Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 08, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » सारेगमप आणि इतर shows मधले performances . » Archive through January 08, 2008 « Previous Next »

Monakshi
Monday, January 07, 2008 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>नुसतं गाणं आणि नुसतं फ्यूजन वेगवेगळे चांगले वाटले असते ऐकायला त्यापेक्षा

पूनम अगदी, अगदी. :-)

वैशाली आणि किती confidently गात होती काल. तेव्हढीच सायली आणि अनिरुध्द बिचकलेले वाटत होते. :-) अनिरुध्द फक्त शास्त्रीय आणि नाट्यसंगीतच गावं. ही गाणी म्हणायला सांगितली त्याला तर एकदम confidentaly गातो otherwise जरा हले डुले होतं त्याचे. :-)


Deepanjali
Monday, January 07, 2008 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो , देवकी अगदीच सुमार गायली .
अवधुत पण हौशी कलाकारा सारखा गायला .
त्या पेक्षा अभिजित कोसंबी ' प्रसाद ओक पण चांगले गायले .


Ajjuka
Monday, January 07, 2008 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल आणि आधीचा रविवार हे सारेगमप पाह्यलं होतं आणि मला पण वैशाली जिंकावी असंच वाटत होतं. छान झालं. कसली सहज गाते ती. आणि आहेपण एकदम साधी आणि मोकळी.
सायलीचा नखरा आणि इतर शो च जास्त वाटला. पण 'पिकल्या पानाचा.. ' मस्त म्हणलं तिनं. मात्र त्या शेवटच्या गाण्यात ती दमल्यासारखी वाटत होती. कणसूर होत होती.
मला अनिरूद्ध फक्त 'काटा रूते कुणाला' मधे आवडला.
अवधूत गुप्ते ने धमाल केली. त्याच्याकडून अपेक्षा काय ठेवणार पण त्याची गाणी catchy असल्याने रंगतात हे खरंय. पण देवकी पंडीत.. हे राम. सुरवातीलाच दमली होती, सूर काय गेला दोन तीन ठिकाणी. आणि ते सगळं 'माझे जीवनगाणे' इतकं बोर झालं की ज्याचं नाव ते. तिच्यापेक्षा काल तरी दोघी स्पर्धक मुलीच छान गायल्या.
पल्लवी जोशी आणि तिचे कपडे याबद्दल काही काय बोलता तुम्ही लोक! त्यातला अर्थ लक्षात येतोय का तुम्हाला. गेल्या वेळेची जी साडी होती तिचं ब्लाऊज शिवून व्हायचं होतं पण घडी मोडायची चांगल्या वेळेला म्हणून मिळेल त्या ब्लाउजवर नेसली साडी तिने. आता वेळेला महत्व! नाही देत कधी कधी टेलस्र वेळेवर. पण कालचा ड्रेस कसा वेळेवर शिवून आणला होता. आणि महाअंतिम फेरी त्यामुळे थोडा जास्त विचार करून बनवला होता. डिझाइनमधे ४ - ५ वेगवेगळ्या ड्रेसेसच्या उरलेल्या तुकड्यांचा कल्पक वापर केला होता. काही झालं तरी मराठी माणूस हा मध्यमवर्गीय आहे आणि काटकसर हा त्याच्या जीवनातील सुखाचा पायाच आहे असं प्रतीकात्मकरीत्या ती सांगत होती. आणि तुम्ही काय कॉमेंटस करता.. श्या कळत नाही तुम्हाला!!
सारखं यांना त्यांच्याबद्दल काय वाटतं, त्यांना अजून त्या ह्यांच्याबद्दल काय वाटतं, वडीलांना मुलाबद्दल काय वाटतं इत्यादी इत्यादी जे वाटण अतुलनी लावलं होतं त्याने शेवटी कंटाळा. आता अतुल भेटला की त्याला पाटा वरवंटा प्रेझेंट द्यावा (वाटायला..) असं मला वाटतंय!! :-)
त्या मागच्या कवायती (त्याला नृत्य म्हणणं हा नृत्याचा अपमान ठरेल!) केल्याशिवायही इव्हेंट होऊ शकतो हे सगळे विसरलेत का? आणि करायच्याच तर जरा काहीतरी बरं करा ना. तिथे अगदी गरीबी दाखवलीच पाहिजे का! :P


Deepanjali
Monday, January 07, 2008 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायलीचा नखरा आणि इतर शो च जास्त वाटला.
<<<<<छे एवढं कुठलं जमायला तिला , perform करताना जागच्या हालतही नाहीत या मुली:-)
ती दिसते छान पण तिलाही बहुसंख्य मराठी स्पर्धकां प्रमाणे नखरा , अदा , performance मात्र मुळीच जमत नाही असं मला तरी वाटतं . :-)



Ajjuka
Monday, January 07, 2008 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं तसा नखरा नाही गं.. तसा असता तरी हरकत नव्हती.. गाण्यातली अदाकारी हवीच ना.
गाणं राह्यलं बाजुला, manipulative गोड गोड बोलणे, मीच महान अश्या सुरात सगळं काही.. त्याबद्दल म्हणत होते. मला नाही ती आवडली अज्जिबात!


Manjud
Monday, January 07, 2008 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालचा प्रोग्राम defferred live असल्याने आम्हाला रीझल्ट रात्री १० वाजताच फोनवरून कळला. सोनू निगमची टी. व्ही वर एंट्री होत होती त्यावेळी. कसला 'टूण्ण' दिसत होता तो. पण ११.४५ ला स्टेजवर आल्यावर बरं बोलला. वैशालीचं 'घनराणी' आणि 'कोंबडी' छनच झालं. सायली तर काल कमीत कमी गाण्याला नाही तर निदान माझ्या रूपाला sms पाठवा असं जणू आवाहन करत होती. अनिरुद्ध 'सुंदरा मनामध्ये भरली' चांगलं गायला. 'आज की रात' मधे फक्त वैशालीचा आवाज मस्त वाटला बाकीचे दोघेही बिचकल्यासारखे वाटत होते. अभिजीतने पण 'साडे माडे तीन' चांगलं म्हटलं.
पण एकूणच 'महाअंतिम फेरी' फारच लांबवतात. शेवटी शेवटी तर फारच रटाळ वाटायला लागला. कधी संपवताहेत प्रोग्राम असं वाटायला लागलं.

काल रीझल्ट जाहीर झाल्यावर स्पर्धकांच्या भावनांचा कडेलोट वगैरे झाला नाही हे आश्चर्य आहे की नाही.... त्यांना आधीच माहीत होतं की कय कॉणास ठाऊक.

पल्लवी जोशीबद्दल अज्जुकाच्या कॉमेंट्स ह. ह. पु. वा.


Jhuluuk
Monday, January 07, 2008 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आली रे आली... वैशाली आली..
मला आणि माझ्या मित्रकंपनीला काल असे वाटत होते की कदचित सायली येतेय की काय... या समस वर कधीही भरवसा वाटत नाही ना..
पण खरंच deserving candidate आली...
हिंदी सारेगम मध्ये जायला तिचाच आवाज बेस्ट आहे.. काल आज कि रात मध्ये याचा पुर्नप्रत्यय आला..
बाकी 'कोंबडी पळाली' सहिच झाले तिचे.. मला स्टुडिओ आणि कालचे पण आवड्ले..
अनिरुद्ध काल बिचारा वाटत होता..
तुम्ही १ गोष्ट नोटिस केली का?
अनिरुद्धची खुर्ची त्याच्या आईशेजारी reserved ठेवली होती.. पण सायली किंवा वैशालीची नाही पाहिली मी!
यांना पहिलेच ठाउक होते कि काय? अनिरुद्ध आधी बाहेर जाणार ते...


Manishalimaye
Monday, January 07, 2008 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>यांना पहिलेच ठाउक होते कि काय? अनिरुद्ध आधी बाहेर जाणार ते...<<<


शक्यता नाकारता येत नाही.
मला अर नेहमीच शंक येते की हे रिझल्ट आधीच [हवे तसे]ठरलेले असतात की काय????




Manjud
Monday, January 07, 2008 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ओब्झर्व केलं की सायलीचे वडील ज्या खूर्चीवर बसले होते त्यावर 'अनिरुद्ध जोशी' असं लिहिलं होतं. मला वाटलं की ती खूर्ची अनिरुद्धच्या नातेवाईक / मित्रमंडळींसाठी आहे पण त्यावर सायलीचे वडील बसलेत... म्हणजे अनिरुद्धचे guests कमी आले असावेत आणि सायलीचे जास्त..

Anagha_vw
Monday, January 07, 2008 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका तुम्हाला अनुमोदन!!
मला पण त्या सायलीचे बोलणे जरा अति गोड आणि नाटकी वाटत होते. रविवारी सकाळी मी गुडमॉर्निग महाराष्ट्र बघत होते, त्यात हे तिघे आले होते, तेव्हा पण त्या सायलीच टोन वेगळाच होता.
आणि नन्तरची 'पत्रकार परिषद' बघितली का कोणी?
त्यात विचारले की तुम्हाला कशा प्रकारची गाणी म्हणायल आवडेल?
वैशलि ने गझल गायला आवडेल असे सान्गितले आणि सन्धी मिळाली तर पार्श्वगायन करेन अस म्हणाली.सायली म्हणाली की "माझं असं काही नाही. मला सगळच गायचय. देवकीताई नाही का शास्त्रीय सन्गीत शिकल्या आहेत, पार्श्वगायन करतात तसे."
केवढा नाटकीपणा!!


Vrushs
Monday, January 07, 2008 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला वैशाली आली. आणि काल सारेगमप live बघायला मिळाल.कोणाला हवे असेल तर
www.watchindia.tv ह्या साईटवर पण
Zeemarathi दिसतय. $9.99/month.Planetvu सुरु होण्याची काही लक्षण दिसत नाही.

Manuswini
Monday, January 07, 2008 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आईने मलाही फोनवरून सांगीतले वैशाली आली.

आईने पण अगदी तीच्या नवर्‍याचे कौतुक करून सांगीतले.(कीती छान माणुस आहे असे वाटते, केव्ढा support वगैरे.).

शेवटे काय, हेच ना भारतीय विवाहीत नारी पतीच्या सहय्याशिवाय काही करु शकत नाहे. :-)

पल्लवी जोशीचे dressing sense महान आहे. अगदी हिंदी अंताक्षरीत ती यायची तेव्हा पण हसायला यायचे ते dress combination पाहून.
अगदी अज्जुकाने वर्णन केल्यासारखे, मिळेल ते साडी,आयत्या वेळी शिवलेला उरलेल्या कापडाचा ब्लॉउज.
हिंदीत तर इतके गबाळे कपडे. हे राम. एकतर जाडी, कायच्याकय सुटलेले पोट होते तेव्हा,त्यात एकदा पोलका डॉटचा स्कर्ट नारंगी रंगाचा नी टॉप हिरवा.
ती सांगु शकत नाही का dress designer ला मला असे चित्र विचित्र कपडे का देता म्हणून?

आता ती हिमानी पण तेच. खावून खावून मस्त गुटगुतीत झालीय नी तेच गचाळ कपडे.

का कुणाक ठावूक मला देवकी पंडीतची personality कधीच pleasant वाटत नाही, नेहमी बोलताना नी गाताना सुद्धा.
काहींचा चेहरा कसा दुनीयेची काळजी करतोय असतो तसा काहीसा. हसरा नाहीये(माझ्यासारखा) :-)


Vinaydesai
Monday, January 07, 2008 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही सगळे मराठी सारेगम बघत आहात, पण आमच्याकडे Zee वर हिंदीत चाललेला Little Champs दिसतोय.... आता हा कार्यक्रम आवडायला लागलाय...

दोन तीन महत्वाची कारणं म्हणजे 'सोनु निगम' आणि 'सुरेश वाडकर' हे दोघेही चांगले Judge आहेत. यापूर्वीच्या कुठल्याही 'सारेगामा' मध्ये जज म्हणून येणार्‍या मंडळींचे वागणे बघून बहुतेक वेळा निराशाच झालीय.. आधीच्या Little Champs मध्ये सुध्दा अलका याज्ञिक, आणि अभिजीतची वादावादी सुरूवातीला ठिक वाटली तरी नंतर ते सगळं अति झालं होतं, त्यात तो बप्पीदा... त्याच्याबद्दल न बोललेलं बरं..

मधल्या एका Round मध्ये लोरिया दोशीला कमी मतं पडल्यामुळे ती परत येऊ शकली नाही, आणि तिच्या वडिलांनी (तो माणूस दिसायला पण Cheap होता) हंगामा करून थोडाबहूत विचका केला, तरी Overall चांगला चाललाय कार्यक्रम...

सोनूने दोन तीन स्पर्धकाना 'मैं गरीब हूं', किंवा 'गला खराब है' असली कारणे सांगून सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चांगलंच फटकारलं आहे. हे कारण आणि त्यावर भांडणारे जज यापूर्वी सारेगामा मध्ये नेहमीच दिसायचे....

मुलं आणि त्यांचे पालक चांगली वागता आहेत. त्यातही कौतूक मला वाटलं ते 'विभोर' नामक एका स्पर्धकाच्या आईचे. तिचा मुलगा गेल्या दोन आठवड्यांमध्ये Danger Zone मध्ये होता. कसाबसा वाचला. पण तरीही ती बाई 'आमिर' नामक एका दुसर्‍या स्पर्धकाला (ज्याचे आईवडील तिथे नाहीत) नेहमी Support करत असते. TV Camera चालू असताना नाटक करणं वगैरे सोप्पं आहे, पण त्या मुलाचं गाणं चालू होईपर्यंत तो तिच्या शेजारी बसलेला असतो, तो स्टेजवर जायच्या आधी ती त्याला आपल्या मुलासारखाच जवळ घेते, तो गात असताना त्याच्या बरोबर गुणगुणताना आणि ताल धरतानाही दिसते.

मला त्या आईचं कौतूक वाटतं. खरं तर ही स्पर्धा आहे, आणि 45 लाख रुपयांचा मामला आहे. पण तरीही इतकं छान वागणं पाहून मला आनंद वाटतो. आणि निदान त्या कारणासाठी (तरी) 'विभोर' स्पर्धेत रहावा असं वाटतं..



Arch
Monday, January 07, 2008 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, अगदी अगदी. तुमच्याशी सहमत.

मुलं आणि त्यांचे पालक चांगले वागतात. mostly सगळ्या आयाच तिथे आहेत हे लक्षात आलच असेल न?


Maitreyee
Tuesday, January 08, 2008 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मलाही सुद्धा विभोर च्या आईचे फ़ार कौतुक वाटते. तिला बर्‍याचदा आमीर ला समजावताना किंवा जवळ घेऊन बसलेले पाहिले आहे.
सोनूचे आणि सुरेशजींचे कमेन्ट्स छान असतात. फ़क्त ते वोटिन्ग मुळे एलिमिनेट होणार्‍या मुलांचे चेहरे बघवत नाहीत अगदी. यापेक्षा जजेस नी एलिमिनेट केले असते तर मुले ते जास्त ऍक्सेप्ट करू शकतील असे वाटते नेहमी.


Yog
Tuesday, January 08, 2008 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>आणि निदान त्या कारणासाठी (तरी) 'विभोर' स्पर्धेत रहावा असं वाटतं..
काय विनूभाऊ आता पोरान्च्या आया आवडल्या म्हणून पोर स्पर्धेत टीकून हवीत का..?:-) just kidding... पण तो कोकलणारा विभोर कधीच eliminate व्हायला हवा होता.. रोहित(?) श्यामराव was much more deserving.. सोनू मात्र विभोर च्या बाबतीत खूप पार्शल असतो अस पाहिलय, otherwise he is very good judge.

Ajjuka
Tuesday, January 08, 2008 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|शेवटे काय, हेच ना भारतीय विवाहीत नारी पतीच्या सहय्याशिवाय काही करु शकत नाहे. |
अगदी अगदी!! मला पण हेच खटकलं.. महागायक असता तर पत्नीच्या सपोर्टचं एवढं कौतुक झालं असतं का? प्रसाद ओक जिंकला तेव्हा कुठे मंजुचं एवढं कौतुक झालं? बायकोने सपोर्ट करायचाच असतो. ते गृहित आहे ना!
वैशालीचा नवरा किंवा सायलीचा नवरा जे करत होते त्याचं कौतुक आहेच पण ते काहीतरी वेगळं, प्रचंड मोठ असं म्हणून दाखवायची काय गरज?


Deepanjali
Tuesday, January 08, 2008 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण अत्ता अत्ताच पहायला सुरवात केली LIl Champs.
मला पण विभोर चा performance नाही आवडत , रोहित छान गायचा .
त्या north east च्या मुली इथेही danger zone मधे नसतात पण त्या दोघींचीही voice quality खरच चांगली आहे .
तन्मय पेक्षा तो जो छोटा सरदार आहे तो चांगला गातो .


Giriraj
Tuesday, January 08, 2008 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरदाराचा आवाज गोड आहेच पण त्याची पन्जाबी थाटाची गायकीहीही उत्तमच आहे. ज्यांचे पर्फ़ॉर्मन्स आवर्जून पहावेसे वाटतात ते म्हणजे आमीर हाफ़िज़,वसुंधरा,सरदार,तन्मय आणि अनामिका. ति नन्दीपण मस्त गाते पण तिचा जास्त रोख गाण्यापेक्षा दिसणे आणी ऍक्टिंगवर जास्त असतो!

Deepanjali
Tuesday, January 08, 2008 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागायक असता तर पत्नीच्या सपोर्टचं एवढं कौतुक झालं असतं का? प्रसाद ओक जिंकला तेव्हा कुठे मंजुचं एवढं कौतुक झालं? बायकोने सपोर्ट करायचाच असतो. ते गृहित आहे ना!
वैशालीचा नवरा किंवा सायलीचा नवरा जे करत होते त्याचं कौतुक आहेच पण ते काहीतरी वेगळं, प्रचंड मोठ असं म्हणून दाखवायची काय गरज?

<<<<< Lol.. मराठीचं माहित नाही पण हिंदी सारेगमप मधे बायको ,Girl friend, आई - सासु असे बायकांच्या support चे प्रदर्शन च जास्त असते , नवराच उलट पहिल्यांदा पाहिला अशा reality show मधे:-)
Last season च्या देबिजीत ची बायको , तिचा त्याग , नवर्‍या च्या singing साठी नोकरी , आणि तिची अतिशय विनोदी बंगाली ने माखलेल्या हिंदी मधली बडबड सारखी दाखवायचे .
शिवाय त्या परेश ची बायको आणि पाकिस्तानी सिकंदर ची बायको पण


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators