|
Athak
| |
| Friday, February 08, 2008 - 6:45 am: |
| 
|
योगिता , अस का , ज्ञानात भर आमच्या . मी 'शार्प' या शब्दावर म्हटले होते अगदी धारदार कधीही खिसा वगैरे कापण्यास उपयुक्त अशी मेमरी अनघा , अग या साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या , आम्ही मेंदु सारखा अमुल्य अवयव या करिता झिझवत नाही आम्हाला विश्वाची चिंता असते
|
हो का???आणि काय झाल रे नवर्याने बायकोसाठी काही आणल तर???तसही मागेच लागाव लागत असेल काही घ्यायला पण...
|
Athak
| |
| Friday, February 08, 2008 - 6:56 am: |
| 
|
योगिता एक मुलगा आपल्या वडिलांना विचारतो 'बाबा लग्नाला किती खर्च येतो हो ? ' बाबा , 'नाही सांगु शकत नक्की किती कारण मी अजुनही करतोच आहे ' पुरुष जन्मा ही तुझी कहाणी
|
Anaghavn
| |
| Friday, February 08, 2008 - 7:07 am: |
| 
|
"मी अजुनही करतोच आहे"----हा हा हा---- खुप असु आलं.
|
हो मलापण....
हे चार शब्द...
|
Athak
| |
| Friday, February 08, 2008 - 7:15 am: |
| 
|
अनघा , अग हसु आलं की असु ? हसा हसा , आसु तर आम्हला येतात अन नाकी नवु पण
|
माझ्या सारख्या वस्तू हरवत असतात,पेन चष्मा,गाडीच्या किल्ल्या,पेन ड्राईव्ह,पाकीट, ई ई सूज्ञ पुरुषास सांगणे न लगे. जेंव्हा बायकोस सांगतो तेंव्हा ती शांत पणे ऐकून घेते पण काहीही शोधण्यास मदत बिदत करीत नाही. आता हे गेले तीस वर्षे चालू आहे.शेवटी मीच शोधतो आणि मग वस्तू सापडतात. मी जर कुरकुर केली तर म्हणते "अहो! मी शोधली तर मग वस्तू सापडल्याचा केवढा मोठा तुमचा आनंद मी हिरावून घेईन की? हा आनन्द तुम्हाला रोज इतक्यांदा मिळ्तो त्यामुळे सारखे किती आनंदी असता तुम्ही? - मुली ही आई च्या म्हणण्यात हो ला हो करतात्-
|
बघा रवी म्हणजे या वरुन तरी निदान तुमच्या लक्षात आल पाहिजे की आम्ही किती मोठ्या मनाच्या आहोत ते..तरी आपल तुमच रडण चालुच असतं..
|
आता जोक पण समजवावा लागेल का???? not unexpected no gender bias-pun intended
|
या बीबी वर स्त्रीयांच्या चंचुप्रवेशामुळे थोडे प्रदुषण वाढलेसे दीसते आणि बीबीचा मुळ विषय सोडुन तो वाहावत चाल्लासा वाटतो. तथापि जोपर्यंत बीबी चे शिर्षक आपण आठवणीत ठेवु तोपर्वंत सर्व काही आलबेल असावेसे वाटते. ती रंगावची चर्चा वाचली.. शिंची पुरुषाना दीशाहीन करण्याची जन्मजात सवय हो! कसे वागावे घरी नवर्याने? ईशवराचे वर्णन नेती नेती असे केलेले आहे म्हणजे ईश्वर कसा आहे?.. या व्रुक्षासारखा आहे?.. " नेती " . या प्राण्यासारखा आहे?.. " नेती " .. या पाण्यासारखा आहे? या अग्निसारखा आहे?... " नेती नेती " तो तसाही नाही असाही नाही... मग आहे तरी कसा? कसाच नाही पण तरीही आहे.! बायकोबरोबर वागताना नवर्यांची ही अशी " दशा " होत असते. कोणत्या वेळेला नेमके काय बिनसेल आणि आपण कसे वागावे?.. ह्याच शोधात तो जन्मभर फीरतो... जसे ग्रह फीरतात ना तसे पण लग्न करताच त्याचे सर्व ग्रह फीरलेले असतात हे त्याला उमगेपर्यंत खुप पाणी पुलाखालुन वाहुन गेलेले असते किंबहुना पुलच वाहुन गेलेला असतो. सर्व नवर्याना हे बहुतेक कळलेले असावे की आम्हाला काय म्हणायचे आहे ते. साधे उदाहरण घ्या... " अग " हा अग शब्द म्हणताना काय reaction असेल आता हा विचार मनात येवुन गेलेलाच असतो. लग्न झाल्यावर पहीले काही दीवस आपण काय बोलतोय याचा विचार न करता प्राणि बोलत असतो.. पण... त्याला हे कळत नाही की हे चुकुन बोललेले आपण बोलुन चुकलो आहोत आणि याचे सजा आपल्याला जन्मभर मिळणार आहे..! तर " अग आज भाजी छान झाली आहे " ... असे म्हणावे आणि ती भाजी बायकोने केलेली आहे हे १०० माहीती असते आपल्याला.. पण पुढचे वाक्य पाहा जे कर्णपटलावर आदळते... " मला भाजी करता येत नाही.. झाल? समाधान? " .. आणि त्यानंतरचे महाभारत हे नवर्याच्या कुळापर्यंत जाते हे सुजाण आणि अनुभवी नवर्याना सांगणे नलगे..! त्यापेक्षा बोलणे कमी म्हणुन चुप राहावे तर पुन्हा अनावस्था. मौनं सर्वर्थलक्षणं असे जरी म्हटले असेल तरी त्यातुन तुंबळ युध्ध होवु शकते अशी नेती नेती अवस्था. पण हे भोगणे आहे हो भोग भोगणे ज्यालाअ म्हणतात ना तसे भोग असतात पुरुषाचे. बाहेरच्या जगात केतीही तो शुर असला तरी घरात गेल्यावर तो उंदीर होतो बिळातला. हे १०० खरे आहे. विनोदाचा भाग द्या सोडुन.. अनेक नवर्याना आपल्याला होणारा त्रास दुसर्याला होतो असे पाहुन मुक्तीची आशा नाही तरीही हायसे वाटते आणि " बायका ह्या अश्याच " असे म्हणुन कदाचित बिडीकाडीचे आदानप्रदान होवुन गाडी राजकारणाच्या चर्चेकडे वळते... पुरुष जन्मा ही तुझी कहाणी.. नेती नेती!
|
Uday123
| |
| Friday, February 08, 2008 - 8:03 am: |
| 
|
माझे नुकतेच लग्न झाले होते त्यावेळेची गोष्ट. एक वेळेला जेवणात पिठलं छान झालं असं म्हणालो, आणी मग पुढे कितीतरी दिवस 'रोज' आमच्याकडे (ह्यांना मी केलेले पिठलं आवडते आशा गैरसमजातून) पिठल (डोक उठलं) च होत होते. चुक दुरुस्त व्हायला ८-१० दिवस लागलेत, पण आता तर मी स्तुतीच करायची धास्ती घेतली आहे.
|
Anaghavn
| |
| Friday, February 08, 2008 - 8:40 am: |
| 
|
पिठलं---डोकं उठलं--उदय लै भारी
|
Ladtushar
| |
| Friday, February 08, 2008 - 9:43 am: |
| 
|
अहो पंत, म्हणजे लग्ना आधी हे सगळे मृगजळ च आहे की आम्हाला !!! 
|
Athak
| |
| Friday, February 08, 2008 - 10:12 am: |
| 
|
मृगजळ लड्डु है भाय लड्डु जो खाये वो पछताये जो न खाये वो ललचाये
|
Manya2804
| |
| Friday, February 08, 2008 - 11:06 am: |
| 
|
एक विनोद : मुलगा : बाबा, बाबा, आपल्या भाषेला 'मातृभाषा' का म्हणतात ? बाबा : कारण वडिलांना त्या भाषेचा उपयोग करायला कधीच संधी मिळत नाही...
|
सगळा बीबी वाचला. धोंडोपंत तुमच्या म्हणण्यात तथ्य नसले तरी हा बीबी सुरू केल्याबद्दल धन्यवाद. बर ज्या ज्या पुरुषांनी या तक्रारी केल्यात त्या सगळ्या बायकोला डोळ्यासमोर ठेऊन केल्यात असं दिसतं त्यामुळं 'आता सुटका नाही' हा वैताग अगदी स्पष्ट दिसतोय स्मायलीज किंवा दिवे दिले असले तरी. सगळं वाचून पुरूष जरा चिडीचा डाव खेळतायत आणि दातओठ दाबून वर आम्ही नाही बुआ चिडलो असं म्हणतायत असं वाटतंय. असो. पुरुष मुक्तीसाठी शुभेच्छा!
आता एक इंटेरेस्टिंग खेळ सांगते. साहित्य : जे आत्तापर्यंत बोललात याबाबत (इथं किंवा मनातलंही चालेल) ते 'या बायका अश्शाच' वगैरे वक्तव्य. प्रवेश पहिला पात्रे : तुम्ही, बायको आणि तुमचे वडील. आता ते सगळं वक्तव्य आईबद्दल बोला. आईबद्दल बोलत असल्याने वडील आणि(कधी नव्हे ते) बायको दोघेही जोरात पाठिंबा देतात प्रवेश दुसरा : पात्रे : तीच आणि शिवाय तुमची आई(ही) साहित्य : तेच. याशिवाय खास फोडणी: अधून मधून अगं पण काल मी हे म्हणालो तेंव्हा तू हो ना म्हणालेलीस किंवा अहो पण बाबा तुम्हीच तर काल हे बोलला होतात. यात फारच विचित्र तट पडतात. कुणाला कुणाची बाजू घ्यावी कळत नाही. बहारदार गोंधळ उडतो. आणि लाईव्ह केलिडोस्कोप पाहिल्याचा आनंद घेता येतो. नंतरच्या परिणामांची चिंता न करता एकदा तरी (एकदाच खेळू शकाल खरं तर) खेळून बघा.
|
अरे बापरे संघमित्रा चांगलाच खेळ सांगितलायस..म्हणजे आज किती घरांत भांड्यांची (आणि डोक्यांची) तोडफोड होणार आहे???
|
Anaghavn
| |
| Friday, February 08, 2008 - 11:55 am: |
| 
|
संघमित्रा खासच... (आणि चार शब्द)
|
Itgirl
| |
| Friday, February 08, 2008 - 11:59 am: |
| 
|
संघमित्रा, सहीच!!! समजा, खेळलातच, तर खेळाचे खरेखुरे निकाल लिहायला विसरू नका पुरुष मंडळी
|
Madhavm
| |
| Friday, February 08, 2008 - 12:21 pm: |
| 
|
अहो हा खेळ खेळायला त्यातली पात्रे असतातच कुठे हल्ली घराघरात. हं आता बायकोच्या आई-वडलांना घेउन हाच खेळ खेळता येइल म्हणा!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|