|
Gobu
| |
| Thursday, February 07, 2008 - 12:20 pm: |
| 
|
"राणी" हे एका कलर चे नाव आहे हे मी पहिल्यांदा ऐकले ( स्त्रीयांकडुन अर्थातच!) तेव्हा माझा विश्वासच बसला नव्हता! "राणी" हे कलरचे नाव कसे असु शकते बुवा? वांगी... चटणी.... आंबा.... ओनिअन... अरे बापरे...
|
Zakki
| |
| Thursday, February 07, 2008 - 1:13 pm: |
| 
|
पुरुष लोकहो, तुम्ही का या रंगाच्या भानगडीत पडता? बोलू देत का्हीहि नि करू देत का्हीहि. आजकाल तर बायका पण पैसे कमावतात, घेतील आपल्या खर्चातून कुठल्याहि रंगाचे कपडे! तुम्ही त्या भानगडीत पडूच नका. भेट द्यायची असेल तर, पुस्तक किंवा सिनेमाची सीडी वगैरे द्या. शक्यतो हिंदी सिनेमाची. बर्याच बायकांना आजकाल लिहायची नि त्यापेक्षा त्यावर टीका करायची सवय जडली आहे असे दिसते.
|
Athak
| |
| Thursday, February 07, 2008 - 1:27 pm: |
| 
|
इतक्या असंख्य रंगातही रंगुन जात नाही त्याचे नांव पुरुष पुरुष जन्मा ही तुझी कहाणी
|
परवा काही बायका आपापल्या नवर्याला Choice कसा नाही यावर बोलत होत्या.. मी त्यांना म्हटलं 'आरसा बघितलाय का?'.. या प्रश्नावर एकीने तर मला खाऊ की गिळू अशी Reaction दिली.. पण लगेच तिची Tube पटली.. मग म्हणते... 'तेवढा एकच Choice बरोबर निघाला त्याचा'.. मी म्हटलं, 'आता बाकीचे त्याचे Choice काय आहेत, हे ठरवायला तुम्ही आहात ना...'
|
आयला राणी कलर ! म्हणजे नक्की गोरा की काळा ? आफ्रीकन देशातील राणी असेल तर ?
|
Amruta
| |
| Thursday, February 07, 2008 - 2:53 pm: |
| 
|
राणी कलर राणी कलर म्हणजे डार्क मरुन कलर. आणि कांदा कलर तर मला जाम आवडतो. आमसुली कलर ऐकलाय कि नाहि कुणि??
|
अमता आमसुली म्हणजे कोकमी रंग ना?? अग आणि राणी म्हाजे डार्क गुलाबी ना??? हो एक बेबी पिंक पण असतो तसंच डाळींबी, अंजीरी, बदामी. पण कांदा कलर मी आजच ऐकला\वाचला बाई
|
Itgirl
| |
| Thursday, February 07, 2008 - 3:26 pm: |
| 
|
हो अमृता, माहित आहे ग आमसुली रंग
|
बैंगणी रंग पण असतो.म्हणजे वांग्याचा रंग......
|
Dineshvs
| |
| Thursday, February 07, 2008 - 4:03 pm: |
| 
|
कुसुंबी, अंजिरी, विटकरी, अबोली, लिंबु, टोमॅटो, डाळिंबी, दुधी, बदामी हि पण रंगांचीच नावं बरं का !!! शिवाय दोन रंग एकत्र असले म्हणजे तो पिवळसर जांभळा कि जांभळट पिवळा, यावर कधीच एकमत होत नाही. साडीवर मॅचिंग ब्लाऊजपिस विकणार्या विक्रेत्याची मला खुप दया येते. त्याच्याकडे नसलेल्याच रंगाची साडी नेहमी त्याच्यासमोर टाकली जाते, आणि आजुबाजुच्या १७५६ छटा दाखवल्या तरी, तो रंग मॅचिंग नसतोच. शिवाय ती साडी, दुकानात, ट्युबलाईटच्या प्रकाशात, साध्या बल्बच्या प्रकाशात आणि दुकानाबाहेरच्या उजेडात, चार वेगवेगळ्या रंगाची दिसते, हे एक अजब प्रकरण आहे. BTW कुठलाही बीबी, कुठुनही, कुठेही नेण्याची एक कला राहिलीच कि.
|
Sahi
| |
| Thursday, February 07, 2008 - 4:08 pm: |
| 
|
धूपछाव म्हणजे फ़िरता कलर राहिला की
|
Athak
| |
| Thursday, February 07, 2008 - 4:12 pm: |
| 
|
कुठलाही बीबी, कुठुनही, कुठेही नेण्याची एक कला राहिलीच कि. धन्य आहेत या बायका हे सगळ सहन करत बिचारा पुरुष अश्या बीबी बरोबर आयुष्याची वाट चाल करतो पुरुष जन्मा ही तुझी कहाणी
|
>>BTW कुठलाही बीबी, कुठुनही, कुठेही नेण्याची एक कला राहिलीच कि.<< हो ना, खरंच की हा BB तर गरीब बिच्चार्या पुरुषांची दु:ख उगाळण्यासाठी आहे ना?? मग रंगांची चर्चा काय रंगवताय?? त्यांच्या दु:खाच्या रंगछटा वाचुयात इथे.
|
Amruta
| |
| Thursday, February 07, 2008 - 4:40 pm: |
| 
|
बैंगणी रंग वाचल्यावर धोंडोपंत आठवले नाहि नाहि इथेले धोंडोपंत नाहि. असा मी असामी मधले. 'तुझ्या बैंगणी रंगावर हा रंग शोभेल का?' अस ते आपल्या बायकोला विचारु पण शकत नाहित. त्यांना सगळे मळखाउ रंगाचे कपडे मिळतात.
|
Manuswini
| |
| Thursday, February 07, 2008 - 6:10 pm: |
| 
|
पण एवढी रंगावर चर्चा करताच कशाला. सगळ्यांना माहीती असेलच ना scientifically most of the men have color blindness . तुम्हाला चेक करायचे आहे की तुमचे 'अहो' आहेत का color blindness तर 'लाल' आणि हिरवा हे दोन्ही एकत्र दाखवा नी विचारा कोणता प्रखर आहे. त्यामुळे पुरुष रंगाच्या बाबतीत 'माठ' असतात ही चर्चाच मुळी संपेल. कसे?
|
मनुःस्विनी, तू बाई असून हे म्हणावेस? प्रश्न तो नाही आहे.. पुरुश सरळ कबूल करतात, 'आम्हाला रंग कळत नाहीत'.. पण बायकांना तेही पटत नाही.. त्याने 'रंग कळतच नाही' हे कबूल केलं तर त्याला 'काही कळतच नाही' म्हणायला तिला संधी कशी मिळणार.... 
|
Manuswini
| |
| Thursday, February 07, 2008 - 6:55 pm: |
| 
|
अहो तेच ते तर म्हणते मी, माठाला पुन्हा पुन्हा माठ म्हणण्यात काय point आहे? आता मी 'बाई' असून असे म्हणते म्हन्जी हेच ना,एक बाईच दुसर्या बाईला हे पटवून देवू शकते ना.. पुरुषांना ते जमायला हवे ना.
|
सरड्या सारखा रंग बदलणे हे या रंगा वरचि चर्चा वाचुन समजले P.S - हे वाक्य विनोदी या अर्थाने लिहीले आहे
|
Uday123
| |
| Thursday, February 07, 2008 - 9:45 pm: |
| 
|
धोंडोपंत कुठे आहात आपण? भाजीत तिखट जास्तच झाल कां? हा बीबी हायजेक होतो आहे, असाल तसे धावत या.
|
मुलांना सर्वात महत्वाचा त्रास होतो तो एअरपोर्टवर. मला तर मुली बरोबर असला की प्रवासात पोटात गोळाच येतो. आपली बॅग ही दुसर्या मुलांनीच उचलावी अशी या मुलींची इच्छा असते. आपली बॅग असते आधीच जड त्यातुन या मैत्रीणींच्या बॅगा पण उचलाव्या लागतात आणि एव्हढच नाही काहीकाही मुली तर एअरपोर्टवर ट्रॉल्या पण ढकलायला तयार नसतात. एव्हढेच जर त्राण नाही तर जडजड बॅगा आणताच कशाला??आम्ही यावर्षी मोठ्या ग्रुपने आलो आणि एयरपोर्टवरुन ट्रेनपर्यंत तिथुन पुढचा प्रवास होईपर्यंत बॅगा उचलुन उचलुन एक मित्र जाम वैतागला होता. धोंडोपंत तुमच्यावर स्त्रीयांनी हल्ला वगैरे तर नाही ना केला???तस झाल असेल तरी नाउमेद होऊ नका,पेटुन उठा आणि क्रांती घडवुन आणा(जरा लवकरच करा म्हणजे आमच लग्नाच वय यायला अजुन काही वर्ष आहेत त्याआधी क्रांती आणा). तुमच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठींबा आहे (फ़क्त बलिदान मागु नका,अजुन लग्न झालेल नाहिये माझ (आमची परिस्थिती समजुन घ्या)). एक दोन दिवसांपुर्वी तुम्ही अन्यायाला वाचा फ़ोडलीच आहे तर आता मागे हटू नका(पोस्ट टाका हो पुढची लवकर). होय,क्रांतिसाठी संघर्श हा व्हावाच लागतो त्यासाठी चांगले नेत्रुत्व आवश्यक असते,तुमच्यात ते गुण आहेत याचा मला विश्वास आहे(तुम्ही बळीचा बकरा नाही बर का). त्यामुळे वेळप्रसंगी स्त्रीयांकडुन मिळणार्या क्षणिक आनंदाला लाथ मारा आणि बंडखोर होऊन पेटून उठा(किती दिवस लाच खाणार). हे करताना समस्त स्त्रीयांचा सर्वात जवळचा सखा (म्हणजे अश्रु) तुमच्या बुलंद इराद्यांच्या मधे येणार नाही ना याची काळजी घ्या(इमोशनल ब्लॅकमेलला थारा देउ नका). धोंडोपंत आगे बढो हम तुम्हारे पिछे है(मागे वळुन पाहु नका मी कधीही मागच्या मागे पळुन जाऊ शकतो)!!!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|