|
Deshi
| |
| Tuesday, February 05, 2008 - 7:42 pm: |
| 
|
नवर्याला स्त्री मैत्रीनी असल्याकी लगेच संशयी वृत्ती जागृत होनार पण बायकोच्या मेल मित्रांबद्दल काही बोलले की " तु ना अगदी जुन्या विचाराचा आहे " अशी पुस्ती मिळनार. दुसर्या पुरषाने जर स्तुती केली की त्याला सोंद्र्य दृष्टी की काय ते आणि मी एकाद्या बाई, मुलीची सुस्ती केली की लगेच " सारख नको तिकडे लक्ष असते, मला नाही म्हणत कधी चांगले " चित भी मेरी ओर पट भी.
|
Maanus
| |
| Tuesday, February 05, 2008 - 8:10 pm: |
| 
|
बायकांबरोबर shopping ला जाणे म्हणजे एक दिव्य असते. प्रचंड पेशंस ठेवावा लगतो. शुज खरेदी सोडुन बाकी कोणत्याही खरेदी साठीचा पेशंस आता माझ्यात develop झालाय. तीन वेगळ्या वेगळ्या मुलींबरोबर शुज घ्यायला गेलो होतो, तीघींनीही चार चार तास लावले शुज खरेदीसाठी.
|
Zakki
| |
| Tuesday, February 05, 2008 - 9:04 pm: |
| 
|
तीन वेगळ्या वेगळ्या मुलींबरोबर शुज <....> नि त्यातली एकहि तुझी बायको नाही. भल्या माणसा, लग्न झालेल्या कित्येक पुरुषांना तुझा हेवा वाटेल. अर्थात् त्या वेगळ्या वेगळ्या मुली त्याच्या बहिणी नसतील तर!
|
Deshi आनि manus - १००% अनुमोदन अजुन एक गम्मत म्हणजे लग्नाच्या आधीच्या मित्राची ओळख मुलानशी करुन देताना "मामा" अशी करुन देणे खरेदी नुस्तीच होत नाही त्यानन्तर "returns" साठी अजुन एक चक्कर होते मग परत खरेदी aani parat returns
|
Manuswini
| |
| Tuesday, February 05, 2008 - 10:25 pm: |
| 
|
हळु हळु एकेक जणं बिळातून बाहेर येवून हातभार लावताहेत ह्या बीबीला स्त्री जाचाबद्दल लिहून. चालु द्या.जरासे कळेल की उधर भी क्या दर्द होता है हलकेच हलकेच घ्या हं.....
|
Arch
| |
| Tuesday, February 05, 2008 - 10:31 pm: |
| 
|
एकदा मुलीबरोबर shopping ला जाऊन चार तास लागतात shoes घ्यायला हे कळल्यावर अजून दोनदा जाण्यात काहितरी आनंद मिळत असल्याशिवाय जाणं म्हणजे निव्वळ ..... 
|
Shonoo
| |
| Wednesday, February 06, 2008 - 2:35 am: |
| 
|
माणसा तुझा लेट करंट असल्याने तुला कळलं नसेल कि शूज घ्यायला चार तास का लागतात ते :-)
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 06, 2008 - 3:17 am: |
| 
|
हे सगळे लाईटली घ्यायचे आहे, साधारणपणे दोन किंवा तीन मुली रस्त्याने जात असल्या कि, त्या कधीच एकामागे एक अश्या जात नाहीत, तसेच मुलांसारख्या लगटुनही चालत नाहीत. बरं त्यांचा वेग म्हणजे, गजगति. आता मागच्या माणसाची पुरती नाकाबंदी. त्यात समोरुन एखादी बारिकशी ओळखीची मुलगी येताना दिसली कि सगळ्या थांबल्याच. मग तिथे गॉसिप सुरु. दादरला, रानडे रोडच्या सिग्नलपासून शिवाजी मंदीरकडे, जाताना याचा अनुभव हमखास येतोच. आणि त्यात एखादी वस्तु घेत बसल्या म्हणजे विचारु नका. सगळी उचकापाचक करुन, त्या विक्रेत्याला पिडुन आपण त्या गावचेच नाही असे भाव आणत चालु पडणार, मग त्या विक्रेत्याच्या मनधरण्या, बहेनजी पचासमे लेलो, अच्छा चालीस देदो, असे करत तो पायर्या उतरणार, आणि मानापमान मध्यल्या भामिनी प्रमाणे, येत येत, आमी नाई जा, करणार्या बाया, हे पण तिथले नेहमीचे दृष्य.
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 06, 2008 - 3:30 am: |
| 
|
एखादी मुलगी ए टी एम मधुन पैसे कसे काढते, बघितले आहेत का कधी ? खास पुण्याचा नमुना. आधी ए टी एम समोर गाडी पार्क करायचा प्रयत्न करणार. परत एकदा प्रयत्न करणार. आणखी एकदा प्रयत्न करुन, प्रयत्न सोडुन देणार. मग बाईकच्या आरश्यात पाहुन घेणार. मग पर्समधे काहितरी शोधणार. मग ए टी एम मधे शिरतानाच याना मोबाईलवर फोन येणार. दारातच थोडावेळ बोलणे, मग मागच्याने योग्य ते हावभाव केले कि बाई आत जाणार. आणि आतमधुन संभाषण सुरु ठेवणार. मग तिथे आरसा असलाच तर त्यात बघुन, केसाची बट मागे करणार. मग पर्समधे कार्ड शोधणार. मग कार्ड आत सरकवायचा प्रयत्न करणार. आणखी एकदा प्रयत्न करणार. मग ते कार्ड बाहेर आले कि ते दुसरेच कार्ड आहे, हे यांच्या लक्षात येणार. मग परत पर्समधे कार्ड शोधणार. तोवर फोन चालुच असतो. मग थोडावेळ कार्ड हातात धरुन, स्क्रीनवरचा सिनेमा बघणार ( हो काहि स्क्रीनवर जाहिरातीच्या क्लिप्स दिसतात ) मग आपकि भाषा चुनिये, या प्रश्नावर मिनिटभर विचार करणार. मग पिन आठवायचा प्रयत्न करणार. आठवलेला एक नंबर दाबणार. मग तो चुकीचा आहे हे लक्षात आल्यावर दुसरा एक नंबर दाबणार. मग तो रिजेक्ट झाल्यावर पर्समधल्या एका चिठोर्याची शोधाशोध करणार. मग टेंशन. मग फोन बंद करणार. मग नंबर विचारण्यासाठी, आई, बाबा किंवा ह्याला फोन करणार. तो नंबर दाबला तरिही रिजेक्ट होणार. मग परत फोन करणार. मग लक्षात येणार कि कार्ड दुसर्याच बॅंकेचे आहे. मग अय्या म्हणुन, जिभ चावत बाहेर येणार. परत दुसर्या ए टी एम कडे जाणार. पुढे लिहु का ? दिवे घ्या हो.
|
Athak
| |
| Wednesday, February 06, 2008 - 5:13 am: |
| 
|
दिनेश बायका ह्या अश्याच पुरुषाला याचा किती त्रास होतो हेही नमुद करायला हवे बायकांच ड्रायव्हिन्ग हा एक मोठा विषय होवु शकेल सोबत बसला तर पुरुषाला जिव मुठीत ठेवुनच बसायला लागत बिचारा कितीही शांत असला तरी ओरडतोच अन ओरडल तर 'तुमच्या ओरडण्याचेच चुकत' हे ऐकाव लागत पुरुष जन्मा ही तुझी कहाणी
|
Anaghavn
| |
| Wednesday, February 06, 2008 - 5:14 am: |
| 
|
अहो उदय भाऊ. हा बीबी "गंमत म्हणुन" उघडला गेला असल्याचं मी वाचलं आहे. त्यामुळे त्यानुसार lightly च लिहिलं आहे. माझी वाक्य रचना जरा मनातल्या मनात म्हणुन बघा, त्यातल्या खोचा लक्शात येतील तुमच्या. पण जर गंभीर पणे वादावादी करायचि असेल तर दुसरा बीबी उघडा, मी येते तिथे. या बीबी ची गंमत कशाला घालवायची.ती लज्जत तशीच राहू देऊ यात.
|
Manjud
| |
| Wednesday, February 06, 2008 - 5:46 am: |
| 
|
दिनेशदा, अतिशय अचूक ऑब्झर्वेशन आहे. अथकशेठ, मी म्हणतच होते अजून ह्या BB वर 'बायकांचं ड्रायव्हिंग' कसं आलं नाही अजून.. सही लिहिलंय.
|
अरे बापरे खुपच जोरात चर्चा चालु आहे.पण कसही आणि किति ही असुदे स्त्री म्हणजे असुन खोळंबा आणि नसुन कुचंबणा अशी गत आहे एकुणच. म्हणतात ना तुझ माझ जमेना आणि तुझ्यावाचुन करमेना त्यातलच काहिस...
|
Dhondopant
| |
| Wednesday, February 06, 2008 - 6:05 am: |
| 
|
श्या... जिथे पुरुषांचा अत्मसन्मानच राहीला नाही शिंचा तिथे दांभिकतेच काय घेवुन बसलात... आप मेला जग बुडाले अब्रु गेली वाचतो कोण?.. पहा पहा हा दैवदुर्विलास. ज्यांच्या आत्मस्न्मानासाठी धीराने बीबी उघडावा त्यांच पुरुषातील एका " बी " ने या प्रकारे उपमर्द करावा हे कोणत्या मर्दपणाला शोभुन दीसते ते सांगा.. दांभिकतेचा हा आरोप आमच्या अंगाला सहस्त्र इंगळ्या डसल्याप्रमाणे वेदना देवुन गेला आणि तो ही कुणी करावा?.. ज्यांच्या पोस्टस आम्ही वाचतो आणि ज्यांना मानतो त्याच त्या मायबोलीवरच्या एका पुरुषश्रेष्ठाने?.. आता कोणत्या तोंडाने आम्ही मायबोलीवर ईथे यावे आणि आमचे गार्हाणे गावे? न्यायाची या जगात काहीच चिड नाही काय? पण नाही.. हा अन्याय कदापि सहन करणार नाही. हा आरोप आम्ही केवळ अमान्य करतो. अरे धुत..!!दांभिकतेचे धडे आम्हाला देण्यापुर्वी ईथे येवोन पाहा बरे जरा कीती नवरे उच्चरवाने आपल्या हतबलतेचे ज्ञात अज्ञात प्रसंग कथन करताहेत... हे थोडे म्हणुन की काय ईथले समस्त पुरुष " हे सर्व लाईटली घ्यायचे आहे " असे पुन्हा पुन्हा सांगत आहेत. म्हणजेच " नाही ग, मला तस म्हणायच न्हवत " असे नरो वा कुंजरो वा स्प्ष्टीकरण देता यावे. खोटा आय्डी घेवुनही भिणार्या आणि गलितगात्र होवुन आपली कथा सांगणार्या माझ्या बांधवानो... या, रणांगणात घायाळ झालेल्या नरवीरांनो तुमच्या कहाण्या ईथे वाचल्या जातील आणि हा बी बी नवरेपण अस्तित्वात असेपर्यंत याव्वचचंद्रदीवाकरौ असाच चालु राहील याबाबत आमच्या मनात काहीयेक शंका नाही.
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, February 06, 2008 - 6:15 am: |
| 
|
बायको (ऑफिस मधल्या नवर्याला फोन वर) : हॅलो... अहो तुम्ही घरी केव्हा निघताय?... नवरा : आहे अजून अर्धा तास.. का ग? बायको : मी लक्ष्मी रोड वर खरेदी करतेय.. मला इथून pick up करा ना जाताना.. मग मी अर्ध्या तासात अजून काही खरेदी करेन.. नवरा : अग पण मी म्हात्रे ब्रीज वरून नीलायम कडे जातो माहिताय ना? बायको : मग त्यात काय मेलं? रस्त्यातच तर आहे की.. तिथून इथे यायला असा किती वेळ लागतो? नाहीतरी कार मध्ये एकटेच असता.. मग येताय ना मला घ्यायला? नवरा : .... .... पुरुष जन्मा...
|
Slarti
| |
| Wednesday, February 06, 2008 - 8:02 am: |
| 
|
बायकांना रंग व त्यांच्या छटांचे अतोनात ज्ञान का असते ??!! बायकांचे ते प्रसिद्ध सहावे इन्द्रिय हेच असावे. एक तर खरेदीला गेलो की 'सक्रिय सहभाग' दाखवावा लागतो. त्या वेळी "अगं तुझ्याकडे असाच निळा ड्रेस / कानातले / गळ्यातले आहे की" असा सक्रिय सहभाग दाखवला तर "तो ड्रेस egyptian blue आहे, हा navy blue आहे" अशी शिकवणी मिळते आणि "मला खूप दिवसांपासून ही shade घ्यायची होती" हे वर. मला तर सर्व काही 'निळे' एवढेच दिसते. त्याशिवाय, पुरूषांसाठी (बाप, भाऊ, मित्र, नवरा होणारा मित्र, नवरा कोणीच सुटत नाही) कपडे निवडण्याचा सोस तर अमर्याद आहे... त्यांचा दोष नाही कारण 'पुरूषाला dress sense नसतो, colour sense नसतो' ही त्यांची समजूत जनुकीयच आहे. "तुझ्याकडे जी blue denim आहे त्यावर तू घालतोस त्या steel blue शर्टापेक्षा हा royal blue शर्ट जास्त छान दिसेल" हे एक वैश्विक सत्य म्हणून स्विकारायचे असते. (त्याने आत्मसन्मानास ठेच बसत नाही. अशा वेळी वाद घालायचा प्रयत्न केला तर मात्र नक्की ठेच बसते.) आयुष्यात एकदा तरी रंगांधळी बाई भेटावी अशी माझी जुनी व फार तीव्र इच्छा आहे.
|
स्लार्टी एकदम पटलं, एकदम.. मी साडी खरेदी ह्या भयानक प्रकारात देखील सहभाग दिलेला आहे. (जिच्याबरोबर साडी खरेदी करायला गेलो ती आता कुणा दुसर्याबरोबर हक्काने साडी खरेदी करायला जाते हा भाग अलाहिदा).. आता मला सर्व निळ्या रंगाच्या साड्या ह्या मोरपंखी दिसतात. किंवा साधारण निळा रंग दिसला की मी छान मोरपंखी आहे असे ठोकुन देतो. आता ह्यावरुन 'तुला कुठला रंगच कळत नाही', किंवा 'तुला ना माझ्याबरोबर यायलाच आवडत नाही' असे वाट्टेल ते संवाद (व त्यातुन निपजणारी भांडणे) हे सगळे सहन करायला लागते. म्हणजे एकतर हा खरेदीचा भयानक अन्याय सोसा आणि वर भांडण पण. मैत्रीण असण्याची चांगली बाजु म्हणजे स्वत्:च्या कपड्यांच्या खरेदीतुन मुक्तता. त्या फार उत्साहाने जीन्स पासुन फॉर्मल शर्ट पर्यंत सगळे काही घेवून येतात. ते सुद्धा चांगले कपडे, मापात बसणारे वगैरे वगैरे.. सध्या मला स्वत:ला खरेदी करायला लागत आहे. त्यामुळे एकही शर्ट मापाचा नाहीये, सर्व पॅंट काळ्या रंगाच्या, शर्ट नेव्ही ब्लू आणी जीन्स गडद निळ्या रंगाच्या आहेत.
|
Psg
| |
| Wednesday, February 06, 2008 - 10:12 am: |
| 
|
शर्ट नेव्ही ब्लू आणी जीन्स गडद निळ्या रंगाच्या आहेत. टण्या, म्हणजे 'मोरपंखी' रंगाचे किती कपडे झाले अरे तुझ्याकडे ~D पण पुरुषांना अगदी २-४च ठळक रंग कळतात आणि बायकांना मात्र नको इतके रंग समजतात हे एकदम पटलं अजून एक म्हणजे 'खोली अगदी नीट साफ आहे' याचा अर्थ 'खोलीतली कपाटं बघू नयेत.. खोलीमधले असलेले सर्व अतिरिक्त सामान त्या कपाटात कोंबले आहे आणि कपाट उघडताच हे सगळं शब्दश: बाहेर सांडेल' असा असतो
|
Slarti
| |
| Wednesday, February 06, 2008 - 10:28 am: |
| 
|
आमचया लेखी 'खोली साफ आहे' याचा अर्थ 'खोलीत जर अचानक पाहुणे आले तर खोली पाहून पाहुण्यांना आणि खोलीत पाहुण्यांना पाहून आम्हाला लाजल्यासारखे होणार नाही' असा आहे. पाहुणे कुठे कपाटे उघडत बसणार आहेत
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|