|
धोंडोपंत सदाशिव पेठे मधील आहेत, ते बहुतेक लक्ष्मी रोड वर सगळ्या रंगाच्या साड्या आणायला गेले आहेत.
|
धोंडोपंत -न्यायाची या जगात काहीच चिड नाही काय? पण नाही.. तुम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही. तुम्ही अस्तित्वात असेपर्यंत हा BB याव्वचचंद्रदीवाकरौ असाच चालु राहील याबाबत आमच्या मनात काहीयेक शंका नाही. उठा! एका परिने भाजी मधे मीठ नव्हते ते बरे झाले! नाही तर खाल्लेल्या मीठाला जागावे लागले आसते
|
Ajjuka
| |
| Friday, February 08, 2008 - 3:08 am: |
| 
|
सहीच... एवढं सगळं मुली करतात? इतका मस्त दत्तू करता येतो नवर्याचा किंवा इतर मित्रांचा? असे दत्तू बनण्याइतके माठ असतात males of the species? हे माहीत नव्हतं. मला का असे दत्तू सापडत नाहीत कधी!! मी आपलं आजतागायत प्रवासात बरोबर कोणीही असलं तरी माझ्या बॅग्ज मीच उचलायचे. उगाच दुसर्याला का त्रास असं म्हणत (का? का?). रंगांच्या बाबतीत म्हणायचं तर माझं आणि नवर्याचं एकमत होतं कारण तो पण असे नवीन नवीन रंग शोधून काढत असतो (श्या नवर्याला याबाबतीत माठ नाही म्हणता येत!). खरेदी म्हणायची तर कामाच्यासाठी शॉपिंग करतान माझी दुकानं बघून ठेवलेली असतात आणि वेळ आली की तिथे जाऊन हवं ते घेऊन येते. एकटीच जाते पण नवर्याला फॅब्रिक्स बघायला आवडतात. त्यामुळे तो आवर्जून येतो कधी कधी विशेषतः खादी किंवा तत्सम ठिकाणी जाणार असेन मी तर (म्हणजे इथेही दत्तू करायचा चान्स नाही). मी उत्तम ड्राइव्ह करते असं माझ्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या पुरूषांचं म्हणणं आहे (म्हणजे माझे बाबा, नवरा, भाउ, जवळचे मित्र इत्यादी!) त्यामुळे इथेही मी कुणाला दत्तू करू शकत नाही. अजून काय बरं... हा घरातली कामं, आम्ही दोघं करतो. आणि दोघंही कधी कधी मस्त आळसही करतो. इथेही दत्तू नही बनता. कॉलेजमधे असताना रात्री अपरात्री तालमी संपवून घरी येताना शक्यतो कुणालाही कळायच्या आत कलटी मारून मी एकटी घरी यायचे. उगाच आपल्याकडे वाहन असताना दुसर्या कोणाला का त्रास असं म्हणत. आणि मग दुसर्या दिवशी सगळ्या मित्रांची बोलणी खायचे. पण ते सगळे इतके माठ की परत त्या दिवशीची माझी कलटी ठरलेली. असो.. ग्रुपमधे किंवा मित्रमंडळींच्यात मुलांचा दत्तू करणार्या मुली होत्या. पण दत्तू बनणारे मुलगे असायचे म्हणून ते जमायचं. अश्या दत्तू बनवू शकणार्या सुंदर मुलींचा मला नेहमी मनापासून कौतुक आणि मनापासून हेवा वाटायचा.
|
Dineshvs
| |
| Friday, February 08, 2008 - 3:18 am: |
| 
|
मुलींच्या सामानाचे काय, पर्समधेदेखील कायकाय भरलेले असते, हे कधी बघितलेय का. मुली प्राण गेला तरी पर्सला, बाकि कुणाला हात लावु देणार नाहीत. त्यामुळे ती उचलायची वेळ मुलांवर कधीच येत नाही. ( इथे मला स्वच्छ मनाने दोन गोष्टी कबुल करायच्या आहेत. मुलाना कधीतरी सेफ़्टी पिनची जरुर पडु शकते, पण ती त्यांच्याकडे कधीच नसते. अश्यावेळी जवळपास एखादी मुलगी असेल तर तिच्याकडे ती असतेच आणि ती अगदी मोठ्या मनाने, ती देते. गोराई बिचवर पायात काटा गेला असताना, आणि एकदा बसच्या गर्दीत शर्टाचे बटण तुटल्यावर मला अनोळखी मुलीनी अशी मदत केली आहे. तसेच या पुढे जी यादी देतोय, त्या साठी पण मला एका मैत्रीणीनेच मदत केली आहे. ) तर पर्समधे सापडलेल्या गोष्टी. ( या प्रकरणाची सुरवात झाली ती अशी, मला एक फोन नंबर लिहुन घ्यायचा होता आणि कधी नव्हे ते माझ्याकडे पेन नव्हते. मैत्रीणीकडे मागितल्यावर, आहे रे पण रिफ़ील संपलीय. आयब्रो पेन्सिल देऊ का, असे विचारण्यात आले. त्यावेळी बघु तरी तुझ्या पर्समधे काय काय असते ते, असे विचारुन मी पंचनामा केला. ) आयब्रो पेन्सिल. एक साधी पेन्सिल, टोक तुटलेली रिफ़ील संपलेली दोन बॉलपेन्स. एक टेलीफोन डायरी, मागच्या वर्षीची एक चालु वर्षाची कोरी डायरी. वैभवलक्ष्मीच्या व्रताच्या कथेचे पुस्तक. वरची दोन पाने फाटलेल्या एका स्तोत्राचे पुस्तक. १०० प्रती काढुन पाठवण्याचे आवाहन करणार्या पत्रकांपैकी दोन पत्रके. सेफ़्टी पिना. एक न वापरलेले बंडल. हेअर पिन्स. टिकल्यांची पाकिटे. एक साध्या लाल मोठ्या. एक अगदी बारिक आणि एक एकता कपुर मालिका टाईपचे. एक घडी केलेला रुमाल. एक चुरगळलेला रुमाल. एक लिप्स्टीक. एक जुनी संपलेली लिपस्टिक ( त्या नंबरची अजुन घ्यायचीय म्हणुन ) एक लिप ग्लॉस. एक पावडरची डबी, त्यातला आरसा फुटलेला म्हणुन एक वेगळा आरसा. पुरुषाना वापरता येणार नाही, अश्या साईझचा कंगवा. मोबाईल, मोबाईलचे विणलेले एक वेगळे कव्हर आणि न चालणारा चार्जर. एक एक्स्पायर झालेले डेबिट कार्ड. एक सुपारी एक रुद्राक्ष एक अक्षताचे पाकिट. एक सुकलेले फ़ुल. एका पुडीत अंगारा. एका वेगळ्या पुडीत काहि तांदळाचे दाणे. शिरडीच्या साईबाबाना देणगी दिल्याची पावती. टेलरकडे ब्लाऊज शिवायला दिल्याची जुनी रसीट. ( अरे ब्लाऊज आणायला गेले त्यावेळी नाही सापडली, तसेच दिले त्याने. ) आवळा सुपारीची दोन पाकिटे. एक उघडलेले. एका पुडीत लवंगा, आणि खडीसाखर. आयर्नच्या गोळ्याचे, दोनतीन गोळ्या असलेले पाकिट. ( अरे डॉक्टरनी घ्यायला सांगितल्या होत्या, मग मी सोडून दिल्या ) क्रोसीनची एक्स्पायर झालेली स्क्रिप. आणखी दोन गोळ्यांची स्क्रिप ( कसल्या असतील रे, आठवत नाही ) दोन बसची तिकिटे. एका चिठोर्यावर लिहिलेला एक मोबाईल नंबर ( कुणाचा असेल रे, आठवत नाही आता ) एका तुकड्यावर लिहुन घेतलेले छोल्याच्या मसाल्यांचे प्रमाण. चष्म्याची तुटलेली काडी. एक गॉगल. लेन्सची डबी. मासिकातील मेंदीचा कापुन घेतलेला नमुना. एक वर्तमानपत्रातले कात्रण. ( त्याच्या दोन्ही बाजुंचा संदर्भ आठवत नाही. ) विमानातील वेट टिश्युचे एक पाकिट. वेट टिशुजची एक डबी. एक जुना रेल्वेचा पास. कॉलेजचे जुने आयकार्ड. विणायची एक सुई. दोरा ओवलेली एक सुई. दोन बटणे. एक हुक. एक प्रेस करायचे बटण. एक नेलकटर. एक छोटी कात्री. एक दोन ईयर बड्स. छोटासा कापसाचा बोळा. एक पाकिटात पिंजर. हुश्श, पुढे लिहा.
|
Ajjuka
| |
| Friday, February 08, 2008 - 3:41 am: |
| 
|
काय सांगता? हे इतकं? नक्की केवढी पर्स होती? माझ्या पर्समधून (पर्स नव्हे खरं तर झोळीच) याच्या एक चतुर्थांश वस्तूही निघणार नाहीत. ना माझ्य मैत्रिणींच्या. पण माझ्या झोळीमधून वेगवेगळ्या प्रकारची पेने, ६ पेन्सिल्स चा सेट, खोडरबर, टोकयंत्र व स्केचबुक असं निघालेल पाह्यल्यावर एका मैत्रिणीलाच धक्का बसला होता.
|
बापरे..इतक्या पण वस्तु असु शकतात का bag मध्ये???नव्यानेच झाला हा साक्षात्कार... आणि दिनेश इतक सगळ तुमच्या लक्षात राहिल बर..
|
Athak
| |
| Friday, February 08, 2008 - 5:14 am: |
| 
|
दिनेश काही मुख्य वस्तु राहिल्या की राईट साईडच्या झिप मधे ठेवलेल्या घड्याळ (एक रेग्युलर अन एक कलर रिंगवाले (इथेही रंग आलेच एक घडाळ्याचा पट्टा बॅन्गल्स (कधीतरी घालण्यासाठी ) फ़ेस पाउडर (इकडे तिकडे सांडलेले अन डबीत थोडेसेच ) क्रीम हेअर क्लिप्स आय लायनर लेफ़्ट साईडच्या झिप मधे ड्रायव्हिन्ग लायसन्स 'की चेन' एक जुनी एक नवी घराची चावी गाडीची चावी एकदा तर स्कुटीचा जुना स्पार्क प्लग पण दिसला होता
|
Madhavm
| |
| Friday, February 08, 2008 - 5:21 am: |
| 
|
इतका कचरा purse मध्ये आणि आमच्या व्यवस्थीतपणाबद्दल ह्या बायका comments करणार? रंगामधले फारसे कळत नाही म्हणून बरे नाहितर 'राजा' colour का नाही म्हणून समानतेच्या बा.फ.वरती वाद घातला असता.
|
कय रे अथक तु न सांगताच bag check केलिस वाटतय...
|
Anaghavn
| |
| Friday, February 08, 2008 - 5:24 am: |
| 
|
दिनेश, आणि इतकं सगळं त्या मैत्रिणीने तुम्हाला दाखवलं? नक्कीच ती तुमची "फ़क्त मैत्रिण" असणार. कारण, "फक्त मैत्रीच्या" पुढे गेलेल्या प्रकरणार मुली अशी Risk घेत नाहीत.(नन्तर त्यच्यावरुन टोमणे ऐकायच काम नाही). अजुन काही वस्तु-- एखाद्या ड्रेस चे तुटलेले "क्रिस्टल मणी खडे वगैरे" कोणीतरी व्यक्तिची आठवण म्हणुन जपुन ठेवलेले काहीतरी (तुटलेले का होइना) एखादा फोटो. बाकीचं आठवल्यावर सांगेन.
|
Athak
| |
| Friday, February 08, 2008 - 5:33 am: |
| 
|
बाकीचं आठवल्यावर सांगेन. अनघा , बघ हे असं असत बायकांच त्या पर्समधे काय काय कोंबुन दडवुन ठेवलेल हेही त्यांना आठवत नसत
|
Manjud
| |
| Friday, February 08, 2008 - 5:34 am: |
| 
|
अरेच्या, हा बीबी 'पुरुष जन्माच्या कहाणीचा' आहे की 'स्त्री जन्माच्या कहाणीचा'? स्त्रियांच्या पर्सचा काय पंचनामा चालवलाय इथे.... पण हे असलं काही नसतं हां आमच्या पर्समधे जसं की..... १०० प्रती काढुन पाठवण्याचे आवाहन करणार्या पत्रकांपैकी दोन पत्रके. एक पाकिटात पिंजर. एकदा तर स्कुटीचा जुना स्पार्क प्लग तुम्ही लोक नशीब समजा की आम्ही पर्समधे ड्रायव्हिंग लायसन्स आणि रेल्वेचा पास ठेवतो. नाहीतर आम्हाला सोडवण्यासाठी तुम्हाला तुरुंगाच्या वार्या कराव्या लागल्या असत्या.
|
Anaghavn
| |
| Friday, February 08, 2008 - 5:41 am: |
| 
|
अथक अस काही नाही हं!! माझ्या memory बद्दल बोलायचं काम नाही हा!!! पण पुरुषा, तुझी कहाणी मध्येच कुठे गुल झालीये? या पर्स प्रकरणात तर तुझा काही छळ वगैरे होण्यासारख दिसत नाहिये मग तिथे का अडकलास? दुसरा ईश्यु काढ बघु आता, मग पदर खोचुन / बाह्या सरसाऊन येतो की नाही आम्ही ते बघ.
|
ता ना पि ही नी पा जा कींवा जानानाही पानी पी या रंगांशीवाय शिंचे आहेच काय दुनियेत?.. आणि यांचेच विविध प्रकार म्हणजे रंग. आहेच काय मुळी रंगात?.. पांधरा आणि काळा हे दोन रंग समजले की आणखी काय समजायला लागते जगात? पांधरा भातासाठी आणि काळा प्यांटीसाठी. अन्न आणि वस्र झाले. राहाता राहीला निवारा.. तो पामर नवर्यांना घरातही नाही मिळत.
|
दिनेश हे कळले नाही- मुलींच्या सामानाचे काय, पर्समधेदेखील कायकाय भरलेले असते, हे कधी बघितलेय का. मुली प्राण गेला तरी पर्सला, बाकि कुणाला हात लावु देणार नाहीत. त्यामुळे ती उचलायची वेळ मुलांवर कधीच येत नाही. baakee kuThehee haat laawoo deteel kaa?
|
Athak
| |
| Friday, February 08, 2008 - 6:04 am: |
| 
|
अगदी अगदी in general बायकांची memory म्हनजे ..... बोलायलाच नको retrieval at the wrong moments 'अहो आठवते का ..... ' फक्त फायद्याच्या गोष्टी बरोबर आठवणार बाकी 'छे छे मी अस म्हटलच नव्हते' दशरथा अरे तु विसरुन गेलास पण .... देवा रामा पुरुष जन्मा ही तुझी कहाणी
|
अथक गप्प बस रे...काही बोलु नकोस...स्त्रीयांची मेमरी शार्प असते खुप..तुम्हालाच खुपश्या गोष्टी आठवत नाहीत कुठे ठेवता ते...
|
Athak
| |
| Friday, February 08, 2008 - 6:16 am: |
| 
|
स्त्रीयांची मेमरी 'शार्प' असते खुप अगदी बरोबर
|
अगदी बरोबर हे कुत्सितपणे लिहिलय का ??? कारण एकदा मायबोलीवरच वाचल होत मी कि स्त्रीयांना देवाने एक अशी देणगी दिलीय जी सगळ्या गोष्टी track करते ते म्हणजे Uterus. it works as tracking device in body. त्यामुळेच पुरुषांना काही गोष्टी आठवत नाहीत.
|
Anaghavn
| |
| Friday, February 08, 2008 - 6:37 am: |
| 
|
(अथक)प्रयत्न करुनही जे पुरुषांना आठवत नाही ते बायकांना कुठलेही प्रयत्न न करता डोळ्यासमोर दिसते!!! बर्याचदा समोर ठेवलेला स्वत:चाच रुमालही दिसत नाही यांना... धांदरटच असतात मेले!!(नारायण मधल्या एका मावशींच्या तालावर)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|