अरे, म्हणूनच म्हणालो, की निदान त्यासाठी तरी...
|
रोहीत या वेळेस जायला नको होता. वैशाली जायला हवी होती.
|
Manuswini
| |
| Tuesday, January 08, 2008 - 6:45 pm: |
| 
|
अज्जुका, बरोबर कळलं हं त्यातला sarcasm . मी आईला पण गमतीत हेच म्हटले.बायकोने 'तारे' तोडले तर नवरा 'कायच्या काय' महान. ,पण नवर्याने तोडले तर हुशाऽऽर हा बाकी. . बाकी विभोर कधी कधी मला बोबडा गातो असे वाटते. बर्यापैकी आधीच गेलेला 'सागरचा' भाऊ आहे गाण्यामध्ये. आणि ह्या बेंगाली लोकांना साधे धड हिंदी बोलता येत नाही. बप्पी इतके वर्ष मुंबईत राहून 'ई बराबर बोलि' .. असे काहीसे बोलतो. अनामीका 'र' ला 'ड' .. भाषेचा परीणाम. मला रोहन नी तन्मय आवडतो. रोहनच्या आवाजात गोडवा आहे. तन्मय हा smartly गातो. गोड आहे पण. बाकी वरची 'मुलांच्या आईबद्दलची' पोस्ट वाचून गोंधळ उडाला माझा लोक गाण्याच्या program इतक्या मनापासून त्यांच्या आयासाठी पण बघतात?? . बरय चालु द्या.
|
Tiu
| |
| Tuesday, January 08, 2008 - 8:40 pm: |
| 
|
शनिवारच्या एपिसोड मधे आदित्यचं 'मां' गाणं कुणी ऐकलं का? काय वेड गायला तो! डोळ्यात पाणी आलं...
|
झी मराठी वरच्या dance competition मधे काल आणि परवाचा एका मुलीचा performance खूप आवडला . पहिल्या दिवशी तिने ' ढोलकीच्या तालावर ' गाण्यावर hula hoop आणि लावणीचे fusion झक्कास केले होते . आणि काल तर डोळ्यांना पट्टी बांधून तक्षक मधल्या तराण्यावर जो dance केला तो तर कमालच होता . सचिन मात्र somehow त्या ' होठोपे ऐसी बात आणि सोळावं वरीस धोक्याचं " वर dance करणार्या मुलीवर जास्त खूष दिसला .
|
Sunidhee
| |
| Tuesday, January 15, 2008 - 4:55 pm: |
| 
|
तो किशोरकुमार च्या गाण्यांवर सुरु असलेला कार्यक्रम आवडला नाही. गायक चांगले नाहीत. . मी पुर्ण गाणी ऐकू पण शकत नाहीत त्या गायकांची इतके सामान्य आहेत. अरे किशोरदांची गाणी म्हणणे म्हणजे चेष्टा आहे होय? माझ्यासारखीची (एक साधारण प्रेक्षक) ही अवस्था तर मग साक्षात किशोरकुमारचा मुलगा कसे ऐकत असेल की.
|
Yog
| |
| Tuesday, January 15, 2008 - 8:07 pm: |
| 
|
खरे आहे... "गुरू" चा किव्वा गुरूवरील कुठलाही कार्यक्रम सहसा चुकवत नाही. पण या कार्यक्रमाची फ़क्त catch line चान्गली आहे: बन्द करो ये शोर play only kishore.. पण मूळ फ़ंडा चूकिचा आहे म्हणजे KK च्या जवळ जवळ जाणारा आवाज शोधायचा आहे म्हणे. कप्पाळ यान्च! अन स्पर्धक तर अगदीच टुकार.. अमित कुमार आणि सुदेश भोसलेच चान्गले गातात.. असो. सर्व पैशाचा खेळ आहे kk हे एक सर्वसम्पन्न institution होत, गायकी हा त्यातल फ़क्त एक अंश. तसा गायक पुन्हा न होणे!
|
परवा अमित कुमारला एका चॅनल वाल्याने किशोरचं एखादं गाणं म्हणायला सांगितलं तर ते त्याला आठवेना.
|
Tiu
| |
| Thursday, January 17, 2008 - 12:53 am: |
| 
|
अमित कुमार म्हणजे किशोर कुमारचा मुलगाच ना? त्याला किशोरचं गाणं आठवत नव्हतं??? Surprising!!! बहुतेक कुठलं गाणं म्हणावं याचा विचार करत असेल तो...
|
Tonaga
| |
| Thursday, January 17, 2008 - 3:12 pm: |
| 
|
खरे तर किशोरच्या आवाजाच्या बराच जवळ जाणारा अमितकुमारचा आवाज आहे. खरे तर किशोरला पर्याय तो ठरू शकला असता. पण लोक उगीच अभिजीत, कुमार सानू असले डुप्लिकेट वापरत राहिले.कदाचित अमितला मार्केटिंग तन्त्र जमले नसेल....
|
Aashu29
| |
| Thursday, January 17, 2008 - 3:22 pm: |
| 
|
होय टोणगा, आणि बहुतेक तोही किशोर सारखाच विक्षिप्त असेल
|
Arch
| |
| Friday, January 18, 2008 - 4:22 pm: |
| 
|
कोणी सोनीवर तुझको है सलाम जिंदगी पहात असेल, तर त्यात आकाशच काम करणारा मुलगा कोण आहे?
|
Amruta
| |
| Thursday, January 24, 2008 - 5:27 pm: |
| 
|
एका पेक्षा एक कुणी पहात कि नाही?? बरे आहेत सगळे कंटेस्टंट्स. बरे नाचतात. सचिन त्यात जज आहे. महागुरु सगळ्यांना बर्यापैकी कमेंट्स देतो. सहसा कुणाला नाराज करत नाही. पण ज्युरींच प्रयोजन कळल नाही. ते नक्कि काय करतात?? सगळ्यात मुख्य म्हणजे वोटींग च नाटक नाहिये
|
Orchid
| |
| Friday, January 25, 2008 - 3:34 pm: |
| 
|
गेल्या भागात स्मिता नंदी नावाची मुलगी आउट झाली. आज पेपरला वाचल की तिच्या बाबांना हार्ट अटक आला. या पालकांच बोउद्धिक घेतल पाहिजे.
|
Yog
| |
| Friday, January 25, 2008 - 5:31 pm: |
| 
|
ती आऊट झाल्याने नसेल आला heart attack , वडिलान्नी लाखो रुपये बरबाद केले असतील sms मधे... आयला आम्ही कधी कुठल्या competition मधून आऊट झालो तर सहानुभूती सोडाच उलटा दम मिळायचा: कशाला गेलास मग "बाकी महत्वाचे" काम धन्दे सोडून.. वगैरे वगैरे.. ZAKKI MODE ON* कालाय तस्मै नमः!
|
Manuswini
| |
| Saturday, January 26, 2008 - 6:06 am: |
| 
|
च्यायला parents हे असे वागायला लागले तर त्यांची मुले काय दीवे लावणार मोठेपणी. काय ते अनामीकाचे नाटक. मग ते नाटक tv वर येवून कशाला करतात? आधीच का नाही सांगीतले. कुठे शिकतात ह्या वयात politics देवच जाणे. आम्हाला तर अक्कलच न्हवती..... खायचे,झोपायचे नी अभ्यास करा हेच काम.
|
Ajjuka
| |
| Saturday, January 26, 2008 - 12:08 pm: |
| 
|
काय त्रास आहे या talent hunts चा! १. तरूण गायकांसाठी २. तरूण नाच्यांसाठी (यातल्या क्वचितच कुणाला तरी नर्तक म्हणता येईल. बाकी सगळे माकड उड्या) ३. सेलेब गाणारे (गळा नसलेले, अप्रसिद्ध सेलेब आणि त्यांच्यावर डोकं आपटणारे गवई ) ४. सेलेब नाचणारे (एकटे किंवा जोडीने) ५. लहानांच्यात गाणारे ६. लहानांच्यात नाचणारे प्रत्येक चॅनेलवर या सहापैकी ४ तरी स्पर्धा चालू आहेत्/ असतात. भारतात अचानक नाचगाण्याचे साथ आलीये की काय? एवढं बदाबदा टॅलेन्ट(खूप सारी प्रश्नचिन्हे!) मग बघणारे कोण? आणि नाचगाणं आलं म्हणजे झालं? तेवढंच आयुष्यात? सगळीकडे नुसता नाचगाण्याचा भडीमार बर नाचणं म्हणजे ६ वर्षाच्या पोरीने 'छम छम करता है ये नशीला बदन' वर नाचायचं आणि गाण्यात हिमेश रेशमिया म्हणजे दर्जा... छी! यातून होतं काय की फक्त हेच येणं आयुष्यात महत्वाचं आहे असं अधोरेखित होतं. च्यायला आपण बघतो म्हणून हे शोज चालतायत... आपणच मूर्ख..
|
Sayonara
| |
| Saturday, January 26, 2008 - 12:47 pm: |
| 
|
मनस्विनी, हे नाटक करायला zee च सांगत असणार मुलांना. कशाला लहान वयात हे मेलोड्रामा मुलांना शिकवतात देव जाणे. पुढच्या वेळी वोट्स जास्त मिळतील तिला. आणि ही कॉम्पिटिशन आहे ह्यात कुणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हरणार. तेव्हा हरणं स्पोर्टींगली घ्या हे का नाही शिकवत मुलांना?
|
Zakki
| |
| Saturday, January 26, 2008 - 4:30 pm: |
| 
|
या गोष्टीचा संबंध स्पर्धांशी नाही, पण तथाकथित 'सेलेब्रिटी' शी आहे. अशीच एक 'सेलेब्रिटी' म्हणजे ब्रिटनी स्पिअर्स! तिच्यात चांगले काय हे शोधायला सांगितले तर काऽही सापडणार नाही. पण आज इथल्या वर्तमानपत्रे, फोटोग्राफेर, दूरदर्शन इ. लोकांनी जे चालवले आहे त्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत १२० मिलियनची भर पडते म्हणे! लोकांनी जर तिला एव्हढे महत्व दिले नसते तर अर्थव्यवस्थेत एव्हढी भर पडली नसती!! भारतात अजून कुणि असा शोध कसा नाही लावला?
|
असले शोज करणार्यांना भरपूर फायदा होतोच की. भारताबाहेर असले शोज बघणारे कित्येक आहेत. तो सगळा पैसा भारतात जात असेल. इथेच मायबोलीवर असले शोज बघणारे कित्येक आहेत आणि त्यावर भरभरून वाहणारे बाफ पण आहेत. अज्जुका, फक्त तेवढच आल तरी आयुश्यभर पुरेल की. प्रत्येक वाढत्या वयासाठी तोच तोच शो आहेच.
|