|
Bee
| |
| Friday, February 29, 2008 - 5:34 am: |
| 
|
मला न राहून हे लिहाव लागत की ऐरवी आपण दिनेश ह्यांना किती मान देतो. खास करून इथल्या मुली. वरची सर्व पोष्ट वाचून वाटायला लागले इतक्या तिखट प्रतिक्रिया द्यायची जर गरज होती तर हे दिनेश ह्यांना मेल करून लिहायचे असते. कारण वरच्या तिखट प्रतिक्रिया वाचून आजवर आपण दिनेश ह्यांना जो मान देत आलो आहोत तो एक ढोंगीपणा होता. आपण ज्यांना मान देतो त्यांच्याशी लगेच असे भांडत नाही. काही जण मायबोलिवर असे आहेत की स्वतहून कधी बोलणार नाही पण जेंव्हा इतर कुणी बोलले तर पुढे सरसावून परिस्थितिचा फ़ायदा घेतात. जर दिनेश ह्यांनी duplicate ID घेतली असती आणि वर जे लिहिले ते लिहिले असते तर इतक्या तिखट प्रतिक्रिया देण्याची कुणाची मजल झाली नसती. प्रामणिकपणे कुणी जर मायबोलिवर लिहित असेल तर सौम्य शब्दात देखील वाद घालता येतो.
|
Admin
| |
| Friday, February 29, 2008 - 6:13 am: |
| 
|
मला वाटते मुद्दा भरकटतोय (तसा तो गेल्या काही दिवसांपासून भरकटतोय) मला असे वाटतेय दिनेश याना असे म्हणायचे आहे की काही स्त्री किंवा पुरूष एखाद्या कामासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेपेक्षा स्त्री पुरुषाच्या अंगी असलेल्या सामर्थ्यांचा किंवा असामर्थ्याचा गैरवापर वाटावा असा फायदा करून घेतात. त्यानी ज्या पद्धतीने मुद्दा मांडला त्यावरून तो अनेकाना आवडला नाही हे स्पष्ट आहे. कुणाला त्यातले generalization आवडले नाही तर कुणाला त्या अनुषंगाने आलेले वर्णन योग्य वाटले नाही. दुसरा एक मुद्दा मी सांगू इच्छीतो. कुठलाही वाद (विशेषत्: स्त्री पुरुषांमधला) हा योग्य दिशेने चालला आहे का नाही, याबद्दलचे निकषच मुळात त्या त्या व्यक्तीला भिन्न वाटतात. अगदी सोप्या पद्धतीत उदाहरण द्यायचे झाले, जर बुध्दीबळ खेळणार्या दोन खेळाडूंनी वेगवेगळे नियम घेऊन खेळ खेळला, आणि जिंकणे म्हणजे काय याच्या व्याख्याच वेगळ्या असतील तर दुसयाला नेहमीच पहिल्याचा खेळ चुकीचा वाटणार. त्यामुळे या वादात ही गोष्टही आपण सगळ्यानी लक्षात घ्यावी.
|
Shraddhak
| |
| Friday, February 29, 2008 - 6:18 am: |
| 
|
बी, मान देणं म्हणजे एखादी गोष्ट चुकीची वाटली तरी गप्प बसणं अशी तुझी समजूत आहे का? गप्प बसल्याने साध्य तरी काय होणार आहे नक्की? मान देण्यासंदर्भात: ही दोन्ही बाजूंची जबाबदारी असते, असं तुला वाटत नाही का? इतर लोक मान देत असतील तर तो आपला आपण राखावाही लागतो. आणि प्रतिक्रिया देताना इथं कुणीही पातळी सोडून बोललेलं मलातरी दिसत नाही. सगळ्याजणींनी स्वतःला खटकलेल्या गोष्टी मांडल्या आहेत. आक्षेप याच गोष्टीवर आहे की काही गोष्टी बीबीच्या विषयाशी काहीही संबंध नसताना उगीच पाल्हाळ लावून मांडल्या गेल्या आहेत. दुसरे जे समानता बीबीचे उदाहरण दिले गेले आहे तेही जमल्यास वाचून बघ. तरीही तुला हे चुकीचेच वाटले, तर वाटो. आणि मेलवर का म्हणून हे सर्व लिहायचे? ज्या गोष्टी खटकल्या त्या इथे सार्वजनिक बीबीवर असताना त्याबद्दलचा आक्षेपदेखील तिथेच यायला हवा. असो. तुला हे स्पष्टीकरण पुरेसे वाटले तर ठीक. अन्यथा जाऊ दे. आणि कृपया यावरून वाद नकोत. धन्यवाद.
|
Arun
| |
| Friday, February 29, 2008 - 6:27 am: |
| 
|
आजकाल मुलाखतीच्या संदर्भात मला हा अनुभव येतो. मी ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेतो, त्यापैकी पात्रता आणि अनुभव या पातळ्यावर समान असल्या तरी मुली, आपले संभाषण चातुर्य दाखवण्यापेक्षा, तिरपा कटाक्ष वगैरेचे प्रयोग माझ्यावर करतात. हे लक्षात आले तरी पुरुष उमेदवार, काहिच करु न शकल्याने निराश होतात. अर्थात माझ्यावर या अस्त्रांचा परिणाम होत नाही. पण बाकि ठिकाणी होत असावा. >>>>>>>>>>>>>>> मी आत्तापर्यंत असंख्य interviews घेतले आहेत. आणि मला हे जाहीर करण्यास अत्यंत आनंद होतो आहे की आत्तापर्यंत कोणत्याही स्त्री उमेदवाराने नोकरी मिळवण्यासाठी हे असले प्रकार केले नाहियेत. ज्या संदर्भात नोकरी आहे, त्याच विषयावर आपले अकलेचे तारे तोडत एकतर नोकरी मिळवली आहे किंवा गमावली आहे. आणि हो, मुलींची पर्स जाऊ द्या हो, आधी आपण आपली वाॅलेट्स तपासुया. त्यात सुद्धा अगणित निरुपयोगी वस्तू सापडतात. नाही का ?????????? उदा. १. असंख्य credit cards २. नको असलेली visiting cards ३. ATM slips ४. ऑफीसच्या drawer ची किल्ली. * छोटी असते, आणि उगाच किचेन लावून खिशात ठेवली की खिसा फाटतो, म्हणून मग पाकिटातच ठेवली जाते * ५. revenue stamps ६. passport size photograph * स्वत: चाच हो. दुसर्या कोणाचा ठेवणार, या वयात ???????? नाही म्हणायला कोणे एके काळी दिक्षितांच्या माधुरीचा फोटो असायचा ....... * ७. वेगवेगळी बिलं. त्यातल्या त्यात पेट्रोलच्या बिलाचा उपयोग तरी होतो, बाकीच्यांचा नाही. अजून काही राहिलं का ???????? जाणकारांनी अजून addition करा बघू ............. असो. तर आता परत आपण या बीबीच्या मुळ विषयाकडे वळू या.
|
Arc
| |
| Friday, February 29, 2008 - 7:30 am: |
| 
|
वर जे काही चालले आहे तो कम्पुगिरीचा प्रकार आहे.दिनेशच्या (ते शेवटी दा लावन्याचे नाटक मला नही जमनार) आधीच्या (इतर धरुन) posts वाचुन मला नाही वाटत की त्याना genaralised statement करायचे होते. अशी tendency काही मुलीन्मधे असते एवदेच त्याना सान्गायचे होते. राहता रहील तो सिनेमामधला प्रसन्ग तोही काही अगदीच अस्थानी नाहिये. इतर BBs वर सुधा लोकानी त्या त्या वेळी त्याना आठ्वलेले अगदी सिनेमातले नाहीत पण त्यन्च्या आयुअश्यातील प्रसन्ग सान्गितले आहेतच की (माज़्या लग्नात असे ज़ाले,मज़्या आईला असे शेजारची बाई म्हणाली etc ) मुलात मायबोली सारख्या sites लोकानी मराठीत एक्मेकन्शी बोलव्यात ह्याकरता असतात.तेव्हा flow मधे मोकळेपन्ननी कोणी काही बोलले की अशी कम्पुगिरी करुन त्याला हाणुन पादले तर कोणाला आवडेल join करयला?
|
Manuswini
| |
| Friday, February 29, 2008 - 7:50 am: |
| 
|
अर्क, तुम्हाला काय जमते, नाटक का काय हे कोणी विचारले आहे का? तुमचे मत विषयावर मांडले तर ज्यास्त चांगले राहील नाही का? respect given, respect taken . एखाद्या व्यक्तीचे मत पटले नाही तर उगाच पातळी सोडून त्या व्यक्तीला 'अरे कारे करत अपमान करायला ..'मला नाही जमणार'. ती व्यक्ती मोठी (वयाने, अनुभवाने एखाद्या विषयात ) आहे ह्याचे भान ठेवून उत्तर लिहिणेच ज्यास्त. आणि तेव्ह्ढ्याच शिश्तीत 'खटकलेली' बाब दाखवली तर काय वाईट. नाहीतर आजकाल मला तर हेच दिसून आलेय की चांगली चांगली प्रग्लभ मायबोलीवरील मंडळी सुद्धा काहीही कारण नसताना उगाच कोणाची तरी कुठल्याही बीबी वरील पोस्ट पकडून मस्करीच्या नावाखाली काहीही पोस्ट करून दात विचकावून मोकळी होतात तेव्हा असे वाटते की अरे ही व्यक्ती असे सुद्धा लिहिते? वर हीच मंडळी दुषीत झाले वातावरण ह्या नावाने बोंब करतात. BTW, Arc, मी तुम्हाला Explaination देत न्हवते पण उगीच काही बाही बडबड करून काहीही साध्य होणार नाही.
|
Athak
| |
| Friday, February 29, 2008 - 8:06 am: |
| 
|
अरुण , बघ बघ अजुन ठेवला असशील लेका नेनेबाईंचा फोटो पुरुषांनी स्वताच्यादुसर्याच्या तर परत ऑब्जेक्शन वालेटमधे काय आहे हे लिहायला हरकत नसावी civil id Driving license Health card club cards Post card ( म्हणजे आमच्या PO Box चे कार्ड हो India मधे येण्याजाण्यांची तारीख असलेली भली मोठी लिस्ट निरनिराळ्या देशांचे Sim cards visiting cards माझे अन इतरही Photos ४ माझे ४ बायको(चेच) ४-४ मुलांचे ( ४-४ मुलांचे नाही हो , २ मुलांचे ४-४ फोटोज निरनिराळ्या airlines चे membership cards Bank Credit Cards चे नंबरची यादी व contact numbers ओह God बघा की राव चुकुन Bank cards चे PIN नंबर पण सापडले वालेटमधे लगेच दुसरीकडे safely ठेवायला हवे , thanks रे अरुण माझे वालेट तपासण्याबद्धल अरे पुरुषा , बायकांनाच का नांवे ठेवतोस
|
Arc
| |
| Friday, February 29, 2008 - 9:24 am: |
| 
|
पण उगीच काही बाही बडबड करून काहीही साध्य होणार नाही...... हे बघा माज़े मुद्दे तुम्हाला मी अनुमोदन ( ते मोदक का लाडु असेच काहीतरी ) न दिल्याने काही बाही बडबड वाटत असेल तर मी पुढे काय बोलणार? तरी नशीब duplicate ID असा आरोप नाही केला.
|
Psg
| |
| Friday, February 29, 2008 - 9:27 am: |
| 
|
पुरुष वॉलेट मधे पुरेसे पैसे आणि वैध असलेली क्रेडीट कार्ड्स आहेत ना हे पहात नाहीत का? अथकच्या पाकिटात ते सोडून बाकी सगळं आहे
|
Giriraj
| |
| Friday, February 29, 2008 - 9:40 am: |
| 
|
माझ्या पाकीटात असलेली महत्वाची वस्तू म्हणजे गाडीचे PUC .. ते नसले तर पाकीटातली सर्वात महत्वाची वस्तू पोलिसांना द्यावी लागते!
|
Itgirl
| |
| Friday, February 29, 2008 - 10:04 am: |
| 
|
....तरी नशीब duplicate ID म्हणजे तसे काही आहे का??
|
Arc
| |
| Friday, February 29, 2008 - 10:12 am: |
| 
|
म्हणजे तसे काही आहे का?? .. अहो तुम्हाला कल्पना नाही वाटते, मी इथे बर्याच ठिकाणी( BBs )वर पाहीले अनुमोदन मिळाले नाही की काही लोक एकत्र येउन duplicate ID, duplicate ID अशी हाकाटी पिटायला लागतात.मनुस्विनीबाईनी तसे केले नाही म्हणुन मी लीहीले तसे
|
Arun
| |
| Friday, February 29, 2008 - 10:17 am: |
| 
|
गिर्या : गाडीचे PUC पाकिटात ?????????? अरे गाडीतच ठेवायचे ना ते ????????
|
Itgirl
| |
| Friday, February 29, 2008 - 10:23 am: |
| 
|
आर्क, अशी कारणाशिवाय हाकाटी झालेली मी तरी अजून मायबोलीवर पाहिलेली नाही. बरेच जुने बा. फ. मी वाचलेत, पण आपण म्हणता तसे काही दिसले नाही कुठेच. त्यामुळे तुमचे हे विधान ओढून ताणून केल्यासारखे वाटतेय. मायबोलीवर येणार्या अन लिहिणार्या लोकांना इतक्या संकुचित वृत्तीचे तुम्ही कशावरून ठरवताय? तुम्हांला पाठिंबा मिळाला नाही म्हणून? तुम्हांला कोणी इथे डुप्लिकेट आयडी असे कोणी तरी म्हटले होते / आहे का? स्वत:च स्वत:च्या अंगावर धूळ उडवायची अन लोकांच्या नावाने बोटे मोडायची ह्याला काय अर्थ आहे?
|
आर्क, मला तुमचे मुद्दे काय मुद्दे आहेत ते कळू शकतील का??
|
Arc
| |
| Friday, February 29, 2008 - 10:46 am: |
| 
|
तुम्हांला पाठिंबा मिळाला नाही म्हणून?..... मला कशाला पाहीजे पाठिम्बा?ही काय निवडणुक आहे? मायबोलीवर येणार्या अन लिहिणार्या लोकांना इतक्या संकुचित वृत्तीचे तुम्ही कशावरून ठरवताय?......... काहि लोक म्हनजे सगळी मायबोली नव्हे, असे मला वाटते.पण तुम्ही मात्र अगदीच generalised statement केलेत. आणि मी तर दिनेश यान्चे post मला का खटकले नाही ह्यासाठी post लिहिले होते त्यावर स्वत्:च धुळ कोणी उडवुन घेतली? any way तुम्ही कसलेले मायबोलीकर ( i mean u people can write well in marathee ) आहात, आमच्यासारख्या पामर तुमच्यापुढे काय टिकाव धरनार this is my last post on this BB
|
Arc
| |
| Friday, February 29, 2008 - 10:49 am: |
| 
|
नन्दिनी i will prefer to mail u
|
मेल कशाला? इथेच लिहा ना. आणि तुम्ही मेल पाठवलत तर ते मी इथे कॉपी पेस्ट करेनच. त्याबाबतीत निर्धास्त रहा...
|
Giriraj
| |
| Friday, February 29, 2008 - 10:59 am: |
| 
|
बा अरुणा,आमची गाडी दोन चाकांची रे.. त्यात मी काही ठेवत नाही.. कोणत्याही कागदांचे त्यात कपटे होऊन जातात!
|
Arc
| |
| Friday, February 29, 2008 - 11:12 am: |
| 
|
त्याचे काय आहे, एका lightly चाललेल्या BB चे भरकतने मला पतत नाही म्हणुन मेल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|