|
Mbhure
| |
| Friday, February 15, 2008 - 4:58 pm: |
| 
|
वेळ जात नव्हता म्हणुन.....? मुझसे दोस्ती करोगे, चुपके चुपके, कभी...कभी गम( ह्याचे Spelling "Gham" का करतात? उत्तर : ४ तास एकाच खुर्चीत बसुन AC मध्येही कुल्याला घाम येतो हे त्यतुन दिग्दर्शकाला दाखायाचे असते.), फ़ना, मेरे यार की शादी है हे चित्रपट टवाळकी करत पाहिले तरच (कदाचित) टाईमपास होतो. त्या चुपके चुपके सिनेमात, पैशेवाल्याची मुलगी ट्रकवल्याच्या प्रेमात काय पडते... तिच्यासाठी तो तडक ग्रीसला जातो... गाण गात शोधतो काय.... फारिनला जाणे किंवा आपल्या माणला त्या देशात शोढणे, मुल होणे, गाणी म्हणुन आणि टवाळाक्या करुन फर्स्टक्लास्स फर्स्ट येणे,कॉलेजमध्ये महागडा सेट लावून आणि सेक्सी ड्रेस्स (माधुरीचा सैलाब)घालुन डान्स स्पर्धा करणे, रस्त्यातल्या कोणालही आपल्या घरात आसरा देऊन त्यांना बेटा / बेटी मानणे.... अश्या असंख़्य गोष्टी म्हणजे हिंदी सिनेमावाल्यांसाठी हातचा मळ असतात. ह्यातील एकही गोष्ट आमच्याबाबतीत होत नाही. म्हण्जे आम्हाला विसाला हजारो पेपर घेऊन सक्काळी लाईत उभे रहावे लागते, मुलाबरोबर येणार्या जबाबदारीचे भान ठेवावे लागते, एकेका मार्कासाठी झगडावे लागते, मुलासारखे मानणारे आणि मग अख्खी " जायदाद " त्याच्या नाववर करणारे आपल्यावेळी दरवाजे बंद करुन घरात का लपतात...
|
Mansmi18
| |
| Monday, February 18, 2008 - 4:00 pm: |
| 
|
त्या चुपके चुपके सिनेमात, पैशेवाल्याची मुलगी ट्रकवल्याच्या प्रेमात काय पडते... तिच्यासाठी तो तडक ग्रीसला जातो... गाण गात शोधतो काय.... ---------------------------------------------- तुम्ही एक पाहिलेत का? हे प्रवास करणारे हिन्दी स्टार कधीच economy class मधे दिसत नाहीत. याना नेहमी business class कसा परवडतो बुवा? आम्हाला economy class अजुन सुटला नाही. हे business class तिकिट पाचपट असते ना?
|
Zakki
| |
| Monday, February 18, 2008 - 6:44 pm: |
| 
|
काल Live free or die hard हा चित्रपट पाहिला. ब्रूस विलिस चा चित्रपट. नुसती धमाल. पहिल्या एकदोन मिनिटानंतर शेवटपर्यंत मारामारी. त्यातली काही दृश्ये: ब्रूस तुफान वेगाने गाडी चालवत चालला असतो. वरून हेलिकॉप्टरमधून त्याच्यावर सतत गोळीबार होत असतो. ब्रूस एकाएकी गाडीतून बाहेर उडी मारतो. गाडी अत्यंत वेगाने जाऊन खांबाला धडकून त्या खांबावर चढते नि वर फेकल्या जाऊन बरोब्बर हेलीकॉप्टरवर आपटते, नि आतल्या वाईट लोकांबरोबर ते हेलीकॉप्टर जळून खाक होते. नंतर पुन: तसेच. ब्रूस गाडी चालवत असतो, नि वरून हेलीकॉप्टार मधून एक जण त्याला गोळ्या घालत असतो. ब्रूस एका Fire Hydrant ला धडक मारतो. त्यातून पाणी अगदी वेगात वर उडते ते बरोब्बर हेलीकॉप्टरमधून गोळ्या मारणार्यावर आपटते, नि तो गोळ्या मारणारा खाली पडून मरतो. ब्रूसला मात्र एकंदर २५ वेळा, अगदी मरायला आलेला असून न मरता, एकदम त्याला मारायला आलेला माणूस मरतो. शेवटी खलनायकाच्या हातात सापडलेल्या ब्रूस विलिसला गोळी घालून खतम करण्या ऐवजी तो नेहेमीप्रमाणे बृसला म्हणतो, मी प्रथम तुझ्या मित्राला नि मुलीला मारतो. त्यांना मरताना बघितल्यावर मग तुला मारतो. मग ब्रूस आपल्याच खांद्यातून गोळी मारतो, ती त्याच्या खांद्यातून आरपार जाऊन खलनायकाला लागते नि तो मरतो!
|
Yog
| |
| Monday, February 18, 2008 - 9:30 pm: |
| 
|
झक्कीबुवा हे खास hollywood SFX आहेत त्यात अचाट अन अतर्क्य काय? तुम्ही रजनीकान्त चे Action movie बघितलेत की नाही..? अगदी तसेच. भारी करमणूक होते.. 
|
Orchid
| |
| Tuesday, February 19, 2008 - 6:29 pm: |
| 
|
तो पिक्चर चुपके चुपके नाही चलते चलते आहे.[शाहरुख खान आणि राणी मुखर्जी चा]
|
Dakshina
| |
| Wednesday, February 20, 2008 - 5:36 am: |
| 
|
हो तो चलते चलते एक महाभयानक सिनेमा होता. विमानाच्या स्टँडवर भेटलेल्या कोणत्याही आचरट माणसाला घेऊन आपण आपल्या घरी नेलं तर आई - बाबा जोड्याने मारतील. सिनेमातले कसे काय मारत नाहीत? शाहरूख इतका मध्यमवर्गीय दाखवला आहे त्यात, मग तो अथेन्स ला जातो तेव्हा त्याचा बिझनेस कोण सांभाळतो? (देव?) जर त्याच्याकडे २५ लाख नसतात तर? त्याच्याकडे इतका पॉश फ़्लॅट कसा काय असतो? आणि ग्रीसला जायला पैसे कुठून येतात, ते ही इतक्यात? सगळ्यात मोठी गम्मत मला एका गोष्टीची वाटते की परदेशात गेले की, नेहमी हिरो हिरॉईन बरोबर असणार. मग कार हायर करणार.. एक सांगा, हिरोला सगळ्या देशातले सगळे रस्ते माहीती असतात?
|
Tiu
| |
| Wednesday, February 20, 2008 - 3:03 pm: |
| 
|
मग कार हायर करणार.. एक सांगा, हिरोला सगळ्या देशातले सगळे रस्ते माहीती असतात? >>> कार सोबत GPS पण मिळत असेल!
|
Farend
| |
| Wednesday, February 20, 2008 - 4:00 pm: |
| 
|
हो आणि हे सर्व लोक कन्वर्टिबल च घेतात भाड्याने त्याही लक्झरी गाड्या ( BMW, Mercedes ई.), हूड उघडे टाकून कोणत्याही सीजन मधे फिरतात, ते ही फक्त निसर्गरम्य रस्त्यांवरूनच. अमेरिकेत सुद्धा साधी शेवी घेऊन, फालतू एरियातून "ही जागा थांबण्यासारखी दिसत नाही" वगैरे म्हणताना दिसत नाहीत
|
Asami
| |
| Wednesday, February 20, 2008 - 6:21 pm: |
| 
|
फालतू एरियातून "ही जागा थांबण्यासारखी दिसत नाही" वगैरे म्हणताना दिसत नाहीत>>पण पदरच्या दमड्या घालून तुला हे असे म्हणताना पहायचेय तुला ? अजब choice बाबा तुझा.
|
Mi_anu
| |
| Thursday, February 21, 2008 - 5:10 am: |
| 
|
हम दिल दे चुके सनम: आपल्यापैकी किती लोक बायकोच्या प्रियकराला शोधायला इटलीला जातात? तेही त्याचा पत्ता, फोटू, आडनाव, शहर काहीही माहिती नसताना? इथे स्टेशनाच्या प्ल्याटफॉर्मवर डबा नं एस ७ मध्ये बसलेला आपला नातेवाईक शोधता शोधता गाडी सुटते. आणि हे निघालेत एका युरोपातल्या देशात काही आगापिछा नसलेला माणूस शोधायला. नो एन्ट्री: फरदीन खान कड्यावरुन पडलेला असताना जी सेलेना जेटलीची मैत्रिण मुलगी त्याला पहिल्यांदा वाचवण्यासाठी स्कर्ट काढायला लागते (पोरींच्या स्कर्ट आणी प्यांटींची बांधून दोरी करुन हिरोला कड्यावर ओढून काढणे अशी कल्पना) तिचा स्कर्ट किती चिमुकला आहे! त्याला दोरीची लांबी वाढणे तर दूरच, गाठ मारण्याइतकी पण माया नाही.
|
Dakshina
| |
| Thursday, February 21, 2008 - 7:34 am: |
| 
|
आणि हे निघालेत एका युरोपातल्या देशात काही आगापिछा नसलेला माणूस शोधायला. >>>> आणि हाईट म्हणजे, तो सापडतो, ह देवगण त्या (राक्षस) माणसाबरोबर चहा काफ़ी पितो, आणि त्याचं नाव विचारत नाही? आपण म्हणजे, नविन माणूस भेटला की पहीली कुंडली विचारून मोकळे होणार... त्याला दोरीची लांबी वाढणे तर दूरच, गाठ मारण्याइतकी पण माया नाही.>>>> अनु.. तुझं लिखाण नेहमीच जबरदस्त असतं..
|
Zakasrao
| |
| Thursday, February 21, 2008 - 9:40 am: |
| 
|
असामी अनु दक्षिणा राक्षस
|
Sheshhnag
| |
| Thursday, February 21, 2008 - 10:16 am: |
| 
|
अनु. खरंच जबरी. ह. ह. पु. वा. इथे प्रत्येक चित्रपटाची `शव(?!)चिकित्सा' अफलातून असते. प्रत्येकवेळी नवा शोध!
|
Sheshhnag
| |
| Thursday, February 21, 2008 - 10:25 am: |
| 
|
दक्षिणा, तुम्हाला असं म्हणायचं होतं का, "हा देवगण (की भूतगण) त्या राक्षस गणाबरोबर...." ए. भो. शं.
|
Swa_26
| |
| Thursday, February 21, 2008 - 10:41 am: |
| 
|
कालच राजकुमारचा 'तिरंगा' लागला होता. त्यातला तो राजकुमारची गाडी बॉम्बने उडवुन देण्याचा सीन... गाडीत ब्लास्ट वगैरे झाल्यानंतर राजकुमारची मुलाखत नि मग टिव्हीवर त्या गाडीचा शॉट!! की 'गाडी एक गटर पे खडी करके ये काला बटन खिंचनेके बाद नीचे का दरवाजा खुला'.... अरे पण ती गाडी तर उडवुन दिली ना???? मग परत शूटिंग कुठे केले, बातमी देणार्यांनी???
|
Zakasrao
| |
| Friday, February 22, 2008 - 10:42 am: |
| 
|
स्वाती इथे अशीच दुसरी गाडी होती असही एकवेळ समजु आपण. पण त्याचा डायरेक्ट TV वर डेमो????? सरंक्षण मंत्रालयात आणि मिलिटरीत बावळट लोक नाहियेत (जरी) असली काही सरंक्षण व्यवस्था आहे हे सांगायला. दुसरी गोष्ट बॉंब डिटेक्टर त्याला अलार्म देतो (घड्याळासारखा) त्याहुन पुढची गम्मत म्हणजे राजकुमारच आणि गुंडा स्वामीच फ़ोनवरच सांभाषण. खरतर त्यावेळी राजकुमारची मुलाखत लाइव्ह सुरु असते अस जर आपण मानल तर त्यानी रेकॉर्ड केलेली कॅसेट त्या फ़ोन वर ऐकवली. पण एवढा पक्का विश्वास की गेंडा(कि गुंडा) स्वामी इथे इतका पॉज घेणार आणि हाच प्रश्न विचारणार तो अख्खा पिक्चरच अचाट आणि अतर्क्य आहे. मी प्रत्येक वेळी बघतो कारण मस्त हसु होत आजकालच्या सो कॉल्ड फ़ालतु इंग्रजी चित्रपटावरुन ढापलेल्या विनोदी चित्रपतापेक्षाही खुप खुप
|
Mbhure
| |
| Friday, February 22, 2008 - 6:32 pm: |
| 
|
हिंदी सिनेमावाले नेपोलियनच्या जातकुळीचे. हिरो कुठचाही प्रॉब्लेम न होता अगदी सहज परदेशात settle होतो किंवा परदेशात शिक्षण घ्यायला जातो.
|
हो ना च्यायला. हिरो म्हणजे सर्व गुण संपन्न... इथे २ महिने झाले अजुन पोळ्या नाही करता येत आहेत.. आणि कुठली चांगली मुलगी भेटली पब मध्ये तर तिला इंग्लिश नाही येत. हिंदी पिक्चरच्या हिरोंना मात्र परदेशात पण हिंदी मुली मिळतात...
|
Dakshina
| |
| Monday, February 25, 2008 - 8:33 am: |
| 
|
काल का परवा, कुठल्यातरी चॅनलवर नविन 'गोलमाल' सिनेमा लागला होता, त्यात परेश रावळ आणि त्याची बायको दोघेही आंधळे असतात, एका दृष्यात चक्क ती सुईने काहीतरी शिवताना दाखवली आहे....
|
Hemantp
| |
| Monday, February 25, 2008 - 9:48 am: |
| 
|
हुश्श... सकाळी ८ पासुन हा bb वाचतोय... सही आहेत observations आणि मस्त लिहिलेय सगळ्यांनी.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|