|
Supermom
| |
| Monday, January 21, 2008 - 7:19 pm: |
|
|
मला कोणी मुंजीच्या विधींबद्दल माहिती देईल का? मला मुंज का करतात वा त्यातील विधींचे अर्थ नको आहेत. थोडक्यात धार्मिक माहिती नको आहे. तर साधारण किती दिवसांचा सोहळा असतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणकोणते विधी करायचे असतात, यातले हौसेचे कोणते व आवश्यक कोणते, तसेच मुंजीत मामाचे काम काय असते,समारंभ देखणा व्हावा यासाठी काही अनुभव, टिप्स अशी माहिती हवीय.
|
Yog
| |
| Monday, January 21, 2008 - 10:45 pm: |
|
|
>वा त्यातील विधींचे अर्थ नको आहेत >सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणकोणते विधी करायचे असतात, यातले हौसेचे कोणते व आवश्यक कोणते,... कोणते विधी आणि आवश्यक कोणते हे त्याचे महत्व वा धार्मिक अन्ग समजावून घेतल्याशिवाय कसे ठरवता येईल..? आणि विधीन्चे अर्थ नको आहेत असे का बरे? अर्थात तो तुमचा वैयक्तिक प्रश्ण आहे पण the info u are asking and what u are stating are contradictory.. समारंभ देखणा हवा सेल तर "बटूच्या" डोक्यावर टाटू काढता येईल(अर्थात केस का कापायचे, इत्यादी धार्मिक वा वैदीक माहिती नको असेल किव्वा महत्वाची नसेल तर) असो. जमेल तशी माहिती इथे टाकतो.. आवश्यक ती घ्या. हा bb "looking for" मधे अधिक योग्य होईल बहुदा..
|
Supermom
| |
| Monday, January 21, 2008 - 11:19 pm: |
|
|
योग, मला धार्मिक विधींचे अर्थ नको आहेत म्हणजे आत्ता नको आहेत. आधी मला किती वेळाचा समारंभ असतो वगैरे माहिती हवीय कारण भारतात फ़ारच कमी दिवस हाताशी मिळतात त्यात मूळ गाव सोडून इतर ठिकाणीपण सतत प्रवास असतात. या अत्यल्प वेळात जास्तीत जास्त चांगला समारंभ करायचा तर नीट प्लॅनिंग हवे. त्या दृष्टीने तसेच तयारीच्या हेतूने विचारले होते. या माहितीबरोबरच विधी व त्यांचे अर्थ ह्याचीही माहिती तुम्ही देऊ शकलात तर आनंदच होईल.
|
Arch
| |
| Tuesday, January 22, 2008 - 4:56 pm: |
|
|
Supermom , तू कशाप्रकारे मुंज करणार आहे त्यावर वेळ अवलंबून आहे. माझ्या मुलाची मुंज मी पुण्यात केली होती. ज्ञानप्रबोधिनीचे गुरु आले होते. त्यांनी प्रत्येक गोष्ट त्याला english मध्ये समजाऊन सांगितली. आम्ही फ़क्त घरातलेच लोक होतो ह्या विधीला. सगळेजण त्याच्याबरोबर बसलो होतो. आणि त्या गुरुजींनी आम्हालाही काही मंत्र त्याच्याबरोबर म्हणायला लावले. त्यामुळे लेकाला विधी अजिबात कंटाळवाणा झाला नाही व मुंजीचा अर्थही व्यवस्थीत कळला. घरातलीच लोक त्याच्याबरोबर बसली असल्यामुळे सगळ्यांच लक्षपण विधीत होत. अजिबात इतर गप्पागोष्टी होत नव्हत्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांसाठीम्हणजे इतर नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांच्यासाठी party arrange केली होती. ह्या सगळ्यामुळे मुंजीच महत्व अजिबात कमी झाल नाही. माझ्या इथल्या एका नातेवाईकाने जेंव्हा वैदिक पध्द्तीने भारतात जाऊन मुंज केली होती तेंव्हा आलेल्या पाहुण्यातली सगळी मुलं आजूबाजूला खेळत होती आणि हा आपल्या आईवडिलांबरोबर मुंजीचे विधी करत होता आणि इतका कंटाळला होता कारण आजूबाजूला लोक मजा करत आहेत आणि मला मात्र इथे डांब्वून ठेवल आहे अस त्याला सारख वाटत होत. अर्थात प्रत्येकाची हौस वेगळी असते.
|
Supermom
| |
| Tuesday, January 22, 2008 - 5:28 pm: |
|
|
आर्च, तुझी माहिती मला नवीन आहे. अर्थ इंग्लिश मधे समजावून सांगितला तर मला तरी खूप आवडेल. तुझ्याकडे काही पत्ता, फ़ोन नंबर वगैरे आहे का ज्ञानप्रबोधिनीचा? दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या नवर्याचा सगळ्या शास्त्रोक्त विधींवर विश्वास तर मला सगळी हौस पण हवीय. थोड्या वेळात या सार्यांचा समन्वय कसा साधायचा हा प्रश्न आहे. आणखी एक, तुझा मुलगा त्या वेळी किती वर्षांचा होता?
|
Sayonara
| |
| Tuesday, January 22, 2008 - 10:28 pm: |
|
|
सुमॉ, मुलाने आठव्या वर्षात पदार्पण केलं की करता येते मुंज. मागे पेपरात एका बाईंनी लिहिलेलं वाचलं होतं की त्यांनी आपल्या मुलाबरोबर मुलीचीही मुंज केली होती. मला ती कल्पना खूप आवडली होती. तो पेपर खूप जुना होता त्यामुळे त्यातले संदर्भ आता लक्षात नाहीत.पण मला वाटतं लोकसत्तात वाचलं होतं.
|
Zakki
| |
| Tuesday, January 22, 2008 - 10:37 pm: |
|
|
मी पण आमच्या नात्यातल्या एका मुलीच्या मुंजीला नॉर्थ कॅरोलिनाला ८ फ़ेब्रुवारी ला जाणार आहे.
|
Manjud
| |
| Saturday, February 16, 2008 - 6:36 am: |
|
|
सुमॉ, मी मागच्या आठवड्यात एका मुंजीला गेले होते. इथे हौशीचे / मौजेचे वाटलेले काही प्रसंग्: १. मूंज लागताना चॉकलेट्सचा अंतरपाट धरला होता. २. मूंज्मुलाला मामाने कडेवरून उचलून आणले. (पूर्वीच्या काळी मुलगा पळून जाऊ नये म्हणून मुलाचा मामा त्याला उचलून आणायचा.) ३. संध्याकाळी भिक्षावळ घोड्यावरून मिरवली. ४. भिक्षावळीनंतर मुंज मुलगा आणि कुटूंबिय देवळात जाऊन घरी आले तेव्हा त्यांचे स्वागत फुलांच्या पायघड्या घालून केले.
|
Dhondopant
| |
| Saturday, February 16, 2008 - 10:44 am: |
|
|
मुंज हा यज्ञोपवीत धारण करण्याचा विधी आहे. ईथे मुलगा हा बाल्यावस्था संपुन कुमाराव्स्थेची जी अलिकडली stage असते तीत असावा लागतो. पुर्वी गुरुंकडे जाताना शिकायला जाताना हा विधी करुन द्वीज व्हावे लागत असे आणि मग तो गुरुग्रुही ब्रम्हविद्य शिकण्यास जायचा.तेव्हा वडील त्याला गायत्रीमंत्राचा उपदेश देत असत. त्याकाळी secular वगैरे प्रकार नसत आणि Global citizen बनवावे असेही पिताजीना वाटत नसावे. मुलावर आपोआपच संस्कार होत. मुंज हा विधी एका दीवसाचा आहे. तो सकाळी चालु करुन तीन वाजेपर्यंत आटोपता घेत येतो.... मानपानाचे साहीत्य जर तुम्ही आधीच घेतले तर तीन दीवस वेळ भरपुर आहे.. पैसा असला की सर्व सोंगे वठवता येतात.. पुर्वी तो नसायचा म्हणुन तयारीला वेळ लागायचा.. विचारस्वातंत्र्यामुळे हा विधी कसा करायचा, करायचा की नाही, केल्यास कसा करावा, fancy प्रकार कीतपत असावेत हे ज्याचे त्याने ठरवावे..
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|