|
काय चर्चा करावी बर?
|
Sanish
| |
| Sunday, February 03, 2008 - 4:55 am: |
| 
|
bb सुरू करण्याचा जो उद्देश आहे त्यावर करा
|
पुरुष जन्मा ही तुझी कहाणी, ह्रदयी 'प्रीती', नयनी 'राणी'!! 
|
सर्व स्त्रीयांनी त्यांच्यावर होणार्या अन्यायांना समानता मधे वाचा फोडली आहे. मग हा बिबि सुरु करणे हा पुरुषांचा हक्कच आहे. अरे जरा आपल्यावर होत असलेले अन्याय मांडा!!!!! १ लोकल मधे बायकांच्या डब्ब्यात आम्ही चढु शकत नाही. पण बायका मात्र कित्येक वेळा त्यांचे डब्बे सोडुन बाकि डब्ब्या मधुन प्रवास करतात. हे चालणार नाही. बायकांनी पुरुषांच्या डब्ब्यातुन प्रवास करता कामा नये. आम्हाला विनाकारण त्यांचे ते 'घाणेरडे स्पर्श' त्यांच्या 'त्या नजरा' सोसावे लागतात. २ बायकांच्या डब्ब्यामधे पुरुष हवालदार असतो. तसाच पुरुषांच्या डब्ब्यामधे आमच्या सुरक्षिततेसाठी एक स्त्री हवालदार हवी. ३ महाविद्यालयांमधे लेडिज रुम असते. तशी जेन्टस रुम प्रत्येक महाविद्यालयांमधे का नही? आम्हाला पण काही प्रायव्हसी नको का? ४ सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांना सक्त ताकिद दिली जावी. सारखे सारखे, माहेरची साडी, वहिनींच्या बांगड्या असले चित्रपट काढु नये. फक्त स्त्रीयांच्याच भावनांचा का उहापोह? वर्षाला कमीत कमी पाच तरी पुरुष प्रधान चित्रपट काढले गेले पाहीजेत. ( त्यात काय दाखवायचे हे हुशार लोकांना सागायची गरज नाहीच. सर्वश्रुत आहे) ५ घरकामामध्ये स्वता:ला सगळी सोप्पी कामे उदा. फोडनी देणे, भाजी शिजवणे, पोळ्या भाजणे वगैरे स्वता:कडे घेउन पुरुषांना सगळी हलक्या जातीची आणी अवघड कामे देणे उदा. कणीक मळने, कांदा कापणे, टोमॅटो चिरणे वगैरे हे बायकांचे दुटप्पी धोरण आम्हाला मान्य नाहि.
|
परवा मी सुट्टी होती म्हणून मासे आणायला गेलो. काउंटर वर मी सोडुन सगळ्या बायका मी आपला वाट बघतोय कि तोप काउंटर वरचा माणुस आत्ता आपली ओर्डर घेईल मग घेईल पण हा पठ्ठ्या लक्षच द्यायला तयर नाही. मी शेवटी कंटाळुन "excuse me, cant u see me, I am also standing here" तो निर्लज्ज वरुन मलाच म्हणतो "लेडिज फर्स्ट" मग मी खणखणीत (पुणेरी) आवाजात " Then kindly do one thing arrange for one girl on this counter who will serve gents first" (ईतक्या) सगळ्या बायका माझ्या कडे बघुन हसत होत्या (आयष्यात पहिल्यांदाच). त्याने बिचार्यने लगेच पुढची ओर्डर माझी घेतली.
|
Hkumar
| |
| Sunday, February 03, 2008 - 11:23 am: |
| 
|
'हातपाय हलवा आणि अधिक पैसे मिळवा' हे टुमणे पुरूषांच्यामागे असतेच!
|
Zakki
| |
| Sunday, February 03, 2008 - 3:14 pm: |
| 
|
पुरुषांना सगळी हलक्या जातीची आणी अवघड कामे देणे उदा. कणीक मळने, कांदा कापणे, टोमॅटो चिरणे अरे बापरे, आजकाल पुरुष का करतात ही कामे! धन्य आहे हो या बायकांची. समानता हवी म्हणून आजकाल कुठल्या थराला पोचल्या या! खरे तर आमच्या घरी सुद्धा मला शंका येते की ही आजकाल जरा वेगळीच झाली आहे. परवा मला चक्क म्हणाली की अहो, चहाचा रिकामा कप उचलून स्वैपाकघरात आणून ठेवत जा! घ्या, म्हणजे आता हेहि मीच करायचे?! हद्द झाली! उद्या म्हणेल, काढलेले कपडे उचलून ठेवत जा! आजकाल कुठलीहि गोष्ट एकदम टोकाला न्यायची पद्धतच झाली आहे!

|
Sashal
| |
| Sunday, February 03, 2008 - 8:56 pm: |
| 
|
आजकाल कुठलीहि गोष्ट एकदम टोकाला न्यायची पद्धतच झाली आहे! >>> बरोबर आहे, समानतेचा BB बायकांनी चालू केला मग पुरुषांनी नको??? लोकल मधे बायकांच्या डब्ब्यात आम्ही चढु शकत नाही. पण बायका मात्र कित्येक वेळा त्यांचे डब्बे सोडुन बाकि डब्ब्या मधुन प्रवास करतात. हे चालणार नाही. बायकांनी पुरुषांच्या डब्ब्यातुन प्रवास करता कामा नये. आम्हाला विनाकारण त्यांचे ते 'घाणेरडे स्पर्श' त्यांच्या 'त्या नजरा' सोसावे लागतात.>>> पुरुष आणि स्त्रीया almost समप्रमाणात आहेत population मध्ये तर ९ डब्यांच्या गाडीत फ़क्त दोनच डबे बायकांना??? ही कुठली समानता???
|
Manya2804
| |
| Monday, February 04, 2008 - 6:14 am: |
| 
|
पुरुष हा क्षणाचा पती आणि अनंतकाळचा पतीत आहे - असं पु.ल. म्हणाले होते (पहा : बटाट्याची चाळ - आगामी आत्मचरीत्र)
|
जर तुम्हाला ते डब्बे कमी वाटत असतील तर सरकार ला सांगा त्यांची संख्या वाढवयाला. आम्हाला का जाच म्हणतो मी??? जाउ दे नाहीतर आम्हीच आंदोलन करतो आमच्यासाठी सुध्धा काही डब्बे राखीव ठेवा म्हणून. जिथे बायकांना आजिबात प्रवेश नसेल.!!! नुसता आठवले तरी काटा येतो हो अंगावर. अजुन काही मुद्दे. १ प्रत्येक वेळेस लेडिज फर्स्ट का म्हणून? म्हणजे बघा ना कुठल्याहि नात्यात पहिल्यांदा स्त्रीचे नाव उदा. आई-बाबा, स्त्री-पुरुष, बहिण भाउ वगैरे वगैरे........ २ आपल्या पुर्वजांनी सुध्धा स्त्री ला भलतेच लाडावुन ठेवले आहे. भाउबीज, रक्षाबंधन, पाडवा वगैरे सगळ्या सणांना आम्हाला त्यांना ओवळणी द्यावी लागते. असा एखादा सण सुरु करा कि ज्यात स्त्री पुरुषाला ओवाळणी देईल....... ३ ह्या स्त्री मुक्ती आंदोलन वगैरे वाल्या एखादा फॅशन शो असला कि लगेच नैतिकतेच्या नावाखाली बंद पाडतात. मग शरिरसैष्ठव स्पर्धा कशा चालतात? त्यात नाही का बायकांच्या नको त्या भावना जागृत होत? तरी बरे बायका फॅशन शो मधे जास्त कपडे घालतात शरीरसैष्ठव स्पर्धेपेक्षा!!!!!! वि.सु. : हा बिबि फक्त विनोदी प्रकार आहे म्हणुन मी लिहित आहे. तरी कृपया वाचताना तसेच वाचावे. आणि विनोदी पद्धतीनेच मुद्द्यांचे खंडण केले जावे. मी स्त्री मुक्ती संघटनेला घाबरलो असे नाही. पण तरी हि एक डिसक्लेमर करण मला अजुनही स्मायली टाकता येत नाहित.
|
अरे बापरे अभिजित..खुपच राग आलेला दिसतोय स्त्रीयांचा...झाल काय नक्की??
|
Athak
| |
| Monday, February 04, 2008 - 7:03 am: |
| 
|
'मी स्त्री मुक्ती संघटनेला घाबरलो असे नाही.' सत्य हे असं नकळत बाहेर येतं पुरुष जन्मा ही तुझी कहाणी
|
Manuswini
| |
| Monday, February 04, 2008 - 7:04 am: |
| 
|
घरात बोलता येत नसेल म्हणून बाहेर वाचा फोडली जाते असे एकले होते.
की घरी गळचेपी होते असे दाखवायचे असेल म्हणून सहानभूती गोळा करण्याचा एक प्रकार असेल नाहीतर बहुधा 'समानता' दाखवयचा हेतु दुसरे काय.. म्हणजे स्त्रीच का 'पुढे' आम्ही का नाही..
हलकेच घ्या हं....
|
हम्मा!! अभिजित तुमच्याबद्दल सहानुभुती वाटते हो. खरच आजच कळलं "कित्ती कित्ती बिच्चारे असतात नई हे पुरुष" आपल्याला आपलं उगिच वाटत असतो की अन्याय काय तो एकट्या स्त्रीवरच होतो म्हणुन, आज हा गैरसमज दुर झाला बरं बघितलस मनु...घरी बिच्चार्या पुरुषांना मोकळेपणानी बोलताही येत नाही म्हणुन इथे असं याव लागत नै!! या बीबीवरच्या समस्त अन्यायग्रस्तांना एक मोठ्ठी दिव्याची माळ 
|
Anaghavn
| |
| Monday, February 04, 2008 - 7:53 am: |
| 
|
"पुरुषांच्या डब्ब्यामध्ये, आमच्या सुरक्षिततेसाठी स्त्री हवालदार असावी" बर ते ठीक आहे, पण त्या स्त्री हवालदाराच्या सुरक्षीततेसाठी पुन्हा काय करा? नाही म्हणजे समजल ना मला काय म्हणायचय ते?
|
नमस्कार मंडळी.. धोंडोपन्त BB अतिशय चांगला उघडलात तुम्हि. अभिजीत इथेही ह्या स्त्रिया स्वस्थ बसु शकत नहित रे ती एक म्हण अहे ना ........ जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. चालुदे मज्जा येत्ये... ..
|
Arun
| |
| Monday, February 04, 2008 - 8:18 am: |
| 
|
कुठेसं वाचलेलं .......... I am boss at my home, with my wife's permission to say so .............
|
Slarti
| |
| Monday, February 04, 2008 - 8:21 am: |
| 
|
>>> हम्मा!! समर्थांच्या कृपेने मनी आलेल्या असंख्य कोट्या / कुत्सित विचार निश्चयाने बोटांवरून परतवून लावल्या... न बोले मना राघवेवीण काही, जनी वाऊगे बोलता सूख नाही... शेवटी समर्थ थोरच म्हणा !! "सावधान" ऐकले आणि त्यांस आगामी दास्याची कल्पना आली. असे अवधान कोठे आता ??!!
|
Anaghavn
| |
| Monday, February 04, 2008 - 8:47 am: |
| 
|
मी काय म्हणते पण--- अहो मान्य करुनच टाका की एकदाचं!!!! नाही म्हणजे असतं एकेकाचं तसं पुरुष असतात जरा वेंधळे, नाही तिथे आगाऊपणा करणारे, नाही तिथे असाह्यतेचा फायदा घेणारे. त्यामुळे बायकांना त्या नुसार वागाव लागतं. पण मला सांगा, तुम्ही आजारी पडल्यावर तुमच्या कपाळावरुन्डोक्यावरून मायेने हात फिरवते, ती स्त्री च असते की नाही? म्हणजे आई, बायको, बहीण,मुलगी--- तिथे कसा कोणी पुरुष येत नाही म्हणते मी मेलं!!! हे स्मायली वगैरे कसं टाकायचं?
|
Manjud
| |
| Monday, February 04, 2008 - 9:09 am: |
| 
|
अभिजीत, तुम्हा सर्वाना सहानुभूती....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|