही एपिसोडस पाहून वेगळेच प्रश्न पडू लागलेत.. १. चांगली दाखवलेली मुलगी ही नेहमी मरतुकड्यासारखी यॅं यॅं करत का बोलते? उदा: अनु. अंगात जीव असल्यासारखं बोलली किंवा वागली तर तीची वा भाइ वा होणार नसते का? म्हणजे मरतुकड्यासारखं बोलणं हे मुलगी चांगली असण्याचं लक्षण आहे का? २. एका सिरीयलचे प्रोमोज आदळवत असायचे सतत. कधी एपिसोड नाही पाह्यला. त्यात त्या मुलीला पडलेले सगळ्यात मोठ्ठे प्रश्न म्हणजे सासू सासर्यांच्या लग्नाचा वाढदिवस महत्वाचा की माहेरच्या घरची सत्यनारायणाची पूजा? आणि तत्सम त्याच पद्धतीचे. विविध सण, उत्सव, पूजा, व्रते यांपलिकडे स्वतःचं आयुष्य असतं इत्यादी कन्सेप्टस यांना सांगितलेल्या नसतात का? आयुष्याचं काहीतरी worthwhile करायचं असतं असं काही माहित नसतं का त्यांना? ३. हल्ली अजून एक विनोदी सिरीयल चे प्रोमो पहायला मिळाले. त्यात ती माता तिच्या 'किती किती लाजू' छाप मुलीला म्हणते. तू ज्याच्यासाठी बनलीयेस तो प्रेम कधीतरी येईलच. ^%&^%*(*&*(& म्हणजे मुली ह्या कुणा मुलासाठी बनलेल्या असतात? मला तर वस्तू विकल्या न जाणार्या दुकानातल्या सगळ्या वस्तूंना हे वाक्य जास्त योग्य वाटलं. आणि सिरीयलचं नाव काय तर म्हणे माझा प्रेम कुठल्या देशात असेल! म्हणजे ही त्या प्रेम नावाच्या बाप्याला धुंडाळायला देशोदेशी फिरणार की काय? आयुष्यात दुसरं काही नाही का करायला? देशोदेशी फिरणार असलीस तर फिर बये आमचं काय जातंय पण प्रेम ला शोधायला? कारण हिचं आयुष्य म्हणे त्याच्यासाठीच आहे? ईईईईईईई इतकं फालतू असतं आयुष्य? प्रेमाबिमाशिवाय जगात काही नाही आणि तेही पार समर्पणयुक्त वगैरे? असो.. आता त. टी. - (कोण कोण बरं!) विल्यम शेक्स्पिअर, एलिझाबेथ राणी (पहिली), जुळी भावंडे, अनु नावाच्या मुली, मरतुकड्या आवाजाचे लोक, प्रोमो करणारे बिचारे, सासू सासरे, लग्नाचा वाढदिवस साजरा करणारे लोक, सत्यनारयण घालणारे/ सांगणारे/ पुजेला जाणारे लोक, व्रते करणारे लोक, लाजणार्या मुली, प्रेम नावाचे सर्व वयाचे पुरूष, विक्री न होणार्या दुकानांचे मालक्/ विक्रेते, तिथल्या वस्तू, travel & tourism industry शी संबंधित असणारे आणि वरच्या पोस्टमधले शक्य असतील ते सर्व... या कोणालाही कमी लेखायचं नाहीये. तसे वाटल्यास तो. तु. बु. दो. आ. !
|
सगळ्यत आणखी किळसवाणी सीरीयल म्हणजे मेरि डोले तेरे अंगना (आता म्हणाल किळसवाणे तरी क बघते फुकटचे झी चे पैसे दीलेत ना मग का नको लावू टीवी.. हे दुर्दैव की ही सीरीयल अक्खी शनीवर सकळ घेते मग काय करणार (केव्ह्ढा हा Defending attitude )) असो, सीरीयल्स्मध्ये पत्नी आपल्या मैत्रीणीला सुधारायला नवरा वापरते.. आणी स्वत अश्रू ढळात रहाते. सदनकदा नवर्याला, बाबा तू काही'ही' केलेस तरी माझा विश्वास आहे. जर चूक असेल तर ती नशीबाची अश्या थाटत सर्व प्रकार.... झी बंद करायचा विचार आहे. जरा मेले चांगले कार्येक्रम नसतात.
|
Ajjuka
| |
| Sunday, March 02, 2008 - 8:48 am: |
| 
|
अशी पण आहे का? ही नव्हती बघितली अजून. वाचले!! मला या मालिकेतल्या मध्यमवर्गीय किंवा गरीब लोकांच्या घरातल्या अर्थकारणाचं जाम कुतूहल आहे. एका सिरीयलमधे त्या मुलीच्या पगारावर संपूर्ण घर चाललेलं असतं. तिला पगार असतो ६००० त्यातला कर्जाचा हप्ता जात असतोच. पण घर बघावं तर चकाचक आणि मोठ्ठं, त्या मुलीच्या भावाची बायको चकचकीत साड्या नेसते, भरपूर दागिने घालते, धाकटी बहीण सतत latest cosmetics च्या मागे आहे, आजीची औषधे असतात, घर का राशन भरायचं असतं, धाकट्या भावाच्या फिया असतात, latest mobile असतो, मोठा लग्न झालेला घोडा भाउ अजून कशात तरी पैसे उडवत असतो त्याच्या मागण्या असतात. हे सगळं ती गुणी कन्या ६००० वजा कर्जाचा हप्ता एवढ्यात बसवते. हे कसं काय घडतं? कसं परवडतं? इतकं सॉलिड money planning कुठे शिकायला मिळेल? इथे मेलं मुंबईत दिवसभर बाहेर फिरत काम करायचं म्हणलं तरी रिक्षा, थोडीशी पेटपूजा एवढ्यात दिवसात कमीतकमी २०० तरी उडतात. म्हणजे महिन्याभरात ६०००. बाकीचे खर्च वेगळे. त.टी. - आम्ही आयत्या पिठात रेघोट्या ओढत कुठल्याही कष्टाशिवाय बनलो असलो तरी कष्ट करणार्या कोणालाही कमी लेखलेले नाही. ज्यांना तसे वाटेल त्यांच्या बुद्धिचा प्रॉब्लेम आहे.
|
Asami
| |
| Sunday, March 02, 2008 - 1:54 pm: |
| 
|
हे कसं काय घडतं? कसं परवडतं? इतकं सॉलिड money planning कुठे शिकायला मिळेल? > serial मधे
|
टीवी एकेकाळी करमणुकीसाठी पाहिला जात असे!! इकडे वहिनीसाहेब, अवघाचि संसार, आणि पिल्लावळ पण म्हणे त्याच उतारावरून गडगडत गेल्या. नशीब, वेळीच घर सुटलं आणि टीवीही!!
|
अज्जुका, तळटीप झकास आहेत
|
Sayonara
| |
| Monday, March 03, 2008 - 3:57 am: |
| 
|
अग अज्जुका तू म्हणतेस त्या सिरीयलमध्ये पुढे काय मज्जा मज्जा चाललीये ती बघत नाहीयेस का तू? ती राधा मला सॉलिड डोक्यात जाते. गरागरा डोळे फिरवत असते. मनस्विनी, अग ह्या सिरीयल म्हणजे vicious circle आहेत. मी पण नावं ठेवत रोज बघते.
|
Bee
| |
| Monday, March 03, 2008 - 4:15 am: |
| 
|
आणखी एक तोच तोच पणा म्हणजे नवर्याच्या मैत्रीणीला नवर्यापासून दिवस जातात. ते दिवस खोटे खोटे असतात. ती त्याला काहीबाही पाजून घरी आणून सांगते की तू रात्री माझ्यासोबत काहीबाही केले मग मला दिवस राहीलेत. मग ती मैत्रीण त्याच्या घरी रहायला येते. जी बायको असते तिची मग सुट्टी व्हायची वेळ येते. मग ते खोटे नाटे भांडे फ़ुटण्यासाठी त्यावर १०० एक episodes .
|
Mi_anu
| |
| Monday, March 03, 2008 - 4:22 am: |
| 
|
हेही वाचा यात बर्याच टिपा मिळतील. मीपण एखादी मालिका काढणार आहे.: http://www.manogat.com/node/10590#comment-100541
|
अनु, तुम आगे बढो, हम तुम्हारे पिछु(हे तु सीरीयल काढणार आहे त्यासाठी) एकड तिकडचा मसाला वापरून टकाटक सीरेयल होइल. अज्जुका, आयत्या पिठात रेघोट्या , ह. वा.
|
Ajjuka
| |
| Monday, March 03, 2008 - 7:03 am: |
| 
|
सायो, इतक्या कमी पैशात एवढे रंगढंग जमतात हे बघून मी पण प्रयत्न केला... कुछ जम्या नही. मग वैतागून ती सिरीयल पाह्यलीच नाही परत.
|
Bee
| |
| Monday, March 03, 2008 - 7:24 am: |
| 
|
मी अनु, ती लिंक वाचली पण 'तळ टिप' कुठेच नाही मिळाली :-)
|
Dakshina
| |
| Monday, March 03, 2008 - 9:30 am: |
| 
|
आतर्क्य, चित्रपटाच्या बी बी वर सिरियल्स ची चर्चा बघून जरा चक्रावले... पण मग विचार केला.... चित्रपट असो वा सिरियल, अचाट आणि आतर्क्य आहे ना? मग बास.... टेव्ही वरच्या सिरियल मधल्या हातातोंडाला आलेल्या मुलींना निट शिक्षण घेऊन, आईवडील लावून देतील त्याच्याशी लग्नं करायला बहुतेक आवडत नाही. मग घरातून पळून जातात, लग्नाचं खोटं नाटक करत मित्राच्या घरी काय रहातात. नेहमीप्रमाणेच घरच्या बुजुर्ग मंडळींचा विश्वास संपादन करतात, अगदी जनम - जनम का नाता असल्या सारखं अज्जू अज्जू करत. आणि ठरल्याप्रमाणे हिरो कुणितरी मोठा बिझनेसमॅन असणारच. गरीब हिरोच्या घरी जाते का बघू नाटक करायला? सर्वजनिक नळावर पाणी भरणारी हिरॉईन दाखवा ना म्हणावं. ४ - २ रुपये उधार मागणारी नायिका दाखवा... आणि हिरो तर काय येडछाप गोव्याला गेल्यावर... याच्या बॅगेत कुणितरी अमली पदार्थ टाकतं. ते टाकेपर्यंत काय हा झोपतो? आपली बबडी लग्नाचं नाटक करून काहीतरी थोर(?) काम करत असल्यासारखी, आणि तिची आई सारखी.. 'बॅबॅडे तूॅ झी काळ्जी वाट्टे गं.. मग हिरॉइनचा भाऊ अधू असणार, वडील जे अत्यंत कठोर असणार ते एके दिवशी अचानकच चांगलं वागायला लागणार... मग वडील आणि मुलगा २ / ४ भाग (सिरियलचे ) गायब असणार, आणि भाऊ आपल्याच पायांनी चालत घरी येणार.... कैच्या कै...
|
Ankyno1
| |
| Monday, March 03, 2008 - 10:02 am: |
| 
|
दक्षिणा... फारच बकाल सीरिअल आहे ती.... जरा नीट पाहिलं की लक्षात येतं की सर्वांची घरं (काही वेळेला रेस्टॉरंट ही...) एकाच बंगल्याच्या वेगवेगळ्या खोल्यांमधे आहेत... (कारण फरशा, पडदे, मोठ्ठाले खांब हे सगळं सर्वांच्या घरात सारखंच आहे....) पण कॉमेंट्स मारत पहायला खुप मजा येते.... (तसं कोणत्याही सीरिअल ला कॉमेंट्स मारायला मजाच येते... पण खासकरून जेवणाच्या वेळी लागणार्या सीरिअल्स या अगाध असतात... बहुतेक अशा बिनडोक सीरिअल्स साठीच तो स्लॉट ठेवत असावेत...) बाकी काही वशिष्ट्ये.... (ही जर सीरिअल मधे नसतील तर त्यांना रिजेक्ट करत असावेत.....) -भोळी पण प्रसंगी खंबीर नायिका (जी सर्व प्रसंगात चेहेर्यावर तेच बावळट भाव ठेवते....) -नायिकाप्रधान कथा... (मराठी मालिका फार क्वचित नायक प्रधान असते...) -अत्यंत नाकासमोर चालणारं तिचं कुटुंब.... -एखादं असं पात्र... ज्याला चांगलं दाखवायचं की वाईट याबद्दल दिग्दर्शकाचा गोंधळ -देवकी पंडित च्या आवाजात टायटल साँग -किमान २ नायक... हे नायिकेबरोबर खो खो खेळत असतात.... -७ ते ८ उपकथानकं... -खलनायकांची फौज... काही तात्पुरते खलनायक... -आगाऊ बालकलाकार -सध्याची लेटेस्ट क्रेझ.... मांत्रिक, जादूटोणा, चेटूक... -किमान ४ते५ वर्ष सीरिअल चालवण्याचा निर्माता-दिग्दर्शकाचा संयम... ('त्यापेक्षा कमीत गुंडाळायचं असेल तर कशाला काढताय') ........... वगैरे वगैरे........ दिल पे मत ले यार......
|
Dakshina
| |
| Monday, March 03, 2008 - 10:46 am: |
| 
|
अगदी बरोबर.... अंकुर... ती सुधा चंद्रन नावाची एक (भयानक) बाई होती, जिने अशाच मोठ्या मोठ्या टिकळ्या...कपाळावर वागवल्या... आणि छू म्हणून मराठी सिरियल्स मध्ये सोडल्या.... ती प्रसाद ओकच्या सिरियल मध्ये एक अशीच बाई आहे. पारदर्शक लिपस्टिक लावून, एक ओठ चावत आणि एक भुवई उडवत बोलते. (तरी बरं मी आजतागायत फ़क्त मलिकेचा ट्रेलर पाहीलाय) वास्तवात असं कोणी कधी करतं का? बायकांचं इतकं घाणेरडं स्वरूप दाखवायचा पायंडा कोणी पाडला कोणजाणे..
|
एकीकडे बायकांचं हे असलं चित्रण आणि दुसरीकडे एकदम पौराणिक मालिका. जी सात्विक पात्रं असतील ती कायम एकसुरी गोड बोलत असतात. अगदी तो महाभारतातला ' काळ ' ही ' मै समय हूं ' हे अतिशय गोऽऽऽऽड आवाजात सांगायचा प्रयत्न करायचा. सध्याची ' रामायण ' कोण बघतंय? त्यात कुमारवयीन सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी... सगळ्या एपिसोडभर पकडापकडी खेळत होत्या. सीता अर्थातच सिरियलची मुख्य हिरॉईन असल्याने ती कुणाच्याच हाती सापडत नव्हती. अगदी घोळदार घागरा घालूनही पाय न अडकता पळत होती. मध्येच तिने शिवधनुष्यही सहज उचलून दाखवले. 
|
Ajjuka
| |
| Monday, March 03, 2008 - 1:21 pm: |
| 
|
संध्याकाळी साडेपाच सहा ला लागणार्या dubbed mythology मालिका पाह्यल्यात का? dubbing मधे नेहमी वरचा सा लावूनच का बोलतात कळत नाही?
|
Tiu
| |
| Monday, March 03, 2008 - 2:11 pm: |
| 
|
खरं आहे! हल्ली मालिका आणि चित्रपट यात काहिही अचाट आणि अतर्क्य दाखवतात. त्यामुळे चित्रपट / मालिका, त्यात काम करणारे, त्याच्याशी संबंधीत असणारे या सर्वांचा आणि डोक्याचा काही संबंध नसतो असं माझं मत झालंय. आमचीही एक तळटीप: वरील वाक्य हे केवळ अचाट आणि अतर्क्य चित्रपट / मालिका, त्यात काम करणारे आणि त्याच्याशी संबंधीत असणारे याच लोकांना उद्देशुन लिहिलंय. या क्षेत्राशी संबंधीत असणार्या सर्वांना उद्देशुन नाही. तसं कुणाला वाटल्यास तो त्यांच्या बुद्धिचा दोष आहे!
|
श्रद्धा, महाभारतातला "समय" बराच चांगला होता की. १५-२० वर्षांपूर्वी तो प्रकार नवीनही होता आणि भिमानींच्या आवाजात एक लक्षात राहील असा वेगळा भारदस्तपणाही होता. बाकी रामानंद सागरांच्या रामायणापेक्षा महाभारत बरंच चांगलं घेतलं होतं. रामायणातला लक्ष्मण डोळे मोठे करून सारखा रागवायचा तेव्हा हसू यायचं.
|
Ajjuka
| |
| Monday, March 03, 2008 - 3:40 pm: |
| 
|
हल्लीच्या रामायणात ते बाण असतात का? झुंइ झुंइ जाणारे? आणि समोर आले की झुं झुं झुं असं करून एक खाली आणि एक पुढे जाणारे? ते नसतील तर काय मजा नाही. सगळ्या रामायणातलं लक्षात राह्यलेलं तेच आहे एकमेव!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|