|
Zakasrao
| |
| Friday, June 01, 2007 - 8:23 am: |
| 
|
माझ्या मान्डीवर माझा २६ वर्षाचा दिर बसला होता..>>>>>>>>. २६ वर्षाचा धट्टाकट्टा पंजाबी कुडा मांडिवर! अरे बापरे! पाय जोरात दुखले असतील २ दिवस.
|
Alpana
| |
| Friday, June 01, 2007 - 8:54 am: |
| 
|
अहो झकासराव...कुडा नाही मुन्डा... न दुखतिल नाहितर काय? ते पण जेंवा त्याचे वजन माझ्या जवळपास दिडपट असताना म्हणुन तर पर्स दिली त्याला.. हवे तेवढे घे पैसे पण पटकन उठ
|
इथे सर्व रीतसर लग्नांचे वर्णन चालु आहे. आता एका रजिस्टर मॅरेजचा किस्सा सांगतो. माझ्या एका मित्राचे आणि मैत्रिणिचे रजिस्टर मॅरेज लावुन दिले. लावुन दिले म्हणजे साक्षीदार म्हणुन सही केली (आणि बाकीही बर्याच भानगडी केल्या होत्या ते लग्न जुळवायला.. शेवटी लग्न झाले हे जेव्हा मुलीच्या घरात कळले तेव्हा तिचे धाकटे बंधुराज आम्हाला मारायला उठले होते.. माझ्या दुर्दैवाने हे बंधुराज इंडियन नेव्ही मध्ये कॅप्टन) असो.. तर ठाण्याच्या रजिस्ट्रार ऑफिस मध्ये लग्नासाठी दुपारी ३ नंतर वेळ ठेवली आहे. सकाळी प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन वगैरे होते फक्त. आमच्या बिर्हाडाच्या आधीचा नंबर होता एका चाळीशीच्या आसपासच्या जोडीचा. हे दोघेही बघुनच लक्षात येत होते की बरीच वर्षे एकत्र राहत असावेत. दोघांबरोबर मुलाची एक जख्ख म्हातारी आई होती. तिला आजुबाजुला काय चालु आहे याची काही एक कल्पना येत नव्हती. रजिस्ट्रारच्या समोर दोघांनी उभे राहुन अत्यंत कंटाळवाण्या सुरात प्रतिज्ञा घेतली. एक आणखी तिशीचा ग्रुहस्थ यांच्याबरोबर होता. त्याच्या हातात हाराचा आणि पेढ्याचा पुडा होता. नवरी मुलीने (मुलगी कसली बाई होती ती) एक हार घेतला, नवर्याने आपले डोके अपेक्षेने जरासे वाकवले.. पण ह्या बाईने शांतपणे स्वत:ला हार घालुन घेतला आणि दुसरा नवर्याच्या हातात दिला. मग तिने पेढ्याचा पुडा फोडला. एक पेढा उचलुन स्वत्: खाल्ला. इथे बिचारा रजिट्रार पण लाजुन म्हणाला, अरे त्या म्हातारीला पण पेढा द्या जरा. त्या संपूर्ण कार्यक्रमामधे म्हातारी फक्त एकदाच हसली, अगदी खुद्करुन हसली जेव्हा तिच्या हातावर कोणितरी पेढा ठेवला.. ह्यानंतर त्यांचा जो एजंट होता त्यानेच २-४ फोटो काढले.. एजंटनेच ऑफिस मध्ये सर्वांना पेढे वाटले.. नवरा-नवरी जणु काही खास झालेच नाही याप्रमाणे शांतपणे म्हातारीला घेवुन निघुन गेले..
|
Mandard
| |
| Friday, June 01, 2007 - 10:38 am: |
| 
|
झकासराव कुडा म्हणजे कचरा. कुडी म्हणजे तुम्हाला माहीत असेलच:-)
|
अरे तान्याबेडेकरजी. तुम्ही पण आमच्यातलेच दिसता, मी आता पर्यन्त तीन लग्नाची आणि दोन निकाहनाम्याची साक्षीदार आहे. पण तुम्ही वर्णन केलेलं लग्न मात्र अफ़ाट आहे. माझ्या एका अत्यंत जिवलग मैत्रीणीचा हा किस्सा.. ती ठाण्याला रहायची आणि मी मुंबईत. आमच्याच एका ग्रूपमधल्या मुलाबरोबर तिचं लफ़डं होतं (ओळखा कोण??) पण त्याचं आणि हिचं प्रकरण भयानक प्रकारे मोडलं. (अचाट आणि अतर्क्यवाले पण विश्वास ठेवणार नाही असा घटनाक्रम आहे) ते जाऊदे. तर नंतर हिचं मुंबईत कुण्या एका चेतनव्बरोबर लफ़डं. एके दिवशी मला फोन केला. "मै शादी कर रहीइ हू.. तू witness बनेगी? " आणि मग चेतन वर एक पुराण ऐकवलं. मी म्हटलं ठीक आहे. मी येईन. नंतर तीन चार महिने या पोरीचा पत्ता नाही. मोबाईल नंबर बदललेला. शेवटी मीच एकदा तिचा नंबर मिळवला आणि तिला फोन केला. तिच्या नवर्याने फोन घेतला. मी "चेतन, सर्बिको फोन देना. नंदीनी बोल रही हू..." "सॉरी.. I am Saurav और सर्बी घर पे नही है.." मी नॉन प्लस.. या पोरीने मी चेतनबरोबर लग्न करणार आहे असं सांगून या सौरवबरोबर arrange marriage केले होते. आणि आता मला म्हणते.. "यार. तू मेरे बारे मे उसको कुछ बोल मत. मैने उसको मेरे past के बारेमे कुछ नहि बोला... "
|
नंदिनी माझे नाव तान्या नाही, टण्या.. असो, शंतनु म्हटले तरी चालेल. हे रजिस्टर मॅरेज जाम लफडेवाली भानगड असते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, मुलीच्या आणि मुलाच्या चुलत मामे/ जवळची मैत्रीण असे कोणितरी एक साक्षीदार हवाच. सगळेच साक्षीदार मुलाकडचे (त्याहुन वाइट म्हणजे मुलाचे मित्रच फक्त) असले म्हणजे थोडा लोचा होतो. समजा मुलीकडचे मुलीला जबरदस्तीने उचलुन परत घेउन गेले आणि पोलिस कंप्लेंट केली त्यांनी तर जाम फाटते.. मुलगी जर पोलिस इन्क्वायरी मधे खंबीर नाही रहिली तर नवरा मुलगा आणि सर्व साक्षीदार ह्यांच्यावर अपहरणाची केस होवु शकते.. त्या केस मधे तथ्य किती वगैरे भानगडी नंतर.. आधी पोलिस उचलुन लॉक-अप मधे नेउन ठेवतात.. म्हणुन मुलीची चुलत मामे बहिण किंवा जवळची मैत्रीण असलेली चांगली.. म्हणजे मुलीकडच्यांना पटकन पोलिस कंम्प्लेंट करणे अवघड होते.. पुढच्यास ठेच मागचा शहाणा.. म्हणुन फुकटचा सल्ला..
|
टण्या (आयला मस्त नाव आहे) झाल्या रे आमच्या ठेचा लागून झाल्या. मी तर मुलाकडची साक्षीदार होते. दोघंहीपळून गेलेली. (लग्नानंतर) मुलीचा भाऊ मटण कापायचा सुरा घेऊन शोधत फ़िरत होता. पोलिस माझ्याकडे. आईबाबानी मस्त षोडशोपचारे पूजा बांधली. नशीबाने दोघे चिपळूणमधे सापडले. सुदैवाने अजून दोघं नीट आहेत. एक छोकरी आहे मयूरी नावाची. पण रजीस्टर लग्न ही सगळ्यात सोपी भानगड आहे, पळून जाणार्याचं मंदिरात कधीच लग्न लावू नये. ते सिद्ध करत करता नाकी नऊ येतं.
|
Zakasrao
| |
| Monday, June 04, 2007 - 10:26 am: |
| 
|
मुलगी जर पोलिस इन्क्वायरी मधे खंबीर नाही रहिली तर नवरा मुलगा आणि सर्व साक्षीदार ह्यांच्यावर अपहरणाची केस होवु शकते>>> हे मात्र बरोबर आहे टण्या. माझा मित्र सांगत होता कि ह्यांनी जावुन रजिस्टर लग्न केल आणि नंतर ह्यानी जावुन पोलिस कंप्लेंट दिली की आम्ही अस ल्ग्न केल आहे आणि आमच्या विरुद्ध काहिही होउ शकत. हि कंप्लेंट प्रत्यक्ष पोरीच्या बापाविरुद्ध होती. तिथे त्या पोरीने धीर दाखवला. नंतर त्या पोरीच्याअ बापाने कंप्लेंट केली होती त्यावेळी सगळी वरात पोलिस स्तेशन मधे. त्यानी फ़क्त पोरगी,माझा मित्र आणि मित्राचे आई वडील इतक्या लोकाना आत घेतल बाकि १५-२० दोस्त बाहेर उभा. नंतर त्यांच्या खास आवाजत पोरीला विचारल कि तुझ्यावर जबरदस्ती केलीय का त्याव्र त्या पोरीने दम आणि धीर दाखवला म्हणुन बरं तिने बापाविरुद्ध बोलली तिथे. नायतर तो मित्र आणि त्याचे आई वडील आणि साक्षीदार सगळे बाराच्या भावात गेले असते. माझ्या मित्राने कबूल केले कि तो त्यावेळी जाम टरकला होता.
|
एक प्रसंग आठवला.. रत्नागिरीत एका तबस्सुम नावाच्या मुलीने हिंदू मुलाबरोबर लग्न केले. सगळीकडे बोंबाबोंब. त्या तब्बूचे भाऊबंद चाकू वगैरे तत्सम गोष्टी घेऊन शोधत होते. (हा सीन मी आयुष्यात खूपदा पाहिला आणि अनुभवला) तर मी आणि काहीजण त्याच एरीयेमधे किरण नावाच्या मुलाच्या घरी "डान्स प्रॅक्टीस" करत होतो. किरण आमचा choreographer . तर मधेच कुणीतरी दार वाजवले. किरणच्या आईने उघडले. बाहेरचा म्हणाला.."किरणचे घर का?" काकू म्हणाल्या "हो" "तोच तो डान्स वगैरे करतो तो का?" "हो.. किरण कुणीतरी आलय बघ.." किरण महाशय दरवाज्यात पोचले आणि या लोकानी त्याला जे काही बदडायला सुरुवात केली. की बस्स... बाकीचे मधे पडले.. मारामारी थांबली. काय झालं वगैरे चौकशा झाल्या आणि मग समजलं की तब्बू मॅडम किरण नावाच्या दुसर्याच एका नाचणार्या पोराबरोबर मार्गस्थ झाल्या आहेत. तो हा नव्हेच. मारामारीपासून सुरु झालेला प्रसंग चहापानाने संपला. आणि आम्ही त्या लोकाची समजूत पण घातली, जाऊ दे,... जे व्हायचं ते झालं आता तुम्ही काय करू शकणार... वगैरे. कारण चहापानाच्या दरम्यान कुणीतरी सांगितलं... "तीन महिने झाले म्हणून तर पळून जाऊन लग्न केलय.. "
|
Alpana
| |
| Monday, June 04, 2007 - 11:38 am: |
| 
|
नंदिनी, झकास, शंतनु ऍकलय रे मी अशा अनुभवांबद्दल आई-बाबांकडुन आणि त्यांच्या मित्रमंडळींकडुन.... माझे सगळेच मित्र एकदम सरळ त्यामुळे मला नाही घेता आला हा अनुभव, पण लहान्पणी पळुन आमच्या घरी आलेल्या जोड्या आणि नंतर बाबा मंडळींचे पोलिसात जाणे त्यांच्या घरच्यांना समजावणे वॅगरे बघितले होते.... by the way शंतनु कसा आहेस? तुझी वारी पुर्ण झाली की नाही?
|
मला लहानपणी कित्येक दिवस "घरच्याचे न ऐकता पळून जाऊन लग्न केले" असं ऐकले की तो मुलगा आणि मुलगी लग्न करण्यासाठी पळत आहेत आणि त्याच्या घरवाले "लग्न नको करू" असे ओरडत त्याच्या पाठून पळतायत असं मला वाटायचं.
|
Alpana
| |
| Monday, June 04, 2007 - 12:15 pm: |
| 
|
नंदिनी कमाल आहे.... मुलगा आणि मुलगी लग्न करण्यासाठी पळत आहेत आणि त्याच्या घरवाले "लग्न नको करू" असे ओरडत त्याच्या पाठून पळतायत   
|
माझ्या आॅफ़ीसमधल्या एकाचे लग्न कुडाळला होते. आम्ही सर्वजण खूप उत्साहात तिथे गेलो. मुहूर्ताच्या आधी लवकरच नवरा आणि नवरी स्टेजवर आले होते. आता अक्षता केव्हा वाटतात यासाठी आम्ही लक्ष ठेवून होतो... कारण प्रस्तुत मुलाने पूर्वी आॅफ़िसमधील तमाम लग्नाना पध्धतशीरपणे हजेरी लावून भरपूर दन्गा केला होता.. तर ही सन्धी साधून आम्ही सर्वानीच जोरदार अक्षता मारायच्या असे आधी च ठरवलेले.. इतक्यात तिथे माइकवरून घोषणा झाली.. "आपण सर्व इथे चि अमूक व चि तमूक च्या लग्नासाठी आलात. आम्ही खूप आभारी आहोत.काही सूचना द्यायच्या आहेत.एक म्हणजे हाॅलमधल्या सर्वानी अक्षता कितीही जवळून टाकल्या तरीही त्या नवरानवरीच्या अंगावर बरोब्बर पडण्याची शक्यता शून्य आहे.म्हणून अक्षता वाट्ल्या जाणार नाहीत.ज्या कुणाला खात्री असेल की त्याने टाकलेल्या सगळ्या अक्षता या दोघान्च्या अन्गावर च पडतील त्यानेच त्या टाकाव्यात.दुसरी गोष्ट लग्न लागल्यावर पहिली पंगत बरोब्बर १ ला बसेल.पुढची १.३० ला नंतर २ ल शेवटची बसेल.पहिली पंगत म्हातार्या लोकान्चीच असेल.जेवण सर्वाना पुरेल इतके आहे." इतके रोखठोक ऐकल्यानन्तर कुणाला च अक्षता घ्यायची हिम्मत झाली नाही
|
Maanus
| |
| Wednesday, August 08, 2007 - 4:41 am: |
| 
|
गेल्या आठवड्यातच मला एक लग्न attend करयचा chance मिळाला. मुलगी मराठी आणि मुलगा american भारतीय पध्दतीने त्यांनी आधिच लग्न केल होता पन मुलाचे नातेवाईक काही खुष नव्हते म्हणुन american लग्न... लग्न म्हनजे main i do.. ani kiss चा प्रकार सोडुन बाकी सगळकाही... २०-२५ च लोक होती त्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणावर नव्हत... मी मुलीकडुन होतो, पन नवरदेव पन ओळखीचाच होता. ३ वजताच invitation होत... हे सगळे लोक sharp ३ ला हजर... आम्ही आजुन पन फुगेच लावत होतो... २:५५ ला नवरा edi आला... तो आलेला t-shirt आणि jeans मधे... मी आपला चांगला interview चा dress घालुन... मी त्याल विचरले तर म्हनतो अजुन वेळ आहे लोक यायला.. आल्यावर बदलतो कपडे... snacks म्हनुन cheese cubes आणि salted cookies ... मला जाम हसु येत होता.. त्यात मी काही बिस्कीट सांडवली... नंतर सगळ्यांशी ओळखीचा प्रकार झाला. एव्हाना सगळ्यांना खुप भुका लगल्या होत्या.. जवळ जवळ ५ वाजायला आले होते.. पन काही लोक IST follow करत होते.. व त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला.. मग मुलाकडचे म्हणाले चला जेवुन घेवु... IST वाले लोक आले कि मग लग्नाच बघु... जेवन पुर्ण veg होत... वधुच्या आईच्या म्हणन्यामुळे... veg biryani, veg bhajya, gajarcha halawa.. veg pizza... veg lazania.. coke.. beer जेवन संपायला आले तेव्हा IST वाले लोक वेळेनुसार आले लग्न first step walking down the aile इथे मुलीच्या मागे आम्ही जोडी जोडीने चालायचे... मग... actual लग्न वैगेरे असते.. पन ते इथे skip झाले.. मग edi ने कहितरी बडबड केली... मग त्यानी सगळ्या लग्न न झालेल्या मुलींना समोर यायला सांगीतले.. आणी नवरी मग त्यांच्याकडे पाठमोरी राहुन फुले फेकणार... इथपर्यंत सगळ काही normal सुरु होता.. खरी मजा आत होती... हे माझे पन पहिलेच american लग्न होत त्यामुळे मला काहि त्यान्च्या विधि वैगेरे माहित नव्हत्या... friends बघुन बघुन काही गोष्टी माहीत झाल्या होत्या.. but this was new... and totally unexpected ok next step is नवरीच्या डव्या पायावर एक band बांधलेला असतो... हा नवर्या मुलाने सगळ्यांसमोर काढायचा... garter म्हणतात त्याला. आणि मग ज्या मुलांची लग्न नाही झालेली त्यांना पुढे बोलावल... आणि मग नवर्याने पाठामोरा थांबुन तो garter आम्च्याकडे फेकला... त्याने purposefully तो माझ्याकडे टाकला त्यमुळे मी catch करु शकलो... i though this will end here... but no मग आता मला तो garter ज्या मुलीने फुल पडकली त्या मुलीच्या पायवर बांधायचा असतो... that was not going to happen... never एक तर ज्या मुलीने फुल पकडली होती ती पन मराठी च होती आणि तिचे पन आई वडील लग्नाला आले होते... त्यानी मला बदडुन काढल आसत. पन तो कुणाच्या तरी पायवर बांधायचाच अशी प्रथा काय कुणाला माही म्हनुन मग edi ने तो त्याच्या भावाला दिला... त्याची gf पन तिथे होतीच... आत हा व्यक्ती जेव्हा ते मुलीच्या पायत टाकत असतो.. तेव्हा सगळे जन त्याच्या बाजुल जमतात आणि त्याला सांगत असतात की you are putting it very low... it should go up... little more up...more ... more and more up.. ;) luckyly त्या मुलीने jeans घातली होती म्हणुन ती वाचली
|
Anaghavn
| |
| Tuesday, January 08, 2008 - 6:07 am: |
| 
|
आमच्या घरात तर सगळ्यांना practice झाली आहे.कसं पळुन जायचं, किंवा पळुन जाताना काय करायच,कशी मदत करायचि वगैरे ची. माझ्या सख्ख्या भावाने, मामे भावाने पळुन जाऊन लग्न केल. सगळ्यांनी जणु शप्पथच घेतली होती love marrage आणि intercast लग्न करण्याची. जैन म्हनु नका, सिंधी म्हणु नका, मराठा म्हणु नका,मल्याळी म्हणु नका,गुजराथी सगळा भारत आहे घरात. शिवाय माझ्या सख्ख्या नणंदेने मुस्लिम मुलाशी लग्न केलय. म्हणजे ती पळुन गेली नव्हती पण अडुन बसली होती--एक तर याच्याशी लग्नाची परवानगी द्या किंवा आयुष्यभर लग्न करणार नाही.बर घरात भाऊ (माझा नवरा) आणि आई भयंकर चिडलेले, वडिल एकदम गप्प. ही बाई शांत पणे आपल्या मतावर ठाम होती. झालं शेवटी लग्न. (हे सगळं माझ्या लग्ना आधी) आता दोन मुलीही आहेत. असं सगळं आहे.त्यामुळे मला सगळ्याची practice आहे. कोणाला काही गरज लागल्यास बंदा हाजिर है!
|
Madhavm
| |
| Tuesday, January 08, 2008 - 7:19 am: |
| 
|
अनघा आणि बंदा ? नक्की कसल्या मदतीबद्दल बोलताय आपण? दिवे घ्या
|
Anaghavn
| |
| Tuesday, January 08, 2008 - 8:32 am: |
| 
|
माधवम, ती पध्दत असते बोलण्याची--मदत लागली तर आम्ही आहोत असं सांगण्याची. आणि कशाची मदत म्हणाल तर,पळुन जाण्यासाठी काय काय करावे लागते ते सांगण्यापासुन तर अशा लग्नानंतर काय काय अनुभव येऊ शकतात, तेव्हा कसे काय बोलावे किंवा बोलू नये इ. सांगण्यापर्यंत.
|
Madhavm
| |
| Wednesday, January 09, 2008 - 6:13 am: |
| 
|
' बंदी ' हाजीर है अस नको का ते?
|
अरे माधवा, तिने काय लिहायला पाहीजे याकडे लक्ष देण्यापेक्षा तिची मदत पाहीजे का तुला ते बघ रे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|