|
Bee
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:46 am: |
| 
|
१)रस्त्यावर अपघात होतो आणि मी तो बघून बाजूला होतो. माझ्यासारखेच सुशिक्षित जण देखील बघ्यांचीच भुमिका पार पाडत असतात. कारण अपघात म्हंटले म्हणजे पोलिस प्रकरण आले. मी का अडकू? हळहळही वाटते, तितकीच भितीही वाटते आपण ह्या प्रकरणात अडकून पडण्याची. २)गर्दीच्या ठिकाणी कुणाची तरी अमुल्य वस्तू चोरीला गेली. मी कान बंद केल्यागत तो तिथला आवाज, ओरडणे ऐकून वाट बदलतो. ३) बसमधे किंवा आगगाडीत कुणाची तरी राखीव जागा हस्तगत केली जाते आणि आपण उघड्या डोळ्यांनी ते बघतो. ४) नळावर पाण्यासाठी होणारे भांडण आक्रमक होते आहे. मी गप्प. ५) कुणाची तरी अब्रु भर रस्त्यावर उधळली जाते आहे. मी गप्प. ६) कुणाचा तरी अमानुषरित्या खून होतो. मी गप्प. ७) मी सरकारी ऑफ़ीसात लाच देताना पाहिले आहे. मागताना अनुभवले आहे. मी गप्प. असे ७ नाही १७६० किस्से इथे लिहिता येतील आणि मी तेंव्हा तेंव्हा गप्प असेल. मी इथे अनेकांचा प्रतिनिधिक आहे कारण माझ्यासारखे अनेक जण हीच अशीच बघ्यांची भुमिका पार पाडत असतात. कुठेतरी आपली ही गार वृत्ती आपल्या संवेदना पार गोठून टाकते. मग वाटत अंगात लढण्याची शक्ती यावी. पण लढता लढता फ़सू नये. योग्य वेळी आपली भुमिका काय असावी जेणेकरून आपण १००० बघ्यांमधील एक नाहीहोत ही टोचणी जिवाला लागणार नाही. ह्याबीबीचा उद्देश हा असा आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही बघितलेल्या सामाजिक / खाजगी भुमिका इथे अवश्य लिहा.
|
आता मीटींगला निघाले होते. माझ्या ऑफ़िसच्या बाजूला "मोका कॉफ़ी" आहे. अर्थात बरेच कॉलेज कुमार आणि कुमारी तिथे असतात. निघताना माझा ऑफ़िसच्या बिल्डिंगच्या खाली एक युवक एका मुलीला मारत होता. दोघेही जवळपास सतरा अठरा वर्षाचे. ती रडत होती. बहुतेक तिच्या डोक्याला लागले असावे. त्याने तिला ढकलले वगैरे असावे. ती डोक्याला हात लावून रडत होती. आणि तो शांत उभा होता बरेच बघे तिथे उभे राहुन मजा बघत होते. मी त्या मुलीला म्हटले "शरम नहि आती मार खाने मे. पैरोमे चप्पल क्या सिर्फ़ हाईट बढाने के लिये पहने है.. मार साले को. रोके सीन क्यु बना रही है..." मी पुढे येऊन टॅक्सीमधे बसले. पुढे नक्की काय झालं ते माहीत नाही.. पण सॉरी मी बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. आल्या आल्या बी ने उघडलेला हा बीबी पाहिला. भरपूर किस्से आहेत असे. वेळ मिळाला की टाकेन.
|
Asami
| |
| Wednesday, January 30, 2008 - 6:10 pm: |
| 
|
असे नाही वाटत तुला कि काही सूचना करायच्या अगोदर काय झाले ते माहीत करून घ्यायला हवे होतेस तू ? आणी कसलिही आगापिछा नसलेली सूचना करून नंतर निघून जाणे कितपत योग्य होते ? मलातरी त्याचे मारणे जेव्हढे अयोग्य वाटतेय तेव्हढेच तुझेही. अतिशय आगाऊपणे सांगायचे तर उंटावरून शेळ्या हाकल्यासारखेच की हे पण
|
ट्रॅफिक थांबलेले, एकही गाडी पुढे सरकत नव्हती. बघ्यांची ही गर्दी.. मॅडम गाडीत बसलेल्या.. कुत्र्याला घेऊन खरं तर डॉक्टरकडे निघालेल्या... दहा मिनिटं झाली.. पंधरा मिनिटं झाली तरी गाडी तिथेच... वैतागल्या उतरून पुढे गेल्या. एका माणसाच्या सायकलला डम्परने ठोकले होते.. तो रस्त्यावर पडून तडफडत होता. डम्पर तिथेच असला तरी चालक फरारी झाला होता... मॅडमना उशीर होत होता.... क्रमशः
|
Chinnu
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:55 pm: |
| 
|
मुंबापुरीत असतांनाची गोष्ट. एलफिंस्टन ब्रिजवरून टॅक्सी धावत होती. मला त्या दिवशी बरे नव्हते. मी त्रास सहन न होवून अचानक चालकाला हळू चालवायला सांगितले. ब्रिज ओलांडल्यावर मला उतरायचे होते. चालकाने टॅक्सी थांबवली. मी पैसे देणार इतक्यात एक माणूस आला. त्याने चालकाला उतरायला सांगितले. सण्णकन चालकाच्या थोबाडीत लगावून दिली! गाडी स्लो काय्को की %^^%%..? असं काहिसं बोलत निघून गेला. मार जबरदस्त होता. टॅक्सीचालकाच्या डोळ्यातून पाणी आलेलं. मी पैसे दिले. सॉरी म्हणाले. टॅक्सीचालक गाल चोळत, मान हलवत निघून गेला.
|
Aaftaab
| |
| Thursday, January 31, 2008 - 5:32 am: |
| 
|
इंग्लिश मध्ये वाचलेला किस्सा लिहीत आहे. - I was walking down a dimly lit street late one evening when I heard muffled screams coming from behind a clump of bushes. Alarmed, I slowed down to listen, and panicked when I realized that what I was hearing were the unmistakable sounds of a struggle; heavy grunting, frantic scuffling, and tearing of fabric. Only yards from where I stood, a woman was being attacked. Should I get involved? I was frightened for my own safety, and cursed myself for having suddenly decided to take a new route home that night. What if I became another statistic? Shouldn't I just run to the nearest phone and call the police? Although it seemed like an eternity, the deliberations in my head had taken only seconds, but already the girl's cries were growing weaker. I knew I had to act fast. How could I walk away from this? No, I finally resolved, I could not turn my back on the fate of this unknown woman, even if it meant risking my own life. I am not a brave man, nor am I athletic. I don't know where I found the moral courage and physical strength, but once I had finally resolved to help the girl, I became strangely transformed. I ran behind the bushes and pulled the assailant off the woman. Grappling, we fell to the ground, where we wrestled for a few minutes until the attacker jumped up and escaped. Panting hard, I scrambled upright and approached the girl, who was crouched behind a tree, sobbing. In the darkness, I could hardly see her outline, but I could certainly sense her trembling shock. Not wanting to frighten her further, I at first spoke to her from a distance. "It's okay,'' I said soothingly — "The man ran away. You are safe now.'' There was a long pause ... and then I heard the words uttered in wonder and amazement, "Daddy, is that you?'' And then, from behind the tree, stepped my youngest daughter, Katherine. - Author Unknown
|
Anaghavn
| |
| Thursday, January 31, 2008 - 8:10 am: |
| 
|
मी माझा अनुभव इथे लिहू शकत नाहिये, पण इतक सांगु शकेल, की मी एका चुकीच वागून पुन्हा समोरच्याला दोष देणार्या व्यक्तीला विचारल कि exactly अस का वागलीस? त्यामुळे नक्की काय होईल सांगता येणार नाही, पण मला उत्तर सांगताना तिला खुपच explanation द्याव लागत होतं. आणि ती स्वत:ला defend करत आहे हे मला जाणवलं.
|
असामी. मला तुझं मत पटतय. पण माझ्याकडे खरंच वेळ नव्हता. माझ्या एका क्लायंटने Q3 रीझल्ट्स मधे घोळ घातल होता. बातमी वायर्सना पोचली होती. BSE मधे जाऊन घोळ निस्तरणे हे काम होतं. आणि हे काम अक्षरश्: चार मिनिटात करायचं होतं.. मला पण यातल्या नियमाची कल्पना नाही, त्यामुळे ही धावपळ मला नवीनच होती. मी तिथे थांबून विचारपूस करण्याइतका वेळ नव्हता, पण कमीतकमी मी नुसतं "बघून" तर पुढे गेले नाही. जर वेळ असता तर मी नक्की पुढची भानगड विचारली असती. एकदा बागलओटला जाताना कुठल्यातरी खेडेगावामधे रस्त्यावर एक नवरा बायकोला मारत होता. पप्पानी गाडी थांबवली. आई आणि ते दोघे गेले आणि मारणं थांबवलं. त्या बाईला पाणी प्यायला दिलं. नवरा दारूच्या नशेत तर्र होता. त्यामुळे त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. तरी पण पप्पानी बायकोला मारलं तर पोलिस पकडून नेतील हे सांगितलं. त्या बाईला परत असा मार खाऊ नकोस नवर्याकडून वगैरे समज्वलं.. मी तेव्हा फ़ार तर पाचवीला असेन.
|
यातल्या काहि गोष्टिंवर उपाय आहे. जर तुम्हाला पटत असेल तरच. काहि वेळा सरळ सरळ दोन हात करणे परिस्थितीमुळे शक्य नसते. तेंव्हा गनिमी कावा वापरायचा. मागच्या शुक्रवार ची गोष्ट मी आणि माझा एक मित्र एका शाॅपिंग काॅमप्लेक्स मधुन बाहेर येत होतो आणि पार्किंग मधुन जाताना एक जण अतिशय रावडी पणे गाडि चालवत एकदम आमच्या जवळुन गेला. माझा मित्र एकदम म्हणाला. " काय जीव घ्यायचा विचार आहे का?" त्याने गाडि थांबविली मागे आला" काय म्हणालास वगैरे म्हणत म्हणत त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली. " मी अतिशय खुन्नस ने त्याच्याकडे बघत होतो. मला म्हणाला " काय बघतो" मी हे करिन ते करिन वगैरे वगैरे. तो अरबी होता. आणी शिवाय गाडिमधे कोणीतरी बाइ पण होती. आम्हि त्याला नडुन आम्हाला काहिच मिळालं नसते आमचेच नुकसान झाले असते. मी त्याची गाडी बरोबर लक्षात ठेवली. तो निघुन गेल्यावर मी शांतपणे हातातले कडं त्या गाडिच्या दरवाजावर मारले आणि जोरात खेचले. चांगला मोठा ओरखाडा उमटवला. कमीत कमी त्याला बिचार्याला ६००-७०० रियाल चा भुर्दंड नक्कीच पडला असेल. आता असे मार्ग वपरायचे कि नाहि हे प्रत्येकाच्या सद्सदविवेक बुद्धी वर अवलंबुन आहे. मी मात्र कधी कधी असे मार्ग वापरतो. बघा तुम्हाला वापरावेसे वाटले तर! ही असली बोच कमी होते. सत्या पिक्चर मधला एक डायलाॅग मी मनावर कायमचा कोरुन ठेवलाय. " चान्स हर एक को मिलता है" तुम्हाला पण कधी तरी मिळेलच अशा लोकांना उत्तर द्यायला. फ़क्त तो वापरायचा कसा ते शीका. मी असे भरपुर मार्ग वापरतो. सार्वजनीक ठिकाणी काहि होत असेल आणी तुम्ही जर काहि करु शकत नसाल तर आज काल सगळ्यांकडेच कॅमेरा वाले मोबाईल असतात. त्याने हळुच गर्दि तुन लपुन छपुन फोटो काढा सकाळ मधे जागर, मुक्तपीठ मधे पाठवा नाहितर वेब साईट वर टाका. बाजारात आज काल छोटे एम. पी३ प्लेयर मिळतात त्यात ध्वनीमुद्रनाची सोय असते. हे प्लेयर अगदि छोटे असतात खिशा मधे सहज मावतात. कोणालही कळत नाहि खिशात असले तरि. समोरचा लाच मागत असेल तर करा रेकाॅर्ड.
|
आणी हो अजुन एक उदाहरण, आपल्या ईतिहासातच आहे. पांडवांच्या बायकोची भर सभेत साडी उतरवली गेली. इतका अपमान स्वता:च्या बायकोचा तुमच्यापैकी कोणी तरी सहन करु शकेल काय? तरीपण पांडवांनी तिथे फक्त शपथा घेतल्या. त्यांनी तिथल्या तिथे युद्ध सुरु नाही केले. आणि वेळ आल्यावर मात्र त्यातल्या प्रत्येकाला अगदि भीषण म्रुत्यु दिले. " चान्स हर एक को मिलता है"
|
Abhijeet, Pandavan war aashi wel ka aali ki sadi utravli? War wagaire sagle aftermath zale. Te suddha Shrikrishna nech ghadwoon aanle. Satya madhe shevati kay zale te baghitles na? Dusrya konala tari suddha "chance" milu shakto. Tya parking lot madhe jar video camerya madhe tuch aala aastas tar? Tu kay sangnar hotas? Tyane car nit nahi chalavli tar kadhi tari tyala police pakadnarch aahet. Arthat tu khbardari ghetli aashilch kade martana 
|
Prajaktad
| |
| Friday, February 01, 2008 - 6:48 pm: |
| 
|
आभिजीत, पांडावावर अशी वेळ का आली की साडी उतरवली? War वगैरे सगळे aftermath झाले. ते सुद्धा श्रीक्रुश्णा नेच घडवुन आणले. सत्या मधे शेवटि काय झाले ते बघितलेस ना? दुसर्या कोणाला तरि सुद्धा "चान्स" मिळु शकतो........... (आशुसचिन मराठित(देवनागरित) लिहणे तेव्हडेही अवघड नाही..प्रयत्ना तर करा ) ग्रुहपाठ: अर्धा परिचेछेद तुम्ही लिहा पाहु Tya parking lot madhe jar video camerya madhe tuch aala aastas tar? Tu kay sangnar hotas? Tyane car nit nahi chalavli tar kadhi tari tyala police pakadnarch aahet. Arthat tu khbardari ghetli aashilch kade martana
|
त्या पर्किन्ग लॉट मधे जर "विडिओ क्यामेर्या मधे" तुच आला आस तास तर? तु काय सान्ग्नार होतस?त्याने कार निट नाहि चालवलि तर कधी तरी त्याला पोलिस पकड नारच आहेत. अर्थात तु खबर दारि घेत ली आस शिलच कडे मार ताना
|
Abhijeet25
| |
| Saturday, February 02, 2008 - 10:04 am: |
| 
|
त्या पर्किन्ग लॉट मधे जर "विडिओ क्यामेर्या मधे" तुच आला आस तास तर? तु काय सान्ग्नार होतस????????? सोपे आहे मी जर सापडलो असतो तर कधीतरी त्याच्या गाडीचा एखादा हेड लाईट गेलेला असेल.
|
अभिजीत ग्रेट यार. मला ही पद्धत जाम आवडली.. आता समजलं जनरली अशी मुलं हातात ते मोठं कडं का घालतात ते... दिवे घे रे बंधु..
|
Uday123
| |
| Saturday, February 02, 2008 - 11:05 am: |
| 
|
अभिजीत महाशय, क्रोधावर नियंत्रण मिळवा, असल्या क्षुल्लक घटना पदोपदी घडत असतात पण म्हणुन तुम्ही स्वत: अशी काही प्रतिक्रिया देणे म्हणजे (कायदयाचा) जाळ्यात अडकवून घेणे होईल, नशीब तेथे केमेरा नव्हता. इथे स्वत:च्या समाधानासाठी तुम्हाला वाटते की तुम्ही त्याला अद्दल घडवली. Ashusachin च्या अभिप्रायवर विचार करा.
|
Mandard
| |
| Saturday, February 02, 2008 - 11:33 am: |
| 
|
अभिजीत कतारमधे (गल्फ़ मधे) तुम्हाला कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही आहे. तेव्हा जपुन क्षुल्लक कारणांसाठी करियरची वाट लागायची. पैसे देवुन प्रकरण दाबणे पण अवघड आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच.
|
Abhijeet25
| |
| Saturday, February 02, 2008 - 12:27 pm: |
| 
|
सर्व हितचिंतकांचे आभार, मी पण आहे हो तितका जागरुक. मला पण काळजी आहे स्वता:ची. मी लिहिलेलंच आहे असे मार्ग मी कधी कधी वापरतो. नेहमी नाही काही. काळवेळ बघुन.
|
Anaghavn
| |
| Wednesday, February 06, 2008 - 7:11 am: |
| 
|
असंच विचार करतेय, "शत्रुवर सुध्धा अशी वेळ येऊ नये" अस आपण म्हणतो, वाचतो. पण खरच जर आपल्या फारश्या सख्य नसलेल्या व्यक्तिवर जर वाईट वेळ आली तर? काय करु आपण? तिने मदत न मागत आपण ती देण्याची तयारि दाखवु का? मला स्वत:ला हा प्रश्न मी विचारला तेव्हा माझ उत्तर "हो" अस होतं. अर्थात त्या व्यक्तीचा जर स्वाभिमान दुखावला जाणार असेल तर मग आपण हुन जाव की नाही हा विचार करेन.
|
Dhondopant
| |
| Wednesday, February 06, 2008 - 7:44 am: |
| 
|
स्वताच्या काय भुमिका वगैरे आहेत हे पडताळुन पाहण्यापेक्षा आणि थोडे काहीतरी करुन holier than thou असल समाधान घेण्यापेक्षा आपण आपले काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करुया. लाचलुचपत, रस्य्तावरची भांडणे ई ई जे काही प्रकार आहेत त्याच्यासंबधी कीती जरी आपण काही करायचा प्रयत्न केला तरी तो आभाळाला ठीगळ लावण्यासारखा आहे. भारतातील अस्थिर आणि विकसन्शील राजकीय, सामाजिक परीस्थिता त्याचप्रमाणे ईतिहास, culture & present economy , लोकसंख्या ई. ई. अनेक घटक कारणीभुत आहेत आणि येणारा काळच या गोष्टी बदलेल... तेव्हा प्राप्त प्रीस्थितीत आपण दुसर्याला मदत करु शकतो का? हा एकच प्रश्न विचारा आणि मग योग्य तो निर्णय घ्या... अर्थात सिग्नल पाळणे यासारख्या गोष्टी आपल्याकडुअन अपेक्षित आहेत पण त्यावर कुणी तो पाळत नाही म्हणुन तिथल्या तिथे वैचारीक डोकेफोड करण्यात काय हशील आहे?... तुम्ही एकाला शहाणपणा शिकवाल आणि दुसर्या दीवशी तो ते आठवणीत ठेवेलच असे नाही. उदा. रस्त्यावर एक माणुस दारु पिवुन पडलेला आहे. वाहने येत आहेत.. मी बाजुला करुन ठेवावा का त्याला?.. हा प्रश्न आहेच पण त्याला कळत नाही का?... हा प्रश्न खुप मोठा आहे. कुणी कुत्र्याला कुठे घेवुन चालले याच्याशी आपल्याला काय घेणेदेणे आहे?१०५ कोटींच्या देशत तुम्हाला या गोष्टी अनेकदा पाहायला मिळतील. कुणाला लागल किंवा कुणी जखमी झाला तर अवश्य मदत करायची पण कुठे डोके घालायचे आणि कुठे नाही याचे भान ठेवले पाहीजे. असल्या गोष्टींचा विचार करत बसाल तर लवकरच " चिंतातुर जंतु " बनुन जाल. दोन हजार वर्षाचा ईतिहास या गोष्टीला कारणीभुत आहे. रस्त्यावर घाण आहे ती उचलुन टाकणे हे करण्यापेक्षा आपण आपला कचरा योग्य ठीकाणी टाकणे हे जास्त महत्वाचे.
|
Meggi
| |
| Wednesday, February 06, 2008 - 11:53 am: |
| 
|
समोरचा लाच मागत असेल तर करा रेकाॅर्ड. >> रेकॉर्ड केलेला आवाज ही साक्ष मानली जात नाही, हिंदी सिनेमा सोडुन..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|