|
Arch
| |
| Wednesday, February 27, 2008 - 11:10 pm: |
| 
|
मनु, पण सगळ्यात तीच चांगली गाते. मला रोहनप्रीतपण आवडतो. पण considering range, variety, voice quality तिच पारडं नक्कीच जड आहे. फ़क्त काय cute आहे म्हणून तो तन्मय जिंकू नये म्हणजे झाल.
|
Little champs top 3 या वेळी फ़ारसे खास नाहीत . मला फ़क्त रोहनप्रीत च आवडतो . नागपुर चा रोहित श्याम राव चांगला होता आणि साहिल , आमिर पण चांगले होते . अनामिका चा आवाज चांगला आहे पण तिच्या त्या drama मुळे फ़ार राग येतो तिचा ! तन्मय तर महा अगाउ , अतिशय बेसूर , अतयंत irritating आहे . तो top 10 मधे येण्याच्या लायकीचा सुध्दा नव्हता . पहाता क्षणी राग येतो त्याचा , काय सारखे काळे - गोरे भेदभाव पसरवतो त्याच्या ads मधून ! त्या फ़ालतु ads म्हणायला लागला कि दोन धपाटे घालावेसे वाटतात त्याला,! हाकला त्याला ! Anyways, पण आसाम ची असल्यामुळेच अनामिका जिंकणार बहुतेक !
|
Giriraj
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:37 am: |
| 
|
DJ ,शांतिला धर! ड्रामाचे सोडून दे आता.. चांगली गाते पण ती.. आमीर माझाही खूप आवडता होता पण consistent नव्हता... पुन्हा त्याच्य घरच्यांनी खूपच राडा केला त्या दिवशी... वसुंधराचही inconsistent performance असायचा.. वैशाली तर मला नव्हती आवडत पण तिने ज्या gracefully elimination स्वीकारले ते मला खूप आवडले! अनामिका जिंकली पाहिजे!
|
आमिर हाफ़िज च्या फ़ॅमिली ने राडा केला , आमिर ने नाही . पण अनामिका ने स्वत : स्पर्धक असून आणि वयाने इतरां पेक्षा मोठी असूनही quit करायचा बालीश ड्रामा केला म्हणून तिला तिथेच eliminate करायला हवं होतं .
|
Giriraj
| |
| Thursday, February 28, 2008 - 9:50 am: |
| 
|
ह्म्म! तो ड्रामा edit करून दाखवता आले असते,पण ज़ीला तसे दाखवण्यात मजा आली... आणी मोठी म्हणजे काय फ़ार मोठी नाही ती.. तो तन्मय खूप लहान दिसत असला तरी तोही ११ वर्षांचा आहे.. ती १२ वगैरे वयाची आहे.. आणि मुळात स्पर्ध चांगले गाता येण्याची आहे.. त्यामुळे माझा पूर्वीपासून तन्मय,वैशाली वगैरेना ड्रामेबाजीबद्दल विरोध आहे. मात्र गाण्यातही ते यथातथाच वाटले.. आमीर फ़ायनल ३ मध्ये हवा होता!
|
या कन्याकुमारी गुणे माझ्या Orkut वर आहेत, पण त्या सा. रे. गा. मा. ला होत्या हे माहीत नव्हते... बाकी अनामिका जिंकायला हवी असे वाटत असले, तरी रोहनप्रीत वर बर्याच लोकांची प्रीत आहे हे कळते...
|
Sayonara
| |
| Thursday, February 28, 2008 - 7:47 pm: |
| 
|
हो, अनामिकाच होणार विनर. खरंतर रोहनप्रीत आणि तन्मय टॉप ३ मध्ये येण्यासारखे नक्कीच नाहीत. कसे काय आले देवजाणे. वैशालीही नव्हतीच. तन्मय आणी वैशाली त्यांच्या ओवरस्मार्ट बडबडीमुळे असावेत.
|
त्या एकापेक्षा एक मधे सचिन त्या जिनेन्द्रच्या एवढा मागं का लागलाय? अगदी खुन्नस ठेवल्यासारखं बोलतो. अर्थात दीपकचा मागचा आणि हेमलताचा कालचा शो फालतूच झाला पण तरीही शो मधे कुणाचा इतका अपमान करणं बरोबर नाही वाटत. सॅड्रीक, अजिंक्य, म्रुणाली किंवा स्वाती कुणीतरी जिंकेल असं वाटतंय.
|
Abhi_
| |
| Friday, February 29, 2008 - 6:37 am: |
| 
|
सन्मी अनुमोदक!! काल तो हेमलताला जे बोलला की त्याला हे आवडलं नाहिये.. तो तिचा फॅन आहे वगैरे वगैरे इतपत हे ठिक होतं.. म्हणजे स्पर्धेबाहेर पडणार्या स्पर्धकासाठी ते थोडं प्रोत्साहनपर ठरलं असतं पण त्या पुढे जाऊन त्याने चक्क त्या जीवेंद्रवर आरोप केला की त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले.. जेंव्हा त्या हेमलताबाई स्वतःहून कबूल करतायत की मी मेहनत कमी करते.. पण एकूणातच सचिन इतर स्पर्धकांच्या बाबतीतही खूप बायस्ड वाटतो.. अजून एक गोष्ट खटकते की आधी त्याच्या कॉमेंट्स दाखवतात आणि मग ज्युरींचे मार्क्स.. त्याच्या मताचा ज्युरींच्या मार्क्स देण्यावर नक्कीच परिणाम होत असेल.. कारण सबकुछ सचिन असल्यामुळे अशी शंका यायला खूप वाव आहे..(एखाद दुसरा अपवाद वगळता).. जर ज्युरी आधीच मार्क्स देत असतील आणि जाहिर नंतर करत असतील तर तसं दाखवावं त्यांनी.. पुढील दोन आठवड्यात कृतिका आणि नयन जातील आणि सेड्रिक, सुकन्या, आजिंक्य, स्वाती आणि मृणाली शेवटचे पाच स्पर्धक असतील.. कदाचीत मग विटींग सुरु होईल असं वाटतंय.. आणि ३ जणांच्यात फायनल ठेवली तर सेड्रिक, सुकन्या आणि आजिंक्य फायनल मध्ये असतील असं वाटतंय..
|
सुकन्या सॅड्रिक चांगले आहेत बाकी सगळे काही extra ordinary नाहीत . केतकी चितळे मला आवडायची आणि प्राची गरुड तर फ़ारच talented होती पण सचिन च्या बायस्ड nature मुळेच त्या आल्या नाहीत पुढे ! सचिन खूप अगाउ कृत्रिम आहेच पण बाकी सगळ्यात non sense म्हणाजे तो आदेश ! त्याने ज्या भागात cow boy गेट अप केला होता त्या वेळी त्याची trouser पाहिली का ? असा आचरट - अश्लील ड्रेस कसा निवडला ?
|
अभि exactly ! त्या ज्युरी बायका तर तमाशात मागं नाचणार्या हिला हिला म्हणणार्या बायकांसारख्या आहेत अगदी. काल तर ती चारूशिलाबाई सारखं हे सचिनजींनी(हे मराठीत 'जी' म्हटलेलं तर अगदी डोक्यात जातं.) सांगितलंच आहे हेच म्हणत होती. अरे तुम्हाला काय वाटतं ते बोला की. (आदिती मात्र छान बोलते.) तसं सचिन पॉईंट्स काढायचे म्हटलं की बरोबर काढतो. मूव्हमेंट्स रीपीट तर बहुतेक स्पर्धक करतात. डीजे अगदी. किती कृत्रिम बोलतो ना तो. आणि प्रत्येक शब्दाला तीन तीन समानार्थी शब्द एकाच वाक्यात. आम्हाला एक शब्द सांगून कळणार नाही का? "हा जो तुमचा आऊटफिट आहे, हा जो तुमचा कॉस्च्युम आहे, किंवा तुमचा अटायर आहे." अरे! काय गम्मत आहे? मला सॅड्रिक आणि सुकन्या सगळ्यात पोटेन्शियल प्लेयर्स वाटतात. पण अजिंक्यचे नाच खूप इनोवेटिव्ह असतात. विषेशतः दुर्गे दुर्घट भारी तर फारच वेगळं वाटलं होतं. मला नाचातलं बघायला छान वाटतंय एवढं सोडून बाकी काही कळत नाही. पण बहुतेक प्रेक्षक याच लेव्हलला असतात.
|
Arch
| |
| Friday, February 29, 2008 - 4:21 pm: |
| 
|
बरं ती सा रे गा मा ची final round किती वाजता आहे उद्या?
|
संघमित्राने लिहिलेल्या 'जी' ह्या शब्दप्रयोगावरुन्: असाच आणखी एक डोक्यात जाणारा शब्द म्हणजे जीजाजी.. "अहो जीजाजी, जीजाजी, तुम्ही येताय ना" असले संवाद ऐकले की एकदम कानात गरम शीशाचा रस ओतावा असे वाटते. बाकी चालुदे. इथे हॉलंड मध्ये पण रिआलिटी शो, टॅलंट हंट इत्यादी अगदी चवीने बघतात. अमेरिकेत तर ऊत आहेच. एकुणात जगभरच हा ट्रेंड दिसतोय.
|
Sayonara
| |
| Friday, February 29, 2008 - 4:59 pm: |
| 
|
आर्च, उद्या सकाळी दहा वाजता. आणि रिपीट संध्याकाळी आठ की साडे आठवाजता.
|
Maitreyee
| |
| Saturday, March 01, 2008 - 8:13 pm: |
| 
|
अनामिका जिंकली शेवटी. गेल्या वेळचे लिटल चॅंप्स पाहिले का सम्चिता कसली ढोल झाली आहे! अन मुलं पण केवढी मोठ्ठी वाटतात आता!!
|
हो , संचिता solid जाड झालीये ! त्या मौली , उज्जयनी , हिमानी आणि निहिरा सुध्दा कसल्या ढोल्या झाल्यायेत . बाकी अनामिका जिंकणारच होती , गाते छान पण जिंकली ते केवळ north-east च्या कृपेमुळे ! As always झी ने winner कुठल्या भागातला असतो याची परंपरा पाळलीच .
|
Sayonara
| |
| Sunday, March 02, 2008 - 4:25 am: |
| 
|
हो ना. आधीच्या लिटील चॅंम्प्स मधला समीर खूपच उंच वाटला आणि संचिता आधीच्या मानाने बारीक वाटली.
|
झी वाटते भरपूर खुराक खालते वाटतो ह्या स्पर्धाकांना. कायच्या काय जाड होतात सर्वजण.
|
संचिता आधीच्या मानाने बारीक वाटली. <<<<<नाही ग सायो , आधी संचिता चांगलीच बारीक होती आता ओळ्खता नाही येणार इतकी गुटगुटीत झालीये !
|
Giriraj
| |
| Sunday, March 02, 2008 - 6:23 am: |
| 
|
मला एका बाबतित ग्यान सहायचे कौतुक वातते.. वसुंधरा किंवा मागच्या वेळचा दिवाकर काय, नाचू शकत नाहीत हे माहीत असूनही त्यांना वाव दिला शेवटच्या कार्यक्रमात. दोघेही आपल्या परीने स्टेप्स आथवून नाचत होते आणि एंजॉय करत होते. त्यांच्या शारिरिक व्यंगाचा कुठेही बाऊ करून भीक मागितली गेली नाही
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|