|
Search मारल्यावर झुबेदा च्या team मधे directors म्हणून श्याम बेनेगल आणि खालिद मोहंमद अशी दोन्ही नावं दिसली . दोन directors आहेत कि काय ? बाकी चमेली मधे करीना अजिबात शोभली नाही (IMO) . जब वी मेट मधे सुध्दा तसे टिपिकल करीना style मधेच केलय तिनी acting, पण overall movie मात्र छान जमलाय म्हणून ठिक वाटली ती . कपूर भगिनी दिसतात चांगल्या पण overacting मधे त्यांचा हातखंडाच आहे .. खूप loud वाटतत दोघी !
|
Malavika
| |
| Friday, February 22, 2008 - 3:30 pm: |
| 
|
करीना पेक्षा हजार पटींनी उजवी आहे ऐश्वर्या. दिसण्यात तर बोलायलाच नको. करीना डोक्यात जाते तिच्या ओव्हराॅक्टींगमुळे. खरतर त्याला ओव्हरॅक्टींग म्हणावं का हाही प्रष्नच आहे कारण ऍक्टींग आणि तिचा काहीही संबंध नाही!
|
Mbhure
| |
| Friday, February 22, 2008 - 7:13 pm: |
| 
|
जोधा अकबर गेल्याच आठवड्यात पाहिला. वर लिहील्याप्रमाणे थिएटरमध्येच पहाणे जरुरीचे आहे. मी इथे सहसा चित्रपट थिएटरमधे जाऊन पाहात नाही (चुक एकदाच केली ते गुरु पाहिला) पण आशुतोष गोवारिकरांचा म्हणुन पाहिला. माझ्या मुलीला अकबराबद्दल फारसे माहित नाही पण तिला हृतिक अकबर म्हणुन आवडला. ऐश्वर्या सुसह्य आहे.( हे सर्व वरीत लिहीले आहेच) जेंव्हा इंटर्वल आले तेंव्हा अजुन पुढे अर्धा सिनेमा बाकी आहे हे जाणवले. खरेतर त्या बेडसीन नंतर THE END योग्य वाटले असते. एडिटींगची अतिशय आवश्यकता वाटली. स्वदेश आणि हा चित्रपट पाहिल्यावर एक जाणवले की लगानमध्ये आमिरचा बराच मोठा वाटा आहेत. मला ते सुफी गाणे आवडले. त्यातले गाणारे दिसायला सुंदर नाहीत किंवा ते विनोदी वाटतात असे काही वाटले नाही. ते पीर आहेत. कॉमन चेहर्याचे दाखवल्यामुळे उलट ठीक वाटले. भजन असल्यामुळे हृतिकचा त्यातील सहभागही खटकत नाही; जितका तो त्या दोघांच्या प्रेमगीतात वाटतो. जनरल प्रेमकथा म्हणुन बघितला तर एकदा बघावा असा नक्कीच आहे नाहीतर V/C आहेच वाद घालायला. शेवरीः नीना कुळकर्णी निर्मीत हा चित्रपट ** रेटिंगचा आहे. आयडिया चांगली आहे पण ती वाटली तेव्हढी रंजक होत नाही. एका घटस्फोटीत महिलेला काही (इतके फालतु) कारणामुळे एक रात्र मुंबईच्या रस्त्यावर काढावी लागते. तिला येणारे अनुभव वगैरे.... पण फ्लॅशबॅकच जास्त आहेत. खालिद मोहम्मदच्या फिजाचे परिक्षण सुभाष घईने केले होते. ते वाचनिय होते. फिजा हा चित्रपट अचाट आणि आर्तक्यमध्ये मोडतो. करीश्मा आपल्या भावाल्या जसे शोधते ते एकंदर विनोदी वाटते. परत त्यावर्षीचे सहय्यक अभिनेत्रीचे फि. फे. जयाला? वास्तव मधील रिमा लागूचा रोल अफलातुन होता. आणि केवळ बच्चन + Comeback म्हणुन तिला पारितोषिक. तेहजीब हा बरा चित्रपट होता. पण तो इंग्रीड बर्गमनच्या "Autumn Sonata" ह्या चित्रपटाची कॉपी होती.
|
Ajjuka
| |
| Friday, February 22, 2008 - 8:35 pm: |
| 
|
आत्ताच पाहून आले. कधी नव्हे ते ऐश्वर्या सुसह्य. सोनू सूद गुड. बाकी महान विनोदी चित्रपट आहे. हृतिक सगळीकडे कोइ मिल गया आणि क्रिश सारखंच बोलतो. खलिद मोहम्मद च्या बाकीच्या रिव्ह्यूजचं माहीत नाही पण हा तरी योग्य आहे यात वाद नाही. ऐतिहासिक तपशील (घटना नव्हे तर वातावरणातले) निश्चितच मुघले आझम मधे जास्त चांगले होते. साधारण माझ्या माहितीप्रमाणे गोषा, पडदा, घुंघट, जनाना या गोष्टींचं महत्व राजपूत आणि मुघल दोघांनाही प्रचंड होतं. ते तर कुठे दिसलंच नाही. असो. एकेक गोष्ट तपशीलात जाऊन सांगता येईल. ते जरा वेळ मिळाला की. पण संशोधनाच्याबाबतीत तोंडावर आपटलेली फिल्म आहे. अभ्यास वरवरचा म्हणजे तरी किती वरवरचा! काहीच अर्थ नाही. च्यामायला खरबंदाने शेल्याला आणि मनवा नाइकने(नीलाक्षी) दुपट्ट्याला लावलेली सेफ्टीपिन लक्षात येते. authenticity च्या नावाने बोंब आहे. अगदी lead pair च्या कपड्यात सुद्धा.
|
Ajjuka
| |
| Friday, February 22, 2008 - 8:41 pm: |
| 
|
BTW मला वळू आवडली नव्हती फिल्म पण या फिल्म पेक्षा ती नक्कीच १० - १५ पट तरी चांगली आहे.
|
Arch
| |
| Friday, February 22, 2008 - 8:53 pm: |
| 
|
Deeps कपूर भगिनी? त्या बंधू दिसतात ग. दोघीतही नाजूकपणा अजिबात नाही.
|
Asami
| |
| Friday, February 22, 2008 - 10:07 pm: |
| 
|
फिजा हा चित्रपट अचाट आणि आर्तक्यमध्ये मोडतो. >> एकदम चोक्कस. संतोष शिवन ची cinematography सोडली तर एव्हढा polished रद्दड movie काढणे फक्त सुभष घईलाच जमू शकते
|
Maanus
| |
| Friday, February 22, 2008 - 10:11 pm: |
| 
|
ए ए ए करीस्मा बद्दल काही बोलायचे नाही.
|
आताच ओम शांती ओम पाहिला. फ़राह खान अतिशय रद्दड विषय घेऊन हिट पिक्चर देऊ शकते. तशीपण मी टीपिकल बॉलीवूडवाली आहे. (इंग्रजी पिक्चर आपल्याला "पटत" नाहीत.. आम्ही आपले मनमोहन देसाई, डेव्हीड धवन, यश चोप्रावाले) मला सर्वात आवडलेला सीन सूरज बरजात्यावाला आणि अक्षय कुमार आणी अभिषेक बच्चनचा ऍवॉर्डमधला. जोधा अकबरशाठी मीडीया ब्रीफ़ बनवताना आम्ही No public appearances असं लिहिलं होतं. बादशाह आणि मलिका एखाद्या प्रोग्राममधे येऊन नाचतात हे बघायलाच विच्त्र वाटलं असतं. त्यामुळे selected newc channnel वर interviews इतकंच टरलं होतं... लो मार्केतींग हा आमचा बेसिक फ़ंडा होता.. सध्या हातामधे IPL आहे त्यामुळे मी चित्रपटावर लिहिणे कमी.. क्रिकेटवर जास्त.
|
फिजा हा नंतर नंतर अगदी फिल्मी आहे पण सुरवातीचा भाग जिथे एका गरीब सरळमार्गी मुस्लिम कुटुंबातील मुलगा त्याला आलेल्या अनुभवामुळे अतिरेकी बनतो तो भाग मला वास्तव वाटला. खरोखर अनेक लोकांच्या बाबतीत तसे होतही असेल. जया भादुरीचे काम मला खूप आवडले. अगदी खर्याखुर्या मुस्लिम स्त्रीसारखे वागणे, बोलणे, वावरणे. बाकी करिष्मा आणि रितिक रोशन म्हणजे सगळाच आनंद. मुख्य गरीब मुस्लिम घरात वाढलेले असे या दोघांकडे बघून वाटत नाही. दोघे अभिनयाच्या बाबतीत योग्य हिंदी वा उर्दू बोलण्यात बर्यापैकी दगड. ह्या सिनेमाचा पहीला तासभर चांगला आहे असे मला वाटले.
|
Nuovokus7
| |
| Sunday, February 24, 2008 - 3:11 am: |
| 
|
I am startled...!!! People over here are comparing VallU with JA !!!! VallU is an outstanding movie..with perfect backdrop village & villagers... Whether its typical proverbs ... and so called fyaashannable attires of aaba/anna... attitude of FORREST... ..Its evident in whole film how much rearch work has been put in... Hats off to these Guyz...
|
Divya
| |
| Sunday, February 24, 2008 - 1:48 pm: |
| 
|
जोधा अकबर पाहीला. इथले review वाचुन फ़ार अपेक्षा ठेवुन बघीतल्यामुळे कि काय माहीत नाही पण फ़ारच बोर आहे movie . प्रेमकहाणी असेल म्हणुन बघीतला तर डोंगर पोखरुन उंदीर निघाला. प्रेम कहाणी कमी आणि इतिहासाचे तपशील ( ज्यात काहीही interest नाही ) तेच खुप झालेत. दुसरे खटकले ते पात्रांची निवड. लगान मधे अमिर आणि ग्रेसी सिंग आणि स्वदेस मधे शाहरुख आणि गायत्री जोशी जसे perfect वाटले होते तसे इथे ऐश्वर्या आणि ह्रुतीक रोशन वाटत नाहीत. ऐश्वर्या सुंदर असली तरी तिला राजेशाही, खानदानी लुक अजिबात नाही त्यामुळे फ़ारच सामान्य दिसते या movie मधे, बिल्कुल राजकुमारी किंवा मलिका वाटत नाही. पुर्वीच्या नट्यांमधे royal चेहरे होते तरी. remember धर्मात्मा मधली हेमामालिनी, काश्मीर कि कली मधली शर्मीला, मुघले आझम मधली मधुबाला... त्यामुळे ते सेट, दागिने, भव्यपणा फ़ार फ़ुसक वाटल. नवीन चेहरा शोधायला हवा होता. मलिका कशी पाहीजे कधी तिचे पडद्यावर दर्शन होते, कधी तिच्यावर camera जातो अस वाटायला पाहीजे. खास तिला बघायसाठी लोकांना परत परत movie पहावासा वाटायला पाहिजे. ह्रुतीक राजा वाटतो तरी, पण काय माहीत कोइ मिल गया बघीतल्या पासुन त्यची तीच acting आठ्वते. बापाने कोइ मिल गया काढुन पोराचे अतोनात नुकसान केले अस मला नेहमी वाटत. गाणी दोन तीन श्रवणीय आहेत. जश्ने बहारा है मस्त. पण एकुण movie बोर आहे.
|
Suyog
| |
| Sunday, February 24, 2008 - 6:23 pm: |
| 
|
yes, jodha akbar is very slow and boring movie, total waste of time.
|
Amruta
| |
| Monday, February 25, 2008 - 12:15 am: |
| 
|
होय, जोधा अकबर मलाहि नंतर नंतर बराच बोअर वाटायला लागलेला पण ह्रितिकमुळे पुर्ण पाहिला. मला तरी ह्यात ह्रितिक जाम आवडला.
|
Sonalisl
| |
| Monday, February 25, 2008 - 2:03 am: |
| 
|
संपुर्ण चित्रपटात ऐश्वर्या आजारी दिसते. एकीकडे खुप कोमल, नाजुक दाखवलं अन तरीही उत्तम तलवार चालवते! कमालच ना! ईतिहास विसरुन हा चित्रपट पाहिला त्यामुळे सुसह्य झाला. बाकी सेट साठी हा मोठ्या पडद्यावरच बघावा असा आहे.
|
Ajjuka
| |
| Monday, February 25, 2008 - 4:23 am: |
| 
|
इतके विनोदी घोळ आहेत ना या संपूर्ण चित्रपटात त्यामुळे हसण्यात वेळ बरा जातो पण मग शेवटचा अर्धा पाउण तास मात्र आता आवरा बरंका तुमच्या मर्कटलीला असं होतं. आणि ते २६ जानेवारीच्या परेडसारखं गाणं... ज्यात प्रत्येक राज्यातले लोक आपापले विसाव्या शतकातले कपडे घालून येऊन नाच करून दाखवतात. मी इतकी मोठ्याने हसले की लोक बघायला लागले. 'चला बरं झालं... आपल्यालाही हसता येईल आता' या जाणिवेने!
|
Manuswini
| |
| Monday, February 25, 2008 - 5:38 am: |
| 
|
मला जोधा अकबर पाहताना प्रश्ण पडला की त्याकाळी आरसे नी मेणबत्या होत्या काय? मेणबत्ते stand पण होते काय? मला काळाचा घोळ दिसत होता. १५०० चा काळ होता २००० समजत न्हवते. माझा तर पेशन्स पुर्ण ऑउट झाला होता. कीती ते लांबऽऽऽलच्चक प्रेमाचे चर्हाट.....
|
Zakki
| |
| Monday, February 25, 2008 - 7:04 am: |
| 
|
त्यात एक अकबराची आरती पण आहे. ती पाठ नाही केलीत नि सकाळच्या बांगेबरोबर म्हंटली नाही तर तुम्ही खरे सेक्युलर नाही. (आठवतय्, लोकांना वंदे मातरम् म्हणायचा आग्रह केला होता तुम्ही हिंदू, राष्ट्रप्रेमी आतंकवाद्यांनी! आँ, आता कसे वाटते?)
|
Swa_26
| |
| Monday, February 25, 2008 - 7:05 am: |
| 
|
जोधा अकबर हे नाव न देता ती फिल्म बनवली असती तर चाल्ली असती!! मुळात विषय (जोधा-अकबर यांची so called प्रेमकहाणी) हाच इतका छोटा आहे नि त्यावर पावणेचार तासांचा चित्रपट... जरा अतिच आहे! कुलभुषण खरबंदा तर सदान कदा ऍसिडिटी झाल्यासारखा वाटतो.
|
Zakki
| |
| Monday, February 25, 2008 - 7:12 am: |
| 
|
अकबराने तीर्थयात्रा कर रद्द केला त्या कायद्यातच, मुसलमानांना मक्केला जायला विमानाचे तिकीट सरकारने, ८० टक्के हिंदूंच्या करातून, फुकट द्यावे, असेहि लिहीले होते. पण त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली नाही. मला वाटते, त्यांना फक्त जाण्याचे तिकीट द्यावे, परत येण्याचे नाही, असा तो कायदा होता. तो बहिरा खान असाच फुकट तिकीटावर मक्केला गेला. पुढे कुणा आनंदीबाई सारख्या बाईने, परतीचे तिकीटहि फुकट मिळावे असे त्यात घुसडले!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|