Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 18, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » कमालीचा चंगळवाद! » Archive through February 18, 2008 « Previous Next »

Savyasachi
Friday, February 15, 2008 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>एका खोलीतून बाहेर पडताना दिवा, पंखे बंद करूनच बाहेर पडावे अशी शिस्त होती

ही गोष्ट पुण्यात अतीच करतात. एका खोलीतून दुसर्‍या खोलीत फक्त पाणी, पेन असल काही आणायला गेल तरिही (म्हणजे एका मिनीटात परत येणार असलो तरी) म्हणे बंद केल पाहीजे.

अखी, बर्‍याच ठिकाणी एक वेळ ठरवलेली असते की या वेळात दिवे चालूच असले पाहीजेत. साडेपाच सकाळचे असोत की संध्याकाळचे, तसे दिवस आणि रात्रीच्या सिमेवर आहेत.
पोलिस म्हणतात की अशा वेळेस काही गुन्हा घडला तर लोकच आरडाओरडा करतात की बघा दिवे चालू नव्हते.

माणसाचे म्हणणे बरोबर आहे. फक्त वैयक्तिक पिसीचे मॉनिटर्स बंद करायला हरकत नाही.


Pooh
Friday, February 15, 2008 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची,

NPR वर १-२ आठवड्यापूर्वी ऐकल्याचे आठवते आहे. खोलीमधला दिवा चालू ठेवायचा का नाही याचा breakeven time १.५ सेकंद आहे.

म्हणजे १.५ सेकंदाकरिता जरी खोलीबाहेर जाणार असला तरी दिवा बंद करणे फ़ायदेशीर आहे.


Sonalisl
Friday, February 15, 2008 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणे बंद केल पाहीजे.>>
ती सवयच अशी लागते ना कि बाहेर पडताना हात आपोआप जातोच बटनाकडे :-) खरच
माझ्या बहिणीच्या घरी तर रात्री ९.३० लाच झोपतात.
त्याचे फ़ायदे: वीजेची बचत, पुर्ण झोप होते, सकाळी लवकर जाग येते.


Zakki
Friday, February 15, 2008 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, हे जरा जास्तच होतंय....

नाही हो. खरेच मिळणार आहेत. मैत्रेयी, मंदार यांनी बरोबर सांगितले आहे. आता या पैशावर पुन: कर मागतील का?

काही शेकड्यांनी आमचे काय शॉपिन्ग होणार म्हणावे :o

अहो चंगळवाद म्हणजे त्या पैशाच्या जोरावर आणखी चौपट कर्ज काढायचे! म्हणजे होते खरेदी.

म्हणजे कसे - माझी मुलगी अकरावीत गेल्यावर तिला आठवड्याला ४० डॉ. ची नोकरी लागली. त्या जोरावर, तिने चार आठवड्यात १२०० डॉ. ची खरेदी केली. प्रत्येक वेळी १२० डॉ. म्हणजे माझा फक्त ३ आठवड्याचा पगार, ८० डॉ. म्हणजे फक्त दोन आठवड्याचा! मुळात फक्त दोन आठवडे नोकरी केली, कारण नंतर अभ्यास असतो.

तर असा विचार करायचा असतो.





Maanus
Friday, February 15, 2008 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीतरी गैरसमज होतोय तुमचा, ते पैसे सगळ्यांना मिळनार नाहीय्त. फक्त ज्यांचे income certain amount च्या खाली आहे त्यांनाच पैसे परत मिळनार आहेत.

remember बातम्यांच्या संकलनामधे मी ती बातमी टाकली होती. आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी भारतात stock market गडगडले.


Zakki
Saturday, February 16, 2008 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, मग आता पुन: अश्या बातम्या टाकू नकोस.



Savyasachi
Saturday, February 16, 2008 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुह, उद्वेगजनक माहिती दिल्याबद्दल आभार :-)

Maanus
Saturday, February 16, 2008 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या इथे विजेचा एवढा तूटवडा असून पण आज काल एसी लावायची स्टाइल आहे म्हणे>>>>

Biogas This is now only available in theory or some old government books.

We dont need high-tech stuff from Swades, energy can be generated from disposable waste.

If we'll again start implementing biogas plants, like they used to be in 80's, there can be more energy generated for consumption.

It doesn't cost much.

Apparently electricity cannot be stored in any storage. It has to be consumed when generated, batteries are used for small purpose, not large scale. but gas can stored, I am not sure if one can convert gas into electricity.

So Biogas, think about it.

http://en.wikipedia.org/wiki/Anaerobic_digestion

Pooh
Saturday, February 16, 2008 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची,

तुझ्या पोस्ट मधे पुण्याचा उल्लेख आल्यामुळे माझी पुणेकरी अस्मिता का काय म्हणतात ती जागी झाली.


Chinya1985
Saturday, February 16, 2008 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका पेज ३ पार्टीला किती खर्च येत असेल????

Savyasachi
Saturday, February 16, 2008 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

minglish baddal maafi pan sagala devanaagarit lihila hota ani murkhasaarakha kuthalaatari control v marala ani sagala gela :-( btw, tya devanagari buttonachya window madhe control z (undo) kaa chalat nahi. mods?

puh:-)
are mi dekhil punekar (pan thanekarahi) aahe. katakasar kinva jagache bhale mhanun bachat kiti karaychi te dekhil pahayla pahije asa maza mhanana.
punyat ain unhalyat, ratri zop lageparyant pankha chalu thev mag band kar asa mala sangnyat ala hota. kiti hasyaspad. eka mitrakade gharat vij pankha asunahi lok galarit basat shakyato. tithe jara vara yeto tar mag pankha kashala ha vichar. ya goshti nakkich jagache bhale ya vicharatun alelya nahit.
udhalpatti baghaychi zalich tar punyat ganeshotsavat divasratra gani vajavane, miravanukitil aras, gulal vagaire udhalane, laxmiroadvaril chakachakat, sagalyaanich kilokilone pedhe naral neun dene ani mag te vaya jane kinva dukanat parat vikayla jane, hi udaharane mhanata yetil. (amachya punyachya 100 meter gallit 3 mandale ahet. ani ata ti sagali mandale sagale san sajare karatat. )

manus, electricity saved at one place can be used at other place at the same time. so needs to be saved. electricity is generated using gas. tata power station at trombay is one eg. it works on gas and coal. gas is used to generate steam that turns the turbines.
as far as I know about biogas, it does not give high power electricity consistently. thus it is not possible to use it for pumps on water or so. (but I am not sure.)

Yogesh_damle
Sunday, February 17, 2008 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका ओळीचा voice-over जरी रेकाॅर्ड करायचा असला तरी लोक त्याचा printout घेतील. ((लहानपणी पाठकोर्‍या कागदांवर केलेलं revision आठवलं!!))

एखाद्या press conference चे प्रायोजक निव्वळ पब्लिसिटी म्हणून शेकडोंनी letterheads, stationery देतात, ती कुणी सांभाळायचेही कष्ट घेत नाहीत. शेकडोंनी कोरे कागद वाया जातात्-तुडवले जातात्-गहाळ होतात... वाईट वाटतं.

अशाच एका conference मध्ये हाॅटेलात चहा होता... साखर-ब्राउन शुगर आणि मधाचे पर्याय होते. पाच ग्राम मधाच्या डबीतला चमचाभर मध काढून उरलेली डबीच्या डबी कचर्‍यात फेकून दिली- एका मधमाशीला एक थेंब मध गोळा करतांना लागणार्‍या वार्‍यांचे शाळेत घोकलेले आकडे नाचून गेले मनात!! :-(


एका पिक्चरमध्ये एक माणूस अंगणातला पेपर उचलायला कार रिव्हर्स घेतो. (त्या दृश्याचे retakes किती झाले असतील? :-) )
-----

आपल्या सणांचं काय?
१) शिवामुठीच्या नावाने पिंडीवरून वाहत जाणारं धान्य,
२) होळीच्या दिवशी वाहत जाणारं पाणी, आणि आदल्या रात्री जळणारं लाकूड...
३) शमीची ओरबाडली जाणारी पानं,
४) गणपतीत मूर्तीसाठी खर्च होणारी शेकडो टन माती आणि गढूळ पाण्यात तडफडून मरणारे मासे!!


Savyasachi
Sunday, February 17, 2008 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर आहे, उठसूठ प्रिंट्स घेणारे पण कितीतरी असतात ऑफिसमधे. फुकट आहे म्हणून. पण घरचा प्रिंटर मात्र धूळ खात पडलेला.
आणि साधे प्रिंट्स असतील तर पाठपोठ प्रिंट्स काढाव्याना. ते तर सोडाच, कलर प्रिंटर असेल तर गरज नसताना कलर काढणार.


Bee
Monday, February 18, 2008 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परदेशात निदान इथे तरी मी असे पाहिले आहे की इथली भारतीय लोक VCD/DVD खूप विकत घेतात. घरात ती नुसतं पडून राहतात. VCD/DVD मागे बराच खर्च होतो.

तसेच कपड्यांच्या बाबतीतही देशात खूप चंगळ करणारे लोक आहेत. अगदी ढीगभर कपडे आणि वर्षातून एक दोनदाही घेतलेले कपडे न घालणारे असतात. कपड्यांचा मागे बरीच उधळपट्टी होते पैशांची.


Dhondopant
Monday, February 18, 2008 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाउ द्या ना थोड सणांवारावर... २०० रुपयाचा पिझ्झा खाता ते कमी करा... उठसुठ सणावारावर काय?...

लाखमोलाची तत्वे जतली जातात त्याच काय..

...पाच ग्राम मधाच्या डबीतला चमचाभर मध काढून उरलेली डबीच्या डबी कचर्‍यात फेकून दिली- एका मधमाशीला एक थेंब मध गोळा करतांना लागणार्‍या वार्‍यांचे शाळेत घोकलेले आकडे नाचून गेले मनात!!.....

चिंतातुर जंतु नावीची एक कविता आहे. ती आठवली...


Trish
Monday, February 18, 2008 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उठ सूट आमच्या सणांवारावर काय हो येता ??? आम्ही गरीब बिचारे ऐकुन घेतो म्हणुन उद्या काही बोलाल हो....
श्रीमंतानी आणि बड्या श्रीमंत राष्ट्रंनी चालवलेली दिवाळी दिसत नाही का ?

Dakshina
Monday, February 18, 2008 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विशेष राजकिय महत्व असलेल्या व्यक्तीच्या मागे जाणार्‍या असंख्य गाड्या...(तेव्हा पेट्रोलची नासाडी नाही होत का?
त्याच व्यक्तीचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रिय दौरे...
(कारणाने आणि विनाकारण काढलेले सुद्धा.)



Akhi
Monday, February 18, 2008 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची,
माझ्या post मधे मी तेच लिहित आहे आत उन्हाळ्या मधे ५:३० वाजता दिवे लावण्याची काहिहि गरज नाही त्या पेक्षा खेड्या मधे, संध्याकाळ च लोड शेडींग जरा तरी कमी करता येइल. जे आहे त्याचा योग्य उपयोग करण महत्वाच त्यासाठी मी sensor चा option सुचवला होता...


Akhi
Monday, February 18, 2008 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन १ मुद्दा असा की, पाईप लाइन फ़ुटने त्यामुळे हजारो gallon पाणी वाया जाते. त्याची कारवाई ताबडतोब करावी. घरातील खराब झालेले वायसर सुध्दा वेळेवर जर दुरुस्त केले ना तरि गळक्या नळातुन पाणी फ़ुकत वाया जाणार नाही.

Sanghamitra
Monday, February 18, 2008 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यावर शास्त्रज्ञ अरूण देशपांड्यांबद्दल लिहिलेलं आठवलं(बहुतेक अनिल अवचटांनी). ते व्यवस्थित गनीत मांडून दाखवून देतात की एका घरात किती ऊर्जा वाया जाते दिवसाला.
त्यातलं एक उदाहरण अगदी फिट बसलंय डोक्यात.
(ते म्हणतात)
तुम्ही लोक दूधाची पिशवी घेता. मग आधीचं शिल्लक असेल तर ती तशीच न तापवता फ्रीझ मधे ठेवता. म्हणजे ती थंड करायला आणि थंड ठेवायला ऊर्जा लागते.
मग लागेल तेंव्हा पिशवी काढता आणि ते फ्रोझन दूध तापायला ठेवता. म्हणजे ते दूध रूम टेंपरेचरला आणून पुढं उकळायला डबल ऊर्जा. मग त्यातलं कपभर चहाला वापरता आणि उरलेलं पुन्हा फ्रीझमधे ठेवता म्हणजे परत ऊर्जा खर्च. दूध संपेपर्यंत चालूच.
आता हे अगदी टाळणं शक्य नसलं तरी थोडा विचार करून ऊर्जेचा अपव्यय कमी करणं शक्य आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators