|
Zakki
| |
| Thursday, February 28, 2008 - 12:01 am: |
| 
|
अथकराव, काऽहीहि होऊन राहिले नाहीये. सगळे झकास! तुम्ही या, वाईच बसा, पान गिन खा, काही हालहवाल, खूषखबर सुनवा! नि जमल्यास ते पेट्रोलचे भाव कमी करा राव! फार मुष्किल होऊन राह्यली आहे इथे. आमची SUV भरायला फक्त प्रिमियम्म पेट्रोल लागते, नि जवळ जवळ १२५ ते १५० डॉलर लागून राहिले, दर आठवड्याला!
|
Dineshvs
| |
| Thursday, February 28, 2008 - 3:10 am: |
| 
|
झक्कि, अहो तुमचा मराठीचा आग्रह, कालच्या जागतिक मराठी दिनीच मोडला गेला हो. माणसा, खरे दुःख त्याचे. बाकी काय चालायचेच !!! आता आलोच आहे, तर एरिन बद्दल लिहितोच. मला वाटले कि हा सिनेमा सगळ्यानी बघितला असावा. त्यापेक्षा जुना, प्रीटी वुमन तर अजुन टिव्हीवर दाखवतात. हा त्या नंतर सहा सात किंवा जास्तच वर्षानी आला. एरिन हि एक घटस्फ़ोटित महिला. तीन मुलांची आई. शिक्षण फ़ारसे नाही. जगण्यासाठी अनेक तडजोडी करत जगत असते. पुढे काहि कागदपत्रे चाळताना तिला एका कारखान्याने केलेल्या प्रदूषणाबद्दल कळते. ती या प्रकरणातील कागदपत्रे शोधुन काढते. त्या प्रदूषणाचा त्रास झालेल्या कुटुंबियांशी संपर्क साधते. तिची धडपड बघुन, एक ज्येष्ठ वकिल तिला साथ द्यायला तयर होतो. तो कायदेशीर लढाई लढुन त्या सर्वाना नुकसानभरपाई मिळवुन देतो, पण तिचे श्रेय मात्र तिला देतो. हि एक पुर्णपणे वास्तव कथा. अश्या कथेवर सिनेमा काढणे, त्यात ज्युलियासारख्या आघाडीच्या अभिनेत्रीने भुमिका करणे, सगळेच अपुर्वाईचे होते. वास्तवातल्या एरिनने या सिनेमात छोटीशी भुमिका केली होती. ( माणसा एरिन हे वास्तव आहे आणि प्रीटि वुमन हि परिकथा आहे. ) ज्युलियाने हि भुमिका अप्रतिम केली होती. तसे या सिनेमात स्पेशल इफ़ेक्ट्स नव्हते. तांत्रिक बाजुही यथातथाच होत्या. तरिही सिनेमा खिळवुन ठेवणारा आहे. ऑस्कर मिळाल्यावर ज्युलियाने नेहमीची लांबड न लावता, हा पुरस्कार या व्यक्तीचा आणि त्या प्रवृत्तीचा आहे, असे सांगितले होते. या सिनेमात काहि कागद्पत्रे मिळवण्यासाठी ती एका सरकारी ऑफ़िसात जाते. तिथला माणुस तिला आधी दाद देत नाही. मग ती जरा वाकुन " विश्वदर्शन " घडवते आणि मग तिचे काम विनासायास होते. मला फ़क्त याच सीनचा संदर्भ द्यायचा होता. ( खरे तर त्यात तिचा काहिच स्वार्थ नसतो ) आजकाल मुलाखतीच्या संदर्भात मला हा अनुभव येतो. मी ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेतो, त्यापैकी पात्रता आणि अनुभव या पातळ्यावर समान असल्या तरी मुली, आपले संभाषण चातुर्य दाखवण्यापेक्षा, तिरपा कटाक्ष वगैरेचे प्रयोग माझ्यावर करतात. हे लक्षात आले तरी पुरुष उमेदवार, काहिच करु न शकल्याने निराश होतात. अर्थात माझ्यावर या अस्त्रांचा परिणाम होत नाही. पण बाकि ठिकाणी होत असावा. नंदीनी आणि अज्जूका, या दोघी तर त्यांच्या क्षेत्रात काहितरी करुन दाखवलेल्या मुली. त्यांचे व्यावसायिक कसब, कौशल्य, त्याना सिद्ध करण्यास पुरेसे आहे, अशी मला खात्री आहे आणि तरिही त्याना हे गैर वाटले नाही, याचे मला वाईट वाटले.
|
Ajjuka
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:47 am: |
| 
|
गैर वाटले नाही? assumptions assumptions! हे सगळेच करतात. एवढंच म्हणाले. कॉलेज लेव्हलवर जे खेळीमेळीने चालतं त्यात गैर काही नाही असं म्हणाले होते मी.
|
Meggi
| |
| Thursday, February 28, 2008 - 7:01 am: |
| 
|
दिनेश, तुमचा मुद्दा पटला नाही. 'स्त्री' त्वाचा किंवा 'पुरुष'त्वाचा फायदा घेणे गैर. पण पुरुषांवर जर कुठली जबरदस्ती नसेल तर ती 'व्यथा' कशी असु शकते? पुरुष त्यांच्या 'पुरुष' फायदा घेत नाहित किंवा घेऊ शकत नाही हे तर मुळिच पटले नाही. गैरवापर स्त्रिया आणि पुरुष दोघेही करतात. फक्त स्त्रियाच असं करतात म्हणणे साफ चुकिचं ठरेल.
|
दिनेशदा, तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते स्पष्ट बोला... उगाc शाब्दिक बुडबुडे नकोत. एरिन ब्र्कोविचचा आणि या बीबीचा संबंध नसताना तुम्ही तो विषय इथे का काढलात असा माझा मुद्दा आहे. ते सांगण्या ऐवजी तुम्ही त्या फ़िल्मची स्टोरी ऐकवत बसला आहात. ** मी तो पिक्चर बर्याचदा पाहिलाय, ज्युलिया माझी आवडती नटी आहे, हे मीपण नमूद करते. मुळात अस्थानी मुद्दा काढून मी किती मूल्यवान हे सिद्ध का करताय तुम्ही? घडतात अशा गोष्टी जगात. व्यक्ती तितक्या प्रकृती. पटलं तर घ्यायचं नाही तर सोडून द्यायचं... साधा सरळ हिशोब आहे. हे मी इतक्या कडकपणे लिहितेय कारण तुम्ही माझे नाव घेऊन उल्लेख केलाय, माझ्या व्यावसायिक कौशल्याचा, यशाचा अथवा अपयशाचा या बीबीशी काहीही संब.म्ध नाहीये.
|
Shraddhak
| |
| Thursday, February 28, 2008 - 8:42 am: |
| 
|
आजकाल मुलाखतीच्या संदर्भात मला हा अनुभव येतो. मी ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेतो, त्यापैकी पात्रता आणि अनुभव या पातळ्यावर समान असल्या तरी मुली, आपले संभाषण चातुर्य दाखवण्यापेक्षा, तिरपा कटाक्ष वगैरेचे प्रयोग माझ्यावर करतात. हे लक्षात आले तरी पुरुष उमेदवार, काहिच करु न शकल्याने निराश होतात. अर्थात माझ्यावर या अस्त्रांचा परिणाम होत नाही. पण बाकि ठिकाणी होत असावा.<<<<<<<< सगळ्याच मुली?????? की त्यातील काही मुली? अनाठायी generalization कशासाठी? स्वतःला महान सिद्ध करण्याच्या नादात आपण कितीतरी सभ्य मुलींचा अपमान करतोय, याचेही भान उरू नये का? गेल्या तीन चार पोस्टपासून एरिन ब्रोकोविचचा असंबद्ध मुद्दा लावून धरला गेलाय तो कशासाठी? बर्याच जणांनी पाहिलाय तो सिनेमा आणि ते दृश्यही. पण लोक त्याचा इथे संबंध नसताना, अकारण वर्णन न करण्याइतके भान राखून आहेत. मग आपणच एकटे तो सिनेमा बघणारे आहोत, या थाटात सिनेमाच्या कथेचा नि त्या दृश्याचा पाल्हाळ लावायचे कारण? एरवी हा बीबी वाचते, आजवर लिहिले नव्हते. पण हे असले पोस्ट्स पाहून मनस्वी चीड आली.
|
Itgirl
| |
| Thursday, February 28, 2008 - 9:21 am: |
| 
|
नंदिनी आणि श्रद्धा, तुम्हां दोघींना पूर्ण अनुमोदन. जे काही पाल्हाळ चाललेय ते पूर्णपणे अस्थानी अन खरोखर चीड आणण्याजोगेच आहे!!
|
तिरपा कटाक्ष!धोंडोपंत कुठे आहात आपण? इथे अस्थानी पाल्हाळ चाललेय..हा बीबी हायजेक होतो आहे, असाल तसे धावत या.
|
Ashwini
| |
| Thursday, February 28, 2008 - 4:11 pm: |
| 
|
अज्जुका, नंदिनी, श्रद्धा आणि इतरांना अनुमोदन. इतक्या खुलासेवार वर्णनाची खरच आवश्यकता होती का? मला हे तितकेच अस्थानी वाटते आहे जितके त्या समानता बीबीवर त्या अश्वमेधाच्या प्रसंगाचे उदाहरण होते. असा बादरायण संबंध लावून या विकृत गोष्टींचा उहापोह केलाच पाहिजे का?
|
अज्जुका, नंदिनी, श्रद्धा, अश्विनी, अनुमोदन. ( अश्विनी डब्बल अनुमोदन!)
|
Divya
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:10 pm: |
| 
|
मला पण हे सगळ एरिनब्रॉकोविच संदर्भ बिलकुल आवडल नाही. अश्वमेधाचेही उदाहरण आवडल नव्हत. अश्विनीला अनुमोदन.
|
Shyamli
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:15 pm: |
| 
|
मायबोली आपली वाटते म्हणून बरेच जण/जणी मनमोकळ लिहितात इथे, पण हे काहीही काय? मुलाखतीला आलेल्या मुली आत्मविश्वासानी जर तुमच्याकडे बघून उत्तरं देत असतील तर त्याचा अर्थ तो तिरपा कटाक्ष असा घेत असाल खरोखर खेदाची गोष्ट आहे ही. आणि फिल्म्समधली एवढी वर्णनं करायची गरजच नव्हती. आमच्याबरोबरीनी आमची मुलं,नवरा इथलं सगळं वाचत असतात. 
|
Ajjuka
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:37 pm: |
| 
|
>>मला हे तितकेच अस्थानी वाटते आहे जितके त्या समानता बीबीवर त्या अश्वमेधाच्या प्रसंगाचे उदाहरण होते. असा बादरायण संबध लावून या विकृत गोष्टींचा उहापोह केलाच पाहिजे का?<< हे मलाही पटलं. आणि नकळत माझ्याकडून त्या विषयाला खतपाणी घातल्याबद्दल क्षमस्व! खरंतर च्यायलाची एक पोस्ट खूप चांगली होती इथे वरती. परत त्या नोटेवर चर्चा नेऊया.
|
Uday123
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:54 pm: |
| 
|
बीबी हायजेक होतो आहे, असाल तसे धावत या. ... असाल तसे? नको नको हा त्यांच्या वर अन्याय होईल, जेवण करत असल्यास आटपुन या, पण उगीचच रेंग़ाळत बसु नका. दोन्ही विषय टाळता येण्याजोगे होते या विचारांशी सहमत. लेखन्/ विचार्/ मुद्दा सर्वजण वाचु शकतील तर दुधात साखरच.
|
Maanus
| |
| Thursday, February 28, 2008 - 6:06 pm: |
| 
|
hmm so i am not the only one who thinks unusually odd posts are coming. apologies were with respect to age and seniority on hitguj, and were not related to your thoughts.
|
Manuswini
| |
| Thursday, February 28, 2008 - 6:43 pm: |
| 
|
दिनेशदा, I am "assuming" that you are working in renowned company at high post and any qualified girl applying for high position in any well known company definitely knows what is she doing and what is she for? म्हणणे हेच की 'सगळ्याच' मुली बेताल नसतात. आणि असे काही करतील ह्याची नक्कीच मला शंका आहे. तुम्ही असे generalization नाही केले तर ते चांगले राहील. तुम्ही खरे सांगता आहात का खोटे ह्या वादात मला पडयचे नाही पण असे एखादे Statement करण्याआधी नीट पडताळून पहावे. केलेही असले एखाद्या मुलीने तरी 'सगळ्या' सारख्या नाही ना? दुसरे म्हणजे हेच खरे की 'काही पुरुषांना' आपला मोठेपणा सांगण्यासाठी मुलींना दुय्यम ठरवायचा अधीकर असतो असे वाटते. किंवा आपला ego maintian करयला असे बोलणे easy जाते. ज़से लग्न ठरवताना मुलाचे आई वडील किंवा मुलगा तो स्वत जरी कमी लायकीचा असला तरी, मला भरपूर मुली आल्या होत्या, किंवा भरपूर मुली खुप शिकलेल्या अगदी highly qualified माझ्या मागे होत्या पण मीच नाकारले तसेच हे सुद्धा.
|
Manuswini
| |
| Thursday, February 28, 2008 - 6:58 pm: |
| 
|
Sorry to say पण विनोदाच्या नावाने म्हणा ह्या बीबी वर पुरुषांच्या व्यथाच्या नावाखाली 'पांचट' पोस्टच ज्यास्त आहेत. नको त्या स्त्रीयांच्या खाजगी गोष्टींची वाच्यता. उदाहरणार्थ, काय त्रास होतो पुरुषांना मुली पर्से मध्ये 'अक्खे घर' का घेवून फिरोत? खरे तर तेव्हाच विचीत्र वाटले होते मला, मैत्री कीतीही जवळची असो, ठरावीक सभ्यतेच्या बाहेर जावून मुलांनी मुली मैत्रीणीच्या / मुलींनी मुलगा मित्राच्या नको तिथे नको तितके नाक खुपसू नये हे माझे मत आहे.
|
Mrinmayee
| |
| Thursday, February 28, 2008 - 7:25 pm: |
| 
|
अज्जुका, नंदिनी, श्रद्धा, अश्विनी, श्यामली आणि मनु तुम्हाला १००% अनुमोदन तर आहेच परंतु तसल्या पोस्टचा निषेध! आणखी एक.. अवतरण चिन्हात, जाहीरपणे स्त्रीयांच्या अंगप्रत्यंगाचा उल्लेख करताना आपण आपल्या आई-बहिणीचाही एका तर्हेनी अपमान करतो आहोत ह्याचं भान सुटु नये! माणसा, i am not the only one who thinks unusually odd posts are coming. हो, अगदी बरोबर!
|
Ajjuka
| |
| Thursday, February 28, 2008 - 7:40 pm: |
| 
|
>>नको त्या स्त्रीयांच्या खाजगी गोष्टींची वाच्यता. उदाहरणार्थ, काय त्रास होतो पुरुषांना मुली पर्से मध्ये 'अक्खे घर' का घेवून फिरोत? खरे तर तेव्हाच विचीत्र वाटले होते मला, मैत्री कीतीही जवळची असो, ठरावीक सभ्यतेच्या बाहेर जावून मुलांनी मुली मैत्रीणीच्या / मुलींनी मुलगा मित्राच्या नको तिथे नको तितके नाक खुपसू नये हे माझे मत आहे. << manu 200% modak ga! aani naak khupasaayachech asel tar mag te vyathaa mhaNoon mandu naye.
|
Simm
| |
| Thursday, February 28, 2008 - 10:23 pm: |
| 
|
Grow up people! ---really!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|