Uday123
| |
| Saturday, February 16, 2008 - 1:53 am: |
| 
|
अहो Sas, तुमचे 'हे' खुप हुशार आहेत. थोडं कौतुक केलं तर रोजच भेट-वस्तु येत रहातील, शेवटी (आणी प्रथम) भुर्दंड त्यालाच (एकत्रीत उत्पन्नाला) बसतो न? मी जर एक वेळा बयकोच कौतुक केलं तर पुढे कैक दिवस भेट-वस्तु येण्याचा सपाटाच सुरु रहतो, जरूर असो वा नसो...घाला नवीन कपडे, आधिचे खुप चांगले असतांना देखील, शेवटी वया कहीच जात नाही म्हणजे ते कपाटाची शोभा वाढवतात.
|
Ajjuka
| |
| Saturday, February 16, 2008 - 6:34 am: |
| 
|
>>कोणा कोणा ला valentine गिफ़्ट मिळाली मुलीनकडुन, बायकानकडुन?<< माझ्या नवर्याला मिळाली (त्याला एकच बायको आहे त्यामुळे एकाच बायकोकडून मिळाली अनेक बायकांककडून नव्हे. shopper's stop मधून ३ tshirts आणि एक हज्जारो खिसे असलेली विजार. अशी भारीभरकम गिफ्ट आहे.
|
Ankyno1
| |
| Saturday, February 16, 2008 - 6:54 am: |
| 
|
जपानमधे १४ फेब्रुवारी ला मुली स्वहस्ते चाॅकलेट तयार करतात आणि ते त्यंना आवडणार्या मुलाला नेऊन देतात.... मजा आहे जपानी मुलांची..... गुलाबाचा गिफ्ट चा खर्च नाही.... वर चाॅकलेट्स खायला मिळणार...
|
Bee
| |
| Saturday, February 16, 2008 - 7:06 am: |
| 
|
मी कमीत कमी १० मुलींना तरी valentine दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आम्हाला मात्र आपणहून कुणी दिल्या नाहीत
|
>>मी कमीत कमी १० मुलींना तरी valentine दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आम्हाला मात्र आपणहून कुणी दिल्या नाहीत बी तू इतर नऊंनाही दिल्यास हे प्रत्येकीनं पाहिलं असेल. >>पुरुषांना Gift वै. काही विशेष वाटत नाही एकूणच पुरुषांना त्यांना जे मिळालेलं असतं त्याचं काही विशेष वाटत नाही. उदा: घरकी दाल तो रोजही खाते है आज बिर्याणी खा के देख... (संदर्भ : मस्ती नामक धन्य सिनेमा) अरे एकदा बस मिळाल्यावर कुणी तिच्यामागे धावतं का?.. (सं : एक विनोद) >>थोडं कौतुक केलं तर रोजच भेट-वस्तु येत रहातील, शेवटी (आणी प्रथम) भुर्दंड त्यालाच (एकत्रीत उत्पन्नाला) बसतो न? हे अजून एक. बघा म्हणजे, बायको पैसे साठवून भेट आणत असेल तर मनात म्हणतील शेवटी मीच दिलेले पैसे साठवून आणलीय भेट. बायको पैसे मिळवून स्वतःच्या पैशाने गिफ्ट आणत असेल तर एकत्रित उत्पन्नाला भुर्दंड म्हणे. आणि हे सगळं मनात. वर गप्प रहातील. बायका बिचार्या सगळे पत्ते दाखवून रिकाम्या. हीच ती खरी कहाणी. वि. सू. : हे सगळे गमतीत लिहीले आहे. कितीही वाद घातले तरी स्त्री किंवा पुरुष कुणाचाच स्वभाव बदलणार नाही. पण ज्या ट्रेट्स ची गम्मत वाटते त्याची थोडी चेष्टा. राग येत असेल तर तोही आपल्या ट्रेट्स चाच भाग समजून गप्प रहावे.
|
Zakki
| |
| Saturday, February 16, 2008 - 1:08 pm: |
| 
|
shopper's stop मधून ३ tshirts आणि एक हज्जारो खिसे असलेली विजार. बरं झालं हा चंगळवादाचा बातमीफलक नाही, नाहीतर बरेच लोक तुटून पडले असते. तीन शर्ट? हज्जार खिसे?! शिवाय मायबोलीवर मराठीत लिहा म्हणणारे लोकहि! मी आता तो धंदा सोडून दिला आहे. खूप लिहीले. पुन: पुन: काय तेच तेच सांगायचे?
|
Ajjuka
| |
| Saturday, February 16, 2008 - 4:20 pm: |
| 
|
बघा म्हणजे गिफ्ट दिलं तर चंगळवाद म्हणतात. आंग्लभाषेतलं नाव तसंच्या तसं लिहिलं की भाषा बिघडली म्हणून ओरडतात. डबल ढोलकी!!!
|
Zakki
| |
| Saturday, February 16, 2008 - 4:41 pm: |
| 
|
ढुम ढूम ढुमाक, ढुम ढूम ढुमाक. हसरा चेहेरा, दाताड दाखवणारा चेहेरा इ. टाकले नाही म्हणून गैरसमज झालाक्काय? म्हणजे पुन: पुरुषांच्या व्यथात भर. छे:, जर्रासुद्धा गंमत करायची सोय नाही!

|
>shopper's stop मधून ३ tshirts आणि एक हज्जारो >खिसे असलेली विजार म्हणजे पुढची १००० वर्षे ऐकावे लागणार या बद्दल
|
>जपानमधे १४ फेब्रुवारी ला मुली स्वहस्ते चाॅकलेट तयार करतात >आणि ते त्यंना आवडणार्या मुलाला नेऊन देतात.... जपान येवढा प्रगत देश का आहे ते समजले का आता?
|
>मी कमीत कमी १० मुलींना तरी valentine दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आम्हाला मात्र आपणहून कुणी दिल्या नाहीत माल है तो ताल है, वरना तू कन्गाल है
|
Maanus
| |
| Saturday, February 16, 2008 - 7:38 pm: |
| 
|
सध्या माझा जबरदस्त चंगळवाद सुरु आहे, नविन रुममेट ची मैत्रीण दर संप्ताहंताला ईकडे येत असते आणि दोन दिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ तीन वेळेस वेगळे वेगळे खायला बनवत असते. नंतर dishwasher सुद्धा तीच लावते. सुख. अशा मुली अमेरीकेत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. चंगळवाद, काय पण कॉमेडी शब्द आहे
|
आयला तु भाग्यवान आहेस माणसा. इथे माझ्या स्वतच्या मैत्रीणीने कधी करुन खायला नाही घातले. (पण आता तिच्या नवर्याला खायला घालते. नशीबाचे भोग!!! )
|
बेडेकर - माणसाला आणी तूला चॉइस होता खायचा!, नवर्याला नाही नविन रुममेट कडून शिका काहीतरी सास - या बीबी चा काहीतरी फ़ायदा झाला म्हणायचा की तुम्ही surprise gift घेतले पुरुषोंका नेता कैसा हो???.............. पुरुषहृदयसम्राट धोंडोपंत जैसा हो!!!!!!!!
|
>>पुरुषहृदयसम्राट धोंडोपंत जैसा हो!!!!!!!! म्हणजे युद्ध सुरू करून देऊन पुन्हा छावणीच्या बाहेर न येणारा >>अशा मुली अमेरीकेत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. माणसा अशा मुली सगळीकडे असतात. फक्त असं ज्यांच्यासाठी करावंसं वाटतं अशी मुलं भेटणं फार अवघड. म्हणून..
|
Runi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 3:44 pm: |
| 
|
फक्त असं ज्यांच्यासाठी करावंसं वाटतं अशी मुलं भेटणं फार अवघड. म्हणून>> अगदी अगदी सन्मे.
|
अगदी अगदी! जो पर्यन्त surprise फ़क्त मागनर्या आहेत तो पर्यन्त अशी मुलं भेटणं फार अवघड >म्हणजे युद्ध सुरू करून देऊन पुन्हा छावणीच्या बाहेर न येणारा. युद्ध!अरेरे - शेवटी टोक गाठ्लेच म्हणायचे !
|
Dhondopant
| |
| Wednesday, February 20, 2008 - 9:10 am: |
| 
|
युध्द?.. श्या..! काहीतरीच काय? लुटुपुटुची लढाई पण नाही म्हणता येणार. लढाईत शत्रे दोन्हीकडे अस्तात.. एथे पुरुष लग्न झाले की शरणागती पत्करतो.. कारण त्याशिवाय गत्यंतर नसते. तह ही होतात पण त्यात जबरी खंडणी वसुल होते. पण तरीही एक ना एक दीवस दाखवुन देईन ही जिद्द मनात बाळगुन तो दीवस कंठतो. पुरुषजन्मा ही तुझी कहाणी..!
|
Chyayla
| |
| Wednesday, February 20, 2008 - 10:15 am: |
| 
|
माणुस, अश्या मुली अमेरिकेत आहे म्हणतोस, अरे हे तर सामान्य आहे माझी पण मैत्रिण (गर्लफ़्रेंड नाही हं) माझ्या घरी जेवण बनवुन देते. तीच्यामुळे मला बरेच पदार्थ शिकता आले फ़क्त कधी कधी तीच्या आवडिच्या रेस्टॉरेंटमधे घेउन जाव लागतय, तीच्याकडे कार नसल्याने व घर लांब असल्यामुळे पोहोचवुन द्याव लागत एवढच. आणी हो मी पण तिच्याकडे गेलो की हुक्कि आलि की दोसे बनवुन देतो. अर्थात दक्षिणेकडची असल्यामुळे पीठ तयारच असत. अशी पवित्र मैत्री ठेवायला ही मजा येते. असो अजुन एक मला वाटत मुलिन्ना बॉयफ़्रेंड मिळवणे सोपे असते, तर मुलान्ना कित्ती मेहनत घ्यावी लागते बापरे. ... पुरुषजन्मा ही तुझी कहाणी. (अर्थात या बाफ़ वर लग्न न झालेल्यानी पण लिहायला हरकत नसावी. )
|
Chinya1985
| |
| Wednesday, February 20, 2008 - 4:11 pm: |
| 
|
अर्थात या बाफ़ वर लग्न न झालेल्यानी पण लिहायला हरकत नसावी जरुर आहे. मी आहे की इथे अविवाहीत. म्हणजे युद्ध सुरू करून देऊन पुन्हा छावणीच्या बाहेर न येणारा आमच्या नेत्यांबद्दल असे उद्गार काढल्यास मायबोली बंद पाडू. एकाही जणाला एकही पोस्ट लिहु दिली जाणार नाही. त्वरित माफ़ी मागावी अथवा परिणामांना सामोरे जावे लागेल!!! जय हिंद जय महाराष्ट्र जय पुरुष!!!!!!!!!!!
|