Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 15, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » कमालीचा चंगळवाद! » Archive through February 15, 2008 « Previous Next »

Ajjuka
Friday, February 15, 2008 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणापासून घरात एका खोलीतून बाहेर पडताना दिवा, पंखे बंद करूनच बाहेर पडावे अशी शिस्त होती. तेच कामाच्या जागी सुद्धा. मग उसगावात गेल्यावर तिथले लोक बेशिस्त वाटायला लागले(इतर देशातले मला माहीत नाही म्हणून उसगाव फक्त.) तिकडच्या हपिसातले दिवे रात्रंदिवस ढणढणत असतात, कॉम्प्स चे स्विच कायमच चालू असतात. हे का हे मला आजवर कळले नाहीये. या बीबीशी सुसंगत वाटल्याने विचारतेय की कुणी याचे कारण सांगेल का? ही उधळपट्टी नाहीये का?

Maanus
Friday, February 15, 2008 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उसगावात सगळी दार खिडक्या काचेची असतात, लोखंडी जाळ्या नसतात, security साठी म्हणून काही दिवे चालु असतात.

एखाद्या ठिकाणी काहीच हलचाल होत नसते तेव्हा बरेचसे दिवे आपोआप बंद होतात. पहाटे पहीला माणूस आला की sensors त्याला detect करुन बाकीचे दिवे सुरु करतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा तु ऑफिस मधे गेली असशील तेव्हा दिवे आपोआप सुरु झाले असतील. व तुला वाटले दिवे सदैव चालु असतात.

संगणक चालु ठेवण्यामागे हजारो कारणे आहेत. काही मुख्य.

१. कंप्युटर मशिन आहे, जीला झोपायचा हक्क नाहीय.

२. जग छोटे झालेय, मी जरी झोपलो असेल तरी माझा pc जगालता दुसरा कोणतातरी माणूस कोठुनतरी वापरत असतो.

३. ऑफिस मधे कधीही कोणताही प्रॉब्लेम येवु शकतो, तेव्हा घरबसल्या ऑफिसला connect करता यायला पाहीजे.

४. एक मोठा संकणत कंपणीतेअले किती संगणक सध्या उगाच चालु आहेत हे शोधत असतो, व रिकामा संगणक सापडला की त्यावर गणिते सोडवायचे काम टाकतो, ह्याला grid computing म्हणतात.

५. time is money, I cannot spend 10 minutes every morning to start the computer


Prajaktad
Friday, February 15, 2008 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग उसगावात गेल्यावर तिथले लोक बेशिस्त वाटायला लागले>>>बेशिस्त पेक्षा उधळे हा शब्द बरा बसेल तिथे...बाकी माणसाने दिलेल्या कारणात सिक्युरिटी हे तसे मुख्य कारण आहे, बर्‍याच शॉप्स मधे रात्रंदिवस दिवे चालुच..

Akhi
Friday, February 15, 2008 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी कालचीच गोष्ट ५:३० वाजता ठाणे बेलापुर रोड ने जात होते. आणी रस्त्या वरची दिवे सुरु होते :-(
एकिकडे वीज नीर्मिती होत नाही म्हणुन लोड शेडिंग करायचे आणी आणी दुसरी कडे असा निष्काळजी पणा दाखवायचा?
सोलर उर्जे वरती चालणारे दिवे हा रस्त्या वरचे दिव्यांसाठी होउ शकत नाही का?? किंवा असा काही sensor कि ज्यामुळे जर सुर्य प्रकाश कमी पडला तर आपोआप सुरु होतील आणी पुरेसा सुर्य प्रकाश असताना लाइट बंद होतील


Ladtushar
Friday, February 15, 2008 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कदाचित उसगावातिल हापीसात फोटू काढायाचे क्यामेरे असतील ते अंधारात कोणाचा आणि कसा फोटू काढाणार...आणि हे सर्व का मन्हे तर सिक्यूरिटी....राणी च्या देशात तर चोविस तास हे क्यामेरे चालू असतात !

उसगावात ले लोक बेशिस्त कशाला आपल्या इथे विजेचा एवढा तूटवडा असून पण आज काल एसी लावायची स्टाइल आहे म्हणे, तुमच्या गाडीत एसी नाही ?? आज काल केवढा उकाडा आहे !!!(एसी ची एकदा सवय झाली की सगळी कड़े उकाडाच... )

Nandini2911
Friday, February 15, 2008 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अखि, नवी मुंबईमधले दिवे सोलरवरती आहेत. त्यामुळे visibility कमी झाली की ते दिवे चालू होतात असं मी कुठेतरी वाचलय..

Akhi
Friday, February 15, 2008 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही मला तरी अस काही वाटत नाही. ठाणे बेलापुर माझा रोजचा मार्ग आहे. काल चांगलाच उजेड होता रोज लक्ष गेल नाही कारण जागीच नसते बस मधे, काल traffic मुळे सगळी कडे लक्ष होते. आणी हिच गत घोडबंदर रोड ची आहे. ते तर मी स्व:त बरेदा mark केल आहे. पण आता तु सांगितल आहेस तर office संपल्यावर आहे पण बघते आहे मग पोस्ट करते.

Dakshina
Friday, February 15, 2008 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नळाच्या बाबतीत उदय ने लिहीलय ते खरंच खूप इरिटेटींग आहे. नळ वाया जाताना लोकांना अस्वस्थ का नाही वाटत? for that matter कोणताही natural resource वाया जाताना अस्वस्थ वाटलंच पाहीजे.

आणि विचारणा केली की उत्तर ठरलेले असते. 'मी बिल भरतोय ना?' हे तर अजुनी त्रासदायक. आजकाल लोकांकडे पैसा इतका आलय.. की त्याची काही किंमतच राहीलेली नाही.

एक किस्सा... (तसा जुना आहे) आमच्या ऑफ़िसात एक सिनियर मॅनेजर होता. दर वीकएन्ड ला त्याच्या अंगावर नविन शर्ट असायचा. (तुम्हाला कदाचित खोटं वाटेल.) कार तर होतीच. बरं बायको पण वर्किंग. म्हणजे पैसाच पैसा... महिन्याला लाखभर रुपयाला मरण नाही. बायको माझी मैत्रिण... कधीही फोन झाला की आज हे घेतलं काल ते घेतलं.. असायंचच...

एके दिवशी बिन नावाचं एक पत्रं आलं ऑफ़िसात... आम्हाला काही कळेना नक्की काय आहे ते. उघडून पाहीलं तर या माणसला चक्क, बॅंकेने थकबाकी ची नोट पाठवली होती. मी हणते हे काही जगावेगळं घडलं असं नाही. पण त्या माणसाचं तत्पुर्वीचं वागणं बोलणं आठवलं मला... आणि दिखाऊपणाची कमालच वाटली... ही म्हणजे 'खिशात नाही आणा, आणि मला बाजीराव म्हणा' यातली गत झाली. पण दुर्दैवाने हे चित्रं सगळीकडे पहावयास मिळते. माझ्या हाताखाली व्हेंडर कडून एक मुलगा होता. असेल २२ / २३ वर्षाचा, त्याने माझ्याकडून ५०० रुपये उसने घेऊन जवळ जवळ ६ महिन्यांनी परत केले होते. हाच मुलगा दरम्यान मला फ़र्ग्युसन रस्त्यावर दिसला होता. टू व्हीलर, उच्च प्रतीचा मोबाईल हँड्सेट, छान कपडे.. मी ओळखलंच नाही त्याला.

सांगण्याचा मतितार्थ हा की.. आपल्याकडे खरोखरी किती आहे, आणि आपण दाखवू किती शकतो? यावर आपली पोझिशन ठरवली जाते. (दुर्दैवाने )त्यामूळे तुम्ही जितकी जास्ती चंगळ करत असाल तितके जास्त उच्चभ्रू....आतून अगदी फ़ाटके असाल तरिही..


Arc
Friday, February 15, 2008 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या office मधे सुध्दा manager, office BUS अगदी दारावरुन जात असली तरी private car ने येतात.का तर त्यान्चे status
बर काहीजण तर अगदी शेजारीच रहातात, तर carpool सुद्धा करत नाहीत.
हे staus प्रकरण असते काय?


Dakshina
Friday, February 15, 2008 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑफ़िसला, स्वतःच्या कार ने येणं हा ज्याचा त्याचा प्रश्नं आहे त्याला थोडी सूट द्यायला हरकत नाही.
कार पूलच्या बाबतीत म्हणाल तर उपाय अगदी स्तुत्य असला तरी पेट्रोल शेअर कसं करणार?
आय मीन पैसे कोण आणि कसे मागणार? तिथे हिशोब करणं महामुश्किल.
(त्या मुद्द्यांवर एक वेगळा बी.बी. निघू शकेल) असो...
हे तर लोकल ट्रॅव्हल झालं. आमच्या ऑफ़िसात हाईट म्हणजे कॉस्ट कटींगच्या मीटींग ला जाताना,
एक दोन जनरल मॅनेजर्स नी एकाच कार मधून मुंबईला जाण्यास चक्क नकार दिला होता... यू बेट इट नाऊ...
कंपनीच्या जीवावर हे लोक भरपूर म्हणजे अगदी प्रमाणाच्या बाहेर चंगळ करतात... आणि आमच्या अप्रेजलच्या वेळी मात्र कॉस्ट कटींग..


Anaghavn
Friday, February 15, 2008 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"जे खरच असतं त्याचा showoff करायची गरज पडत नाही.ते सहजच दिसु शकतं आणि म्हणुनच अधिक सुंदरपणे.--पण जे आपल्याजवळ नाही--मग पैसा म्हणा किंवा गुण म्हणा ते आहे असं दाखवण्यासाठी आटापिटा करावा लागतो."

विजेच्या बाबतीत
पुण्यात तरी काय कमी विजा जाळतात? लक्ष्मी रोद वर गेलात संध्याकाळी तर रोज दिवाळी दिसेल. म्हणजे ठिक आहे--दुकानात, त्याच्या बाहेर जास्त लाईटस पाहीजेत, पण किती त्याला काही लिमिट असते की नाही? इथे पुण्या मुंबईत रोज दिवाळी आणि तिथे खेड्यात मुलांना रात्री अभ्यासाची मारामार.


Ladtushar
Friday, February 15, 2008 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक काळ असा असेल की आपल्याला किंवा आपल्याला पुढच्या पिधीला प्राण वायुच्या आणि उर्जेच्या प्रचंड तुटवडा सहन करावा लागेल. जसे आपण आपल्याला मुलांसाठी सेविंग करतो तसेच निसर्गाच्या या उर्जास्त्रोता चा पण साठा जतन करून ठेवला पाहिजे. जर आपल्याला ही सुरवात करायची असेल तर स्वतः आपला Co2 उतसर्जन मोजयाला सुरवात करा कदाचित आपण मिळुन फूल न फुलाची पाकळी म्हणुन थोड़ा तरी उर्जा स्त्रोत वाचवू शकू ...

अधिक माहिती साठी या दुव्यावर भेट द्या :
http://actonco2.direct.gov.uk/index.html


Ladtushar
Friday, February 15, 2008 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> खेड्यात मुलांना रात्री अभ्यासाची मारामार.
हो हे मात्र १०० टक्के खरे आहे. खेड्यातले छोटे उदोय झोपले आहेत उदा. इस्त्री वाले बिचारे रात्रि जागुन इस्त्री करत आहेत लोड शेडिंग मुळे. असे अनेक उद्योगां वर संक्रांत आहे आणि शहरात कमालीचा चंगळवाद! हा वाद तर काही दिवासांपूर्वी चांगलाच गाजला होता मुंबई ला लोड शेडिंग नाही आणि सर्व महाराष्ट्र अंधारात असतो. असो तो पुन्हा दूसरा विषय आहे.

Dakshina
Friday, February 15, 2008 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, तुम्ही दिलेला दुवा फ़ारच छान आहे. माझ्या घरी इतक्या कमी वस्तू असूनही.
फ़क्त किचन मधून ५ टन....?


Apurv
Friday, February 15, 2008 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारपुल करणे खूप फायदेशीर आहे, उसगावात त्याला बरेच प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे रस्त्यावरची रहदारी पण कमी होते आणि प्रदुषण पण. पेट्रोल ची किंम्मत वाटून घेतली जाते. कशी ती मला माहीत नाही. कारपुल साठी रस्त्यावर वेगळ्या लेन राखीव ठेवतात. बस, ट्रेन ह्याने प्रवास करण्यासाठी पण बर्याच सोयी उपलब्ध केल्या जातात.
माणूस म्हणाला तस ईथे बर्याच गोष्टी sensor activated असतात. पाणी, वीज दोन्ही साठी.

Zakki
Friday, February 15, 2008 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पण चंगळवाद कमी केला तर आर्थिक प्रगति कशी होणार? हिंदीत एक म्हण आहे. 'या खुदा, खर्चे बढा.'

अमेरिकेत तर लोकांनी पैसे उधळले नाहीत तर अर्थव्यवस्था सुधारणार नाही म्हणून आम्हाला सर्वांना शेकडो डॉलर देणार आहेत, ते खर्च केले म्हणजे अर्थव्यवस्था सुधारेल असे म्हणतात. माझ्या मते ते सर्व तात्पुरते आहे, पण मला कोण विचारतो.

जर उपभोगाची इच्छा नसेल, समाधानी वृत्ति असेल, तर नवीन उद्योगधंदे, सुखसोयी हे वाढणार कसे? गरज ही शोधाची जननी असते. त्या शोधावर आधारीत धंदे काढून पैसे मिळवले की त्या शोधाचे सार्थक होते, असे म्हणतात!

तर भारताने आता झटपट श्रीमंत व्हायचे ठरवले आहे असे दिसते. त्यासाठी हा चंगळवाद. अगदी अमेरिकेसारखा.

खरे तर मराठीत बोलून, मराठी पद्धतीने राहूनहि चंगळवाद करता येतो, पण 'आमचे सग्गळे म्हणजे कसे अगदी अमेरिक्कन' असे कौतुकाने सांगायला आवडते ना!




Supermom
Friday, February 15, 2008 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेकडो डॉलर देणार आहेत?
झक्की, हे जरा जास्तच होतंय....

(कुठे नि कधी ते पण सांगून टाका आता..)


Sandu
Friday, February 15, 2008 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं बाई, खरच शेकडो डोलर देत आहेत. त्याला tax rebate म्हणतात. मे महिन्यात मिळणार आहेत. Rs 48,000 तेही उगाच खर्च करण्यासाठी. recession येवू नये म्हणून.......

Maitreyee
Friday, February 15, 2008 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग सुमॉ ते त्या stimulation प्याकेज बद्दल बोलत असतील :-) काही शेकड्यांनी आमचे काय शॉपिन्ग होणार म्हणावे :o

Mandarnk
Friday, February 15, 2008 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येस, tax rebate मंजूर झालेलं आहे शेवटी. Single tax payer ला $ ६०० आणी married couple ला $ १२०० मिळणार!!!
साधारणपणे मे-जून च्या आसपास चेक यायला सुरुवात होइल, हुर्ये!!!!!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators