Chyayla
| |
| Wednesday, February 20, 2008 - 11:11 am: |
| 
|
हाच विषय त्याने जोधा अकबर हे नाव न देता काल्पनिक रीत्या साकार केला असता तर त्याला अजून कल्पना स्वातंत्र्य मिळाले असते किंबहुना ते जास्त विश्वसनीय ठरले असते. नंदिनी एकदम पटले, मला पण असे वाटत की त्याच्या मेहनतीच, कल्पकतेच तेवढच चांगल चीज झाल असत. व नसत्या विवादातही अडकला नसता. गोवारीकरच्या लगान, स्वदेष मुळे मी त्याचा पंखा झालो होतो, पण ईथे त्यानी थोडी निराशा केली.
|
Sas
| |
| Wednesday, February 20, 2008 - 5:51 pm: |
| 
|
'मिथ्या' एकदा पाहण्यासारखा, मला आवडला, 'रणवीर' चा अभिनय एकदम सहज आणी सही बाकिच्या कलाकारांनीही छान अभीनय केलाय 
|
Asami
| |
| Wednesday, February 20, 2008 - 6:18 pm: |
| 
|
कालच मी The warrior पाहिला. इरफ़ान खान, असिफ़ कपाडिया अशी नावे वाचून जोरदार अपेक्षा होती. तशात BAFTA award मिळाले असल्यामूळे उत्सुकता होती. एकदम अशा type ची awards जिंकणार्या movies सारखा निघाला. अजिबात अपेक्षाभंग झाला नाही
|
Jadoo
| |
| Wednesday, February 20, 2008 - 9:12 pm: |
| 
|
कालच पहिला जोधा अकबर. movie मधे costume - jewelry छान आहेत. Hrithik चा अभिनय मात्र मला आवडला नाही. त्याच्या तो सिंहासनकडे चालत जातानाच्या scene मधे तर अगदिच किरकोळ वाटतो. त्याच्या चालण्यात तो राजेशाहि थाट अजीबात वाटत नाही. aishwarya ठिक ठिक आहे for a change
|
Ankyno1
| |
| Thursday, February 21, 2008 - 5:13 am: |
| 
|
मी पण काल पाहिला 'जोधा अकबर' (पेशंस ठेउन) एकदा पहायला चांगला आहे हृतिक छा जाता है (फक्त त्या सूफी गाण्यात त्याला नाचवायला नको होतं... ते अख्खं गाणं नसतं तरी चाललं असतं) नितिन देसाई चे सेट्स अफलातून आहेत काही सीन्स मधे आशुतोश गोवरीकरच्या दिग्दर्शनातली नजाकत केवळ लाजवाब आहे (सुभानल्लाह !) ऐश्वर्या बरीच सुसह्य आहे... (काही वेळा उगाचच ती 'मल्लिका ए हिन्दुस्ताँ' न वाटता 'गुरु' ची बायको वाटते....) पण हृतिक आणि तिची केमिस्ट्री सुपर्ब आहे... (अभिषेक जळून कोळसा झाला असेल) सोनू सूद ला बर्यापैकी भूमिका मिळाली आहे. (तो मधूनच राज बब्बर, मधूनच तरूण अमिताभ आणि क्वचित राजू श्रीवास्तव सारखा दिसतो) पण आशुतोश नी कात्री वरचा राग जरा दूर करायला हवा आणि जरा नाॅर्मल लांबीचे सिनेमे बनवायला पाहिजे... श्रीखंड कितीही स्वादिष्ट असलं तरी त्याचा अतिरेक सुस्ती आणतो..... पूर्वार्धात असंच जास्त ताणल्यामुळे सिनेमा खूप रेंगाळला आहे... आणि एक क्षण असा येतो की 'मध्यंतर कधी होणार?' असं वाटायला लागतं 'गुरन' 'मुनीसर' (स्वदेस मधला काटकुळा म्हातारा... इथला 'पीर') 'बाघा'(ख्वाजा गाण्यातला) असे गोवारीकर चे आवडते कलाकार हशा सोडून कहीही मिळवत नाहीत... सुहासिनी मुळे ला तर फक्त ३ संवाद आहेत.... कुलभूषण खरबंदा अजूनही 'पूरणसिंग' च वाटतो (लगान मधे: अब ये खेल खेलना ही होगा, तर इथे: ये शादी का जहर तुम्हे पीना ही होगा) पण इतकं असूनही एकदा तरी निश्चित पहावा असा सिनेमा आहे. (डीव्हीडी ची वाट पाहू नका.... भव्यतेची कल्पना येणार नाही.... ती मजा मोठ्या पडद्यावरच लुटायला हवी) माझ्याकडून ५ पैकी ३ तारे (एक हृतिक साठी दुसरा सेट्स आणि भव्यते साठी आणि तिसरा अशा अनेक विखुरलेल्या सीन्स साठी ज्यात आशुतोश मधला दिग्दर्शक भाव खातो...... न मिळालेल्या दोन ची कारणं: संथ गती अनावर झालेला गाण्यांचा मोह)
|
Manuswini
| |
| Thursday, February 21, 2008 - 6:38 am: |
| 
|
अभिषेक नक्कीच जळला असेल.. ह्या मूवीमध्ये पण 'कीस्सींग' सीन आहे की aish नी रुतीकचा जोधा अकबर मध्ये....
|
Dakshina
| |
| Thursday, February 21, 2008 - 6:46 am: |
| 
|
अंकुर, चित्रपटाचं वर्णन छान लिहीलंयस. वाचून पहावासा वाटला...
|
Ankyno1
| |
| Thursday, February 21, 2008 - 7:12 am: |
| 
|
दक्षिणा... ढाण्या वाघ (उफ्फ ये चार शब्द...)
|
किसिंग सीन नाहीये.. जो काही शॉट आहे त्याला किसिंग सीन म्हणत नाहीत.. धूम २ मधे पण तो "किसिंग सीन" नव्हता..
|
Deshi
| |
| Thursday, February 21, 2008 - 2:09 pm: |
| 
|
अरे अरे एक ही किसींग सिन नाही. मग कस्ली आलीये प्रेमकथा. ( किस शिवाय ती पुर्ण होतच नाही). आशुतोश मला भेटला असता तर मी त्याला मल्लीका चा उत्तान की काय तो नाच ही दरबार दृष्यात टाकायला लावला असता त्यावर तानसेनने गाणेही म्हणले असते. एवढी चांगली मुल्य देताना ही काटकसर का? शो ना हो.
|
Upas
| |
| Thursday, February 21, 2008 - 3:43 pm: |
| 
|
खरय... सगळीच फिल्लमबाजी असल्याने अकबराला इथे मल्लिका हे दहावे रत्न ठेवायला काहीच हरकत नाही.. :-P मला ह्या मूव्हीचं मार्केटींग जरा जास्तच वाटतय..
|
मल्लिका म्हणजे अकबराच्या दरबारातली बेली डान्सर का ? 
|
Tonaga
| |
| Thursday, February 21, 2008 - 4:04 pm: |
| 
|
मल्लिका जुनी झाली आता, काहीतरी नवीन 'आयटम' आणा बुवा!
|
खलिद मोहम्मदचे परीक्षन इथे वाचा. त्याच्या मते जोधा अकबर म्हणजे जोधा अकबोअर आहे. http://www.hindustantimes.com/StoryPage/FullcoverageStoryPage.aspx?id=64210ad8-ad75-4bc3-a608-228999fc3774jodhaaakbarmoviespecial_Special&&Headline=And+the+rest+isn%u2019t+history
|
मला ह्या मूव्हीचं मार्केटींग जरा जास्तच वाटतय.. >>> I will take it as a compliment, Thnx
|
Tulip
| |
| Friday, February 22, 2008 - 6:14 am: |
| 
|
खलिद मोहम्मदचे स्वत:चे (फ़िजा, सिलसिले आणि तिसर्याच नावही आठवत नाहीये) असे सिरिजमधे फ़्लॉप झालेले चित्रपट पहाता त्याने फ़्रस्ट्रेशनमधे (तो बर्याचदा तसेच लिहितो म्हणा) हा असला रिव्यू लिहिला आहे हे उघड आहे. आशुतोषने शॉट केलेल्या असंख्य कलात्मक सीन्सपैकी एकतरी करुन दाखवावा ना त्याने. इडियट. आणि मला नाही वाटत मार्केटींग जास्त वगैरे झालेय. हे बेबी, सावरीयां सारख्या टुकार फ़िल्म्सचेही हल्ली जे कायच्याकाय मार्केटींग झाले होते आणि आता रेस सारख्या फ़िल्मचेही चाललेय ते पहाता आशुतोषच्या मार्केटींग टिमने खूपच डीसेन्टली प्रोमोट केलेला आहे हा चित्रपट. र्हितिक किंवा ऍश एकाही रिऍलिटी शो मधे अकबर जोधाच्या ड्रेपरी मधे आधी नाचलेले नाहीत की आशुतोषने माझा चित्रपट जगातला सर्वोत्कृष्ट अशी भन्साली विधाने रिलिजच्या आधी केलेली नाहीत. अगदी मायनर फ़्लॉज सोडले (ज्यांचा चित्रपटाच्या कथावस्तूवर काहीही वावग परिणाम नाहीये इतके मायनर) तर हा चित्रपट इतर कमर्शियल मेनस्ट्रीम सिनेमामधल्या हजार फ़ालतू मिडिऑकर, उगीचच गाजवलेल्या फ़िल्म्स पेक्षा कितीतरी पटींनी चांगला आहे. निर्माता दिग्दर्शकाला त्याचे ड्यू क्रेडीट हातचे न राखता द्यायलाच हवेय.
|
Well said tulip! तो तिसरा movie चमेली आहे का ?? आणि बहुतेक झुबेदा पण . त्या खालिद च्या दृष्टीने करीना करीष्मा या extra ordinary actresses! त्यामुळे त्याची horrible टेस्ट आणि तो critic म्हणून काय दिवे लावणार हे काही सांगायलाच नको ! 
|
Arc
| |
| Friday, February 22, 2008 - 10:08 am: |
| 
|
झुबेदा श्याम बेनेगलचा आहे आणि वाईट नाहिये,बराच बरा आहे. ash कपुर भगीनिपेक्शा चान्गला अभिनय करते असे मला तरी नाहे वाटत, अर्थात जोधा-अकबर मधे आशुतोशने तिच्याकदुन बरे काम करु घेतले असेल तर माहीत नाही
|
Tulip
| |
| Friday, February 22, 2008 - 10:26 am: |
| 
|
अगं नाही इट वॉज सम फ़्लॉप तेहजीब. झुबेदा बेनेगल चा आणि चमेली मधे राहूल बोस असल्याने आणि त्यातल्या दोन गाण्यांमुळे तरला. मला करीना ऍक्टिंगच्या बाबतीत फ़क्त जब वी मेट मधे आवडली आणि करिष्मा कधीच नाही. ओव्हर ऍक्टींग करते ती इतकी. राजा हिंदुस्तानीतल्या तिच्या त्या 'राजाऽजीऽऽ' असल्या टिपिकल लाडिक टोनला तर कान बंद करावेसे वाटतात. खालिद मोहम्मदने जब वी मेट आणि नो स्मोकिंगलाही वाईट झोडपले होते. आणि KKKG चा रिव्यू तोंड फ़ाटेस्तोवर स्तुती करुन लिहिला होता. क्रिटिक म्हणून उगीच ओव्हर हाईप्ड आहे तो.
|
खालिद मोहोम्मद शाहरुख,यश चोप्डा बॅनर्सच्या चित्रपटांना ग्रेट म्हणतो मग ते कितिही रद्दी असोत
|