Zakki
| |
| Wednesday, February 06, 2008 - 9:21 pm: |
| 
|
खरे तर बायकांचेच लक्ष नसते कोण काय बोलताय् याकडे. कारण मुळात सर्व बायका एकाच वेळी बोलत असतात, कुणीहि कुणाचे ऐकत नसते. मग तीच तीच गोष्ट परत परत सांगायला काही फरक पडत नाही. जसे इंडेक्स १ ने वाढवला किंवा कमी केला नाही तर लूप कधी पूर्णच होत नाही तसे. शिवाय सांगायची पद्धत म्हणजे, 'अग, हिच्या हिचे डोहाळजेवण आहे ना?' 'अय्या, मला वाटले, तिच्या त्या ह्याच्या हिचं केळवण आहे!' पुरुषांचे तसे नसते. एकदा सांगितले चुलत भावाच्या मुलीचे केळवण आहे की सगळ्यांना ते समजते, पुन: पुन: तेच तेच सांगावे लागत नाही. माझ्या अलास्का क्रूजबद्दल मी एक दिवस काय ते सांगितले. सौ. दर भीशीला (कदाचित् त्याच) गोष्टी गेली सहा महिने सांगते आहे, नि तरी पुढच्या भीशीला कुणितरी परत विचारेलच अलास्का क्रूज बद्दल!
|
Asami
| |
| Wednesday, February 06, 2008 - 10:26 pm: |
| 
|
पुरुषांचे तसे नसते. एकदा सांगितले चुलत भावाच्या मुलीचे केळवण आहे की सगळ्यांना ते समजते, पुन: पुन: तेच तेच सांगावे लागत नाही.>> आणी प्रत्येकाला वेगळे सांगावे लागत नाही हे राहिलेच कि हो राणिचा maayboli id नाहिये ही किती सुखाची गोष्ट आहे
|
Asami
| |
| Wednesday, February 06, 2008 - 10:28 pm: |
| 
|
तो ओला टॉवेल अंग पुसलेला पण बेडवर टाकायचा... अतीशय घाणेरडी सवय असते ही काही पुरुषानां.>>अग जमिनीवर टाकला तर घाणेरडा नाही का होइल ? मग तो परत वापरला तर तू म्हणशील " काय बाई घाणेरडे पुरूष असतात "
|
Manuswini
| |
| Wednesday, February 06, 2008 - 11:39 pm: |
| 
|
असामी, अहो पण बाथरूम मध्ये धूवायला लगेच टाकला तर काय कष्ट पडतात का हो? पण सवयीचे गुलाम पुरुष म्हणजे...
|
Zakasrao
| |
| Thursday, February 07, 2008 - 1:48 am: |
| 
|
गुण उधळण छान सुरु आहे माझ लग्ना ठरल्यापासुन मला राणी,वांगी,मोरपंखी,चटणी अशी नवीन रंगांची नाव कळाली आहेत. (मी नाव म्हणतोय रंग नव्हे ) मी आपला अज्ञानी रंग हे ७ असतात ह्या (गैर)समजुतीत होतो किती दिवस. बायकांची अजुन एक खोड म्हणजे बाहेर जायच असल की आवरायला वेळ लावणे आणि ड्रायविंग बद्दल तर बोलुच नये. पुण्यात दुचाकी चालवत असाल आणि इंच इंचाने पुढे जात असताना तुम्हाला जर तुमच्या पुढे एखादी कार जर अडवत असेल तर नेमक ड्रायव्हर सीट वर एखादी स्त्रीच असते. वळताना कोणता इन्डिकेटर सुरु आहे ह्यासारखी फ़ालतु बाब तर बायका लक्षातच घेत नसाव्यात. गोबु तुझ्या म्हणण्यात फ़ारच तथ्य आहे रे. आणि हो मनातल्या भावना समजुन घ्यायला प्रत्येक पुरुष हा त्या "अगबाई अरेच्च्या" मधल्या संजय नार्वेकरसारखा "दैवी देणगी" लाभलेला नसतो ही बाब बायकांच्या मेंदुत कधी घुसेल तो सुदीन
|
Anaghavn
| |
| Thursday, February 07, 2008 - 5:51 am: |
| 
|
गोबु, असुये बद्दल बोलत नाहीये मी----"मनात येणारा कमीपणा"-- आधी वाटेल की बायको दुसर्याची एव्हढी प्रशंसा करत आहे, माझ्यातही हे पाहीजे, आणि आपल्यात ते येउ शकत नाही असं लक्षात आल्यावर मग? उपाय काय?--"बायकूवर संशाय"--- best solution --- म्हणजे बायको गप्प बसते.
|
Milya
| |
| Thursday, February 07, 2008 - 6:09 am: |
| 
|
असामी, अहो पण बाथरूम मध्ये धूवायला लगेच टाकला तर काय कष्ट पडतात का हो? >>> अहो पण सारखा धुवुन धुवुन तो फ़ाटेल ना... मागे एकदा दामट्या नावाच्या id ने मी एकच शर्ट महिनाभर रोज घालतो आणि मळला की मग धुवायला टाकतो.. सारखा सारखा धुवुन तो फ़ाटेल की असे म्हणले होते तेव्हा स्वप्ना ने किती मोठ्ठे डोळे केले होते... हो की नाही असाम्या पण पुरुषांना अगदी २-४च ठळक रंग कळतात आणि बायकांना मात्र नको इतके रंग समजतात हे एकदम पटलं >>> आणि त्यातून एखादा रंग समजलाच नाही बायकांना तर तो ग्रे असतो राणिचा maayboli id नाहिये ही किती सुखाची गोष्ट आहे >> असाम्या एवढे सुख सगळ्यांना कुठचे मिळायला? 
|
Manjud
| |
| Thursday, February 07, 2008 - 6:27 am: |
| 
|

|
Giriraj
| |
| Thursday, February 07, 2008 - 8:50 am: |
| 
|
एकदा 'आंबा कलर' ऐकून अजून कित्येक फ़ळांचे रंग आठवून पाहिले होते!
|
इश्श्य या साठी का करतात बायका लग्न??? मंज़ु अक्षी लय भारी की काय म्हणतात तसेऽगदी ह. ह. पु. वा.     एक रामा कलर पण असतो म्हणे.
|
Ashwini_k
| |
| Thursday, February 07, 2008 - 10:02 am: |
| 
|
चिकू तसेच कान्दा कलर पण असतो. त्याहीपेक्षा मी एका मैत्रिणीकडून श्रीखंडी व पुरणपोळी कलरही ऐकला आहे. माझी तर कल्पनाशक्ती चालेनाशी झाली. आता तिच्याशी कॉन्टक्ट नसल्याने उर्वरीत पक्वान्ने बचावली.
|
Psg
| |
| Thursday, February 07, 2008 - 10:12 am: |
| 
|
मन्जू जबरी आहे.. अगदी लॉजिकल कारणं आहेत की.. अश्विनी, कांदा कलर????? हांऽऽऽऽ आता मला कळलं की माझ्याकडे एक साडी आहे त्याचा रंग कोणता आहे ते.. येस.. कांदा कलरच तो!
|
हो असतो ना onion color म्हणतात त्याला.. आणि wine color पण असतो माहितिय का???
|
Monakshi
| |
| Thursday, February 07, 2008 - 11:00 am: |
| 
|
हो हो वाईन कलर असतो ना. आमच्या लग्नात reception ला माझ्या नवर्याचा वाईन कलरचा शर्ट होता. नातेवाईक म्हणाले सुध्दा काहीतरी वाईन वाईन ऐकू येत होतं आम्हाला आपलं वाटलं लग्नात वाईन ठेवलीये पण नंतर कळलं वाईन कलरच्या शर्टाबद्दल बोलत होते.
|
Anaghavn
| |
| Thursday, February 07, 2008 - 11:00 am: |
| 
|
c language शिकताना काही विशिष्ठ colours असतात, ज्याला technical language मध्येच नावे ही आहेत. मी पहील्यांदा जेव्हा c language शिकवत होते, त्यावेळेस बोली भाषेमध्ये नावे सांगितली होती. नन्तर भयंकर ओशाळायला झालं होतं (घरी गेल्यावर)!!! मंजु तुझं लग्नाच्या करणांच post बघितल्यावार मला आता motivation च मिळालं आहे. काही मजाच येत नव्हती.
|
Meggi
| |
| Thursday, February 07, 2008 - 11:05 am: |
| 
|
पूनम, आत्तापर्यंत त्या साडीला ' ग्रे ' कलरची साडी समजायचीस का? :D :D
|
Manjud
| |
| Thursday, February 07, 2008 - 11:22 am: |
| 
|
btw ही मेल मी नवर्याला फॉरवर्ड केली आहे. comments are expected ..... पण मला वाटतं ते मंगळसुत्राचं कारण तो १००% मान्य करेल. त्या onion colour ला माझा नवरा दाणा कलर म्हणतो. म्हणजे चांगलं आहे त्याचं रंगज्ञान!!
|
मंजु onion color ला दाणा कलर???काय logic आहे ग??की सगळ्या नवर्यांच असच होत का लग्नानंतर?? मोठ्ठ question mark असलेली स्मायली...
|
Anaghavn
| |
| Thursday, February 07, 2008 - 11:58 am: |
| 
|
माझा नवरा मला सारखा म्हणायचा की "माझा (म्हणजे त्याचा) choice तुझ्यापेक्षा(म्हणजे माझ्यापेक्षा) जास्त चांगला आहे". एकदा मी ठासुन म्हणालेच-- "होच मुळी" तुझा choice च चांगला निघाला. गप्प बसला बिचारा!!!!! आता कध्धी कध्धी तो मला अस म्हणत नाही. b.t.w. दाणा कलर म्हणजे कोणता ग?
|
Manjud
| |
| Thursday, February 07, 2008 - 12:13 pm: |
| 
|
अगं दाणा कलर म्हणजे ओनिअन कलर.... आता झक्कीकाका परत म्हणतील, ह्या बायका एकच गोष्ट परत परत फिरवून फिरवून सांगतात...
|