|
संघमित्रा च्या नवर्याला शुभेत्शा!
|
Chyayla
| |
| Sunday, February 24, 2008 - 1:59 am: |
| 
|
हा बाफ़ तर एकदम गमतीच्या रंगात भिजलाय पण खरच कुणी थोडे गंभीरतेने या विषयाकडे पाहिलेही आहे? मी ईथे तक्रार नाही करत आहे तर पुरुषाची हळवी बाजु त्याच्या व्यथेसहीत समोर आणण्याचा स्वता:च्या अल्पबुद्धीने प्रयत्न करतोय. जगात सहानुभूती म्हणाल तर ती पुरुषांपेक्षा, स्त्रियांना सहज मिळते. त्याबद्दल मला जराही आक्षेप नाही कारण स्त्रिया ह्या पुरुषांसाठी जरा नाजुकच विषय असतो कधी तो विस्मयकारक तर कुणासाठी क्वचित हेटाळणीचा विषय जो ज्याच्या त्याच्या अनुभवांवर आधारित असतो. पण पुरुषाकडेही ही एक व्यक्ति म्हणुन पाहुन बघा, मला तर पुष्कळदा दया ही येते तर कधी अभिमानही वाटतो. पुरुष जरी वरुन कितीही कठोर दिसत असला तरी आतला गाभा फ़णसा सारख्या रसाळ गोडव्याने भरला असतो. त्यालाही स्त्रियांसारख्या संवेदना, प्रेम, माया पुरेपुर भरलेले असते व तशीच त्याला स्त्री कडुनही अपेक्षा असतेच ते कोणी समजुन घेतले का? पुरुष कधी गोड, सालस तर कधी खोडकर मुलाच्या रुपाने बाललीला करत आईच्या वात्सल्यानी न्हाउन मोठा होतो. कोणत्याही आईला तो तीचा कान्हाच वाटतो, आईलाही मुलावर जास्तच लोभ. कधी खोडकर भाउ बनुन बहिणीवर आगळी माया त्यातल्या त्यात बहीण लहान असेल तर.. "आई बघ ना कसा हा दादा... " म्हणत छोटुकली बहीण ईटुकल्या नाकावर मोठा राग आणुन दादाची तक्रार करताना दिसते. त्या लुटुपुटुच्या भांडणात आपण कधी मोठे झालो ते कळतही नाही. पण बहिणीला तसाच हक्काचा बालपणीचा सवंगडी, राखी बांधुन त्या बदल्यात पाठीराखा म्हणुन जन्मभराचा कायम आधार असतो. कधी जन्मदाते आई वडील जन्मभर नाही पुरत तेव्हा हाच पुरुष वडील भाउ बनुन आधार देतो. आजकालच्या "हम दो हामारा एक" किंवा ( Double Income No Kid ) च्या जमान्यात असे भाउ बहीण मिळण्याचे भाग्य सगळ्यांच्याच नशीबाला येइल की नाही सांगता येत नाही. बालपण ते यौवनापर्यंतचा प्रवास हा फ़ारच महत्वाचा असतो, पुष्कळ प्रष्न पडलेले असतात त्याना योग्य वेळी योग्य उत्तरे मिळाले तर ठीक कारण या वयात थोडी घालमेल झालेली असते शरिरीक व मानसिक बदल होत असताना त्यांच्या ताळमेळ मागे पुढे होतो कुणाला योग्य मार्गदर्शन, संस्कार मिळतात तर कुणाला योग्य मार्ग न दिसल्याने, चुकीच्या संगतीने काही गोष्टी बिघडु शकतात, आता या पुढे अभ्यास व जीवघेण्या स्पर्धात्मकतेतुन मार्ग काढत मुख्य चिंता असते ती करीअरची. मला वाटत ईथे पुरुषांवर जास्त ओझे निसर्गताच आहे कारण त्याला संघर्ष करत पुढे जायचेच जेणेकरुन पुढच्या सांसारीक जीवनातली उदरभरणाची मुख्य जबाबदारी त्यालाच पार पाडायची असते. आज भले स्त्रियाही शिक्षण करुन पुढे येतातही व बरोबरीने करीअर करतात पण त्यांची अपेक्षा असतेच की आपला नवरा हा जास्त शिकलेला, जास्त कमावता व आपल्या पेक्षा मोठ्या हुद्यावर असावा. मी फ़क्त त्याला साथ देईन, एकंदरीत पुढाकार हा पुरुषालाच घ्यावा लागतो. मुली बरोबरीने शिकतात, सहजीवनात काही प्रेमसंबंध जुळतातही.. साधारणता "पहिल प्रेम" जे जन्मभर विसरल्या जाउ शकत नाही ते बहुतेक याच काळात होत. पण हाय रे दैवा ईथे पुरुषासोबत खरोखर क्रुर थट्टा झालेली असते पुरुष जीवनात स्थिरस्थावर झालेला नसतो त्यामुळे प्रेयसीला काहीच ठोस आश्वासन देउ शकत नसतो भले प्रेयसी मात्र तयार असते. कित्येक प्रेमकथा तिथेच सम्पलेल्या पाहिल्यात. भातुकलीच्या खेळामधली राजा राणीची गोष्ट तिथेच सम्पते. "का त्याचा श्वास कोंडला गित तीचे गाताना..." कोणाला त्याचा कोंडलेला श्वास जाणवलाय? मला कधी कधी जाणवत काय पुरुषांसारख प्रेम स्त्रियाही करत असतील? स्त्रिया भावना व्यक्त करुन मोकळ्या होतात तसेच पुरुषानाही का नाही करता येत? मला वाटत ईथेही नियतीने पुरुषाची थट्टा केलीय. पुरुषाने रडणे नामंजुर मग त्याने भावनांचा आवंढा गिळुन गप्प बसायचे तिथे त्याचा किती कोंडमारा होत असतो याची जाणीव आहे? आत कितीही कोलमडलेला असला तरी जगाला मात्र ताठ मानेनी सामोरे जायचे असते. अशावेळेस दुसर काही नको असत फ़क्त प्रेमानी पाठीवर हात ठेउन लढ म्हणणार असाव आणी मग बघा त्याच्यातला उत्साह, चैतन्य, जिद्द जी आकाशालाही गवसणी घालण्याचे सामर्थ्य ठेवते. अशावेळेस हातत हात घालुन केवळ डोळ्यातुनच आश्वासक आधार देणारी, जीथे शब्दही उणे पडतील अशी प्रेयसी, सखी असेल तर मग काय विचारायचे. (तो चांदणेही तोडुन आणेल म्हणतो तो भाग वेगळा) तो स्त्रि कडुन फ़क्त अश्या आधाराचीच अपेक्षा करतो भले आईच्या रुपाने वा सखीच्या रुपाने. अर्थात सगळेच असे नशीबवान नसतात. अशावेळेस तीच त्याची शक्ति असते, भारतिय अध्यात्मशास्त्रातही पुरुष हा स्त्रि वर कसा अवलंबुन असतो यासाठी शिव्-शक्तीचे उदाहरण दिले आहे. शक्तिशिवाय शिव हा केवळ शव आहे त्याला पुर्णता: नाही. काही पुरुष परिस्थितीचा विचार करुन प्रेम भावनाही व्यक्त करीत नाही, न जाणो तीला मी आवडेल? तीला त्रास तर होणार नाही? त्या न सांगण्यातही प्रेमच असत मान्य. पण मग पुढे काय? कुढत असतात जन्मभर जळत असतात आतल्या आत, पुढे स्थिरस्थावर झाल्यावर एकवेळ आठवणही येते पण कालचक्र उलटे फ़िरवता येत नाही, पश्चातापही होतो.. निदान प्रेम व्यक्त तर करायचे असते नाही म्हटले तर नाही. मनाला समाधान तर मिळाले असते. तीला नाही जाणवले तर निदान कळले तर असते की माझ्यावर प्रेम करणार आहे कुणी. एका ठीकाणी वाचल होते.. जगात सगळ्यात दु:खी कोण असेल तर तो पाण्यातला मासा कारण त्याच्या डोळ्यातले अश्रूच जगाला दिसत नाहीत. तीच व्यथा पुरुषजन्माची. असो ह्या व्यथा झाल्यात लग्नापुर्वीच्या, लग्नानंतरच्या व्यथा दुसर्याच. त्या व्यथानाही दिलदारपणे घेउन गमतीवर नेणारे पुरुष महानच म्हणावे लागतील.
|
च्यायला - केवळ अप्रतिम! सुरेख लिहीले आहे
|
Athak
| |
| Sunday, February 24, 2008 - 4:23 pm: |
| 
|
पुरुष जरी वरुन कितीही कठोर दिसत असला तरी आतला गाभा फ़णसा सारख्या रसाळ गोडव्याने भरला असतो. त्यालाही स्त्रियांसारख्या संवेदना, प्रेम, माया पुरेपुर भरलेले असते वा च्यायला एकदम सही , खुप छान लिहीलेस . पुरुष परिस्थीनीने , जबाबबदारीने , त्याच्याकडुन अपेक्षीत असलेल्या मोठ्या कर्तव्याने , संसार रथ खेचत कधी गंभीर कधी कठोर भासतो पण आंतुन तेव्हडाच संवेदनशील असतो हे मात्र खरे , बस जरूरी असते छान समजुतदार सोबतीची , मग बघा आयुष्य अन त्यातल्या व्यथा कश्या हसत खेळत टोलवीत जातो
|
Ajjuka
| |
| Sunday, February 24, 2008 - 5:09 pm: |
| 
|
पुरूषांच्यावर restrictions जास्त असतात यात वाद नाही. त्यांना हळवं होण्याची, रडण्याची, घाबरण्याची मुभा नाही. अत्यंत नैसर्गिक अश्या या काही भावनांना embrace करण्याची मुभा नाही हे दुर्दैव आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे अर्थातच कोंडमारा होत असणार. बर.. मी आजतागायत माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्यात प्रेमभंग किंवा घटस्फोट बघितलेत त्यात काही अपवाद वगळता सर्व ठिकाणी पुरूषाला मानसिकरित्या सावरायला वेळ लागलाय हेच बघितलेय. जर तो मुलगा किंवा पुरूष खरोखर प्रेम करत असेल तर त्याच्यासाठी विसरणं, पाटी कोरी करून पुढे जाणं ही प्रक्रिया खूप काळाची असते. त्यामानाने नैसर्गिकरित्याच सहनशक्ती जास्त असल्याने स्त्रिया कदाचित पटकन सावरू शकतात. (अपवाद आहेतच.) जनरली सगळ्याच मुलीबायकांच्यात स्कार्लेट असतेच कुठेतरी. तुटून जाणं, उन्मळून पडणं हे स्त्रियांचं होत नाही असं नाही पण ते सगळं आयुष्य व्यापून उरत नाही. म्हणजे स्त्रिया खरं प्रेम करू शकत नाहीत असं नाही पण recovery चा वेग खूप जास्त असतो. हळवेपणा हा पुरूषांचा प्रांत यात वाद नाही. त्यामुळेच मान्य केलं नाही तरी पुरूष आपल्या जोडीदारावर emotionally dependent जास्त असतो. प्रेम असेल तर हा dependence काही प्रमाणात असतोच पण longtime relationship मधे पुरूष जास्त emotinally dependent होतो असं मी तरी बघितलंय.
|
Zakki
| |
| Monday, February 25, 2008 - 12:03 am: |
| 
|
बरोबर आहे. देवदास बरेच पाहिले असतील, पण देवदासाची ती नायिका, ती काही कुठे जाऊन दारू पिऊन पडलेली किंवा जोगीण बनलेली दिसली नाही. अज्जुक्काला बहुतेक तीन टी शर्ट नि हज्जार खिसेवाल्या पॅंटीच्या बदल्यात तीन लाख रुपयाचा हिर्याचा हार मिळालेला दिसतो आहे!
अज्जुक्का, कृपया समजा की झक्कि या मायबोलीवरील व्यक्तीने हे व्यक्तिश: तुम्हालाच उद्देशून असे न बोलता, मायबोलीवरील कुणि एक लेखिका हिला उद्देशून गमतीने, कुठल्याहि प्रकारचा काही प्रक्षिप्त उद्देश न ठेवता, तुमचे पुरुषांविषयीचे चांगले उद्गार वाचून म्हंटले आहे. बाकी झक्की मायबोलीवरील काऽहीहि लिहीलेले गंभीरपणे घेत नाही. झक्कीची 'मते' ही खरी मते नसून कुणि काही बोलले की कधी त्या बाजूने तर कधी त्याच्या विरुद्ध असे लिहून जरा खळबळ माजवावी या क्षुद्र, वृत्तिने लिहीले असते. केवळ बरेच वर्षानी (सात आठ वर्षापूर्वी) मराठी वाचायला नि लिहायला मिळेल या आनंदाने सामिल झालो. पुष्कळ मजा येत असल्याने अजून आहे. जेंव्हा फार लोक झक्कीला नावे ठेवू लागतील, तेंव्हा झक्की इथून पळून जाइल. मते मांडायला व्यक्तिश: माझे एक काही ठाम मत कधी नसतेच. टाळके कसे अग्गदी रिक्कामे. आज पाणी, उद्या तेल, परवा दारू, काहीपण भरा, तसे चालते. मला चांगले ओळखणार्या माझ्या जवळच्या नातेवाईकांना (बायको, मुले,) यांना विचारा. एरवी मजसारख्या वृद्ध व्यक्तीने असा विदुषकीपणा करणे समाजात मान्य नाही. इथे बरे आहे. पुन: या विधानातहि, कुणि माझी कीव करावी, मला सहानुभूति दाखवावी म्हणून लिहिले नाहिये. मला कुण्णी सहानूभूति दाखवावी असे काही नाही. हेवा वाटावा, 'लागो न दृष्ट माझी, माझ्याच' नशीबाला अशी परिस्थिती आहे.
|
Bee
| |
| Monday, February 25, 2008 - 3:00 am: |
| 
|
अज्जुका, खरच तुझ्यात एक उत्तम लेखिका दडली आहे. तू लिहिण्याचा गंभीरपणे विचार कर आता..
|
Dineshvs
| |
| Monday, February 25, 2008 - 3:11 am: |
| 
|
थोडासा वेगळा पण तरिही अगदी वास्तव अनुभव. ज्युलिया रॉबर्ट्स चा, एरिन ब्रोंकोविच बघितला असेल ना ? त्यात एका सरकारी नोकराकडून काहि कागदपत्रे मिळवण्यासाठी ती एक खास पोझ घेते. अगदी तसाच अनुभव मला, भारतातील एका संस्थेमधे आला. एकवार नाही अनेकवार. ती संस्था, त्या व्यक्ति यांचा उल्लेख मला करता येत नाही. पण इथे स्त्रीत्वाचा गैरफायदा घेतला गेला आणि दिलाही गेला. दोन्ही व्यक्तींचा करावा तेवढा निषेध थोडाच.
|
Ajjuka
| |
| Monday, February 25, 2008 - 4:01 am: |
| 
|
झक्की, हिर्यांचा हार!! ईईईईईईईई.. करू काय त्याचं? मिळाला नाही तेच बरंय. मला काSSSईही मिळालं नाहीये. काही पुस्तकं आहेत मात्र वेटिंग लिस्ट वर!! निळ्या अक्षरातलं नो झेप्स. काहीच कळलं नाही. जाउदेत! दिनेश, स्त्रीत्वाचा फायदा.... तसा पुरूषत्वाचाही फायदा दिला वा घेतला जातोच की. आपण माणसं आहोत संत नाही. या गोष्टी येणारच आहेत. त्याच सगळ्यावर हावी होणार नाहीत हे बघणं महत्वाचं. मी समर्थन करत नाहीये पण मला ते एका मर्यादेपर्यंत चूकीचंही वाटत नाहीये. शेवटी आहे त्या परिस्थितीमधे survive होणं ही मानवाची प्रकृती आहे आणि हे असे फायदे हा त्याचाच भाग आहे. आता मला सांगा.. कॉलेजच्या वयात नुसतं एखाद्या मुलीनं हसून माझं एक काम करतोस असं विचारलं (ह्याला स्किल लागतं सगळ्यांनाच जमत नाही. कुणी शिकवायला तयार असेल तर फी देऊन क्लास लावायची तयारी!) तर तिचं एकंच काय १०० कामं हसत हसत करणारे आणि तेच मिरवणारे काय कमी असतात? हा स्त्रीत्वाचा फायदाच होईल ना? पण हा तर सगळा आपखुशीचा मामला असतो. दोन्ही बाजूंना मजा येत असते की. मग कशाला बोला?
|
Bee
| |
| Monday, February 25, 2008 - 5:33 am: |
| 
|
ही ही ही.. खरच मुली अशा स्माईल देऊन आपली कामे मुलांकडून करून घेतात :-)
|
Meggi
| |
| Monday, February 25, 2008 - 6:01 am: |
| 
|
एका स्माईलने पाघळाणारे कसले आलेत वाघ.. छ्या
|
Bee
| |
| Monday, February 25, 2008 - 6:17 am: |
| 
|
मेग्गी, स्माईल तर खूप जास्त झाले. एखाद्या मुलीने आपल्याकडे पाहिले, नजर भिडवली तरी देखील खूप काही वाटायचे त्या वयात
|
Dineshvs
| |
| Monday, February 25, 2008 - 8:01 am: |
| 
|
ज्युलियाचे ते फ़क्त स्माईल नव्हतं, ( कुणीच बघितला नाही का तो सिनेमा ?) आणि मी ज्या संस्थेचा उल्लेख केलाय, ती आपल्या देशातील एक महत्वाची आणि आदरणीय मानली जाणारी " संस्था " आहे. म्हणुन खटकले ते.
|
झक्की सो.. ते निळे तिरपे कसे काढता हो???
|
>> ते निळे तिरपे कसे काढता हो??? हे अगदी मी चटणी कलरचे पडदे म्हणत होते ना.. छाप झालेय. असो. हे बघा. निळे तिरपे खालील प्रमाणे लिहा फक्त backslash पुढची space delete करा. \ blue{niLe \ i{tirape}}
|
च्यायला अगदी मान्य. छान लिहीलेय. त्याच्यावरच्या जबाबदार्या, अपेक्षा, कर्तव्यं यांचं ओझं जास्त असतंच. भावनिक आधार जरी स्त्रिया देत असल्या तरी घराचा खरा आधार हा पुरुषच असतो. नशीब चांगलं म्हणून मला तरी आजोबा, वडील, भाऊ, नवरा यामधे असे गोड फणसच सापडलेत. पण एकूण सांगायचं तर, पूर्वीपासून पुरुषाकडे अधिकार जास्त, निसर्गाची शक्ती जास्त. या गोष्टीचा फायदा घेतला गेलाच. त्यामुळं सहानुभुती बाईला मिळते. आणि आपण जे आजूबाजूला बघतो ते शहरी, संस्कारी, पापभीरू, सदसद्विवेक जागा असणार्या लोकांचं जग. तिथं नाही पण इतर ठिकाणी अजूनही परिस्थिती फारशी बरी नाहीये स्त्रीसाठी. तरीही खरंच या विषयावर गंभीरपणे लिहा जरूर. मुळात सुरूवात विनोदी होती म्हणून थोडा(खरं तर बराच) TP झाला पण व्यथा समजून घ्यायला आवडेल.
|
Ladtushar
| |
| Monday, February 25, 2008 - 8:57 am: |
| 
|
च्यायला एकदम सही लिहिले आहे...सगल्या बकरया चारी मुंडया चित !! (हलकेच घ्या हो...) >>>> बस जरूरी असते छान समजुतदार सोबतीची , मग बघा आयुष्य अन त्यातल्या व्यथा कश्या हसत खेळत टोलवीत जातो... समजुतदार सोबती !!! Ideal Women / Perfect Partner match !!! ही संकल्पना खरी आहे का हो ? का फ़क्त एक कल्पनाच आहे ? !!! "पुरुष जन्मा हीच तुझी कहाणी"
|
दिनेशदा, तुमच्या या पोस्टचा मला अर्थ लागला नाही.. आपले काम करून घ्यायला लोक खोटे बोलतात. कित्येक पुरुष खोटे बोलतात. लाच देतात. स्त्रिया स्वत्:चे शरीर भांडवल म्हणून वापरतात... त्यामधे तुम्हाला नक्की काय खटकले?? की तुमची अपेक्षाअ प्रत्येक स्त्रीने डोक्यावरून पदर घेऊन रहाण्याची आहे?? संस्था आदरणीय आहे म्हणून त्यातल्या व्यक्तीनी नीट वागावे हा अट्टाहास का??
|
Shrini
| |
| Monday, February 25, 2008 - 9:24 am: |
| 
|
संस्था आदरणीय आहे म्हणूनच त्यातल्या व्यक्तींनी नीट वागावे हा अट्टाहास असेल... नाहीतर संस्था आदरणीय राहणार नाही!
|
Zakki
| |
| Monday, February 25, 2008 - 5:29 pm: |
| 
|
चटणी कलरचे आत्ता! अहो चटणी काय एकाच रंगाची असते? लसणाची चटणी लाल, काही गडद हिरव्या, काही फिक्क्या हिरव्या, कारळ्याची चटणी आणखीनच वेगळ्या रंगाची!! समजावे कसे माणसाला चटणी रंग म्हणजे कुठला रंग? बिचारा नवरा अंदाजाने काहीतरी आणतो, नि मग वादावादी! भोग आहेत हो! किती किती म्हणून सहन करायचे? आता नाही होत एव्हढे सहन!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|