Zakasrao
| |
| Saturday, December 08, 2007 - 11:15 am: |
| 
|
टण्या मला DCH मधल्या सैफ़चा चेहरा आणि डायलॉग आठवला
|
Anaghavn
| |
| Saturday, December 08, 2007 - 11:36 am: |
| 
|
हं बरयाच दिवसांत वेंधळेपणा केला नव्हता ना,,घ्या आता!! मला "अज्जुका" असंच म्हणायचं होतं.
|
Ajjuka
| |
| Saturday, December 08, 2007 - 2:24 pm: |
| 
|
अनघा... तुझा mistaken identity चा वेंधळेपणा.. मेरेसे भारी है!! ही ही ही ही
|
प.पू.पिताश्री एव्हडंच बोलून गप्प बसले. ते माझ्या खाजगी बाबतीत लक्ष घालत नाहीत. आई खुश झाली. म्हणाली कोणी तरी आहे जी ह्याला शिव्या घालते ह्याला आणि हा ऐकतो पण. आणि अनघा, एका मुलीने सोडले तर ठीक आहे. दोघींने सोडले. मी दोघींच्या शिव्या शांतपणे ऐकायचो. मी ठरवलं आहे की आता थोडा टफ स्टान्स घ्यायचा. च्यायला पण आता टफ स्टान्स घ्यायलाच कोण मिळत नाहीये.
|
Anaghavn
| |
| Monday, December 10, 2007 - 4:46 am: |
| 
|
"कोई बहोत special लडकी है शायद जो तेरी बनके आने वाली है....उसीका ये background है"..... "वत्सा तुजप्रत कल्याण असो." अनघा
|
आज एक किस्साच घडला. माझ्या एका सहकार्याच्या मोबाईलवर एक 'मिस्ड कॉल' येऊन गेला. तो जागेवर नव्हता. नंतर येऊन त्याने पाहिले तर त्याला तो नंबर कुणाचा हे लक्षात येईना. त्याने आम्हाला दाखवला की तुम्हाला हा नंबर माहीत आहे का म्हणून. पण कुणाच्या ओळखीचा नव्हता. तो म्हणाला ठीकाय, काही महत्त्वाचं असलंच तर ती व्यक्ती मला परत फोन करील. नंतर काही वेळाने काही अतिउत्साही मंडळींना जाग आली आणि आता आलाच आहे तर निदान मुलगी आहे की मुलगा आहे हे तरी जाणून घेऊया("मोस्ट इन्टरेस्टीन्ग थींग!") म्हणून त्या नंबरवर परत फोन करून विचारायचे असे ठरले. पण फोन लागल्यावर बोलायचे काय असा प्रश्न पडला. यावर अमुक अमुक आहे का, असे काहीतरी नाव घेऊन विचारायचे ठरले आणि खूप विचार करून, मुकेश आहे का असे विचारायचे ठरले. फोन लावला, तिकडून उचलला- हॅलो मुकेश है क्या? हां बोलीए, मुकेश हिअर.. असं पलीकडून उत्तर आलं. यावर पुढे काय बोलायचे हे न सुचून यांनी फोन बन्द केला. आम्हा सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली.
|
Kedar123
| |
| Saturday, December 15, 2007 - 9:33 am: |
| 
|
हॅलो मुकेश है क्या? हां बोलीए, मुकेश हिअर.. असं पलीकडून उत्तर आलं. हे वाचल्यावर मला एक किस्सा आठवला. कोणी एक महाभाग (मी नाही तो) फोने करायचा आणि म्हणायचा (समजा केदारने गजानन ला फोन केलाय) केदार स्पीकींग गजानन हीयर (म्हणजे केदार बोलतोय गजानन तू ऐक.)
|
माझ्या लहानपणीचा किस्सा. एके रात्रि एकटाच कोल्हापुर वरुन पुण्याला येत होतो. गाडित मोजुन पाच ते सहा माणसे होती. गाडीतल्या क्लिनर नी सगळ्यांना चाॅकलेट आणि पाणी दिलं मी खुश चाॅकलेट खायला मिळालं म्हणुन. गाडित अंधार झाल्यावर घाइघाइत रॅपर काढले आणि चाॅकलेट चावले तर आतमधे अजुन एक रॅपर होतं आता ते तरि नीट काढावं म्हणुन अंधारात डोळे फाडुन बघितलं तर लक्षात आलं कि तो फेशियल टिश्श्यु होत.
|
>>केदार स्पीकींग गजानन हीयर लय आवडलं हे आपल्याला.
|
या बिबि वर कोणीहि जास्त येत नसल्याने या बिबि चे पालकत्व मी घेत आहे. नुकताच काहि दिवसांपुर्वी केलेला वेंधळेपणा. साहेबां सोबत गाडितुन जात होतो. मोबाईलची बॅटरी ( मराठी प्रतिशब्द?) अगदिच जीव टाकत होति. त्याच्या गाडित चार्जर होता. ( गाडितल्या बॅटरी वर चालणारा.) मी माझा मोबाईल चार्जिंगला लावला. नंतर एका ठिकाणी आम्हि नाष्ट्यासाठी थांबलो. मी उतरायाला लागलो तर साहेब म्हणाले "मोबाईल घे". मी त्यांना म्हणालो "असु दे बॅटरी डाउन आहे". तो माझ्याकडे बघुन म्हनतो "कि तो चार्ज असाहि होणार नाहि गाडि बंद असताना." मी अगदि ओशाळवाणे का असे काहितरि म्हणतात ते हसु तोंडावर आणत "अरे हो कि" म्हणत गपचुप मोबाईल घेउन बरोबर चालु लागलो.
|
अगदि परवाचीच गोष्ट, मी आणि एक मित्र लुलु मार्केट मधे स्पोर्ट शूज घ्यायला गेलो होतो. तिथे त्याच्या बहिनी चा फोन कि मी सुद्धा लुलु मधे च आहे. आपण जाताना घरि एकत्र जाउयात. आमचे सगळे काम झाल्या वर मग आम्हि तिला फोन केला. ति म्हणाली कि मी ईथे लहान मुलांच्या कपड्यांच्या सेक्शन पाशी आहे मग आम्हि तिथे गेलो. तिथुन परत मोबाईल वर फोन केला तर मग म्हणाली कि मी आता बॅग्ज च्या सेक्शन पाशी आहे. मग परत तिथे गेलो. तिथे गेलो तरि ती काहि दिसेना. तिला फोन केला तर म्हणे मी ईथेच तर उभी आहे. तुम्हिच मला फसवताय. कुठे तरि मुली बघत फिरत बसलाय मला इथे उभं करुन. तिथे तिला भरपुर शोधले तरि काय सापडायला तयार नाहि. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला म्हणालो तिला विचार कुठल्या लुलु मधे आहे. इथे दोहा मधे दोन लुलु आहेत एक लुलु हायपेर मार्केट आणि दुसरे लुलु सेंटर. ति तिकडे लुलु सेंटर मधे शोधतिये आणि आम्हि लुलु हायपर मधे.
|
Sandu
| |
| Monday, December 31, 2007 - 4:09 pm: |
| 
|
आरे, गाडी बंद असली तरी mobile charge होतो गड्या. गाडी बंद असतांना headlight लागतातच ना
|
माझ्या मते नाहि होत चार्जिंग. पुढच्या वेळेस परत प्रयत्न करुन बघतो.
|
Nilima_v
| |
| Friday, January 11, 2008 - 9:35 pm: |
| 
|
गाडी बंद असली तरी mobile charge होतो. Battery down asel tar nahi honar.
|
बरे जाउ दे आपण त्यालाअ माझ्या बाॅस चा वेंधळेपणा म्हणु यात. मागे एकदा माझ्या मैत्रिणीच्या मामांना ( जे अतिशय दारुडे आहेत) ससुन मधे घेउन गेलो होतो. तिथे तपासन्या झाल्यावर डाॅक्टर ने आत बोलाविले, म्हणाले " सिच्युएशन क्रिटिकल आहे. लिव्हर पुर्ण पने खराब झाले आहे." मी नको तिथे शहाणपणा करत " एक का दोन्ही?" डाॅक्टर माझ्या ज्ञानाची किव करत उतारले " माणसाला लिव्हर एकच असते. किडन्या दोन असतात"
|
गाडी बन्द असली तर किंवा चालू असली तरीही मोबईल चार्ज होत नाही त्यासाठी गाडीत चार्जेर असावा लागतो. sorry for PJ_ गाडी बन्द असली तरी चार्ज होतो-
|
Jadoo
| |
| Tuesday, January 15, 2008 - 3:26 pm: |
| 
|
मी कालच माझी Engagement ring हरवली. chicago च्या mall मधे. खूप थंडि होती त्यामुळे सारखे हातमोजे काढावे घालावे लागत होते. त्या गडबडीमधे कुठेतरि पडलि. खूप वाईट वाटते आहे. माझि सगळ्यात अनमोल वस्तु माझ्याकडुन हरवली
|
जादू, अनमोल वस्तू हरवली, खरंच वाइट झालं. पण ती अंगठी तुला आयुष्यात किती अनमोल ठेवा देऊन गेलीय!! हा माझा वेंधळेपणा- १८ तासांच्या आॅफ़िसनंतर झोप अनावर होत होती. घाटकोपरसाठी ट्रेन पकडली आणि पेंगत बसलो. ट्रेनचे थांबे मोजताना ती गुंगी झोपेत कधी बदलली कळलं नाही- डोळे उघडले तेव्हां जाणवलं की ट्रेन बर्याचवेळची थांबली आहे. Oversleeping च्या भीतिने चांगली दीड वीत फाटली. ताडकन सीटवरून उठलो, aisle मध्ये उभ्या लोकांना तुडवत उधळलेल्या वासरासारखा दाराशी आलो. थुंकल्या जांभळासारखा थाडकन प्लॅटफ़ाॅर्मवर land झालो. डब्ब्यातले लोक दारातनं शिव्या देत पुढे निघून गेले, फलाटावरचे लोक कुतुहलाने पाहू लागले. मी डोळे चोळत शुद्धीवर आलो, समोर पाहिलं तर कुर्ल्याची पाटी मला पाहून हसत होती. नशीब, विक्रोळीला जागा होऊन टीसीच्या चरणांवर नाही पडलो!!
|
Psg
| |
| Wednesday, January 16, 2008 - 6:54 am: |
| 
|
हा माझा मूर्खपणा.. गाढवपणाही म्हणू शकतो जे मराठी सारेगमप बघतात त्यांना 'अमर ओक' चांगलेच ठाऊक असतील.. ते सारगमपच्या वाद्यवृंदात आहेत आणि अप्रतिम सुंदर बासरी वाजवतात.. एकदाही चूक नाही.. कितीतरी दिग्गज लोकांनी त्यांचं कौतुकही केलं आहे. हल्लीच त्यांना 'युवा संगीतकार' शिष्यवृत्तिही मिळाली आहे.. टीव्हीमुळे त्यांचा चेहरा घराघरात पोचला आहे.. तर हे मला अचानक परवा दिसले/ भेटले.. मी एका प्रदर्शनाला गेले होते, प्रचंड गर्दी होती आणि we literally bumped into each other . मी ताबडतोब ओळखलच त्यांना.. आणि म्हणले, 'तुम्ही अमर ओक ना?' तेही हसले आणि 'हो' म्हणले फ़क्त! बास! मला यापुढे बोलायलाच सुचलं नाही काही.. 'तुम्ही सुरेख बासरी वाजवता' हेही म्हणायला सुचलं नाही.. मी अजून काही बोलत नाही म्हणल्यावर ते गेले पुढे निघून.. आणि मी येड्यासारखी जागेवरच.. श्या! मी स्वत:लच शिव्या घातल्या.. एरवी इतकी बडबड चालू असते माझी आणि तेव्हा धड एक वाक्यही त्यांना बोलता आलं नाही मला.. I literally kicked myself later पण काय उपयोग??
|
२ दिवसापुर्वीचा वेंधळेपणा... याहू मेल चेक करत होती. एक मेल वाचुन डिलीट केला आणि नंतर आठवल की काहीतरी वाचण्यासारख होत मेल मध्ये. म्हणुन परत trash मध्ये जाउन मेल ओपन केल. वाचुन झाल्यावर म्हटल आता डिलीट करुया. एक एक मेल डिलिट करताना लक्षात आल अरे हे सगळे मेल डिलीट केलेत मग परत कसे आले??? २ सेकंदानी लक्षात आल की आपण trash मध्ये आहोत ते...
|