Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 18, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक » Archive through January 18, 2008 « Previous Next »

Zakasrao
Tuesday, January 08, 2008 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार
सुमॉ १००% पटल.
कालच ताइम पास म्हणुन झी सिनेमा लावला तर तिथे सनी भाउचा चॅंपिअन लागला होता. त्यात एका लहान मुलाच्या सुरक्षेसाठी सनी असतो.
ते पोरग आणि त्याची मित्र मैत्रीणिंची गॅन्ग वात्रट दाखावली आहे.
त्यातल्या एका छोट्या (वय वर्ष फ़ार तर ६-७) पोरीच्या तोंडी तर डायलॉग दिलाय की सनी कसला क्युट दिसतो आणि ती त्याच्याशी लग्न करायला तयार आहे असा. हे म्हणजे काहिच्या काहीच


Tanyabedekar
Tuesday, January 08, 2008 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कुणीतरी मनोज कुमारच्या क्रांती बद्दल लिहा रे!!!! मला बस मध्ये ह्या पिक्चरचा काही भाग बघायला मिळाला.. केवळ भयाण आहे.. ह्या बीबी साठीच बनवलेला सिनेमा आहे तो..

Vinaydesai
Tuesday, January 08, 2008 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'क्रांती' ज्या काळी आला तेव्हा आमच्याकडे (गावामध्ये) रिक्शाला कर्णा ( LoudSpeaker ) लाऊन जाहीरात केली जायची...

माझ्या एका मित्राला तो सिनेमा पहायची इच्छा झाली, आणि त्याने त्याच्या वडिलांकडे परवानगी मागितली...

'अरे गावभर ओरडत फिरताहेत 'घाण ती', 'घाण ती' म्हणून, तरी तुला बघायची आहे?' त्याचे वडिल म्हणाले...


Divya
Tuesday, January 08, 2008 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'घाण ती', 'घाण ती' म्हणून, तरी तुला बघायची आहे?'.... LOL


Meghdhara
Wednesday, January 09, 2008 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अचाट आणि अतर्क्य लॉजिक हिन्दि सिनेमात कसं घुसडावं याचं क्लासीक उदाहरण अतिशय रद्दड वेलकम मधे दिसतं. यातला शेवटचा सीन पांचटपणाचा कळस आहे. नाना पाटेकरचं काय चाललय..?

मेघा


Ankyno1
Wednesday, January 09, 2008 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल 'सहारा फ़िल्मी' वर 'अनर्थ' नामक सिनेमा लागला होता...
दोनच सीन्स पाहिले... महान होते...

सीन पहिला...
एका टकल्याला काही गुन्डे मारत असतात. जीप मधून जणारे सुनील शेट्टी आणि त्याचा मित्र थाम्बतात आणि खाली उतरून टकल्याच्या मदतीला... "साले... हमारे दोस्त को मारते हो..." फायटिन्ग सुरू...
तेव्हड्यात एक माउली खिडकीत येते आणि ओरडते... "बंड्या.... हे घे..." आणि क्रिकेट बॅट खाली टाकते.. खाली तो टकलू बंड्या ती कॅच घेतो आणि वळतो.... मी खाली पडणार होतो.... बंड्या म्हणजे साक्षात विनोद काम्बळी.... मग पुढे तो मैदानात न जमलेले क्रिकेट शाॅट्स लोकान्ना हाणतो... त्याची ही फटकेबाजी चालू असताना बाजूचा एक पोरगा हातानी १,२, चौकार आणि शेवटी षट्कार अशा खुणा करत असतो... शेवटचा शाॅट मारल्यावर काम्बळी साहेब शतक झाल्यासारखे बॅट ही वर करून दाखवतात..... आणि डायलाॅग मारतात "बंड्याच्या हातात बॅट आली की समोरच्याची हवा निघाली"

सीन दुसरा....
पार्श्वभूमी अशी की बंड्या चा खून झालाय आणि त्या गम मधे परममित्र सुनील दुसर्‍या भाइ च्या एरिआ मधल्या बार मधे दारू ढोसायला आला आहे.... (आपल्या एरिआ मधे बार नाहीत का त्यात दारू मिळत नाही हा मला पडलेला प्रश्ण नंतर आशुतोश राणा नी त्याला विचारल्यावर मला आशुतोश राणा विषयी एकदम आपुलकी वटायला लागली)....
अरे.. भटकलो मी.... कुठे होतो आपण?.... येस्स... दुसर्‍या भाइ च्या एरिआमधल्या बार मधे (आपण म्हणजे आपला
point of interest... सुनील शेट्टी) त्या बार मधे ते दुसर्‍या भाई चे ३ पंटर असतात (असायचेच... बार मधे नसणार तर काय मराठी नाटकाच्या प्रयोगात असणार का) ते सहाजिक सुनील ची खिल्ली उडवतात आणि आधिच चिडलेला सुनील आणखी चिडतो... मग दे मार हाणामारी... त्यच्या शेवटी तो पिस्तूल काढतो आणि एका पंटर ला गोळ्या घालायला लागतो... १ २ ३.... अरे ३ लोक आहेत... एकाला ३ आणि इतर दोघान्ना कमी असं करून कसं चालेल... पण तो जेन्व्हा चौथी गोळी झाडतो तेन्व्हा दिसतं... गोळी क्र. ३ आणि ४ या पंटर क्र. १ मधून आर पार जाउन पंटर क्र. २ ला लागतात.... हे पाहून मार खाउन पडलेला पंटर क्र. ३ उठतो... (त्या दोघान्न २-२ गोळ्या... मला १ पण नाही असं कसं ?)... आपण जाग्रुत झाल्याची सूचना तो मोठ्ठी आरोळी ठोकून देतो... सुनील कडे अजून २ गोळ्या शिल्लक असल्यानी तो परत पंटर क्र. १ च्या मुडद्यातून आर पार गोळ्या मारून पंटर क्र. ३ ला यमसदनी पाठवतो...
रामाचा बाण म्हणे एका ओळीतल्या ७ झाडान्मधून आर पार जायचा... सुनील च्या गोळ्या फक्त २ माणसान्मधून जातात....


दोन्ही सीन्स मधे सुनील शेट्टी सर्दी झाल्यासारखा नाकानी फुरफुर आवाज करत असतो... (अधून मधून तर हातालाही नाक पुसल्यासारखं करतो.... हा. हा. पु. वा.)


Milya
Wednesday, January 09, 2008 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईला भन्नाट बीबी आहे हा...

नुसती ह.ह.पु.वा.

Zakasrao
Wednesday, January 09, 2008 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन्की
आता बघायलाच हवा :-)
BTW तुझ्या आयडीचा उच्चार काय आहे??


Ankyno1
Wednesday, January 09, 2008 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उच्चार अँकी नं. १ असा आहे


सिनेमाचं म्हणाल तर झकासरव्;
watch it at your own risk

परिणामांना मी अथवा सुनील शेट्टी अथवा विनोद कांबळी अथवा इतर कोणीही जबाबदार नाही....

BTW...
या सिनेमा मधे एक स्वदेशी प्रेम दर्शवणारं गाणं आहे....

ये है
england की
ये है
poland की
ये है
russia की तो
ये है
switzerland की
अरे देसी है बंदा कर बात मेरी
land की
whiskey पिलादे मुझे indian brand की

Manjud
Wednesday, January 09, 2008 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍंकी नं. १

पण बंदूकीतून सोडलेल्या गोळ्यांच्या कसरती करणारा फक्त एकच - 'रजनीकांत'.


Ajjuka
Wednesday, January 09, 2008 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा कुठल्यातरी चॅनेल वर एक मराठी सिनेमा लागला होता. सगळा माहौल हिंदी होता. किंवा भोजपुरी होता म्हणूया. अंजू महेंद्रू, किरण कुमार असे सगळे हिंदीवाले लोक आपल्या भयाण मराठीमधे बोलत होते. अंजू महेंद्रू आपल्या तरूणपणातली आठवण सांगत होती. अंजू चं किरण कुमार शी लग्न होतं. मग ती सुहाग रात साठी बसलेली असते. मग तो येतो आणि तिचे दागिने काढू लागतो. ते करत असताना 'हे कर्णफुले कशाला मधे, पटत नाही. हे गळ्यातला हार कशाला मधे, पटत नाही. हे बांगड्या मधे, पटत नाही' असं सगळं न पटणारं म्हणत रहातो. साधारण ४५ ची दिसणारी अंजू महेंद्रू 'शादी के जोडेमे' आणि तेवढाच दिसणारा किरण कुमार नवर्‍यामुलाच्या वेषात. आपल्या अत्त्युच्च मराठीत फारसं तोंड न हलवत 'पॅटॅत नाह्य!' असं म्हणतो तेव्हा माझा टिव्ही किती बिचारा झाला असेल... पटत नाही ना.. मला पण पटलं नाही आणि मी चॅनेल बदलायला गेले तोवर त्यांचे 'न पटणारे दागिने उतरवा' हे खेळून झाले होते. आणि मग किरण कुमार ने ते सगळे दागिने एका कापडात बांधले. अंजू महेंद्रू च्या पदराला हात घातला. blackout ढॅण्ण्ण!! म्युझिक... कट टू.. दुसर्‍या दिवशीची सकाळ.. आधीच्या सीनमधल्या पेक्षा वेगळं म्हणजे सिंदूराचा फराटा ओढलेली अंजू महेंद्रू जवळ जवळ 'हल्ली गुडघे दुखतात माझे' अश्या चेहर्‍याने जागी होते. उठते आणि शेजारच्या स्टुलाकडे पहाते. तिथे दगिन्यांची पुरचुंडी नसते आणि त्या खोलीतले किरण कुमारचे कपडेही गायब झालेले असतात. ढॅण्ण्ण्ण्ण! कट टू म्हातारी (खरंतर फक्त कपडे बदललेली) अंजू महेंद्रू आठवणीतून जागी होते.

मी नंतर टिव्ही ची माफी मागते!


Slarti
Thursday, January 10, 2008 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंजू महेन्द्रू अन् किरणकुमार मराठीत ?? का ? का ? पण का ?
फारा वर्षांपूर्वी अनिता राज व गिरिश ओक यांना एका चित्रपटात पाहिले, तेव्हाही... का ? का ? पण का ?


Ajjuka
Thursday, January 10, 2008 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का? का?? पण का??? हे माझंही होतं दरवेळेला तो सीन आठवला की!!

Shendenaxatra
Thursday, January 10, 2008 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजेश खन्नाची कारकीर्द घसरणीला लागली होती त्या काळात आशिक हूं बहारोंका नामक एक अनेक अचाट आणि अतर्क्य गोष्टी भरलेला सिनेमा आला होता. तो पहाण्याचे भाग्य(!) काही वर्षापूर्वी लाभले.

त्यात मध्यमवयीन दिसणारा राजेश खन्ना तरुण संशोधक दाखवला आहे. तो स्विट्झरल्यांड मधे काही हायफाय न्युक्लियर सायंस शिकायला जातो. अभ्यास वगैरे फारसा करताना दिसत नाही. छान छान दिसणार्‍या गाड्या चालवणे, बाजूला छान छान दिसणार्‍या कन्या बसलेली वगैरे प्रकार भरपूर! (बहुधा हा संशोधनाच भाग असावा)

पण म्हणे मग भयंकर संशोधन करून तो असे काहीबाही उपकरण शोधून काढतो की त्याने झाडे भराभरा वाढू शकतील! (कसे ते देवच जाणे).
त्याच्या संशोधनाचा डेमो म्हणून एक छोटे झुडुप बाबा आदम च्या काळातील आनिमेशन दाखवून मोठ्ठे होताना दाखवले आहे. सोबत ट्यांव ट्यांव आवाजाचे पार्श्वसंगीत! न्युक्युलर फिजिक्स आणि बॉटनीचा असा मेळ दोन्ही विषयाचा गंधही नसणारे हिंदी सिनेमा दिग्दर्शकच करू जाणे!
मग हा थोर देशभक्त, हे अचाट संशोधन घेऊन भारताचा अन्नाचा प्रश्न कायमचा सोडवायला देशी येतो. मग खलनायकाबरोबर दे दणादण इत्यादी इत्यादी!

एकंदर ह्या सदरात फिट्ट बसणारा सिनेमा.
चू.भू.द्या घ्या. हा सिनेमा बघून बरीच वर्षे झाली आहेत.


Farend
Friday, January 11, 2008 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंडेनक्षत्र

पाहायला पाहिजे हा चित्रपट. राजेश खन्नाने त्यावेळी तेच औषध स्वत:च्या डोक्यावर लावले असावे कारण त्याच्या त्या काळातील पिक्चर्स मधे त्याचे केस कान झाकण्याएवढे लांब होते ('आनंद' मधले बघा आणि मग 'हाथी मेरे साथी' मधले )


Mrinmayee
Friday, January 11, 2008 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरजा, तुझं पोस्ट वाचून मी आणि नवरा, दोघेही पोट धरधरून हसलो! खूपच फर्मास लिहिलंय! नाव सांग सिनेमाचं. नावडत्या मंडळींना प्रेमाची भेट म्हणून ह्याची DVD देता येईल!

'आशिक हूँ बहारोंका'.. बघायला हवा! आमच्या बॉटनीच्या एका खत्रुड सरांसाठी (स्वत:ला ग्रेट संशोधक समजून इतरांना किस झाडकी पत्ती समजणारे) ही DVD भेट म्हणून घेईन!


Nandini2911
Friday, January 11, 2008 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठल्याशा सिनेमामधे गोविंदा ममता कुलकर्णीला "मुझे इंजिनीअरिंगके नोट्स चाहिये म्हणतो." कॉलेजचा बोर्ड सीटी कॉलेज ऑफ़ आर्ट्स. आणि ती त्याला एक शंभरपानी वही देते. :-)

Slarti
Friday, January 11, 2008 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिटी कॉलेज ऑफ आर्ट्स म्हणजे 'सोशल इंजिनिअरींग' असेल.

Ajjuka
Friday, January 11, 2008 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं मृण्मयी मला सिनेमाचं नाव माहित असतं तर इथे आधीच नसतं का दिलं! पण शोधलं पाहिजे कुणावर सूड घ्यायचा असेल तर बघायला लावली पाहीजे... ऐडिया शॉल्लेट!!

Uchapatee
Friday, January 18, 2008 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बा.फ. वर अजुन पर्यंत “जानी” राजकुमारच्या सिनेमा बद्दल कसे लिहिले गेले नाही?
अचरटपणात “जानी” राजकुमारचे पिक्चर्स कशालाही हार जाणार नाहीत. त्याचा “तिरंगा” हा सिनेमा देखील असाच अचरटपणाने भरलेला होता. बरेच दिवसांपुर्वी पाहीला असल्याने फार तपशील आठवत नाहीत. ज़े आठवतात ते असे. सिनेमात प्रलयनाथ गुंडास्वामी (कि गेंडास्वामी) नावाचा खलनायक भारतात बॉम्बस्फोट, दंगली, अतिरेकी कारवाया वगैरे घडवुन अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामधे त्याला एका मंत्री सामील असतो. तो देशातिल तिन महत्वाची शहरे मिसाईलने उडवण्याचा प्लान करतो. त्या मिसाईल्स करता त्याला “फ्युज कंडक्टर” (?) नावाचा छोटासा पण महत्वाचा पार्ट लागणार असतो. त्या साठी तो भारतातिल नामवंत साईंटिस्टसना पळवतो व मारण्याची धमकी देउन “फ्युज कंडक्टर” मिळवतो. “जानी” राजकुमार ब्रिगेडीयर दाखवला असुन तो नाना पाटेकरच्या मदतिने खलनायकाला संपवतो व देशाला वाचवतो.

सिन क्र. 1 – गावा बाहेरील रानात प्रलयनाथचे गुंड हॅंड ग्रेनेड्स, बंदुका वगैरे कुठेतरी पाठवत असतात. एका ट्रेनी गुंडाला हॅंड ग्रेनेड बद्दल मुलभूत शंका निर्माण होते. त्याच्या शंका निरसनार्थ त्याचा सिनीयर गुंड त्याचे थोड्क्यात बौद्धीक घेतो व प्रात्यक्षिक म्हणुन एक हॅंड ग्रेनेड पिन काढुन रानातल्या झाडांमधे फेकतो. पण काय आश्चर्य़! ग्रेनेड फुटतच नाही. पुरेशी उत्सुकता ताणल्यावर झाडांमागुन राजकुमार ग्रेनेड चेंडु सारखा झेलत झेलत बाहेर येतो. नंतर त्या गुंडाचा तोच ग्रेनेड फेकुन खातमा करतो.
तात्पर्य : ग्रेनेड हा दिवाळीतिल आपटबारची मोठी अवृत्ती आहे. तो वरचे वर झेलल्यास फुटत नाही, जमीनीवर आपटल्यासच फुटतो.
शेवटचा सिन : यात नेहेमी प्रमाणेच खलनायकाचे पारडे वर आहे. प्रलयनाथने राजकुमार नाना पाटेकर यांना पकडुन बांधलेले आहे. त्यांनी जास्त गडबड करु नये म्हणुन त्यांच्या कुटुंबियांना सुध्दा पकडुन बांधले आहे. राजकुमारला पाईप ओढण्याची सवय असते. राजकुमार काहीतरी(च) संवाद म्हणत पाईप कढतो व प्रलयनाथला डिवचतो. प्रलयनाथ चिडुन पाईप खेचतो व फेकुन देतो. त्याबरोबर फेकलेल्या पाईपचा स्फोट होतो व उडालेल्या धुराळ्यात काहीच दिसत नाही. धुराळा खाली बसल्यावर सर्व काही पुर्वी सारखेच असते. म्हणजे राजकुमार, नाना पाटेकर त्याच्या जागेवरच उभे, त्यांच्या वर रोखलेल्या बंदुका, बांधलेले कुटुंबीय सर्व तसेच असतात. प्रलयनाथ राजकुमारला डिवचतो. “बघ. आपल्या प्रिय देशाचा नाश मरण्यापुर्वी आपल्या डोळ्यांनी बघ.” आणी मिसाईल फायर करण्याची ऑर्डर देतो. पहिले मिसाईल फायर करतात. पण मिसाईल टेक ऑफ न घेता नुसते जागेवरच धुर सोडते. वैतागुन प्रलयनाथ दुसरे मिसाईल फायर करण्याची ऑर्डर देतो. ते पण टेक ऑफ न घेता नुसते जागेवरच धुर सोडते. तिसर्‍या मिसाईलची पण तीच गत होते. हे पाहुन प्रलयनाथ साईंटिस्टला गोळी घालुन मारून टाकतो. तेंव्हा राजकुमार हे आपणच केल्याचे व कसे केल्याचे सांगतो.
“प्रलयनाथ, हम जानते थे कि तुम हमारा पाईप छुओगे और फेकोगे जरुर. ईसलिये हमने उसमे डायनामाईट फिट किया था. ज़ब धमाका हुवा तब हमने तुम्हारे तिनो मिसाईलके “फ्युज कंडक्टर” निकाल लिये. अब तुम्हारे मिसाईलोमे धुवे के अलावा कुछ नही”
काय तो कॉंनफिडन्स. आणी डायनामाईट आपटबार सारखा नुसता फेकल्याने स्फोट होतो? मिसाईल मधे काय नुसता “धुंवा” आणी फ्युज कंडक्टर असतो? तसे असेल तर मिसाईल बनवणे फरच सोपे. फक्त फ्युज कंडक्टर मॅनेज करायचा. प्रलयनाथने बहुतेक “घरच्या घरी तयार करा” किंवा “हे तुम्हीही करू शकता” अशा सदरा खाली मिसाईल तयार करण्याची कृती वाचून मिसाईल्स तयार केली असावीत. कृती साधारणपणे खाली दिल्याप्रमाणे असावी.
घरच्या घरी मिसाईल तयार करा” (तुम्हीही घरच्या घरी मिसाईल बनवु शकता). साहित्य : एक 8-10 फुट लांबीचे व 8-10 ईंच व्यासाचे (डायमिटरचे) पत्र्याचे नळकांडे, एक दिड फुट उंच व 8-10 ईंच व्यासाचा पत्र्याचा कोन (शंकू), फ्युज कंडक्टर, 8-10 ईंच व्यासाची पत्र्याची तबकडी, थोडी लाकडे व काडेपेटी.
(टीप: नळकांडे, शंकू व तबकडी यांचा व्यास सारखा हवा). कृती : प्रथम नळकांडे घेउन त्याचे एका तोंडाला शंकू जोडावा. ज़ोडतांना शंकूचे तोंड नळकांड्यांच्या बाहेर राहील याची काळजी घ्यावी. नंतर लाकडे पेटवुन त्याची शेक़ोटी करावी. लाकडे नीट पेटायच्या आधीच नळकांड्यांचे उघडे असलेले तोंड शेक़ोटीवर धरावे. शेक़ोटीचा धुंवा नळकांड्यांत भरू द्यावा. धुंवा पुरेसा भरला गेल्यावर तबकडी घेउन नळकांड्यांचे तोंड सील करावे. तबकडीवर फ्युज कंडक्टर बसवावा. तुमचे मिसाईल तयार! आहे कि नाही सोपे. तर मग चला आपण घरच्या घरी मिसाईल बनवुया.

सिनेमात अजुन ही बराच मसाला आहे. ज्याला कुणाला सिनेमा आठवत असेल अजुन भर घालावी.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators