Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 18, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Maargdarshan karaa... » Archive through January 18, 2008 « Previous Next »

Akshra
Tuesday, January 15, 2008 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग़ पण घरच्याना हि गोश्ट बाहेरुन कळ्ली.म्हनुन राग नाहि ना?कारन ७ वर्शात एकदाहि तुल त्याना सान्गावेसे वाटले नाहि. अस त्याना वाट्त असेल.

Dineshvs
Tuesday, January 15, 2008 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगिता, मग जा पुढे.
कुटुंबियांच्या प्रत्येक मुद्द्याला, न चिडता उत्तर द्या. या मुद्द्यांचा तुम्ही काय विचार केला आहात, ते स्पष्टपणे सांगा. त्या मुद्द्याचा विचार केला नसेल, तर विचार करण्यासाठी वेळ मागुन घ्या. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकुन घ्या. त्या मुद्द्यांचा शांतपणे व ठामपणे प्रतिवाद करा. आपल्या निर्णयावर ठाम असाल, तर त्यांच्या उद्रेकाला सामोरे जा. नवे नाते जोडताना, जुने तोडायचे नसते हे लक्षात ठेवा.

धाकटी भावंडे अनुकरण करतील, हाच एक मुद्दा असेल, तर आता व नंतर ती स्वतंत्र निर्णय घेणार नाहीत, याची काय खात्री आहे, असे विचारा.

कटुता आलीच, तर ती केवळ त्यांच्याकडुन आहे असे लक्षात घ्या पण आपल्याकडुन ठेवु नका. भविष्यात मदतीची अपेक्षा न करता, मदत करायची मात्र तयारी ठेवा.

आपला निर्णय किती ठाम आहे, ते येत्या काळात ठरवणे तुमच्याच हातात आहे. यशाचे श्रेय तुमचे आणि न येवो, पण आलेच तर अपयशाची जबाबदारी देखील तुमचीच.

आईवडीलाना काळजी असते ते मुलीचे कसे होईल याचीच, जर ते व्यवस्थित झाले तर काळाच्या ओघात विरोध मावळतोच. आणि समजा गरज पडलीच तर निदान आई तरी अवश्य एका हाकेला धावत येते.

पण बघा, आम्ही सांगत नव्हतो. तेव्हा ऐकलं नाहीत. असे भविष्यात कुणी म्हणेल, असा प्रसंग येऊ देऊ नका. आणि हे पुर्णपणे तुम्हा दोघांच्याच हातात आहे.

परत एकदा मनापासुन शुभेच्छा.



Yogita_dear
Tuesday, January 15, 2008 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश..तुम्हा सर्वांमुळे मी खुप सावरलिय २ दिवस.बघुया आता काय होतय ते..

अग अक्षरा माझ शिक्षण पुर्ण करायच होत आणि त्यालाही नीट settle i mean at least स्वत्:चा room घ्यायचा होता त्यासाठीच मी थांबली होती.


Manuswini
Tuesday, January 15, 2008 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, मला तुमची 4:18 january 15 ची पोस्ट खुप आवडली.

Aashu29
Tuesday, January 15, 2008 - 10:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, मला पण आवडली तीच पोस्ट.
लाखाचं बोललात.

Dineshvs
Wednesday, January 16, 2008 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार मनुस्विनी, अंशु
मायबोलीच्या व्यासपिठाचा, हा असा उपयोग होवु शकतो, हे मला खुप महत्वाचे वाटते.
माझ्यासारखेच, अनेक सिनियर लोक आहेत, ज्यानी आयुष्य जवळुन बघितले आहे, ते अश्याप्रकारे सल्ले देऊ शकतात.
इथे कुणाही मायबोलीकराला, एकटे पणा जाणवु नये, असाच माझा प्रयत्न असतो.


Yogita_dear
Wednesday, January 16, 2008 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रभात...
काल तरी वातावरण थोड थंड होतं घरी... आणि आज सकाळी पण. बहुतेक दुसरीकडे posting साठी apply केलय हे सांगितल्यामुळे असाव पण असु दे....


Raja_of_net
Wednesday, January 16, 2008 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगिता,
सर्व posts वाचुन मला अजुन समजले नाहि कि तुझ्या घरुन विरोध का आहे ते. And I doubt even if you know that yet . अक्षराने पोस्टल्या प्रमाणे, जर तुझ्या घरचे कोणिच जर त्याला ओळखतहि नसतिल तर माझ्यामते हा विरोध म्हणजे निव्वळ आडमुठेपणा आहे.

if believe you two have decided on something. Your mom and relatives, out of their concern for you, can only advice you on things but can not force you on any thing. I think you are matured enough to take your own decisions and not seeking some. Ultimately it is your life.

Let's see.... what if something goes wrong after you marry this guy? Are you gonna blame every one who are in favor of it?

And what if you live a happy married life? are you gonna cuss every one who are against it, including your parents?

anyone in either situation will surely say, "See? did I not tell you this earlier?"

Even I could have told you my story which is very similar to your's but that's not gonna help you anyways as the circumstances, situtaions, consequence etc., are sure to be different. Here EXPERIENCE does not count....

PLEASE REMEBER : THIS IS YOUR LIFE AND YOUR DECISION






Yogita_dear
Wednesday, January 16, 2008 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजा तुमच म्हणण अतिशय पटतय मला. उद्या माझ्या आयुष्यात काही झाल तरी आज जे कोणी विरोध करतायत ते काही करु शकणार नाहित किंवा करणार नाहीत. आयुष्य माझ आहे आणि मलाच सगळ सहन कराव लागणार आहे. even मी जरी त्यानी शोधुन दिलेल्या मुलाशी लग्न केल तरी ही. आणि personally मला तरी अस वाटत की लग्न हा जुगार असतो. कसा आणि किती उधळायचा किंवा सावरायचा हे प्रत्येकावर अवलंबुन आहे. त्यामुळे नंतर काही झाल तरी कोणालाच दोष देउन उपयोग नाही. चांगल झाल तरी लोक बोलणार आणि वाईट झाल तरी बोलणार.

फक्त मला एका गोष्टीच समाधान असेल कि काही झाल तरी निर्णय माझा होता जरी तो चुकला तरी...


Dakshina
Wednesday, January 16, 2008 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मला असं वाटतंय की तुझं हे समाधान (स्वतःचा निर्णय स्वतः घेतलेल्याचं) आणि
त्याचे परिणाम भोगण्याची तयारीच तुला बळ देईल...
All The Very Best कधी करतेयस लग्नं? लाडू पाठव.


Yogita_dear
Wednesday, January 16, 2008 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म..बर वाटल ग ऐकुन दक्ष्स...लवकरच पाठवेन.. आणि तुलाच नाही सर्वांनाच द्यावे लागतील ना... नाहीतर नंतही मदत लागेल ना...

Dakshina
Wednesday, January 16, 2008 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळं छान होईल गं, मनापासून केलेली कोणतीही गोष्ट, कधीही अपयश देत नाही.

Yogita_dear
Wednesday, January 16, 2008 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते तर आहेच ग.. i hope सगळ व्यवस्थित होईल...पण खरच मायबोलीवरच्या सर्वांमुळे मला खुप आधार मिळाला.

Yogita_dear
Friday, January 18, 2008 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कोणाला court marriage बद्दल काही idea आहे का??? i mean कोणते documents लागतात वगैरे.. अजुन तरी ठरवल नाहीय करायच पण माहीती असलेली बरी...

Abhijeet25
Friday, January 18, 2008 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या नंदिनी२९११ आहेत त्यांना विचारा.............

बराSSSSSSSSSSSSSच अनुभव आहे म्हणे त्यांना अशा लग्नांचा ( दुसर्‍यांच्या). आणि शिवाय पत्रकारपन आहेत म्हणे. बरिच मदत होइल तुम्हाला.

नंदिनी दिवे घ्या. पोस्ट वाचुन चिडाल म्हणुन आधीच लिहितो.


Rajya
Friday, January 18, 2008 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोर्ट मॅरेज साठी फक्त वयाचा दाखला लागतो :-) नंतर एक महीन्याची नोटीस.
आणि २ साक्षीदार पण लागतात :-)


Tanyabedekar
Friday, January 18, 2008 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नोंदणी पद्धतीने लग्न (कोर्ट मॅरेज हा शब्द अयोग्य आहे) करण्यासाठी वयाचा दाखला तसेच राहत्या पत्त्याचे काही पुरावे सादर करावे लागतात, उदा: टेलीफोन बिल किंवा लाइट बिल वगैरे. रजिस्ट्रारची नोटीस ह्या पत्त्यावर येते. त्यामुळे तुमच्या घरात जर विरोध असेल तर तुमचा राहता पत्ता देणे थोडे धोकादायक होइल. अधिक माहिती साठी नोंदणी कार्यालयाच्या बाहेर एखादा एजंट गाठा जो ह्यातील बरीच कामे करुन देइल. अर्थात असा एजंट हुडकताना बरीच सावधगिरी बाळगा. तुम्ही स्वत्: हे करण्यापेक्षा तुमच्या जोडीदारास हे काम सांगितले तर बरे होइल. मुलाला जाउन ही चौकशी करणे व बाकी गोष्टी ठरवणे अधिक सोपे जाइल म्हणुन हा सल्ला.

Maanus
Friday, January 18, 2008 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणीतरी माझ्या वतीने दोन कानाखाली मारा ह्या योगीताच्या आणि तीला फुकटचे सल्ले देणार्‍यांच्या.

22 is not year to get married.


Zakki
Friday, January 18, 2008 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे माणूस, तू हे काय भलतेच लिहीलेस! कुणि कितव्या वर्षी लग्न करावे हे ज्याचे त्याने ठरवावे रे. जोपर्यंत कायद्याची आडकाठी नाही तो पर्यंत इतरांना काय त्रास?

आता योगितांना भरपूर सल्ले मिळाले आहेत. पुढचे सगळे त्यांना वाटेल ते त्या करतील!


Apurv
Friday, January 18, 2008 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस तुझा सल्ला अतिशय आवडला! :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators