|
Sunidhee
| |
| Wednesday, February 13, 2008 - 6:10 pm: |
| 
|
मुलींनो, काय सांगू माझी व्यथा तुम्हाला!! मला ८-१० दिवसातून एकदा तरी सांगावे लागते 'मिस्टर, तुम्ही कुलकर्णी ह्यांच्या घरात रहाता, कुलकर्णी हॉटेलात नव्हे'. मग ५० पैकी ५ वस्तू जागेवर जातात.
|
Prajaktad
| |
| Wednesday, February 13, 2008 - 6:50 pm: |
| 
|
'मिस्टर, तुम्ही कुलकर्णी ह्यांच्या घरात रहाता, कुलकर्णी हॉटेलात नव्हे'. >>>>
|
Ashusachin
| |
| Wednesday, February 13, 2008 - 7:16 pm: |
| 
|
फ़क्त ५!! बाकीच्या हॉटेल मधेच का? तुम्ही इतर बायकान सारखे एका पेक्षा जास्ती वेळा सान्गा 
|
Athak
| |
| Wednesday, February 13, 2008 - 7:21 pm: |
| 
|
मग ५० पैकी ५ वस्तू जागेवर जातात ८ - १० दिवसात १० % वस्तु जागेवर इट्स नॉट बॅड स्कोअर मंथली ३० % ३ महिन्यात सगळ्या वस्तु जागेवर मग परत मिस्टरला बिझी ठेवण्यासाठी हाच प्रयोग सुरु ठेवण्यात येत असेल
|
Prr
| |
| Wednesday, February 13, 2008 - 9:57 pm: |
| 
|
@Sunidhee मी पण तुझ्या व्यथेत सहभागी आहे. मला तर माझ्या नवर्याला कसे सांगायचे तेच समजत नाही. अनेकदा सांगुनही मस्त सगळीकडे पसारा करुन ठेवतो. आता मी सांगणेच सोडुन दिले आहे.
|
Princess
| |
| Thursday, February 14, 2008 - 4:18 am: |
| 
|
स्त्रियांच्या व्यथा इथे कशा? पुरुषा जागा हो ...(आधी माणसा लिहिणार होती... पण तो माणुस नावाचा आयडी आला असता धावत. मग आठवले "माणसाचे" अजुन लग्नच नाही झाले. त्याला काय व्यथा असणार ;)) विनोद म्हणुन ठीक चाललय. पण पुरुषांना खरच व्यथा असतात का? कुणी आहे का इथे स्त्री पिडीत? पोस्ट्स वरुन तरी पुरुष व्यथित वाटत नाहीत.
|
Athak
| |
| Thursday, February 14, 2008 - 4:38 am: |
| 
|
पोस्ट्स वरुन तरी पुरुष व्यथित वाटत नाहीत. काय करणार बिचारा , लग्न झाल्या दिवसापासुन सगळ सहन करण्याशिवाय दुसर काही करु शकत नाही चेहर्यावर नेहमी हसु आणुन आंतले आसु आतच ठेवतो , कधी अश्या फ़ोरमवर विनोदीरुपाने का होईना आपल दुख्ख व्यथा सांगण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक पुरुष ओरडुन सांगतो I was happy for 25 years ...then.. Then I got married
पुरुष कितीही सिरिअसली सांगत असला तरी त्याला विनोदच समजणार
|
Princess
| |
| Thursday, February 14, 2008 - 5:03 am: |
| 
|
अथकराव, एवढे बिनधास्त लिहिताय... वहिनी येत नाही काय आजकाल इकडे?;)
|
Shyamli
| |
| Thursday, February 14, 2008 - 5:24 am: |
| 
|
सुनिधी अग अस नुसत सांगायच नाही, शाळेत कश्या पाट्या असतात ना तश्या पाट्या लावायच्या सगळीकडे " हे घर माझं आहे आणि ते मी स्वच्छ ठेवीन" :D
|
Athak
| |
| Thursday, February 14, 2008 - 5:48 am: |
| 
|
" हे घर माझं आहे आणि ते मी स्वच्छ ठेवीन" "हे घर माझं आहे आणि तसे म्हणण्याची मला माझे बायकोकडुन परवानगी आहे , ते कसं ठेवायच हे तीच ठरवते अन अंमलात आणते " पूनम मी काय घाबरतो का तुझ्या वहीनीला
|
Ramani
| |
| Thursday, February 14, 2008 - 5:51 am: |
| 
|
अथक, खी खी खी.
|
>> पुरुष कितीही सिरिअसली सांगत असला तरी त्याला विनोदच समजणार अहो अथक, (जपानी अहो नाही हं ) बायका या जन्मजात आनंदी असतात ना म्हणून. >> या प्रश्नाला हरिश्चंद्री / मनोहरपंती / चाणक्यी असे काहीही उत्तर दिले तरी पुरूषाचा शेखचिल्लीच होतो ही व्यथा... ही खरी पुरुष जन्माची व्यथा दिसतेय. मी सहभागी आहे हो तुमच्या दुःखात. (खास बायकांसाठी : कितीही बेमालूम वेषंतर केले तरी मूळचा तो अमिताभ आहे हे जसे चाणाक्ष प्रेक्षकांना समजते तसे कितीही स्मार्ट उत्तर द्यायचा प्रयत्न केला(हरिश्चंद्री / मनोहरपंती / चाणक्यी) तरी मूळ रूप शेखचिल्लीचे आहे हे बायकांना(चाणाक्ष लिहायची गरजच नाही. त्या असतातच. ) समजतेच. समस्त दुःखींसाठी
|
Rajya
| |
| Thursday, February 14, 2008 - 7:18 am: |
| 
|
पुरुषांना व्यथा नसतातच हे सांग़ण्याचा या बायकांचा अट्टहास का?
|
Manuswini
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:07 am: |
| 
|
मग prove it की पुरुषांना व्यथा नाहीत. . करा करा prove , आम्ही आहोत वाचायला नी अश्रू ढाळायला. तेव्हढेच डोळे साफ़. इथे नुसती चिरचिर सुरु आहे. नक्की काय प्रॉबलेम आहे ते कुणीच पुरुष सांगत नाही. बायका असे करतात तसे करतात.. अरे नक्की कुठे दुखते तेही सांगता येत नाही. ते नाही का लहान मूल फक्त रडत असते मी शाळेत नाही जाणारऽऽऽ मी शाळेत नाही जाणार.. अरे पण का? नक्की कारण हे असते की अभ्यास केला नसतो म्हणून.. पण रडारडीची सुरुवात शाळेत जाणार नाही.. मग बाई मारतात / ओरडतात असे सांगणे.. अशीच रड सुरु असते. स्वतची चूक कबूल करत नाहीत की मीच अभ्यास केला नाही तसेच आहे हे. दुसरे काय
|
Rajya
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:27 am: |
| 
|
जाऊ दे ना, आमचं आमच्या जवळ मासा कितीही रडला तरी त्याचे अश्रु कुणाला दिसणार आहेत का? तसेच आहे आम्हा पुरुषांचं. फक्त एकच गोष्ट सांगतो, कुणालाही साधी ठेच लागली तर तो आई गं म्हणुन कळवळतो पण जर समोरुन मोठा ट्रक आला तर बापरे म्हणुनच ओरडतो. कारण किरकोळ प्रॉब्लेम साठी आई चालते पण मोठे प्रॉब्लेम असतील तर बापच लागतो यातुनच पुरुषाच्या जबाबदार्या, कर्तव्यं, व्यथा कीती मोठ्या असतील याची कल्पना येते या आता, हे मत खोडायला
|
Itgirl
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:55 am: |
| 
|
फक्त एकच गोष्ट सांगतो, कुणालाही साधी ठेच लागली तर तो आई गं म्हणुन कळवळतो पण जर समोरुन मोठा ट्रक आला तर बापरे म्हणुनच ओरडतो. कारण किरकोळ प्रॉब्लेम साठी आई चालते पण मोठे प्रॉब्लेम असतील तर बापच लागतो यातुनच पुरुषाच्या जबाबदार्या, कर्तव्यं, व्यथा कीती मोठ्या असतील याची कल्पना येते खोडले रे राज्या
|
Rajya
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:59 am: |
| 
|
खोडले रे राज्या ही अजुन एक व्यथा आम्हाला काय म्हणायचंय हे या बायकांना कळतंच नाही
|
Itgirl
| |
| Thursday, February 14, 2008 - 9:01 am: |
| 
|
अरे तुम्हांला काय म्हणायच असत ते तुम्हांला तरी कळत का?? आधी म्हणायचं, माझ मत खोडायला या अन खोडून दिलं की रडायच...
|
>>कुणालाही साधी ठेच लागली तर तो आई गं म्हणुन कळवळतो पण जर समोरुन मोठा ट्रक आला तर बापरे म्हणुनच ओरडतो. कारण किरकोळ प्रॉब्लेम साठी आई चालते पण मोठे प्रॉब्लेम असतील तर बापच लागतो
राज्या ट्रक ने धडक दिल्यावर जखमी झाल्यावर वेदनेनं कळवळताना कुणी तो मोठा आहे म्हणून बाप रे म्हणत नाही. संकट समोर आलं म्हणून म्हणतात तसं.वेदनेत आईच आठवते आणि संकटात बाप. आमच्याकडे ठेच लागली तर आई गं आणि प्राणघातक अपघातात जखमी होऊन असह्य वेदना झाल्या तरी आई गं च म्हणतात. तसंच मोठा ट्रक काय आणि छोटी लुना काय अचानक समोर आली तरी आम्ही बाप रे च म्हणतो किती ते बायकांना कमी दाखवायचं? >>नक्की कारण हे असते की अभ्यास केला नसतो म्हणून.. पण रडारडीची सुरुवात शाळेत जाणार नाही.. काय बरोब्बर बोललीस मनुस्विनी. आता बघ लगेच येतील आम्ही अभ्यास केलाच आहे म्हणून शैलजा
|
Uday123
| |
| Thursday, February 14, 2008 - 9:04 am: |
| 
|
अहो तुम्ही शब्दश्: खोडले की रज्या चे मत. हे असे होत असते, पुरुष थोडी व्यथा मोकळी कराण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही लोकांनी तोंड दाबलेच त्या पिडीताचे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|