Sandu
| |
| Saturday, February 16, 2008 - 2:28 pm: |
| 
|
जोधा अकबर कोणी पहिला का? कसा वाटला?
|
Tulip
| |
| Saturday, February 16, 2008 - 9:35 pm: |
| 
|
डीजे एकदम पटलं. मला जाम आवडला जोधा अकबर. आशुतोषची अजून एक ग्रॅंड फ़िल्म. आणि र्हितीक तर मेस्मरायजिंग आहे. त्याचे ते रॉयल आउटफ़िट्स काय ग्रेसफ़ुली कॅरी करतो आणि डायलॉग डिलिवरी पासून ते रुबाबदार चालीपर्यंत, तलवारबाजी वगैरे कशातच कमी पडत नाही तो. आशुतोषच कास्टिंग परफ़ेक्ट. जस्ट स्प्लेन्डीड!!! जष्न्-ए-मोहोब्बत, इन लम्होंके दामन में ही दोन गाणी बेहतरीन. ऍशला ब्राऊन लेन्सेस मुळे छान सॉफ़्ट लुक आलाय. आणि पहिल्यांदाच तिने तिची ती ट्रेडमार्क श्रील, ओव्हर ऍक्टींग केलेली नाही. and i think she was asked to put on weight by the director. . बाकी सगळं आहेच सुंदर पण सर्वात सुंदर आहे र्हितीक. अजून किती ठिकाणी जाऊन लिहिणार आहे मी हे काय माहीत. माझं पोस्ट पण वाच डीजे. त्यांच्या रोमान्सबद्दलचं :P
|
Sanish
| |
| Sunday, February 17, 2008 - 12:49 am: |
| 
|
जोधा अकबर सिनेमाच्या दृष्टीनी चांगले मुद्दे वरच्या पोस्ट्स मधे लिहिलेच आहेत. ह्रितिक बद्दल तर वादच नाही. मरहबा गाणं सुंदर घेतलंय. पण ह्या सिनेमात अकबराचं character हिंदी सिनेमातला हिरो जसा असतो तसं दाखवलंय. विचार, आचारानी एकदम चांगला वगैरे. आणि एकुणच अकबराला over glorify केलंय जे अर्थात खोटं आहे (संदर्भ - वरच्या अनेक पोस्ट्स मधे आहेच व पु. ना. ओक ह्यांच्या "अकबर थोर नव्हताच" ह्या पुस्तकातही) ह्या तथाकथित लव्ह स्टोरी(?) चा अख्खा सिनेमा होऊ शकत नाही म्हणुन ते मेजवानी व इतर सीन्स घातल्या सारखे वाटतात.
|
जोधा अकबरचा मूळ गाभा हा एक राजकीय सौद्यासाठी झालेले लग्न आणि त्यातून उठणार्या त्य दोघच्या तरल भावनाचा अविष्कार असा आहे, असं आशुतोष म्हणतोय. मात्र चित्रपटामधे असं फ़ार कमी वेळेला जाणवतं. आशयाला मुगल सल्तनन्तची झूल घालून चित्रप्ट बनवलाय. ह्रितिक आणि ऍशचा जबरसद्त परफ़ॉर्मन्स अखखा चित्रपट बघण्यास सुसह्य करतो. कॉस्च्युम्स, सेट आणि इतर प्रॉडक्शन वॅल्युज जबरदस्त ठेवून सुद्धा आशयावर हेवी होत नाहीत. जोधा चे स्वतंत्र व्यक्तिमत्व आणी जलालचे सतत "दुसर्यानी संगितल्यासारखे मी करतोय" ही भावना एकमेकाना छेद देत प्रेमाचं रूप घेते. जलाल जोधाच्या माध्यमातून स्वत्:ला शोधत जातो. त्याच्या समोर समस्या मोठ्या आहेत. आजू बाजूचं राजकारण त्याच्या जेवावर उठत चाललय.. असं असताना जोधा त्याच्या आयुष्यातला एक निवांत कोपरा आहे. आणि त्या कोपर्याला आयुष्याचा भाग बनायचं आहे.. दुर्दैवाने सर्व काही भव्य दिव्य दाखवायच्या नादात दिग्दर्शक ही तरलता अधून मधून विसरून जातो. आणि सर्वच व्यक्तिरेहा उदात्त करत जातो. त्यामुळे पिक्चर खरा वाटत नाही. बघणेबल आहे, पण हे सत्य नाही.. हे जाणवत राहतं दोन भिन्न संस्कृतीच्या माणसानी एकत्र येऊन त्यातून नवीन संस्कृती तयार होणं हे काही नवीन नाही, पण तरीही सद्य राजकीय स्थितीकडे पाहिल्यास गोवारीकरला काय दाखवायचे यापेक्षा काय दाखवायचे नाही हा प्र्श्न जास्त पडला असेल. हाच विषय त्याने जोधा अकबर हे नाव न देता काल्पनिक रीत्या साकार केला असता तर त्याला अजून कल्पना स्वातंत्र्य मिळाले असते किंबहुना ते जास्त विश्वसनीय ठरले असते. प्रेक्षकाना आवडेल असा चित्रपट बनवताना इतिहासाला त्याने बर्याच ठिकाणी मुरड घातली आहे, त्यामुळे कधी कधी मजा नही आता.... जेव्हा ह्रितिक ह्रितिक रोशन न वाटता "जलाल" वाटायला लागतो तिथेच चित्रपट अर्धा यशस्वी ठरतो. मुघल सम्राट आणि एक पति हे दोन्ही रूपं त्याने छान सांभाळली आहेत. आणि त्याचं "सम्राटपण" बघायचंच असेल तर आग्रा बझार मधला सीन आठवा.. नुसत्या डोळ्यात राजेपण उतरवलय त्याने. ऍश खूप छान काम करते. मुख्य म्हणजे ती एकदाही चिरकत नाही. तिचा मेकप मधे मधे विचित्र दिसतो. प्णेकंदरीत राजस्थानी म्हणून ती शोभत नाही.. का कुणास ठाऊक... बाकीचे ऍक्टर्स मात्र मुघल दरबारातून उचलून आणल्यासारखे वाटतात (खास करून शरिफ़ुद्दीन त्याच्यासमोर ह्रितिक बुटका वाटतो. )\ सोनु सूदने चांगलं काम केलय. मात्र इतक्या चांगल्या पात्राचा शेवट अत्यंत फ़िल्मी केला गेलाय. चित्रपट संपवताना हाणामारी पाहिजेच एमोशनल ड्रामा पाहिजेच हे या लोकाना क वाटत राहतं?? राजपूत दरबार, दिवाने आम दिवाने खास क्किंवा जनान खान्याचं चित्रीकरण अप्रतिम झालय. रीअल वाटावं इतक्या तोडीस ते होतं. मला आवडलेला सर्वात मस्त शॉट म्हणजे जोधा मुघल जनानखान्यात जाताना त्याचे वैभव बघते तो आणि जलाल राजपूत महालात येताना कौतुकाने बघते तो शॉट. दुसरा म्हणजे "नमक कम है" नंतर तिने दिलेला दाईमा ला लूक. (आधी मला ते जाम विनोदी वाटलेलं.. त्या लूक नंतर शह काटशहाचं हे राजकारण ती जिंकल्याचं समजतं.. ) मनमोहना गाण्याची जागा पण अशीच चुकल्यासारखी वाटली पण नंतरचा सीन निव्वळ अप्रतिम होता. फ़क्त एकच संवाद आहे "सिंदूर.." त्यावेळेला ह्रितिक आणि ऍशची ऍक्टिंग बघण्यालायक आहे. दुसरा बेस्ट म्हणजे जलाल तलवारबाजीची प्रॅक्टिस करत असताना जोधाचं बघणं.. आणि त्याला हे समजणं की ती बघतेय.. "इन लम्हो के" गाणं पण जरा फ़िल्मी वाटतं. अकबर चक्क गाणं म्हणतो?? जोधाचा तो ड्रेस पाहिल्यावर ही आता कधीही "कजरारे" सुरू करेल असं मला वाटायला लागलं होतं. हत्तीच्या आखाड्यातला जलाल किंवा "सही वक्त का इंतजार है" म्हणणारा जलाल किंवा लिहता वाचता न येणारा जलाल किंवा सूफ़ी गाण्यामधे गोल गोल फ़िरणारा जलाल.. ह्रितिक परसे नजरे नही हटती. काही गोष्टी मात्र अति फ़िल्मी झाल्यात. एवढ्या मॉठ्या कडाईमधे स्वतंपाक करून पण इतकेसे वाटी का घेऊन येतात??? राजपूत बायकाच्या ओढण्या इतक्या झिर झिर झिरीत असतात का?? आणि ओपन बॅकचे ब्लाऊज?? (असं असेलही पण मला मात्र ते कधीतरी मनिश मल्होत्रा टाईप वाटून गेलय.) आशुशी बोलणं झाल्यावर आणि प्रोमो पाहिल्यावर मला चित्रपट visuals च्या प्रेमात वाहून गेला आणि भव्य दिव्य असूनही आशय हरवलेला असेल असें वातले होते. आशुचा संजय लीला भन्साली होतोय की काय असं वाटलं होतं. मात्र सुदैवाने भव्यता आइ दिव्यता चित्रपटाला पूरक ठरते. जाचक नाही.. एकाअतरी चित्रपट बघायला हरकत नाही.. फ़ोर स्टार्स फ़्रॉम नंदिनी...
  
|
Adm
| |
| Sunday, February 17, 2008 - 11:47 am: |
| 
|
डिज़े... किती ते मेहेंदी मेहेंदी.... AG नी मेहेंदी ऐवजी अल्ता दाखवून अगदी तुझ्या वर्मावरच बोट ठेवल की काय??? (दात विचकावून हसणारा चेहेरा)
|
Anjali28
| |
| Sunday, February 17, 2008 - 3:58 pm: |
| 
|
DJ आणि Tulip ला अनुमोदन. मलाही जोधा अकबर आवडला. मी हा चित्रपट एक काल्पनिक प्रेमकथा म्हणूनच (आशूतोषने कितीही दावा केला तरिही) पाहिला. त्यामूळे मी चित्रपट मस्त enjoy केला. पूर्ण चित्रपटात ह्रितिक अगदी 'छा जाता है'. त्याच्यासाठीतरी बघावाच. विशेषत: तो गच्चीवरचा तलवारबाजी करतानाचा प्रसंग ऐश्वर्या मला कधीच आवडली नव्हती. पण 'जोधा..' मधे सुसह्य वाटली. बहुतेक नेहमीचे मांजरीसारखे डोळे नसल्याने असेल. lenses मुळे तिच्या चेहर्याला एक soft look आला आहे. त्याचबरोबर स्वत:चा स्वाभिमान जपणारी करारी तरूणी वाटते. ह्रितिक-ऐश्वर्याची chemistry मस्तच. अगदी तिने अभिषेकमधे काय पाहिलं असा पुन्हा एकदा प्रश्न पडण्या इतकी मस्त दोघांमधले प्रसंग अतिशय छान चित्रित केले आहेत. सोनू सूद थोडा तरुणपणच्या अमिताभ सारखा दिसतो का? नितिन देसाईचे sets अप्रतिम. युध्दाचे प्रसंग अतिशय छान. तनिष्कचे दागिने अगदी नजर ठरत नाही इतके देखणे. सोनू सूदचा मृत्यू मात्र अगदी फिल्मी. चित्रपटाची लांबी अजून कमी असती आणि गती थोडी वाढवली असती तर अजून छान वाटला असता. शिवाय प्रत्येक वेळी सल्लागारांशी पटलं नाही की मक्केला पाठवताना का दाखवलय कुणास ठाऊक? नंतर तर ते हास्यास्पद वाटतं. एकदा तरी बघावाच. (मी ह्रितीकसाठी पुन्हा बघणार ).
|
आणि अजुन एक अकबराच्या तोंडचं शेवटचं फ़िल्मी वाक्य जे theatre मधे अक्षर्श : हशा पिकवतं " अब मै महारानी जोधा से ये कहना चाहता हूं कि वोह मेरे करीब आये "
|
डीजे, त्या वाक्याला माझा बॉस म्हणे,, "दरबार मे??" आणि इन लम्हो के दामनमे च्या वेळेला "ये अभिषेक रो रहा है क्या देखो उठकर,,"    बिचारा बराच लेट आला होता... का कुणास ठाऊक, तीन तास झाल्यावर आशुतोशला वाटलं "अर्र, आता चित्रपट संपवायला हवा.. " म्हणून तो सीन घालून पिक्चर संपवलाय  मी हा पिक्चर एकदा प्रीमीअरला पाहिला. एकदा मित्रासोबत.. अजून तिसर्यादा पाहिला तयार आहे. ह्रितिकपायी...
|
Lol नन्दीनी ! शुकवारी एकन्दरीतच पब्लिक भरपूर jokes मारत होते बर्याच वाक्यांना ! आणि त्या अर्ध्या डोळ्याच्या मुघल ऍक्टर च्या प्रत्येक close up ला ( लगान मधला गुरन ) खूप हसत होते लोक ! त्या सूफ़ी गाण्याच्या वेळी दुसर्या रांगेत बसलेले मख्ख चेहेर्याचे खंजिरी वाले पाहून तर कॉमेडी चित्रपट पहात असल्या सारखे हसत होते लोक ! सिनेमा संपल्यावर कोणी तरी जोरात ओरडलं " तकलीया "
|
हो ते सूफ़ी गाण्याचं पिक्चरायजेशन जरा विचित्रच झालय. ते गाण्यावाल्याचे चेहरे इतके विचित्र का घेतलेत?? गुरनच्या एंट्रीला आम्हीपण हसलो... तकलीया.. Lol
|
शेवटची लढाई चालू असताना गुरन त्याच्या लगान स्टाईलमधे २-३ दा "हं" असा जोरात हुंकारताना दाखवल्यावर अरे एकदम लगान कुठून आला असं झालं
|
>आशुशी बोलणं झाल्यावर आणि प्रोमो पाहिल्यावर मला चित्रपट visuals च्या प्रेमात वाहून गेला आणि भव्य दिव्य असूनही आशय हरवलेला असेल असें वातले होते. आशुचा संजय लीला भन्साली होतोय की काय असं >वाटलं होतं. मात्र सुदैवाने भव्यता आइ दिव्यता चित्रपटाला पूरक ठरते. जाचक नाही.. एकाअतरी चित्रपट बघायला हरकत नाही.. फ़ोर स्टार्स फ़्रॉम नंदिनी... आशु!!!!!! तुमचा काय शाळा सोबती की काय? तकलीया..
|
मिथ्या पाहिला का कुणी? बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये होता. काही अ-भारतीय माणसांकडुन पण तो चांगला आहे असे ऐकले.
|
Tulip
| |
| Monday, February 18, 2008 - 9:38 am: |
| 
|
मी पाहीलाय बर्लीनेल मधेच तो. मला आवडला. लिहिते वेळ झाला की अजून.
|
Meghdhara
| |
| Monday, February 18, 2008 - 6:05 pm: |
| 
|
जोधा अकबर फोर स्टार..कितीपैकी???? अंजली सोनू सूद खरच बरेचदा अमिताभसारखा वाटला आहे. बाकी बॉर्डरमधला डायलॉग आठवला..".................. बाकी सब ठीक है!!!" मेघा
|
Anjali28
| |
| Monday, February 18, 2008 - 6:12 pm: |
| 
|
या बातमीत कितपत तथ्य असेल? आणि हे खरच असेल तर आशुतोषवर अन्याय होत नाही का? त्या टुकार वीर-झारा वगैरे पेक्षा नक्कीच उजवा आहे 'जोधा-अकबर'. ..just little curious.. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2787216.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2786859.cms
|
राजपूत बायकाच्या ओढण्या इतक्या झिर झिर झिरीत असतात का?? <<<<<नन्दीनी , माझा काही अभ्यास नाही , कदाचित अज्जुका सांगू शकेल यावर . पण आठराव्या शतकातले किशनगढ style चे सुप्रसिध्द ' बनी ठनी ' या रजपूत सुंदरीचे painting( जिला भारतीय मोनालिसा म्हणता ) तिची नेहेमी झिरझिरीत ओढणी च असते . अकबराच्या काळात अजुन कशी dressing style होती काय महित ! हे पहा बनी ठनी painting.

|
तो सूद म्हणजे सुजामल का? मला तो राज बब्बर वाटला.
|
Tonaga
| |
| Tuesday, February 19, 2008 - 5:48 pm: |
| 
|
लगान मधल्या त्या गुरनचे नाव आहे दयाशंकर पान्डे. गोवारीकरचा तो फेवरिट आहे. स्वदेस मध्येही होता. सूद अमिताभसारखा दिसतो तसाच तो राज बब्बरप्रमाणे दिसतो हेही पटले.त्यामुळे माझा मित्र शेजरी बसला होता त्याला तो राज बब्बरचा मुलगा आर्य की काय तो तसा वाटला होता. एवढे कोट्यवधी रुपये खर्च करतात लोक पण साले विग आणि दाढ्या एवढ्या भिकारड्या वापरतात की बस. फक्त त्या मुल्लाची पांढरी दाढी खरी वाटली. सूफी गाणं तुर्कस्तानातल्या सूफी गान नृत्यावरून घेतले आहे दिसते.. ड्रेस. गोल फिरणे उंच लाल टोप्या. हृतिक आणि ए. आर रहमान ग्रेट...
|
Ajjuka
| |
| Wednesday, February 20, 2008 - 10:47 am: |
| 
|
बरोबर डिजे, झिरझिरीतपणाबद्दल मिनिएचर्स तरी हेच सांगतात आपल्याला. बाकी मी फिल्म पाह्यली की लिहिन इथे किंवा ब्लॉगवर.
|