Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
धुलाई यंत्र

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » product कसा वाटला? » धुलाई यंत्र « Previous Next »

Gajanandesai
Monday, March 03, 2008 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणत्या बनावटीची धुलाईयंत्रे तुम्हाला किंमत, दर्जा, वीजखर्च आणि खास वैशिष्ट्ये या दृष्टीने चांगली वाटतात, याची माहिती कृपया इथे लिहा.

Shraddhak
Monday, March 03, 2008 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्हर्लपूलचं व्हाईटमॅजिक. यात दोन प्रकार आहेत.

१. पाणी गरम करण्याच्या सुविधेसकट असणारं स्टेनवॉश. ( याचंच नाव पूर्वी हॉटवॉश असं होतं.)
किंमत मी घेतलं ऑक्टो. २००७ मध्ये तेव्हा १७५०० होती. याला वीज जरा जास्त लागते; हा एकच त्याचा दुर्गुण म्हणता येईल.
बाकी कोमट आणि गरम पाण्यात आवश्यकतेनुसात कपडे भिजवता येणे (agitronic soak) असं त्या पर्यायाचं नाव आहे. त्यात भिजवणं नको असेल तर आधी भिजवून थेट कपडे धुवायला लावले तरी चालतात. त्याच्या प्रोग्राममध्ये सोक नको असेल तर तो न निवडण्याची सुविधा आहे.
घाईगडबड असेल तर यात कपडे टाकून, कपडे भिजवण्यासकट सगळे पर्याय निवडून, धुलाई प्रक्रिया चालू करून तुम्ही बाहेरही जाऊन येऊ शकता. काम झालं की ते बापडं गप्प उभं राहतं. ( पण अजूनपर्यंत कपडे काही दोरीवर वाळत घालून ठेवत नाही. :-P )
धुणं चालू असताना वीज गेली तर पुन्हा आली की, त्याचं धुणं जिथे थांबलं होतं तिथूनच पुढे सुरु करता येतं. तेवढं ते लक्षात ठेवतं. :-)

धुण्याचा लोड कसा आहे ( कमी, मध्यम, जास्त, फ़ारच जास्त) वगैरे पर्यायही यात आहेत.
व्हाईटमॅजिकचं दुसरं आहे ते त्यात फ़क्त गरम पाण्याची सुविधा नाहीये बाकी वरीलप्रमाणेच. ( माझ्या आईकडे हे यंत्र आहे आणि त्याला आता घेऊन ८ वर्षं झाली. अजून एकही तक्रार नाही. Touchwood.) त्याची किंमत काहीतरी साडेचौदा हजाराच्या आसपास जाते.

मी बरंच विस्कळीत लिहिलेलं असण्याची शक्यता आहे तसंच या यंत्राची एकावेळी कपडे धुण्याची क्षमता वगैरेचे आकडे मला आता आठवत नाहीत. पण एका ४ / ५ माणसांच्या कुटुंबाच्या रोजच्या तसंच जास्तीच्या कपड्यांना ही यंत्रं चांगली आहेत.

ही वरील दोन्ही यंत्र पूर्णपणे स्वयंचलित आहेत (Fully Automatic) . यांना हवं तितकं पाणी मिळायलाच हवं असतं. ( पण आत्ता मी घेतलं तेव्हा तो माणूस्; बिनधास्त वरून ओतलं तरी चालेल म्हणाला.) याउलट सेमी मध्ये तुम्हाला हवं तितकं पाणी टाकून त्यात धुणं धुवून घेऊ शकता. किंमत कमी आणि धुण्याला वेळही कमी लागतो. पण धुतलेले कपडे पिळायला वेगळा टब असतो त्यात, त्यात ते टाकणे वगैरे सोपस्कार ( कटकट!) असतात. :-P
मी बंगलोरला वापरलेलं LG चं होतं. भाऊ अजूनही वापरतोय. चार वर्षं झाली तरी performance उत्तम.


Bee
Monday, March 03, 2008 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Whirlpool, LG च छान आहे. फ़क्त एकच लक्षात ठेव की front opening पेक्षा top opening असणार धुलाई यंत्र वापरायला जास्त छान जात. किमती ह्या किती किलो कपडे धुवायची गरज असते त्यावर अवलंबुन आहे. साधारण ५ ते ७ किलो कपडे धुवू शकणारे धुलाई यंत्र पुरेसे आहे.

धुलाई यंत्र घेताना त्याचे stand पण मिळत असेल तर घेऊन ठेव. कारण तळाला जर पाणी लागले तर त्यानी यंत्र खराब होत जाते. खाली जर काही घाण साचली असेल तर तीही काढता येत नाही. म्हणून stand मिळत असेल तर अवश्य घे.

विजेवर जर अवलंबुन रहायचे नसेल तर inverter किती watt चा लागेल हेही विचारून घे.


Zelam
Monday, March 03, 2008 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

front load washing machine top load पेक्षा ६० ते ६५ % बचत करते पाण्याची आणि energy ची.

Bee
Monday, March 03, 2008 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सांगतेस झेलम! मला वाटलं हा फ़क्त यंत्राचा दिसण्याचा भाग आहे. जर इतकी मोठी सुविधा त्यात असेल तर मग देशात आणि परदेशातही top loading धुलाई मशीनच का जास्त प्रमाणात वापरली जाते?

Maanus
Monday, March 03, 2008 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्याच्या washing machines चे माहीत नाही, पण पुर्वीच्या washing machines ला खालुन काहीच protection नसायचे, आणि मग त्यातुन उंदीर वैगेरे प्राणी मशीन मधे जावुन बसतात. तर मशीन घेतल्यावर त्याच्या खालील मोकळ्या भागावर जाळी बसवुन घ्यावी. तसेच जेथुन पाणी बाहेर पडते त्या पाईप वर देखील काम झाल्यावर cap बसवुन टाकावी. नाहीतर त्यातुन उंदीर आत जावुन मशीन खराब होते.

Ajjuka
Monday, March 03, 2008 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परदेशात जसे जास्त क्षमतेचे ड्रायर्स असतात ना ज्यात कपडे टाकले की ३० - ४० मिनिटांनी कपडे कडक वाळलेले. घडी घालून कपाटात ठेवून द्या. वाळत घालण्याची बातच नस्से.. असे ड्रायर्स आपल्याकडे देशात आलेत का? कुणाकडे आहे का? ते फारसे दिसत नाहीत याचं कारण काय कुणी सांगू शकेल का?

Savyasachi
Monday, March 03, 2008 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे ड्रायर्स गेल्या ३ ४ वर्शांपासून आहेत भारतात. IFB ही एक कंपनी मला माहीत आहे. अजुनही एक आहे बहुतेक.
असे ड्रायर्स आपल्याकडे अजून जास्त वापरात नाहीत कारण त्याला पॉवर जास्त लागते (गरम हवा बनवायची म्हणून) आणि खूप महागही आहेत. मला वाटत २ वर्षांपूर्वी IFB च्या मशीनची किंमत २५००० रुपये होती.
तर मीळतात.


Gajanandesai
Tuesday, March 04, 2008 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, बी आणि मंडळी माहितीबद्दल मनापासून धन्यवाद.

Manuswini
Tuesday, March 04, 2008 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे dryers चांगले बर्‍याच वर्षापासून आहेत देशात. फक्त ४-५ वर्षाआधीपासून नाही.

मला नक्की नाव नाही आठवत कारण आता ते machine dump केले इथे आल्यावर. आईला विचारते.
तेव्हा दुबई मधूनच ऑर्डर केले जायचे असे काहीतरी होते. दुबईचा ब्रंड होता वाटते. आम्ही भारतात असताना तिथूनच मागवला होता असे वाटते.
पण whirlpool चे आहेत आता.


Zakki
Tuesday, March 04, 2008 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परदेशात सोलर ड्रायर नावाचेहि ड्रायर मिळतात. 'पावसात वापरता येणार नाहीत' अशी विशेष सूचना असते. फक्त ९.९९ अधिक ५.९९ पाठवण्याचा खर्च.

इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जपानी इ. भाषांतून सूचना असतात. घरा मागे बरीच जागा पाहिजे, दोन झाडे पाहिजेत, एव्हढ्या माफक अटी असतात.

कुणाला हवा असल्यास मला कळवा!


Zelam
Tuesday, March 04, 2008 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी - top loading जास्त वापरात का याबद्दल काही कल्पना नाही रे. पण हे मी वाचलय खरं.
front load मध्ये गुरुत्वाकर्षणाचा वापर tumbling साठी केल्याने energy जास्त वाचते.


Psg
Wednesday, March 05, 2008 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोलर ड्रायर
म्हणजे??? साध्या नायलॉनच्या दोरीसाठी इतके डॉलर मोजावे लागतात????

झेलम, मी घेतेय शोध नेटवर. काही सापडलं तर इथे देते लिंक


Giriraj
Wednesday, March 05, 2008 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

top loading जास्त वापरात का याबद्दल >>
१. कमी किंमत.
२. portability

Front loading मशिन एका जागी फ़िक्स करावे लागते. त्याला inlet- outlet त्या त्या जागी द्यावे लागते. घर स्वतचे नसेल तर ही कटकट अवघड असते.

front loading मध्ये कपडे आपटून धुण्यासारखी क्रिया होते त्यामुळे कपडे चांगले निघतात. पूर्वी फ़क्त या प्रकारात असणारी गरम पाण्याची सुविधा आता top loading मध्येही आलेली आहे.

tumble wash चा एक दुर्गुण म्हणजे कमी क्षमतेच्या (४ / ५ kg ) मशिनमध्ये ड्रम लहान असल्याने आपटण्याची क्रिया नीट होत नाही त्यामुळे जास्त क्षमतेच्या मशिनातच tumble wash चा फ़ायदा पुरेपूर मिळू शकतो!

भारतात निव्वळ ड्रायर न खपण्याचं कारण आपल्याकडे मुबलक आणि चकटफ़ू असणारा सूर्यप्रकाश हेअसू शकेल





Giriraj
Wednesday, March 05, 2008 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजा,बाकी माहितीसाठी भेटा अथवा फ़ोन करा!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators