|
फेब्रुवारी महीना उजाडला की ज्याला त्याला वेध लागतात ते valentine's day चे..तुमच काय मत आहे?? valentine's day celebrate करण कितपत योग्य आहे???
|
Anaghavn
| |
| Thursday, February 07, 2008 - 11:17 am: |
|
|
मला वाटतं की या सणावरुन वाद घालण्यात वेळ घालवण्या पेक्षा आपल्या लाडक्या व्यक्तिंसाठी तो दिवस्/ दिवसाचे काही तास द्यावेत. चुक की बरोबर यात अडकण्यात काय अर्थ आहे? ह, आता कोणी या प्रकाराचा गैरफायदा घेऊ नये म्हनुन जरुर जागरुक रहावं. कोणत्या मुलीला काही त्रास होऊ नये वगैरे उद्देश चांगले आहेत, पण उगाचच दुकानात जाऊन तोडफोड करण्याला काही अर्थ आहे अस वाटत नाही. दुसर्या देशात का होइना पण अशी एक व्यक्ति होउन गेली आहे, जिने आपल्या प्रिय व्यक्तिसाठी काही उल्लेखनीय केले, त्या दिवसाची ही आठवण, इतका साधा अर्थ घ्यायचा सोडुन काय मारामारी करत बसायची? आता उद्या तिकडच्या लोकांनी जर राखीपोर्णिमा / पडवा(दिवाळीचा) / गुरुपोर्णिमा असे सण साजरे केले तर काय आपल्याला वाईट वाटणार आहे? की लगेचच तिकडच्या लोकांनी तिथे जाळपोळ किंवा तोडफोड करायची?
|
अनघा पुर्णपणे सहमत...पण काही प्राणी असतात ना गरम डोक्याचे. आम्ही नाही करत साजरा मग तुम्ही ही करायच नाही अस... असो प्रत्येकाची मत वेगवेगळी असु शकतात ना...व्यक्ति तितक्या प्रकृती...
|
Satishbv
| |
| Thursday, February 07, 2008 - 11:44 am: |
|
|
४-५ वर्षांपुर्वी या विषयावर मी BB उघडला होता. त्यावर इतके वाद झाले की शेवटी तो moderator ने बंद केला. माझ्या मते वर्षाचे ३६५ (यावर्षी ३६६) दिवस प्रेमाचे असतात असे मानणार्या आपल्या देशाला या अश्या वेगळ्या दिवसाची गरज नाही. नाही म्हणायला देशात पाय रोवु इच्छीणार्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना marketing साठी मात्र हा दिवस पर्वणीचा ठरतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|