|
>>मित्राला मिळाली ना तशीच grass is always green on other side >>आमच्याकडे मुलींना नोकरी करायची गरज नाही ह्म्म.... काश कोई कहेता आमच्याकडे मुलांना ... बाकी, कोणी योग्य कापो प्रश्नोत्तरे काय असावीत ते का लिहीत नाही ?
|
ती नक्की डॉकच आहे ना? (कॉल सेंटरवाली नाही ना?) कदाचीत ते कसले तरी मेडिकल रायटर असतात ना, तसा अनुभव असेल.
|
मंदार, सही जवाब पण तस केल तर नवरा लग्नाच्या ऐवजी नक्कीच पळून जाईल अशी खात्री असणार
|
Rimzim
| |
| Thursday, November 01, 2007 - 8:40 pm: |
| 
|
सव्या, ती मुलगी खरच doctor आहे. आणि अफलातुन आहे तिचे इंग्रजीचे ज्ञान. बाकी मंदार, सव्या तुमचे कांदेपोहे अनुभव ( कि direct पुरणपोळी) लिहा की.
|
Mandarnk
| |
| Thursday, November 01, 2007 - 9:01 pm: |
| 
|
माझा कांदेपोहे अनुभव: लग्न झाल्यावर ८ दिवसांनी अमेरिकेत आलो. मग काही दिवसांनी बायकोने देशी दुकानातून Pohe Thick असं लिहीलेला पॅक विकत घेतला, आणी नंतर घरी कांदेपोहे केले. छान झाले होते! संपला बरका आमचा कांदेपोहे अनुभव कसा वाटला? लव्हमॅरेज केलेल्यांना खराखुरा कांदेपोहे अनुभव मिळत नाही हो!!! 
|
Rimzim
| |
| Thursday, November 01, 2007 - 9:55 pm: |
| 
|
मंदार अरे वा, तुझा अनुभव तर आवडेश एकदम. पण त्या पोह्यांमुळे आपली बायको सुगरण आहे याचा शोध लागला नं तुला? ( हा शोध आधिच लागला होता का?) 
|
Aashu29
| |
| Thursday, November 01, 2007 - 11:40 pm: |
| 
|
आमच्यात वधु वर सुचीचे एक पुस्तक असते, त्यात मुलगा मुलगी दोघांचे शिक्षण, वय, जॉब, अपेक्षा वगैरे असतात, त्यात अपेक्षा कॉलम मधे एकाने मुली चा रंग गोरा सुळसुळीत हवा आणि बांधा शिवशिवीत हवा असे लिहिले(बांधा शिडशिडित लिहायला हवे होते हे कळाले पण रंग नक्कि कसा हवा होता त्याला ते त्यालाच ठाउक!) अजुन एकाचे शिक्षण होते १० वी आणि अपेक्षा कॉलम मधे मुलिचे शिक्षण --graduate असावि असे!!
|
Psg
| |
| Friday, November 02, 2007 - 6:25 am: |
| 
|
सव्या, तसे 'आदर्श गाईड' असते तर काय............... कितीही प्रश्न-उत्तरं तयार ठेवा, जेव्हा आणि ज्याच्याबरोबर व्हायचं असतं हे अचानकच 'क्लिक' होतं
|
Ajjuka
| |
| Friday, November 02, 2007 - 6:41 am: |
| 
|
श्या!! हे सगळं वाचून वाटलं.. i missed out.. निदान एक दोन मुलं तरी पाह्यला हवी होती असंच अनुभव म्हणून...
|
Zakasrao
| |
| Friday, November 02, 2007 - 7:05 am: |
| 
|
मला बी काय कांदापोहे अनुभव नाहीच राव. पण बरय असल्या काहितरी अनुभवातुन नाय जाव लागल. अज्जुके ते तुला एखादी वस्तु असल्यासारखे बघायाला आले असते तर तुला छान वाटले असते का???? काहिहि तुझ.
|
Sush
| |
| Friday, November 02, 2007 - 7:12 am: |
| 
|
अज्जुका, तु लकी आहेस. सगळ्यातुन वाचलिस. पहायला आले की सगळ्याचे सल्ले सुरु. साडि निट सांभाळ. उठुन येताना सगळ्यांच्या पाया पड. सगळं स्त्री मुक्ति वगैरे बाजुला ठेवायला लागतं. आणि त्यावेळी तुम्हि लोक जे म्हणता तसे करण्यात मर्यादा येतात. कारण लगेच लोकं म्हणायला तयार की आई वडिलांनी संस्कार नाही केले. ४ माणसात कसं बोलावं कळत नाही. मुलांनी कसंही वागलं तरी चालतं. मुलीची एक चुक झाली की ती वाईट.
|
इथे मी लिहिण्यासारखं बरंच काही आहे पण सर्वात पहिला अनुभव मात्र जाम गमतीशीर होता. मी नुक्तीच कॉलेज संपवून रत्नागिरी टाईम्स मधे काम करत होते. त्यावेळेला कुण्या एका मध्यस्थाने आईला हे "चांगले स्थळ" सांगितले. मुलगा पोवईला राहत होता. (हिरानंदानीमधे फ़्लॅट आहे हे तीन तीनदा सांगितलं माझी आई मला साडी नेस म्हणून पाठी लागलेली. तसा मला साडी संभाळण्याचा वगैरे त्रास नव्हता तरी एकंदरीत हे प्रकरण मला नकोच होते. तरीपण आईला म्हटलं चल नेसते.. उगाच तिला वाईट नको वाटायला.. तर मी माझी आई पप्पा आमी त्याच्या घरी गेलो. का कुणास ठाऊक घरात अजिबात जिवंतपणा नव्हता. घरासमोरची बाग पार सुकलेली. घरामधे तो मुलगा त्याचे आईवडील आणि एक मोठा भाऊ (साधारण चाळीशीचा) आम्हाला मुलाचे वय पंचवीस सांगितलं होतं. प्रत्यक्षात त्याला नोकरी लागून पाच वर्षं झाली होती. आरामात तो ३२ ३३ चा वाटत होता (वयाने) जाडजूड भिंगाचा चष्मा आणि भलं मोठं सुटलेलं पोट. सोफ़्यावर थुलथुलीत बसलेला. मला पाहताक्षणी राग आला. प्रश्नोत्तरे मला आठवत नाहीत. कारण तो अमधेच आईला म्हणाला. "मला मुलगी पसंत नाही. खूप बारीक आहे." मी मान खाली घालून नम्रतेची पराकाष्ठा (पु ल ) वगैरे करत बसले होते. वर पाहिलं आणि म्हटलं "पप्पा या रेड्याला सांगा. मी बारीक नाही तो जाड्या आणि थोराड आहे. " परत कुठे "दाखवायला" घेऊन जायच्या आधी पप्पा आणि आई स्वत्: जाऊन सर्व काही बघून येतात. काही ना काही चूक सापडतेच. माझ्या वाटेला कुणी जात नाही.
|
Manjud
| |
| Friday, November 02, 2007 - 7:40 am: |
| 
|
हा लग्नानंतरचा कांदेपोहे अनुभव..... तेव्हा आमच्या लग्नाला जेमतेम महिना झाला होता. एका रविवारी सकाळी फोनची रींग वाजली. मी फोन उचलला. कोणीतरी सदगृहस्थ होते फोनवर, मी : हॅलो सदगृहस्थ : नमस्कार, हे कान्हेर्यांचं घर आहे का? मी : हो, आपण कोण बोलताय? स. गृ. : मी, गोडबोले बोलतोय. अमुक संघातून तुमच्या मुलाचं हे स्थळ मिळालं. माहिती आवडली, म्हणून लगेच फोन केला. मग कधी येऊ मुलीची पत्रिका आणि फोटो घेऊन? तुम्हाला आज वेळ असेल तर आजच येतो. बरं, शशांक तुमचा मुलगाच आहे ना? मी : नाही, माझा नवरा आहे तो......... (हे वाक्य बहुतेक त्याना ऐकू गेलं नाही किंवा माझ्या उत्तराकडे त्यानी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि पुढचं फायरींग सुरु केलं.) स. गृ. : अहो होतं काय की मुलाचे काका किंवा भाऊ फोन घेतात मग आपली पंचाईत होते. मग कधी येऊ म्हणताय? मी : अहो ते स्थळ तिकडून रद्द केलं असलं पाहिजे, तुम्हाला कसं मिळालं? (मला काय गरज होती हा प्रश्न विचारायची? पण म्हटलं बघूया तरी हे स्थळ प्रकरण आपल्या आया कश्या हॅंडल करताट) स. गृ. : अहो, २ महिन्यापुर्वीच मिळालंय, पण बाकिच्या स्थळांकडून पुढचं उत्तर मिळालं नव्हतं म्हणून थांबलो होतो. तुमची अट आहे ग्रॅजुएट मुलगी हवी म्हणून, आमची मुलगी आहे बारावी झालेली, पण बोलण्यात डब्बल ग्रॅजुएटना पण मागे टाकेल. मग कधी येऊ तुमच्याकडे? आज संध्याकाळी ५ वाजता चालेल? १० दिवसात पितृपक्ष चालू होईल ना, घाई करायला हवी. (एव्हाना सासू सासर्याना एकंदर चर्चेवरून फोनची कल्पना आली होती, तेही हसत हसत माझी मजा बघत होते) मी : अहो पण आता उपयोग नाही मुलगी बघून. स. गृ. : का हो? अहो बघून तर घ्या एकदा, एकदा मुलगी बघितलीत की आधी होकार दिलेल्या मुलीला नकार कळवाल तुम्ही. आपण मुलाच्या काकू बोलताय का? मुलाच्या वडीलाना विचारून मला सोईस्कर वेळ सांगता का? (बहुतेक तेही वैतागले असावेत फोनवर बोलून...) मी : (शान्तपणे) मी मुलाची बायको बोलत्ये.आणि आमचं लग्न होऊन १ महिना झालाय त्यामुळे आता नकार देण्याचा प्रश्नच नाही. फोन ठेवल्यावर आमच्या घरात जो काही हसण्याचा कल्लोळ झालाय की विचारू नका.... त्यानंतर सासूबाईनी पहिलेछूट सगळ्या मंडळमधून नाव रद्द करण्याचे काम केले.
|
Badamraja
| |
| Friday, November 02, 2007 - 9:24 am: |
| 
|
Manjud मुलाच्या मनात काय आहे हे एकदा तरी विचारयसच, त्याची मर्जी नविचारताच स्थळ नाकारायला नको होत. ( just kidding tk it easy )
|
Manjud
| |
| Friday, November 02, 2007 - 9:42 am: |
| 
|
बदामराजा, लग्नाला १ महिनाच झाला होता हो फक्त. नव्याची नवलाई असते ना....... १ वर्ष झालेलं असतं तर विचारलं असतं बिचार्याला, तेवढीच मलाही एक संधी मिळाली असति!!!
|
Badamraja
| |
| Friday, November 02, 2007 - 12:28 pm: |
| 
|
---विचारलं असतं बिचार्याला--- मुले लग्ना नंतर बीचारी होतात. (काही अचारी ही होतात)
|
आणी विचारीही नंतरच होतात ?! चला, तिय्या जुळला
|
नंदिनी, कहर केलास हा हा ! मंजू, तुझा किस्सा सही आहे.
|
Rimzim
| |
| Friday, November 02, 2007 - 3:28 pm: |
| 
|
मंजु ह ह पु वा सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला माझ्या लग्नानंतर एका सासु होण्याच्या मर्गावरच्या बाईने खुप वेळ माझी चौकशी केली आडनाव काय, शिक्षण काय वगैरे. आता direct अहो काकु माझे लग्न झाले आहे असे पण म्हणता येत नव्हते. ( लगेच मी असे कुठे विचारले म्हणाल्या तर काय घ्या.....) त्या वर मैत्रिणीने सांगीतले, हि (मी) माझी मैत्रीण पुढच्या महिन्यात US ला जाते आहे. (काकु परत खुष... MS करणार आहेस का? ) मैत्रीण नाही MS नाहि पण सध्या cooking शिकते आहे. (काकुंना काही संदर्भ लागत नव्हता) बराच वेळ अशाच दोघी बोलत राहिल्या. शेवटि अहो नवर्याला नको वाटायला कि हिला cooking येत नाही म्हणुन लग्न झाले आता नवरा तिकडे मग हिला पण जायला नको का? कांदेपोहे चा अनुभव नाही पण माझ्या याच मैत्रिणिसोबत असताना लग्नानंतर कांदेपोहे होता होता वाचले २-३ वेळा. प्रत्येक वेळी ह ह पु वा (मैत्रिणीचे लग्न नव्हते झाले अजुन)
|
पूनम, कांदेपोहे फॉर डमीज असेल कदाचीत
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|