Hkumar
| |
| Monday, February 18, 2008 - 7:34 am: |
| 
|
प्रयोग म्हणून मी गेले २ महिने फ़्रीज बन्दच ठेवला आहे.( मुळात हा फ़्रीज मी विकत घेतलेलाच नाही. हाॅस्पीटलने मला दिलेल्या घरात तो दिलेलाच आहे). दूध फक्त चहापुरतेच लागत होते. त्याऐवजी दूधाची पावडर वापरत आहे. नीट विचार केला तर घरातला फ़्रीज ही गरजेची वस्तू नाही. पण ''लोक काय म्हणतील'' या शंकेपोटी तो घराघरात वास्तव्य करून आहे!
|
Hkumar
| |
| Monday, February 18, 2008 - 7:38 am: |
| 
|
बराचसा चंगळवाद कमी करायला कुटुंबातील सर्वांचे एकमत होणे आवश्यक आहे आणि ती महाकठीण गोष्ट आहे!
|
Bee
| |
| Monday, February 18, 2008 - 7:39 am: |
| 
|
Electronics वस्तूंची चंगळ राहीलीच लिहायची. हल्ली बहुतेकांकडे एकाच कामासाठी किती प्रकारच्या electronics च्या वस्तू असतात! जसे की घरात CD player आहे, DVD player तो वेगळा ज्यावर VCD play होतात. नंतर Tape/Mp3 players पण असतात. काहींचे Model latest नसल्यामुळे आहे तो model घरच्या घरीच scrap करून ठेवून देतात. राक्षशी आकारांचे भले मोठे fridge/washing machine/dish washer काय काय नि काय. भारतात ज्या तुलनेने ही साधनं वाढलीत त्या तुलनेनी वीज वाढली नाही. परिणाम लोड शेडींग! Mobile चे model दर सहा महिन्यांनी बदलणार्यांची गणतीच नको करायला.
|
Ladtushar
| |
| Monday, February 18, 2008 - 8:30 am: |
| 
|
>> बराचसा चंगळवाद कमी करायला कुटुंबातील सर्वांचे एकमत होणे आवश्यक आहे हे मात्र पटले हो.... Electronics वस्तूंची चंगळ अटोक्यात ठेवान्या साठी त्यांचे व्यसन सोडावणे सर्वात महत्वाचे म्हणजे उदा. हा idiot box पाहिजे तेव्हढा च पाहाणे, अहो खुप घरात तर हा सदैव चालू असतो.
|
Akhi
| |
| Monday, February 18, 2008 - 8:46 am: |
| 
|
१दम बरोबर.... पण मी कधी कधी स्व:त पुरत बघते. आपण तर सगळी प्रजा सुधरऊ शकत नाही ना.. मग आपल्याल जे पटते ते करावे आपण कोणी करो अथवा ना...... चिन्तातुर जंतु होण्यापेक्शा आपल्या हातात जे आहे ते करावे. पण हा मस्त आहे जे कधी मला सुचल नसेल पण माझ्या हातुन त्या गोष्टि चा जर अपव्यय होत असेल तर ते मला टाळता येइल.
|
Hkumar
| |
| Monday, February 18, 2008 - 9:26 am: |
| 
|
चंगळवाद टाळणे व पर्यावरण जपणे यांचा जवळचा संबंध आहे. असे करणार्या काही मायबोलीकरांच्या अनुकरणीय कृती यापूर्वीच 'सामाजीक' मधील 'पर्यावरण ' बा.फ. मध्ये लिहीलेल्या आहेत.
|
Akhi
| |
| Monday, February 18, 2008 - 9:45 am: |
| 
|
धन्यवाद.. मला नव्हत महिती ह्या ची. आधी जाउन वाचुन काढला. आता नंतर post करते मि काय काय करते ते.... थोड urgent काम आल आताच
|
Ajjuka
| |
| Monday, February 18, 2008 - 11:01 am: |
| 
|
आपण चंगळवादाबद्दल बोलतोय की coservation of resources बद्दल? उधळपट्टीचं म्हणाल तर tissue papers (सर्व प्रकारचे पार्श्वभाग पुसण्यापासून किचन टॉवेल्स पर्यंत) ही एक मोठ्ठी नासाडी आहे. पर्यावरणाची आणि म्हणूनच रिसोर्सेस ची सुद्धा. पण हल्ली भारतातही स्टेटस म्हणून टिश्यू हवेच असतात हातात. कोकणस्थांचा विनोद म्हणून एक गोष्ट सांगितली जाते. आधी एक कपडा असतो मग त्यातून लहान मुलांची मुतेली होतात मग फडकी मग वाती आणि मग दात घासायची राखुंडी' असा काहीतरी. तपशीलात आठवत नाही आणि त्यातली अतिशयोक्तीही सोडून द्या पण मला अश्या पद्धतीने केलेलं कपड्याचं रिसायकलिंग जास्त योग्य वाटतं. त्यामुळे जुनं काहीच नसल्याने(नव्हतं खरं त्यावेळेला हाताशी. का कसं ते विचारू नका!) नव्या ऑफिससाठी फरशी पुसायचं फडकं नवीन विकत आणणं मला जीवावर गेलं होतं. बर्या अवस्थेतले पण लहान झालेले किंवा आपण घालू न शकणारे कपडे कुठे कुठे देऊन टाकूनही आपल्याकडे असे अनेक कपडे उरतात जे आपण घालू शकत नाही देऊन टाकू शकत नाही. ते कचर्यात टाकण्यापेक्षा असे उपयोगात आणणे हे मला बरोबर वाटते. अर्थात अनेक सिंथेटीक कपडे यासाठी उपयोगात आणता येत नाहीत पण त्याचे भरपूर इतर उपयोग करता येऊ शकतात. याला लगेच कोकणस्थी कंजूषपणा म्हणा हवंतर पण माझ्यामते गरजेच्या वस्तू(विविध प्रकारची फडकी) तयार होण्यासाठी वेगळी उर्जा आणि कच्चा माल खर्चला जात नाही याचाच अर्थ नैसर्गिक संपत्तीची काटकसर होते. आपल्या खिशाचीही होते. नको असलेला एकही कपडा घरात उरत नाही. परिणामी अडगळ जाऊन घर ही स्वछ रहाते.
|
Manjud
| |
| Monday, February 18, 2008 - 11:45 am: |
| 
|
आमच्या घरात फ्रिज आम्ही आमच्या सोईसाठी घेतला आहे. लोकांना दाखवण्यासाठी नव्हे. तसं बघायला गेलं तर घरात एकट्या राहणार्या माणसाला सगळ्याच वस्तू, कपड्यांसकट, चंगळवादीच वाटू शकतील. माझ्या मते 'परदेशातील नोकरी' हा सुद्धा एक प्रकारे चंगळवादच होऊ शकेल. अर्थात, प्रत्येकाच्या मूलभूत गरजा, प्रायॉरिटीज वेगळ्या असतात त्याप्रमाणे प्रत्येक माणसानुसार चंगळवादाची व्याख्या बदलते.
|
Dakshina
| |
| Monday, February 18, 2008 - 11:55 am: |
| 
|
तु म्हणतेस ते मनोमन पटतं अज्जुका.. पण ऑफ़िसात जुने कपडे कुठून आणणार फ़रशा पुसायला? आमच्या इथे तर वॉश बेसिनच्या आसपास पडलेलं पाणी पुसायला हेल्प डेस्कची बाई पेपर नॅपकीन घेऊन उभीच असते. मुली पण भरमसाठ पेपर्स उचकटून वापरतात. इतकंच नाही, तर त्या कंटेनरमधून एखादा नॅपकीन चुकून खाली पडला तर तो डायरेक्ट डस्टबिन मध्ये? वापरायला काय होतं यांना? घरचा पेपर रोल कसा पूरवून पूरवून वापरला असता..?
|
चंगळवादाचा आणि जुने कपडे रीसायकल करण्याचा काय संबंध ते कळत नाही. Waste Management हा या बीबीचा विषय नाही..
|
Bee
| |
| Monday, February 18, 2008 - 3:08 pm: |
| 
|
विषय कुठला आहे हे सर्वांनाच ठावूक असते. पण एखाद्या विषयाच्या अनुषंघाने जर एखादी नविन गोष्ट निघत असेल तर ती आपोआप लिहिली जाते वर तो बीबी विषयाशी निघडी राहून पुढे पुढे सरकत राहतो. आता मायबोलिवर आपण इतके पोष्ट लिहितो हा पण एक मोठा चंगळवादच झाली ना.. (चंगळवादाची व्याख्या खरच सापेक्ष आहे का? )
|
Ajjuka
| |
| Monday, February 18, 2008 - 6:12 pm: |
| 
|
दक्षिणे, अगं हपिसात नाही तरी घरात तर शक्य आहे ना? आणि ऑफिसेस मधे सुद्धा आता पेपर टॉवेल च्या ऐवजि ड्रायर्स किंवा अश्या अनेक गोष्टी ठेवणं सुरू झालंय. बर ही सगळी उधळपट्टी थांबवायला आपण आपला ०.००००००१% एवढा जरी हातभार लावला तरि उपयोग आहेच की.
|
Arch
| |
| Monday, February 18, 2008 - 6:13 pm: |
| 
|
काल 60 Minutes ( TV Program) वर पाहिलं सर्वात आनंदी देश डेन्मार्क. आता का? अस का ह्याचं उत्तर देताना तेथील लोकं म्हणाली आम्ही आहे त्याच्यात खुषी मानतो. comparison करत नाही म्हणून असेल. त्या देशात श्रिमंत आणि गरीबमध्ये आपल्यासारखी तफ़ावत नाही. म्हणजे शेवटी काय समाधानी वृत्ति असली की आपोआपच चंगळवाद कमी होऊ शकतो. बी, छान विषय आहे.
|
Hkumar
| |
| Tuesday, February 19, 2008 - 4:38 am: |
| 
|
चंगळवाद व संसाधनांचा जपून वापर (किंवा रक्षण) यांचा निकटचा संबध आहे. त्यामुळे या दोन्हींची सरमिसळ या बा.फ. मध्ये होणे अपरिहार्य आहे.
|
Bee
| |
| Tuesday, February 19, 2008 - 5:36 am: |
| 
|
स्वच्छ करायला पाणी वापरले काय नि कागद वापरले काय दोन्ही सारखेच आहे. जे मुबलक आहे ते वापरावे. मी फ़्रान्समधे असताना पाहिले आहे की जिथे मशीनीतून पेपर बाहेर पडतो त्या ऐवजी त्यांनी एक प्रचंड मोठा रोल होत जाणारा कापड ठेवला. आपले हात आपण पुसले की तो कापड परत आपल्याला मिळत नाही. तो मागे जातो. मग नविन व्यक्तीला दुसरा स्वच्छ कापड मिळतो. पुर्ण कापड संपला की तोच कापड दुसर्या दिवशी laundry मधे धुतल्या जातो. त्यामुळे कागदाची केवढी तरी मोठी बचत होते. शिवाय कपड्यानी हात जास्त चांगले कोरडे होतात. कुणी कादगांप्रमाणे कापड सोबत घेऊन जाऊ शकत नाही. बरेच जण आपल्याकडे अडीनिडीला स्टॉक असावी म्हणून कितीतरी tissues सोबत घेऊन जातात. अज्जुका, घरी माझी आई हातानीच जिरलेल्या कपड्यांची गोधडी शिवते.
|
Akhi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 7:23 am: |
| 
|
चंगळवादाची व्याख्या व्यक्ती सापेक्ष आहे. उ.दा. आज मला lipstick ही गोष्ट चंगळवाद वाटते. तिथे लोकां कडे डझनांनी असतात. ती त्यांची गरज असु शकते.
|
Dakshina
| |
| Tuesday, February 19, 2008 - 8:04 am: |
| 
|
अज्जुका, माझ्या पहाण्यात almost लोकं फ़रशी पुसायला, जुने कपडेच वापरतात. तुम्हाला सगळ्यांना कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण मुलींकडे जुने (नसले तरी वाटणारे... ) खूप कपडे असतात. तसेच आमच्यकडेही होते. आम्ही त्याची पायपुसणी शिवली, घरात जुन्या डायर्या होत्या त्याला कव्हरं घातली, हात पुसण्यासाठी फ़डकी केली. शिवाय सईच्या मुलासाठी टोपडी, अंग़डी, दुपटी शिवली. हे तर झालं घरचं, पण तसं लक्षात घ्यायचं म्हणलं तर कॉर्पोरेट मध्ये वावरताना वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट (अगदी डोक्यापासून, चप्पल पर्यंत) ही इतरे जनांसाठी चंगळ असू शकते. चंगळवादाची व्याख्या खरंच सापेक्ष आहे. अत्ताच मी पँट्रीत पाणी प्यायला गेले होते, लोक, water dispenser मधून पुर्ण ग्लास भरून पाणी घेतात, एक घोट पितात आणि बाकीचं फ़ेकून देतात. अर्थात ऑफ़िसेसच हे असं विकतंचं पाणी ठेवतात, आणि लोक त्याचाही गैरवापर करतात. कॉर्पोरेट वाल्यांना हे सगळं पुरवावं लागतं कारण उद्या लोकांनी आरोग्य बिघडलं म्हणून केस ठोकली कोर्टात तर? त्यापेक्षा पैसे गेलेले बरे. निव्वळ आमचा फ़्लोअर विचारात घ्यायचा म्हणला तर दिवसाला बिसलरीच्या २० लिटरच्या ६ बाटल्या लागतात. त्यातलं लोक पितात किती आणि ओततात किती देवच जाणे. प्रिंट आऊट्सची पण तीच गोष्टं.. अगदी अमर्याद वापर....
|
Akhi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 8:50 am: |
| 
|
चपला चा १ जोड पण पुरेसा आहे. तिथे लोकांकडे ५-६ जोड असतात. तर कुणाला पुस्तक विकत घेणे हा पण चंगळवाद वाटेल. आणी पुस्तक विकत घेणे हा जर चंगळवाद असेल तर तो मला हा आवडेल. आता ग्रंथालयामधे हवी ती पुस्तक वाचायला मिळतात हा भाग निराळा.
|
Akhi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 8:55 am: |
| 
|
जुने कपडे (लहान झालेले, खराब न झालेले) असतील तर त्याची पायपुसणी किंवा हात पुसणी करण्या पेक्शा गरजु व्यक्ती ला वापरायला देणे हा मला चंगळवाद नाही वाटत.
|