|
सिरीयल्स च्या लेखाकाला त्या नायिकेसाठी म्हशीचे रुपक वापरायचे असेल. म्हणुन ती इतके दिवस गरोदर होती. असे छुपे आणि महान अर्थ तुम्हाला कळत नाहीत आणि उगा सिरियल्स वाल्याना दोश देता.. (दिवे घेणे)....
|
Manuswini
| |
| Thursday, February 28, 2008 - 8:42 pm: |
| 
|
tiu, तेच ते.. तेच ते तान्यजी, शेवटी काय त्या म्हशीला 'रेडा'च होणार ना नाहीतर टोणगा( ID नाही हां म्हणत आहे) म्हणून इतका वेळ गरोदर दाखवत असतील. बरे झाले हा गुपीत अर्थ सांगीतला ते. दिवे घ्या
|
तान्यजी, तनया, तान्या.. अरेरे.. काय हे माझ्या सुंदर नावाचे अपभ्रंश (अपभ्रंशातला श शहाम्रुगातला की षटकोनातला???) टण्या एव्हडे सुंदर नाव आहे.. मिरजेत येवून विचारा कोण पण नीट सांगेल माझे नाव.. (म्हणजे सांगायचे.. आता कुणी ओळखेल की नाही माहिती नाही.. असो.. काळाचा महिमा).. आणि रेडा झाला तर काय उपयोग.. रेडी झाली तर खरं.. (बहुतेक म्हसरांच्या मायबोलीवर समानता बीबीवर रेडामुक्तीबद्दल चर्चा घडत असावी) दिवे घ्या (गेल्या काही दिवस मायबोली शहरातील वातावरण एव्हडे तंग आहे की प्रत्येक पोस्ट नंतर दिवे घ्या असे लिहितोय.. चुकुन एखाद्या पोस्टला लिहिले नाही तर हे घ्या माझे ओम्निप्रेझेंट दिवे..)
|
Giriraj
| |
| Friday, February 29, 2008 - 7:48 am: |
| 
|
जर वाटते की या सिरियल अश्या आहेत तरी त्या बघण्याचे धाडस करावेच का?
|
Manuswini
| |
| Friday, February 29, 2008 - 5:01 pm: |
| 
|
गिरिराज, धाडस कुठले आहे त्यात? मी तरी टीवी घरात शिरल्यावर उगीच लावून ठेवते.. मोठा आवाज करून... जेवण करताना काहीतरी धांडधींगा पण रोज रात्री या अचाट सीरीयल्स फक्त लागतात. त्यामुळे मग कळते. पण काही लोक अगदी मन लावून, प्रत्येक भाग follow करून बघतात ह्या सीरीयल्स. जावु दे हर एक का चॉइस और पसंद अपनी अपनी होता है....
|
Tonaga
| |
| Friday, February 29, 2008 - 5:07 pm: |
| 
|
गिरीशजी, सफरचन्द खाऊ नको असे बजावले असताना खाऊन पुढचा अनर्थ घडवणारांचे आपण वंशज त्यामुळे नको नको म्हणताना या सिरियल्स पहाणारच...
|
Sayonara
| |
| Friday, February 29, 2008 - 6:50 pm: |
| 
|
हल्लीच्या हिंदी सिरियल्समध्ये गरोदर असलं तरी पोटं सपाट दाखवायची ट्रेंड आहे. आणि अचाट, अतर्क्य मध्ये 'कसम से' चा नंबर पहिला यात काही शंकाच नाही. धन्य हो एकता कपूरची. थोडं विषयांतर....ती म.टा.मध्ये कादंबरी लिहिणारी रोहिणी निनावे एकता कपूरला सिरीयल्स लिहून देत असावी असा मला डाऊट आहे. 
|
Mpa
| |
| Friday, February 29, 2008 - 8:46 pm: |
| 
|
अगदि अगदि. म. टा मधे येणरी "तु सुखि रहा" ही अशीच अचाट आणि अतर्क्य गोश्ट आहे. तरिहि मी रोज वाचते.
|
Sas
| |
| Saturday, March 01, 2008 - 2:48 am: |
| 
|
serial मध्ये आळून पाळून 'हे असे' होते, >>> तुम्हाला आलटुन पालटुन असं म्हणायचय का? म. टा मधे येणरी "तु सुखि रहा" ही अशीच अचाट आणि अतर्क्य गोश्ट आहे. तरिहि मी रोज वाचते. >>>>> मला जाम हसु आल वरील वाक्ये वाचुन
|
Sas
| |
| Saturday, March 01, 2008 - 3:08 am: |
| 
|
मला तर वाटत एकाच प्रकारच्या सिरीयल्स वेगवेगळ्या चायनल वर दाखवितात फक्त पात्र Director, Writer...etc etc वेगवेगळे कुठलिही एक सिरियल बघितली कि आजुबाजुच्या चायनल वर काय चालु असेल ह्याचा अंदाज लावता येतो (Similar घटना क्रम मागे पुढे चालु असतात) एकता कपुर तर विचारायलाच नको: बडे बडे परिवार उनका बडा नाम, घरात संस्कृतिचा, परिवार यांचा ध्यास असलेली एक तडपती आत्मा (व्यक्ती), जिला सगळ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे, नाक खुपसणे मग त्यांचा काय problem चाललाय ते शोधुन काढणे, तो सोडविणे, आपले शत्रु बनविणे हे करत असतांनाच स्व:ताच्या जिवनात नवनवीन रहस्यमय गोष्टि घडवणे (एखाद मुल परिवारवालो के पिठ के पिछे, मग ते मुल अचानक कितैक वर्षांनी उगवणे वै...) हे करण्यात घर काम, मुलांचा अभ्यास वै. ला अजीबात वेळ मिळत नाही (पण make up करायला ला मिळतो.) अशी ही महान व्यक्ती, तिचे संस्कार, घरात असतांना देखिल, घरातिल विवाह मोडतात, मुलाच्या-नवर्याच्या ई. २ बायका, घरातले तरुण बिघडलेले.....थकले लिहुन पण यादि अभि बाकी है ... ...To know more about Non-stop and Unlimited अचाट आणी आर्तक्य पणा watch एकता कपुर'स सिरीयल्स ...टिंग टौंग!!! 
|
Ajjuka
| |
| Saturday, March 01, 2008 - 3:34 am: |
| 
|
...To know more about Non-stop and Unlimited अचाट आणी आर्तक्य पणा watch एकता कपुर'स सिरीयल्स ...टिंग टौंग!!! HHPV!!!!
|
Kilbil
| |
| Saturday, March 01, 2008 - 6:47 am: |
| 
|
सास, अधुनमधुन मरुन(?) परत जिवंत होणे, स्म्रुतिभ्रंश होणे, आंधळे होणे, canser होणे, अगदीच कंटाळा आला तर पुनर्जन्म घेणे हे सगळे राहिलेच की....
|
Ajjuka
| |
| Saturday, March 01, 2008 - 11:26 am: |
| 
|
कॅन्सर होतो मग ती व्यक्ती आपल्या नवरा किंवा बायकोला दुसर्याशी लग्न करायला सांगते/ तो. आणि treatment साठी निघून जाते. इकडे ती व्यक्ती स्वर्गवासी झालीच असं समजून दुसरे लग्न होते. आणि त्या दुसर्या लग्नात जोडीदार रमू लागलाय असे दिसताच नियतीरूपी केकता खदाखदा हसते नी अचानक कॅन्सर किंवा एडस खडखडीत बरा करून आधीच्या व्यक्तीला परत आणते. (बहुतेक पगारवाढीच्या प्रस्तावावर मांडवली झालेली असणार..) मधे काही दिवसांपूर्वी जो तो धडाढड plastic surgery करत सुटत होता. त्यामुळे ओळखायला अवघड. त्यात थोबाड बदलायचंच पण संपूर्ण अंगकाठीही? उंच आणि सुदृढ स्मृति इराणी जाऊन स्कर्ट घातला तर सातवीतली वाटेल अशी गौतमी गाडगीळ? विज्ञानाचा चमित्कार... प्लॅस्टिक सर्जरी काय काय करू शकते! सध्या पुनर्जन्मांचं पेव फुटलंय आणि 'मागच्या background ' ला OSO ची धून. त.टी. - याठिकाणी सिरीयलच्या अचाटपणावरच विनोद किंवा टीका केलेली आहे. कॅन्सर पेशंटस, दुसरे लग्न करणारे लोक, कॉस्मेटिक सर्जरी करणारे, स्कर्ट बनवणारे, सातवीतले विद्यार्थी इत्यादी कुणावरही विनोद किंवा टिकेतून विनोद अपेक्षित नाहीये. तसा गैरसमज करून घेतल्यास तो तुमच्या बुद्धीचा दोष आहे.
|
Abhi_
| |
| Saturday, March 01, 2008 - 12:08 pm: |
| 
|
अज्जूका तळटीप खासच
|
Zakki
| |
| Saturday, March 01, 2008 - 12:24 pm: |
| 
|
तर काय. आजकाल स्पष्टीकरण, विशेष सूचना, आगाऊ क्षमा, इ. तळटीपा लिहील्याखेरीज काही लिहायची सोय नाही हो. कोण केंव्हा भांडायला उठेल याचा भरोसा नाही! गंमत, चेष्टा इ. साठी इथे म्हणजे हितगूजवर येऊ नका. फक्त अत्यंत गंभीर, कमीत कमी दहा पुराव्यांनी शाबित असेच लिहा. नाहीतर माझ्या सारखे निर्लज्ज होऊन, गेंड्याच्या पाच कातड्या पांघरून इथे या. चटकन् क्षमा मागून टाकण्याइतकी नम्रता अंगी असू द्या. किंवा जे आपल्याला ओळखतात त्यांचा गट करून, त्यांच्यातच संवाद साधा, चेष्टा, विनोद, साहित्यिक दृष्टीने कमी दर्जाचे लिखाण, सगळे त्यांच्यात. मग कुणि गटबाजीचा आरोप केला, की एकदम प्रत्यक्ष काळ किंवा कालिमातेचे स्वरूप घेऊन, होऊन जाऊ द्या शाब्दिक लढाई! त्यातून तलवारीचे वार होताहेत, अंगावर आग पडते आहे, असे वाटले पाहिजे वाचताना!! तेव्हढीच बाकीच्यांना गंमत!
|
Zakasrao
| |
| Saturday, March 01, 2008 - 12:40 pm: |
| 
|
अज्जुका तळटिप म्हणजे खास पुणेरी पाटी आहे अगदी रोहिनी निनावे ही खरच असल्या कादंबर्या लिहु शकते आणि ति बर्याच सिरियल्स ची लेखिका आहे देखिल.
बर मला एक सांगा सगळ्या सिरियल्स ची स्टोरिची आयडीया केकतेचीच का असते??? तिचे नाव असते बर्याच वेळेला त्यात.
|
Sayonara
| |
| Saturday, March 01, 2008 - 1:43 pm: |
| 
|
अज्जुका, केकता कपूर काहीही लिहू शकते आणि अंमलात आणू शकते. झी हिंदी म्हणजे अचाट आणि अतर्क्य सिरियल्सचा खजिना आहे.लिहावं तेवढं थोडंच.
|
Tulip
| |
| Saturday, March 01, 2008 - 2:09 pm: |
| 
|
अज्जुका आणि हल्ली असं काय ते सिरियल्समधे ढॅण्ढ ढॅण्ढ असले आवाज करत पन्नास वेळा प्रत्येक कॅरेक्टरच्या चेहर्यावरुन कॅमेरा फ़िरवत असतात? फ़्लॅश पाडत असतात? चॅनल सर्फ़ करताना सगळ्या ठिकाणी असंच चाललेलं दिसतं.तो चकचकाट पाहून आंधळेपण बहीरेपण दोन्ही एकदम येईल की काय असं वाटतय. शिवाय बुद्धीभ्रंश वेगळाच. आणि मुलगी मुलाचा ड्रेस घालून लगेच मुलगा बनून अगदी स्वत्:च्या आई वडिलांसकट सगळ्यांना फ़सवू शकते. कोणाला संशयही येत नाही. अन्नु की हो गयी वाह भई वा नावाची एक सिरियल माझ्या इथल्या नव्या पंजाबी शेजारणींमधे लई पॉप्युलर. अगदी खो खो खो आवाज येत असतात त्यांच्या सदैव उघड्या घरांतून. मी सुद्धा गेले दोन तीन भाग जेवताना कुतूहलाने पाहीलेच शेवटी आणि धन्य झालेय.
|
Manuswini
| |
| Saturday, March 01, 2008 - 6:02 pm: |
| 
|
अज्जुका, तळटीप एकदम खासच specially, सातवीतले विद्यार्थी आता राग करणार ह्या पोस्टचा
|
Sayonara
| |
| Saturday, March 01, 2008 - 6:05 pm: |
| 
|
ट्यु, एक विसरलीस. जेव्हा सिरीयल्समध्ये काहीतरी शॉकिंग असतं तेव्हा सगळ्यांचे ब्लॅक एंन्ड व्हाईट चेहरे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|