|
Farend
| |
| Monday, January 21, 2008 - 5:52 am: |
| 
|
Good Luck Chuck टाईमपास आहे. जरा लहान मुलांना नका बघू देऊ, पण बर्यापैकी कॉमेडी.
|
Manuswini
| |
| Tuesday, January 22, 2008 - 1:30 am: |
| 
|
bombay to bankok पाहीला : शेवटचा अर्धा तास मी थेटरात झोपले होते. सुरवात ठीक आहे. पुर्ण थेटरात फक्त आम्ही दोघी मैत्रीणी, बाकी तीन चार प्रेमी जोडप्याना रान(थेटर) मोकळे होते PDA करायला.:-) आता PDA काय विचारू नका, माझी 2005 ची पोस्टचा ref घ्या. rating: FF करून बघू शकण्यासारखा.
|
Mahaguru
| |
| Saturday, January 26, 2008 - 3:42 am: |
| 
|
bombay to bangkok: बकवास! नागेश कुकुनुर चा म्हणुन मोठ्या अपेक्षेने पाहिला. डे. धवन यांच्या चित्रपटांपेक्षाही टुकार वाटला
|
सुयोग, दिल दोस्ती.... डोळे उघडणारा असला तरी कुटुंबासोबत बघण्यासारखा नाही मला तर फार व्हल्गर वाटला. त्यातले प्रसंग एवढे बटबटीत नव्हते दाखवायला पाहिजे.
|
उमेश कुलकर्णी ह्याचा वळु नावाचा चित्रपट नुकताच भारतात प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी, मोहन आगाषे, दिलीप प्रभावळकर इत्यादींच्या प्रमुख भुमिका आहेत. ह्या चित्रपटाचे वितरणाचे हक्क मुक्ता आर्टस् ह्या सुभाष घईंच्या प्रसिद्ध कंपनीने घेतले आहेत. विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटाचे जागतिक स्तरावरील प्रथम प्रयोग २९ जानेवारीला रॉटरडॅम चित्रपट महोत्सवामध्ये होणार आहे. बहुतेक पहिल्यांदाच ह्या चित्रपट महोत्सवामध्ये मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. जे लोक नेदरलॅंड मध्ये आहेत त्यांना इथे हा चित्रपट नक्कीच पाहता येइल. ह्याचे एकुण ४ शोज दाखविण्यात येणार आहेत. रॉटरडॅम फिल्म फेस्टिवलच्या संकेतस्थळावर तिकीटे खरेदी करता येतील तसेच वेळ व जागा ह्याची माहिती देखील आहे. गूगलवर शोधल्यास ह्या संदर्भातील, अनेक वर्तमानपत्रातील लेख मिळतील. स्क्रीन नियतकालीका मधील लेखाचा हा दुवा: http://www.screenindia.com/fullstory.php?content_id=18673
|
चित्रपट कसा आहे? सविस्तर कळवावे
|
सावली मोठ्या अपेक्षेने पाहीला. अपेक्षाभंग. विषय जरी चांगला असेल तरी तो निट पोचवता (मांडताच आलेला नाही). ऐका फ्रेम मधुन दुसर्या फ्रेम मध्ये जाताना कधी कधी संदर्भ लागत नाही. एकच चांगली बाब. शास्त्रीय संगीत आवडनार्यांसाठी प्रसिध्द गायकांच्या गायनाची चांगली मेजवानी या चित्रपटात आहे. (त्यातही एका लहान मुलीला देवकीचा आवाज दिल्यासारख्या वाटला, तेथे एकदम चुकल्यासारखे वाटले.)
|
रवि, मी मंगळवारी जाणार आहे हा चित्रपट बघायला रॉटरडॅमला. तिथे दिग्दर्षक व इतर आलेल्या मंडळींची भेट होण्याची आशा आहे. तेव्हा सविस्तर वृत्तांत देईनच. बाकी भारतात ज्यांनी ज्यांनी पाहिला आहे ते आपए मत देतीलच इथे.
|
केदार्-कुठल्या पिक्चर बद्दल सान्गताय आपण???वळू का?
|
Ajjuka
| |
| Monday, January 28, 2008 - 4:30 am: |
| 
|
वळूचं सगळीकडे जोरदार कौतुक होतंय. पण खरं सांगायचं तर मला चित्रपट अजिबात आवडला नाही. मी ऑक्टोबर मधेच प्रीव्ह्यू पाह्यला होता. गोष्ट म्हणायची तर गावात देवाला सोडलेला वळू असतो तो हिंसक होतो. त्यामुळे फॉरेस्ट ऑफिसरला त्या वळूला पकडायला बोलावतात. त्या ऑफिसरबरोबर त्याचा अतिउत्साही Docu-maker भाऊही असतो. वळूला पकडायला गावात फारेश्ट चं येणं, सोबत डाक्यूमेंट्रीचं गावात येणं, गावातल्या लोकांनी डुरक्या (वळू) च्या गोष्टी सांगणं यातून गाव आणि व्यक्तिरेखा उलगडत जातात. शेवटी वळू पकडला जातो. फारेश्ट त्याला घेऊन जातो आणि गावात दुसर्या एका गायीला गोर्हा होतो तो नवीन वळू असं सांगत चित्रपट संपतो. वळू आणि त्याला पकडणे इत्यादी गोष्टींचा एक metaphor म्हणून वापर करायचा आणि परिस्थितीवर भाष्य करायचे की केवळ एक गावरान विनोदी ढंगातला सिनेमा करायचा यामधे पटकथा लेखक आणि दिग्दर्शक या दोघांचा गोंधळ दिसतो. त्यामुळे मधेच परिस्थितीवर भाष्य करायच्या नादाला जाता जाता परत ग्रामीण विनोदाकडे गाडी घसरते. साध्य काहीच नाही. गावाचं वातावरण तपशीलात दाखवायचं या सोसापोटी सभेला जाताना छोट्या पोराला त्याची आई देवळाच्या बाहेरच शू करायला धरते ह्या दृश्याने चित्रपटात भर काहीच पडत नाही अगदी विनोदनिर्मिती सुद्धा. सतत बिघडलेल्या पोटाने घाण वास सोडणारा किंवा लोटा घेऊन जाणारा देवळाचा पुजारी या व्यक्तिरेखेसाठी दिलीप प्रभावळकर कशासाठी हवेत? कोणीही करेल की ते. सतत संडासला जाणे यापलिकडे ही व्यक्तिरेखा काहीच फारसं करताना दिसत नाही. बर या प्रकारच्या विनोदांना किती वेळा हसायचं? फारेष्टचा भाऊ डाक्यूमेंट्री ह्याने मराठी किती कृत्रिम बोलावं याला काही अर्थच नाही. वृषसेन दाभोळकर हा नट इतकंही वाईट मराठी बोलत नाही (माझ्या नाटकातला मुलगा आहे, मी याला लहानपणापासून ओळखते. थोडी कृत्रिम झाक आहे मराठीमधे पण एकदा सांगितल्यावर हे बाळ सुतासारखं सरळ मराठी बोलू लागतं हा अनुभव आहे.) आणि ते सुधारून घेणे हे दिग्दर्शकाचे काम नाही का? अतुल कुलकर्णी अभिनेता म्हणून खूप ताकदीचा आहे हे आता माहित होऊन जुनं झालं पण इथे त्याचाही गोंधळ उडाल्यासारखा वाटतो. विनोदी अंगाने जाणारे मर्मभेदी भाष्य अश्या काहीश्या presentation format मधे तो जायला बघतो. त्यामुळे अभिनयाची शैलीही थोडी लाउड, caricature सारखी त्याने ठेवली आहे. ते चित्रपटाला कुठेही मदत करत नाही. पण याठिकाणी दोष बिचार्या अतुलचा नाही, पटकथेच्या form, lack of focus यांचा व दिग्दर्शकाचाच आहे असं जाणवत रहातं. अतुलला कपड्यात कृपया stir-ups देऊ नयेत. वरचं शरीर कमावलेलं आणि खाली मोराचे काटकुळे पाय हे अतिशय विचित्र दिसतं. अमृता सुभाष मात्र तिच्या व्यक्तिरेखेमधे चोख बसलीये. तिच्या अभिनय पद्धतीला जाणारी भडक, लाउड व्यक्तिरेखाच तिला मिळाल्यामुळे ते जमून गेलेय. बाकी सगळं जिथल्या तिथे ठीक. कपडे गावाच्या मानाने फारच स्वच्छ आणि नवेकोरे वाटतात. तसंच सगळं visual ही. नाटकाच्या सेटसारखं बनवलेलं वाटतं. हे सगळ दिसत रहातं कारण पटकथेतल्या गोंधळामुळे आपण नाट्यापासून तुटत रहतो. एक उत्तम potential असलेली कथा आणि पटकथेमधे त्याचं झालेलं वांगं एवढंच impression शेवटी डोक्यात उरतं. हे झालं माझं मत. पहावी की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं.
|
Chinnu
| |
| Monday, January 28, 2008 - 4:26 pm: |
| 
|
नो कंट्री फर ओल्ड मेन.. आपापल्या जबाबदारीवर पाहणे. दिग्दर्शन दिग्गज्जांनी केले असले आणि त्याचं अवाढव्य कवतीक होत असले तरीही बरेच loop-holes आहेत. शेवट खुपच subtle आहे. थोडक्यात, नो झेप्स!
|
नाही रवि मी " सावली " बद्दल सांगत होतो. आता अजुन एक भिक्कार चित्रपट " क्षण " . सुरु झाल्यावर १५ मिनीटातच कळते की हा पिक्चर आपल्या आयुष्यातील दोन महत्वाचे तास वाया घालनार. शिवाय पिक्चर संपल्यावर आणखी एक तास डोके ठिकानावर यायला लागते. दिग्दर्शक सतत " आत्ता " घडनारे व " मागे " घडलेले यातच ठेवतो. बघताना वाईट्ट त्रास होतो त्याचा. विषयही तोच घिसापिटा प्रेमभंगाचा. बघताना नेहेमी हम दिल दे चुके ची बर्याचदा आठवन होते. नंतर काय होते ते सांगत नाही ज्याला बघायचा आहे त्यानी डोके बाजुला काढुन ठेवल्यावरही त्रास होनार आहे हे लक्षात ठेवुन बघावा.
|
Rani_2007
| |
| Monday, January 28, 2008 - 6:59 pm: |
| 
|
केदार, तुम्हाला मराठि चित्रपट कुठे मिळतात इथे?
|
नाही ईथे नाही मिळत पण देशात कोणी गेले किंवा येनार असेल तर मी त्यांना सिडीज आणायला सांगतो.
|
Manuswini
| |
| Monday, January 28, 2008 - 7:28 pm: |
| 
|
sunday: पाहीला. ठीक आहे. नंतर खुपच predictable नी अतीशोयक्ती आहे. मध्ये दिल्लीत मुलींना drinks मध्ये नशीली गोळ्या देवून रेप करणे वाढले होते त्यावरून मूवी कुठल्या कुठे वहात जातो.
|
Mandarnk
| |
| Monday, January 28, 2008 - 7:36 pm: |
| 
|
बरेचसे मराठी चित्रपट इथे बघायला मिळतात, फुकट आणी legally वर लिहीलेला 'क्षण' पण आहे तिकडे.
|
Ajjuka
| |
| Tuesday, January 29, 2008 - 4:14 am: |
| 
|
क्षण.. एकाच शब्दात.. भिकार. वळूबद्दल विस्ताराने लिहिलं कारण तेवढं तरी त्या सिनेमाची, दिग्दर्शकाची पत निर्माण झालीये सिनेमामुळे. क्षण बद्दल लिहायचं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. परवा कुठल्यातरी चॅनेलवर लागला होता म्हणून पहात होते. सहनशीलता वाढवण्याचा उत्तम व्यायाम. तसंच सावली या सिनेमाचंही. क्षणपेक्षा बरा. आणि माझं दुर्दैव म्हणजे मी तो सिनेमा कोकणीत 'अंतर्नाद' या नावाने गोवा कला अकादमीत IFFI मधल्या वर्ल्ड प्रिमिअर च्या वेळेस बघितल. IFFI मधले ३ तास वाया गेले. दुसरा काही बरा सिनेमा बघितला असता यापेक्षा जो एरवी कधी बघायला मिळाला नसता इत्यादी इत्यादी.. थोडक्यात भरपूर चरफड मूल्ये असणारा सिनेमा.
|
Ankyno1
| |
| Tuesday, January 29, 2008 - 5:05 am: |
| 
|
कालच 'वळू' पाहिला.... ठीक ठाक आहे.... अज्जुका ची पोस्ट वाचल्यामुळे फारशा अपेक्षा ठेवल्या नव्हत्या... पण तरीही ज्या काही थोड्याफार होत्या त्यातल्याही बर्याचशा अपूर्ण राहिल्या... खरं सांगायचं तर अतुल कुलकर्णी मुळे पूर्ण सिनेमा पाहिला... दिलिप प्रभावळकरंना वाया घालवलय... (त्यांच्या 'सवयी' मुळे जो विनोद निर्माण होणं अपेक्षित आहे त्याला पहिल्या खेपेस ही हसायला येत नाही... नंतर पुन्हा पुन्हा तेच किती वेळा....) अमृता सुभाष चा सब्-प्लाॅट नसता अथवा कमी लांबीचा असता तरी चाललं असतं इतर कलाकार ठीक ठाक वाटतात... एकूणच सिनेमा आणखी बराच चांगला करता आला असता... इतकी तगडी कलाकारांची फौज असताना दिग्दर्शकाला 'शिशु' विनोदाची गरज का पडते हे न समजण्यासारखे आहे... पण सध्या जे इतर तद्दन फालतू, कथेचा आभाव असलेले, कमर्शिअल च्या नावाखाली नीकृष्ट मनोरंजन देणारे सिनेमे येत आहेत त्यांच्या भाऊगर्दीत वळू नक्कीच उठून दिसणारा आहे. थोडक्यात "वासरात लंगडा वळू वेगळा" असं म्हणता येईल....
|
Manuswini
| |
| Tuesday, January 29, 2008 - 6:27 am: |
| 
|
वळु म्हणजे कुठला प्राणी?(हसु नकां हं,मला खरेच अर्थ माहीत नाहीये. अंदाज आलाय की 'प्राणी' आहे पण नाव कधीच एकले नाही).
|
Ankyno1
| |
| Tuesday, January 29, 2008 - 6:31 am: |
| 
|
देवाच्या नावावर मोकाट सोडलेला बैल (सांड) म्हणजे वळू....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|