Sayonara
| |
| Wednesday, January 30, 2008 - 2:36 pm: |
| 
|
मला वाटतं जरा आगाऊ असणं हीच वोटिंग मिळवण्याची गुरुकिल्ली आहे.
|
Yog
| |
| Friday, February 01, 2008 - 6:59 pm: |
| 
|
little champs मधून तो विभोर (आईसकट) आऊट झाल्यापासून परदेसाई नी इथे यायचे सोडले आहे.. काय भानगड आहे..? 
|
अरे आता 'परदेसाई' वाट बघताहेत अजून कोणी काळजीवाहू स्त्री, माता, भगिनी येते का त्याची... 
|
Yog
| |
| Friday, February 01, 2008 - 9:38 pm: |
| 
|
>>कोणी स्त्री, माता, भगिनी येते... समानता bb वर वाचून आलास की अस होत का..? असो. आज बघूया कुणाचा पत्ता कट होतोय सारेगमप मधे..
|
Uday123
| |
| Saturday, February 02, 2008 - 11:12 am: |
| 
|
आज बघूया कुणाचा पत्ता कट होतोय सारेगमप मधे.. ---वसुंधरा आणी छोटे-सरदार मधे बाहेर पडण्यासाठी स्पर्धा होती पण, वाडकरांच्या ईच्छेखातर आज कुणीच बाहेर पडलं नाही.
|
NDTV imagine वर कुठल्याशा show मधे मलाईका चा ड्रेस (!) पाहिला का कोणी ? शो तसा साधा होता पण सुत्र संचालन करणारी मलाईका अगदी ' माही वे पोल डान्स ' mode मधेच आली होती !
|
Prachee
| |
| Thursday, February 14, 2008 - 4:23 pm: |
| 
|
कोणी 'एकापेक्षा एक' बघतं का? त्यातली 'कृतिका घरत' नाचते चांगली. पण हळूहळू तिची 'राखी सावंत' होऊ लागली आहे. फ़ार वेड्यासारखं बोलत असते. आणि अगदी भोळेपणाचा आव आणते.
|
Amruta
| |
| Thursday, February 14, 2008 - 7:50 pm: |
| 
|
अगदी योग्य बोललीस, सुरवातीला ती फारच साधी वाटत होती पण हल्ली तिचा confidence चांगलाच वाढलाय. पण फार ओव्हर वाढु नये. आज केतकी चितळे गेली. बरी नाचायची खर तर. आणि एक बघितल आज, सचिन ज्यांना छान छान म्हणत होता त्यांना ते ज्युरी कमि मार्कस देत होते.
|
हो ती कृतिका. अरे थांबवा तिला कुणीतरी. काय ती प्रेमाची कविता! सचिन पण काय पकवतो. त्यापेक्षा आदेश बरा वाटायला लागलाय. मी कालचा एपिसोड मिसला. कसा झाला ते लिहा ना कुणीतरी. केतकी गेली का? अरेरे. खरंतर नयन, दीपक असे कॅंडीडेट्स होते की जायला. आधी त्या ज्युरींना काहीच फूटेज नव्हते. आणि सात सात आणून बसवायचे. कशाला काय माहित? आता तेही बोलतात. खरंतर सगळेच नको इतकं बोलतात. नाचाचा पोग्र्याम आहे तर नाचा की राव. तोंडं कशाला चालवाय पाहिजेत यवढी?
|
हो , केतकी गेली ! एकदम graceful नाचायची आणि दिसायची कृतिकाचं ' परदेसीया ' कसलं बेक्कार झालं होतं ! त्या कृतिका , नयन किंवा त्या ढोल्या स्वाती देवल ला घालवायला हवं होतं ! आणि मागे त्या प्राची गरुड ला उगीच च काढलं ! आदेश बान्देकर फ़ार irritate करतो ! त्याची personality अशा show ला मुळीच suit होत नाही आणि ते महा भयानक " यो " कपडे तर अजिबात च नाही ! रंगीबेरंगी ब्लेझर काय , गळ्यातले bands वगैरे घालून अतिशय केविलवाणा दिसतो तो आदेश ! Btw, या week मधे सारेगमप ची झलक पाहिली . आमिर हाफ़िज च्या फ़ॅमिली ने हिन्दु मुस्लिम वाद सुरु केला काही तरी .... मागच्या सारेगमप मधे राजा हसन आणि अमानत वर पण अन्याय झाला असं आमिर चा भाउ म्हणात होता ! बघु काय होतय आज ते !
|
Prachee
| |
| Friday, February 15, 2008 - 8:13 am: |
| 
|
प्राची गरुड म्हणजे तीच ना जिने डोळे बांधुन नाच केला होता? ती कशी आउट झाली? मधे काही भाग चुकले माझे. त्यामुळे कळलेच नाही.
|
Jhuluuk
| |
| Friday, February 15, 2008 - 8:35 am: |
| 
|
ओहो... सहन कसे करताहात तुम्ही लोकं सचिनला! अक्षरश्: चॅनेल फिरवताना पण तो बोलताना दिसला तर irritate होतं. आधी फक्त डान्स बघुन चॅनेल बदलायचो, आता ते पण करवत नाही. एकदा नच बलियेचा विनर झाला ते ठिक आहे, पण महागुरु म्हणुन किती ते बोलायचं! आवरा त्याला!
|
हो ती च प्राची . सचिन ला नाही आवडायची ती . आधी हुला हूप घेउन लावणी पण मस्त केली होती तिनी ! पण सचिन तिला सारखा prop चा अतिरेक , no expressions अशा अनेक गोष्टीं वरून नापसन्ती द्यायचा . ती top 10 मधे यायच्या आधीच out झाली , मेरे पिया गये रंगून चा तिचा dance नाही आवडला सचिन ला .
|
Amruta
| |
| Friday, February 15, 2008 - 2:29 pm: |
| 
|
बर्याचदा मला आवडलेले नाच सचिनला आवडलेलेच नसतात. आणि आपल्याला एखादा आवडु नये तर तो अगदी भरभरुन कौतुक करतो. काल त्या स्वाती देवल चा ड्रेस कसला भयानक दिसत होता. नाच तर बघवलाच नाही मला त्या ड्रेस मुळे. सचिन प्रॉप्स बद्दल मागे इतक बोलला की हल्ली कुणि प्रॉप्स वापरतच नाहित. आणि ते हिरे हिरे सारख बोलतात त्याच तर हसुच येत मला.
|
Ankyno1
| |
| Friday, February 15, 2008 - 3:37 pm: |
| 
|
L'il Champs मधून आज आमिर बाहेर पडणार आणि वादावादी होणार असं प्रोमोज मधे दाखवतायत (अशी जाहिरातबाजी केल्यामुळे हे प्रकरण पूर्वनियोजित आहे का असं वाटतय)
|
Yog
| |
| Friday, February 15, 2008 - 9:38 pm: |
| 
|
वादावादी होण्यासारख खर काहीच नाहीये.. तो आमिर य काळापूर्वीच बाहेर जायला हवा होता. असेल मग publicity stunt च असेल.. final अनमिका अन सरदार मधे होणार याची खात्री आहे. कारण सोनू सरदारच्या बाबतीत खूप पार्शल आहे आणि अनामिका सर्वान्च्यात matured आवाजामूळे उजवी वाटते.
|
Mansmi18
| |
| Friday, February 15, 2008 - 9:52 pm: |
| 
|
आदेश बान्देकर फ़ार इर्रितते ---------------------------------- १००% खरे! मी त्याचे बोलणे करतो. त्याचा विनोद forced वाटतो. ती "हेमलता" तीला का बाहेर काढले नाही??
|
Dakshina
| |
| Wednesday, February 27, 2008 - 7:00 am: |
| 
|
नुकत्याच गेलेल्या सोमवारपसून 40 plus वाल्यांचं सारेगमप सुरू झालं. पहील्या भागात ३ स्त्रीया आणि ३ पुरूष होते. (कालचा एपिसोड पाहू शकले नाही. पहील्या फ़ेरीत सोलो आणि दुसर्या फ़ेरीत डुएट होती. सगळे बर्यापैकी गायले. वझे नावाच्या बाईंचं नाट्यगीत चांगलं झालं पण पुढचं एक लाजरा न साजरा सुद्धा त्यांनी नाट्यगीताच्या स्टाईल मध्ये फ़िरत घेऊन म्हणलं त्यामूळे त्या गाण्याची मजा गेली. कन्याकुमारी गुणे यानी 'या सुखानो' गायिलेल्या बाई पेक्षा बरं गाऊन सुद्धा त्यांना शेवट का ठेवले कोणजाणे. श्रीयूत दंडे आणि लिंबेकर.. हे दोघे मात्र अप्रतिम गायले. तुमच्यापैकी कुणी पाहीला नाही का हा भाग? आता तर कार्यक्रमाची वेळ बदलून रात्रौ १० ऐवजी ९.३० ठेवली आहे.
|
Arun
| |
| Wednesday, February 27, 2008 - 10:34 am: |
| 
|
दक्षिणा : काल आणि परवाचे दोन्ही भाग पाहिले मी. लिंबेकर मस्तच गात होते. पण सगळ्यात कळस म्हणजे प्रत्यक्ष सुलोचना बाईंचे गाणे. केवळ अप्रतिम. वयाच्या ७५ व्या वर्षीसुद्धा, त्याच तडफेने म्हटली लावणी त्यांनी. स्पर्धकांचं म्हणशील तर, त्यांच्या वैयक्तिक सादरीकरणापेक्षा काल्च्या भागाच्या सुरुवातीचं सामुहिक जयोस्तुते चं छान वाटलं ............ त्याचप्रमाणे, परिक्षकांकडून सुद्धा फारसा अपेक्षित प्रतिसाद किंवा सुचना स्पर्धकांना मिळाल्या नाहीत असे मला वाटले. कदाचित देवकी पंडित आणि अवधूत गुप्तेची सवय झाल्यामुळे असेल कदाचित. खाडिलकर बाई, थोडा जास्त मेकप करून आल्या होत्या कदाचित. त्यामुळे थोड्या वेगळ्या दिसत होत्या. सलिल मात्र पुर्णपणे परिक्षकाच्या भुमिकेत शिरला होता. त्यातल्या त्यात काही बदललं नसेल तर एकच गोष्ट आणि ती म्हणजे निवेदकाच्या रुपातील ती माठ जोशी. तिच्या माठ दिसण्यात काहीही फरक पडलेला नाहिये ..............
|
Manuswini
| |
| Wednesday, February 27, 2008 - 10:54 pm: |
| 
|
विनर अनामीकाच होणार 100%,(east ebngal conenction आणि तीचा आवाज़ ही बरा आहे).
|