|
Ajjuka
| |
| Tuesday, January 29, 2008 - 10:12 am: |
| 
|
अगं मने मी लिहिलेलं नीट वाचलं नाहीस का? गायीला गोर्हा होतो.. त्याला एकजण नवीन वळू म्हणू जाहीर करतात. गायीला गाय किंवा बैल च होतो गं.. म्हणजे कालवड (जी मोठी झाल्यावर गाय होते) आणि गोर्हा (जो मोठा झाल्यावर बैल होतो) ही ही ही अंकुर, हो अगदीच अमुकतमुकच्या नावाने चांगभलं, सौभाग्य वस्तू भांडार, हिरवं कुंकू इत्यादींपेक्षा वेगळा वाटतो हे नक्की. पण राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या दिग्दर्शकाकडून तेवढी तर अपेक्षा धरायलाच हवी ना.
|
Ankyno1
| |
| Tuesday, January 29, 2008 - 10:47 am: |
| 
|
अज्जुका.... नुसतं हिरवं कुंकू आणि तत्सम सिनेमांपेक्षाच नाही तर जुन्या हिंदी सिनेमाची डीव्हीडी लाउन सीन टू सीन काॅपी केलेल्या अथवा काॅमेडी च्या नवाखाली अंगविक्षेप, प्रादेशिक भाषेचा वापर, स्प्लिट पर्सनलिटी असं काहीही खपवणार्या, नायकाच्या भोळसटपणाच्या नावाखाली बावळटपणाचं प्रदर्शन करणार्या इतर सो-काॅल्ड काॅमेडी सिनेमांच्या (वासरांच्या) कळपात हा वळू लंगडा (त्रुटी असलेला) असला तरी उठून दिसतो आणि कदाचित म्हणूनच पारितोषिकं ही मिळवतो... बाकी राकेश ओमप्रकाश मेहेरा च्या 'दिल्ली ६' मधे बिनमिशीचा बाॅडीफिट टी-शर्ट घातलेला अतुल; अभिषेक बच्चन बरोबर पडदा कसा शेअर करतो ते पहायची उत्सुकता आहे...
|
Ajjuka
| |
| Tuesday, January 29, 2008 - 11:44 am: |
| 
|
बरोबरे अंकुर त्या सगळ्यांपेक्षा बरा वाटतो. पण दुर्दैव हेच आहे ना की आपल्याकडे इतका कचरा तयार होत असतो की वळूसारखी फसलेली पटकथाही 'क्या बात है!' अशी दाद मिळवते. कुणी मंगेश हडवळेचा टिंग्या पाह्यला का? आणि हृषि देशपांडेचा जिंकी रे जिंकी? दोन्हीबद्दल खूप ऐकलंय. बघणं झालं नाही अजून.
|
Ajjuka
| |
| Tuesday, January 29, 2008 - 11:46 am: |
| 
|
एक गंमत लक्षात आली मला.. की आपण आता चित्रपटांना त्यांच्या दिग्दर्शकांच्या नावाने ओळखतोय. स्टारच्या नावाने ओळखण्यापेक्षा. म्हणजे उमेश कुलकर्णीचा 'वळू', अतुल कुलकर्णीचा नाही. हा trend किती चांगला आहे!
|
Ankyno1
| |
| Tuesday, January 29, 2008 - 12:04 pm: |
| 
|
खरच.... चित्रपट हा सर्वस्वी दिग्दर्शकाचाच असतो... कलाकार... मग तो मुख्य भूमिकेतला असो अथवा दुय्यम.. दिग्दर्शक सांगेल तसं चोख काम त्यानं केलं पाहिजे... आपल्याकडे मुख्य कलाकाराच्या नावावर तिकिटं खपतात... (दिग्दर्शकाचं कसलं घेउन बसता... मुख्य नायिका ही गर्दी खेचेलच असं नाही {'समानता' बीबी वर चर्चिण्यायोग्य विषय) केवळ याच कारणामुळे 'चंद्रा बारोट चा अथवा फरहान अख्तर चा डाॅन' न म्हणता 'अमिताभ चा अथवा शाह रुख चा डाॅन' असं म्हटलं जातं याच एका कारणामुळे मुख्य नायकाचं मानधन हे मुख्य नायिकेच्या मानधनाच्या अनेक पट असतं By the way...वळू मधली continuity error... अतुल कुलकर्णी निघताना त्याच्या जीप वर 'महाराष्ट्र शासन (वन विभाग)' अशी अक्षरं रंगवलेली आहेत तो गावात पोचतो तेंव्हा ती गायब होतात पण पुढच्याच सीन मधे परत प्रकट होतात...
|
चला म्हणजे वळु निदान नेहेमीच्या पठडीतला नाहिये. आत्ता तरी एक प्रॉडक्शन डाउन इश्यु आला आहे. तो संपवायच्या मागे आहे. कारण आज रात्री वळुचा पहिला पब्लिक स्क्रीनिंग आहे. आणि मला इथुन रॉटरडॅमला जायला २ तास लागतात. रात्री प्रयोगानंतर दिग्दर्षकाशी प्रश्णोत्तराचा कार्यक्रम देखील आहे. कुणाला काही विचारायचे असल्यास मी विचारेन नक्की. कारण मी उमेशला पिक्चरच्या आधीपण भेटणार आहे. (जर हा इश्यु संपला तर. च्यायला आयुश्यभर हा मर्फी माझ्या मागे लागला आहे. ) अर्थात अज्जुकाने म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्षकाकडून उच्च अपेक्षाच ठेवल्या पाहिजेत. ह्यामुळे त्या दिग्दर्षकालाही नेहेमी आपला स्तर उंचावण्यास भाग पडते.
|
Manuswini
| |
| Wednesday, January 30, 2008 - 12:04 am: |
| 
|
धन्यवाद अज्जुके वळु काय ते कळले.
|
Mukund
| |
| Wednesday, January 30, 2008 - 5:59 am: |
| 
|
स्लार्टी.. तु सुचवलेला 'द कॉन्व्हरसेशन' हा हॅकमनचा मुव्ही पाहीला. मुव्ही चांगला आहे पण परवा ऑस्ट्रेलिअन ओपन सेमीफ़ायनलमधे हरल्यावर फ़ेडरर जे म्हणाला त्याची मुव्ही पाहील्यावर आठवण झाली. फ़ेडरर म्हणाला की मी इतक्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकुन मी स्वत्:च प्रत्येक स्पर्धा मीच जिंकायला हवी या अपेक्षेचा मॉन्स्टर उभा केला आहे. त्यामुळे आता मी सेमीफ़ायनलला हरलो त्यामुळे लोकांना शॉक बसला. खर म्हणजे सेमीफ़ायनल पर्यंत पोहोचणेसुद्धा काही वाइट नाही. हा मुव्ही कोपोलाचा आहे हे माहीत होते. कोपोलाने गॉडफ़ादरसारखा मास्टरपीस निर्माण केला असल्यामुळे कोपोलाची सुद्धा परिस्थीती फ़ेडररसारखी झाली आहे.... त्याचे प्रत्येक मुव्ही गॉडफ़ादरच्या तराजुत तोलले गेले व जाणार! त्यामुळे हा मुव्ही गॉडफ़ादरच्या तुलनेत जरा डावा वाटला एवढेच. पण कोपोलाचे कॅमेरा ऍंगल जबरी असतात. तसेच त्याचा बॅकग्राउंड म्युझिकचा उपयोगही सही असतो.(आजही गॉडफ़ादर म्हटल की त्यातले प्रसंग तर आठवतातच पण त्यातले हॉन्टींग बॅकग्राउंड म्युझिकही कानात घुमते!) या मुव्हीमधे पण हॅकमन सॅक्सोफोन वाजवतो तो पीस व मुव्हीच्या सुरुवातीला जो सर्व्हेलंस चालु असतो त्याच्या बॅकग्राउंडला जे जॅझ म्युझिक आहे तेही मस्तच आहे. हॅकमनच्या ऍक्टींगबद्दल वादच नाही. पण एक मजा म्हणजे हॅकमन जेव्हा तरुण होता तेव्हाही वयस्करच वाटायचा ... आणी हॅरीसन फ़ोर्डला एवढा यंग प्रथमच पाहीला.... आणी बाकीचे ऍक्टर कोपोलाचे फ़ेव्हरेट आहेत.. म्हणजे रॉबर्ट डुव्हाल वगैरे.. स्लार्टी..... पण तुला हॅकमनच्या फ़्रेंच कनेक्शनमधला सर्व्हेलंस व एकंदरीत तो मुव्ही आवडेल.. जरुर बघ.. त्यातला हॅकमनने कारमधुन केलेला ट्रेनचा पाठलाग... जबरी..
|
Slarti
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:16 am: |
| 
|
खरे आहे मुकुंद. गॉडफादरची पातळी थोरच होती. फ्रेंच कनेक्शन पाहिला होता फारा वर्षांपूर्वी. तो एक मालकतुकडा आहे. Lasse Hallstroem चे चित्रपट पाहिले आहेत का ? म्हणजे What's eating gilbert grape, Chocolat, The cider house rules वाला. त्याचा My life as a dog (Mitt liv som hund) हा चित्रपट.... लहान मुलांच्या भावविश्वावर निघालेल्या सुरेख चित्रपटांपैकी एक. स्विडिश व एकंदरीतच scandinavians हे लैंगिकतेकडे आपल्यापेक्षा खूप जास्त मोकळेपणाने बघतात असे मी ऐकले होते ते हा चित्रपट बघताना पहिल्यांदा जाणवले. वर दिलेल्या इतर चित्रपटांतूनसुद्धा लैंगिकतेबद्दलचा हा दृष्टीकोन सूचित झाला आहे म्हणा, पण इथे तो जास्त जाणवला.
|
गेल्या वर्षीचा लोकप्रभेचा दिवाळी अंक पाहिला. त्यात शिरीष कणेकरांचा लेख वाचा. आर्टी पिक्चरांची बरीच रेवडी उडवली आहे. सगळेच पटेल असे नाही पण वाचायला हरकत नाही. http://www.loksatta.com/lokprabha/diwali2007/cinemawale.htm
|
Suyog
| |
| Saturday, February 02, 2008 - 8:52 pm: |
| 
|
"ह्यान्चा काहि नेम नाहि" धमाल आहे, ह ह पु वा त्यातल्या चोराचा mobile ringtone अफ़लातुन आहे ! दुसरा भाग जरा लाम्बला आहे आणि काही पान्चट आणि सिक जोक आहेत पण एकदा बघायला हरकत नाही.
|
Farend
| |
| Saturday, February 02, 2008 - 9:15 pm: |
| 
|
Who killed the electric car? ही एक डॉक्युमेंटरी बघितली. जरा एकच बाजू जास्त मांडली असली तरी इंटरेस्टिंग आहे. GM ने EV1 ही एक इलेक्ट्रिक कार बाजारात आणली होती, पण जास्त मागणी नाही या कारणाने उत्पादन बंद केले. कॅलिफोर्निया ने एक नियम काढला त्याला विरोध करणे हा ही एक उद्देश त्यात होता. या फिल्म मधे असे दाखवायचा प्रयत्न आहे की तेल कंपन्यांपासून ते इतर बर्याच हितसंबंधी मंडळींचे हे कारस्थान होते. याबद्दल आणखी माहिती येथे मिळेल
|
Dakshina
| |
| Wednesday, February 13, 2008 - 9:26 am: |
| 
|
शेंडेनक्षत्र, हा लेख माझ्या इथे दिसत नाहीए. कसा वाचू? आय मिन फ़ॉन्ट वगैरे डाऊनलोड करावा लागेल का?
|
Farend
| |
| Wednesday, February 13, 2008 - 1:18 pm: |
| 
|
दक्षिणा, Firefox असेल तर फॉंट डाउनलोड करावा लागेल आणि मग View...Character Encoding...Iso-8859-1 menu option निवडलेस की मग दिसेल. मलाही नेहमी हे करावे लागते. पण फॉंट एकदाच डाउनलोड करावा लागेल.
|
जोधा अकबर... मस्त पिक्चर. ह्रितिक आणि ऍश सुंदर काम करतात.. magnum opus .. रहमानचे संगीत अप्रतिम आहे. कॉस्च्य्म्स, सेट्स.. सर्वच जबरदस्त आहे. युद्धाचे सीन तर एकदम सही आहेत. लांबलचल रीव्ह्यु लिहायचा आहे वेळ मिळाला की टाकेल.
|
Prajaktad
| |
| Friday, February 15, 2008 - 4:21 am: |
| 
|
काहिच अपेक्षा न ठेवता sunday बघितला,चक्क बरा वाटला..किमान पार्टनर, वेलकम अशा तद्दन टाकावु कचरा पेक्षा खुपच बरा आहे..
|
Dakshina
| |
| Friday, February 15, 2008 - 7:11 am: |
| 
|
प्राजक्त, काहीही म्हण पार्टनर जरी तद्दन होता, तरी त्यातल्या काही विनोदांमुळे मला किंचित हसू आले होते. हा sunday म्हणजे कुठला? ते एक (आचरट) गाणं सारखं रेडिओ मिर्चीवर लावतात.... 'दिल मे पल पल... है एक हलचल...तोच का हा?
|
Ankyno1
| |
| Friday, February 15, 2008 - 12:22 pm: |
| 
|
हो तोच हा.... पार्टनर कितीही बकाल असला तरी २ तास टी पी साठी बरा होता (ओरिजिनल 'हिच' पाहिल्यावर कळालं की सीन टू सीन चोरलाय) आज 'जोधा अकबर' फर्स्ट डे फर्स्ट शो ला गेलो होतो..... पण शो च रद्द झाला
|
जोधा अकबार : Complete Hrithik movie!! ह्रितिक च्या पंख्यांना जबरदस्त visual treat !! प्रचंड graceful तरीही HOT दिसतो ह्रितिक बादशाह चे outfits खूप छान carry केलेत त्यानी ! त्याचा तलवारबाजीचा scene आणि हत्तीशी झुंज तर बघ sssssss त रहावी ऍश carries her royal outfits and jewelry very well as always पण ...... पण वय दिसतं अता . तिचा eye make up चांगला नाही जमला , त्यामुळे थोडी निस्तेज दिसते ! काही scenes मधे चवळीची शेंग तर काही scenes मधे जरा जाड झाल्या सारखी दिसते . चेहेर्या वरच्या बारीक पुरळांचा close up घेण्याचा मोह आवरायला हवा होता ! ऍश च्या हातावर , पायावर आलत्या ऐवजी मेंदी जास्त योग्य वाटली असती . रजपूत लोक आलत्याचा वापर करत होते कि नाही माहित नाही पण मेंदीची परंपरा राजस्थानात मुघल काळातच आली असा एक अंदाज आहे . त्या काळतल्या paintings मधेही स्त्रीयांच्या हातावर मेंदी दिसते . आलता असेल असं वाटत नाही कारण त्या paintings मधे हातावर मरुन रंग दिसतो , आलत्या सारखा लाल भडक नाही वाटत .. असो , हे आपलं माझं मत . पण याच सिनेमात इला अरुण च्या तोंडी ' अति तिथ माती ' या अर्थाने एक संवादही आहे " बहुत ज्यादा मेहेन्दी भी हात काले करती है " म्हणजे गोवारीकर ने त्या काळात मेंदीचा reference तर उचलला आहे मग अजुन थोडी R&D करायला हवी होती आलता दाखवताना . अर्थात अलत्या ऐवजी ते कुंकु म्हणून पण दाखवलं असेल कदाचित . शिवाय चित्रपट सुरु होण्या पूर्वी अमिताभ च्या प्रस्तावने आधी जोधाचं एक painting पण दाखवलय अर्थात ते अत्ता काढलेलं आहे किंवा historic माहित नाही पण त्या त जोधाच्या तळव्यांवर मरुन कलर ची मेंदी दिसली . Anyways, मेंदी पुराण बास करते , back to Jodha Akbar: जमेच्या बाजु : ह्रितिक चा best performance! ऍश ह्रितिक ची अफ़लातून केमिस्ट्री ! मुघल लोकांचे casting. अति भव्य royal sets. Outstanding cinematography. अत्त पर्यंत पाहिलेले best युध्दाचे scenes! Great jewelry, costumes! मरहबा गाण्याची choreography! एक सूफ़ी गाणं आहे ते चांगलं घेतलय . इला अरुण चा दाई मा चा role. शरीफ़ुद्दीन च्या रोल केलेला ऍक्टर . न आवडलेल्या गोष्टी : पावणे चार तास लांबी रजपूत casting फ़ार काही जमलं नाही ! 2 nd part उगीच लांगवला ! ऐश्वर्याने केलेली निराशा ! A.R. रेहमान कडून निराशा ! पटकथा थोडी गंडली संवाद अजुन चांगले हवे होते , मुघल - ए - आझम चे संवाद अजुन आठवतात त्यामुळे नकळत comparison होतेच ! अकबर जोधा रोमॅंटिक scene मधे स्वत : गाणी गाउ लागतात ते खूप च funny वाटलं . जोधाबाई स्वत : ( भरजरी कपड्यां मधे ) अकबरा साठी आणि इतरां साठी आगडबंब कढईत स्वयंपाक करते हे पण मला फ़िल्मी वाटलं , त्या कढाई पर्यंत तिचा हात सुध्दा पोचत नव्हता तर तिनी इतकी सारी मेजवानी कशी काय बनवली हे अचाट आणि अतर्क्य वाटलं ! अर्थात इतिहासात असा काही उल्लेख अहे किंवा नाही माहित नाही पण खरच करायची का ती स्वयंपाक ??  Overall हा चित्रपट प्रेम कहाणी पेक्षा अकबराच्या जीवनावरचा चित्रपट वाटतो ! अर्थात तरीही एक visual treat म्हणून वरचे सगळे -ve points असूनही आवश्य पहा
|
Ami79
| |
| Saturday, February 16, 2008 - 1:58 pm: |
| 
|
मिथ्या पाहिला का कुणी? खुप चांगला चित्रपट आहे. वेलकम, पार्टनर, संडे अशा रद्दी चित्रपटांपेक्शा नक्कीच पाहण्यासारखा आहे. कसलेल्या कलाकारांपुढे नेहा धुपिया खुप ताकदीने उभी राहिली आहे. नक्की पहाच.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|