Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 07, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » सारेगमप आणि इतर shows मधले performances . » Archive through January 07, 2008 « Previous Next »

Sameer_ranade
Wednesday, December 26, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी फक्त कालचाच एपिसोड पाहिला. देवकि पंडितने खरच ज्याचा चांगल अवाज असेल त्यालाच sms करावेत असं सांगितल. हे अगदि बरोबर अहे. पण अवधुत गुप्ते म्हणाला कि आम्हि तुम्च्यासमोर फक्त तेच ३ जण उभे केलेत ज्याच्यापैकी कोणिहि जिंकल तरी तुम्हाला चांगल ऐकायल मिळेल अर्थात पुढे ह्यातल्या कोणाला chance मिळाला तर. मायबोलिकरांपैकी कोणी sms करेल कि नहि हा प्रश्न वेगळा अहे. इथल्या बर्‍याच जणांच्या प्रतिक्रिया वाचुन मला असं वटल कि अनिरुद्ध जोशी च्या बाबतित सगळ्यांच मत चांगल नाहिये.
मला गाण्यातलं शून्य कळंत. पण माझ्यामते देवकि पंडित ही गायिका आहे, आणि अवधुत गुप्ते हा music composer पण आहे. त्यामुळे दोघांचा गायकांकडे बघण्याचा द्रुष्टिकोन वेगळा असेल. मला काहि वाद घालायचा नाहिये. पण music मधे पण सध्या technique खुप पुढे गेलं आहे. त्या technique च्या सहाय्याने ह्या तिघांपैकी कोणिही पुढे येउ शकतो जरि स्पर्धेत जिंकला तरि किव्वा हरला तरिही. करण सगळ्यांना गण्यातल ज्ञान अहे. कोण जिंकणार आणि कोण नाहि हे आधिच ठरलहि असेल. ह्याच्यात पण आत्ता पर्यंत betting चालु झालं असेल. फक्त ह्याच्यात mobile company आणि चॅन्नेल वाल्यांचा खुप फ़ायदा होतो अस मला वाटत. लोकान्ना उगाच अशा लाउन ठेवायचि आणि नेहमि असच होत के आपल्याला किव्वा बहुतेक लोकांचा विचर बघता जो जिंकायला हवा असतो, तो क्वचितच जिंकतो.


Jhuluuk
Wednesday, December 26, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालचा सा रे ग म प एपिसोड पाहिला.. सगळी गाणी चांगली झाली..
duet मध्ये सायली-वैशाली च्या जोडीने 'राजाच्या रंगमहाली' गायलं. त्यात वैशालीचा दमदार आवाज जाणवत होता आणि त्या गाण्याला सुट ही झाला.
तिनं मोगरा फुलला गायलं तेव्हा देवकी आणि अवधुतने आत्मा नाही असे सांगितले, देवकीने सुद्धा चांगला गुरु मिळाल्यावर ते येईल असे सांगितले.. तेव्हा खरोखर असे वाट्ले की आज जर वैशालीला चांगला गुरु मिळाला असता तर ती या लोकांच्या कितीतरी पुढे असती....
अनिरुद्धची solo बरी झाली...सायली आणि त्याचे कोळीगीत खुप मिळमिळीत वाटले..
दक्षिणा, हे खरयं की देवकी पंडीत ने लोकांना 'चांगल्या आवाजाला' एस एम एस पाठवण्याचं आव्हान केलं आणि तिने ते अगदी चांगल्या पद्धतीने केले... :-)
पण अवधुतचे बोलणे मला फारसे पट्ले नाही, तो म्हणाला हे तिघेही the best आहेत.. मला असे वाटत नाही. तिघांपैकी एक जण पहिला येणार आणि ती व्यक्ती the best असावी.
तसेच सायली आणि अनिरुद्ध गावावरुन आवाहन करतात हे पटत नाही. मोठ्या शहरातुन येउन सुद्धा असे म्हणणे बरोबर वाटत नाही, कि हे लोकं सुद्धा competition च्या दबावाला बळी पडले आहेत म्हणायचे.... :-(
तसे काल अनिरुद्धनी चांगल्या गाण्याला मत द्या असेही म्हटले...

आपण आपली विवेकबुद्धी जागृत ठेवुन चांगल्या गाण्याला मत देतो, पण असे किती लोक असतील याचाच प्रश्ण पडतो....... :-(

अनिरुद्ध फक्त मतांच्या जोरावर पहिला आला, तर सायली आणि वैशाली साठी खुप वाइट वाटेल.... :-(

No offence meant for any fans


Manuswini
Thursday, December 27, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिरुद्धचे मी 'गोमु माहेरला जाते रे नाखवा' एकले. छे पार वाट लावून गायला.
एक तर त्या गाण्यात एक typical कोकणी tone आहे तोच missing होता. गाणे मराठी style ने गात होता अगदी. मग त्या दुसर्‍या माणसाने तरी बर्‍या कोकणी style मध्ये विचारले, कित्यां रें अशें. त्याचे ते एकायला छान वाटले.
हे माझे कोकणी गाण्यामधले फ़ेव गाणे आहे. जितेंद्र अभीषेकींचे. कशाला तो अनिरुद्ध आहे अजून इथे कळत नाही.

अजब सी मध्ये अदाऽऽऽए दाब देवून म्हणत होता.


Dakshina
Friday, December 28, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मागच्या कोणत्या तरी एका एपिसोड मध्ये त्यानं लगे रहो मुन्नाभाई मधलं 'बोले तो बोले... हे गाणं अगदी जुलाबचं औषध खाल्ल्यासारखं गायलं होतं आणि एखादं शांत सुलभ गाणं पण तो घाईघाईने का गातो.. काही कळत नाही.

Ankyno1
Friday, December 28, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>हे गाणं अगदी जुलाबचं औषध खाल्ल्यासारखं गायलं होतं

एकदम बरोबर


पण ह. ह. पु. वा.


Sameerdesh
Friday, December 28, 2007 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झी मराठीवर " एका पेक्षा एक " नावाची एक नृत्य स्पर्धा सुरु झाली आहे ; सचिन पिळगावकर मुख्य परीक्षक आहे ; दर बुधवारी व गुरुवारी असते.

ही स्पर्धा कशी आहे ?


Psg
Friday, December 28, 2007 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'एकापेक्षा एक' ही मराठी चॅनलवर असली तरी स्पर्धकांनी मराठीच गाण्यांवर नाच केला पाहिजे असं बंधन नाही.. स्वत: सचिनचा मराठी बोलायचा सराव सुटलाय वाटतं.. कारण ऐनवेळी त्याला मराठी शब्द सुचत नाहीत आणि मग नाईलाजाने इंग्लिश शब्द बोलावे लागतात :-) तसंच स्पर्धा आणि कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी सर्वच स्पर्धकांना 'चांगले' म्हणावे लागतेय असं मला वाटलं. काहीकाही स्पर्धक खरंच चांगले आहेत.. मात्र जे नाहीत ते नाहीतच ना.. सगेळेच कसे चांगले आणि वा वा? :-)

अनिरुद्ध इतकं पण वाईट गात नाही :-) नाट्यगीतं फ़ार सफाईदारपणे गातो. बाकी दोन गायीकांपुढे मात्र तो फिका वाटतो हे ही खरेच!


Dakshina
Friday, December 28, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आठवणीप्रमाणे एकापेक्षा एक या मालिकेची जाहीरात ही आदेश बांदेकरने केली होती. आणि मी त्याचवेळी तो कार्यक्रम न पाहण्याची खूणगाठ बांधली होती, कारण मला वाटलं अँकरिंग तोच करणार असेल.
त्याला पाहीलं की मला अगदी तिडिक येते... त्याचा तो 'होम मिनिस्टर' नावाचा आचरट कार्यक्रम तुम्ही पाहीलाच असेल...


Preetib
Saturday, December 29, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Home Minister agadi Pakau program aahe. Tyat tyacha te Vahini ani tya bayka pan yala Bhavoji ..its all irritating..

Lopamudraa
Saturday, December 29, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा कार्यक्रम मी फ़ार तर दोन चार वेळा भारतात असतांना पहिला होता.मला तो पकावु वैगैरे अजिबात वाटला नाही.
यात ज्या(कनिष्ठ) मध्यम वर्गीय स्रीया भाग घेतात त्यांच्या जीवनात एन्टर्टेनमेंट कुठलीच नसते. आयुश्यात काही change नसतो. ज्यांना पैशा अभावी फ़ार कुठे जाता येत नाही. त्या स्रिया यात घराबाहेर येतात खेळात भाग घेतात.( त्यांचे महिला मंडळ नसते. किटी पार्टी नसते). म्हणुन हा कार्यक्रम मला आवडला.
बाकी सध्या यात काही बदल झाले असतील तर माहित नाही.


Kedarjoshi
Saturday, December 29, 2007 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उद्या जात आणि धर्माच्या नावावर पण आव्हाने केली जातील>>>>

दिनेश ती ऑलरेडी केली आहेत. मागच्या ऐपीसोड मध्ये पाणसेच्या वेळी अवधुत नाही का म्हणाला पुणे, डोंबीवली अन पार्ले. यात संखेने जास्त को ब्रा राहातात. ( त्याचा कडुन नक्कीच हे अनावधानाने झाले नाही).

सायली कडुन मात्र निराशा झाली. तिचा अगदी साऊथ अफ्रीका झालाय. मोठ्या खेळांमध्ये कॉन्फीडन्स नसल्यासारखे. वैशालीचा मोगरा खरच फुलला नाही. मला फार वाईट वाटले. तीच जास्त लायक आहे तिघात. पण अनिरुध्द चा मात्र पाक झालाय. अगदी जिद्दीने वर येतोय. ( बिलीव्ह ईट ऑर नॉट काल अनिरुध्द चांगला गायला. कदाचित टेन्शन नसल्यामुळे).

वैशाली महागायीका व्हायला पाहीजे ती मराठी तर उच्च गातेच पण तिच हिंदी सारेगामपा मध्ये डायरेक्ट जान्यास योग्य आहे. बाकीचा दोघांचेही हिंदी आवज मराठीत लावल्या सारखे वाटतात.


Arch
Sunday, December 30, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपाशी अगदी सहमत. भारतवारीत एकदा दोनदा पाहिला होता. आदेश बांदोडकर त्या सगळ्या सहभाग घेणार्‍यांच्यात इतक घरगुती वातावरण निर्माण करतो न. पैठणी मिळाल्यावर त्यांच्या चेहेर्‍यावर दिसणारा आनंद शेजार्‍या पाजार्‍यांचा सहभाग. कधीच कुठे भाग न घेता येणार्‍यांसाठी खरच छान कार्यक्रम आहे तो.

Prachee
Sunday, December 30, 2007 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, आर्च तुमच्याशी मीही सहमत आहे.

Manishalimaye
Sunday, January 06, 2008 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपेक्षेप्रमाणे अखेर वैशालीच जिंकली की :-)


Manishalimaye
Sunday, January 06, 2008 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपेक्षेप्रमाणे अखेर वैशालीच जिंकली की :-)


Deepanjali
Monday, January 07, 2008 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल चक्क deserving singer जिंकली , वैशाली होतीच best.
काल सायली ची गाणी अगदीच flat झाली , तिचा आवाज पण खूप किनरा येत होता .
अनिरुध्द चं काटा रुते कुणाला आणि सुंदरा मना मधे भरली चांगलं झालं .
वैशाली ची ' घनरानी , कोंबडी ' दोन्ही गाणी आधी studio मधे गायली तेंव्हा जास्त चांगली झाली होती .
तिचा नवराच काल तिच्या पेक्षा जास्त senti झाला होता , पण किती supportive वाटत होता .
:-)

Manishalimaye
Monday, January 07, 2008 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली गाते खरंच छान...पण sms च्या आघाडीवर काय होईल अशी भीती वाटत होती...पण शेवटी या तिघांमधे तीच खरी लायक होती आणि ती जिंकलीही :-)
गाणी सुरु असताना एरवी छान निवेदन करणारी पल्लवी जोशी बर्‍याचदा तेच तेच घोळवुन घोळवुन का बोलत होती कोण जाणे...
आणखी एक खुप खटकणारी बाब म्हणजे गायक गात असताना मागे जे आचरट नृत्यप्रकार चालले होते

आणि देवकी पंडितनीचं गाणही नाही आवडलं मला...गाण्यात पाश्चात्य ढंग आणण्याच्या नादात मुळ गाण्यातला आत्माच हरवलेला वाटला
अवधुत गुप्तेकडुन यापेक्षा काय वेगळी अपेक्षा करणार म्हणा... पण देवकीही??



अनिरुद्ध पहील्या पदासाठी [या तिघांमधे] योग्य नसला तरी क्लासिकल बेस तो खुपच छान गातो याबाबत दुमत नसावं बहुदा...मात्र हिंदी उच्चार चक्क ओढुन-ताणुन..धरुन्-पकडुन केलेले...फारच वाईट्ट बुवा

*****अर्थात हे माझं मत झाल कदाचित ईतरांना ते पटणारही नाही याची मला जाणीव आहे ****

Dakshina
Monday, January 07, 2008 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी शेवटी तर सायली पानसेची घाबरगुंडी उडालेली स्पष्टं कळत होती.. आज की रात म्हणताना एक ओळंच म्हणायची विसरली.
As said by all मला पण वैशाली जिंकावी असंच वाटत होतं. ती एकमेव अशी होती जी फ़क्त स्वतःच्या आणि स्वतःच्या बळावर पुढे आली आणि तिने सर्वांना जिंकलं सुद्धा...


Dakshina
Monday, January 07, 2008 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा, मी तुमच्याशी सहमत आहे, देवकीचं गाणं अगदीच सुमार झालं. तान म्हणताना तर चक्क तिला दम लागत होता. आणि मला प्रकर्षानं जाणवलेली एक गोष्टं म्हणजे, ती गाणं म्हणताना कधीच प्रेक्षकांशी कनेक्टेड वाटत नाही. गाताना फ़क्त तिचे ओठ हालतात, बाकी ती अगदी निर्जीव वाटते. विशेष करून तिचे डोळे; का कोणजाणे
पण बाकी तिचं परिक्षण थोडं परखड असलं तरीही त्यामूळे स्पर्धकांमध्ये बरीच improvement जाणवली... म्हणजे सायली अलीकडे लहान मुली ऐवजी मोठ्या मुली सारखी गाऊ लागली होती...
अवधूतचा एकूण सगळा सपोर्ट हा, सायलीला होता, आणि ती हरल्यामूळे तो थोडासा खट्टू पण वाटला. कधी कधी तर तो सायलीवर जरा जास्तीचीच मर्जी दाखवायचा.


Psg
Monday, January 07, 2008 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंय, खूप बरं वाटलं वैशाली जिंकल्यावर.. deserving तर ती आहेच, पण अगदी साधीही वाटली. काल अगदी सहजपणे गायली. मला 'घनरानी' खूप आवडलं तिचं. बरेच दिवसांनी एखाद्या reality show मधे खरंच चांगला विजेता झाला. काल अनिरुद्धही सही गात होता.. सायलीचं जरा 'कष्टप्रद' वाटत होतं.. पण तिचं 'पिकल्या पानाचा..' कसलं झालं ना! :-) असो, वैशालीला आता पुढे चांगल्या संधी लाभोत आणि तिचा आवाज आपल्या सगळ्यांना खूप ऐकायला मिळो :-)

देवकीचं फ्यूजन ठीक होतं, पण 'माजे जीवनगाणे'ला सूट नाही झालं ते.. नुसतं गाणं आणि नुसतं फ्यूजन वेगवेगळे चांगले वाटले असते ऐकायला त्यापेक्षा :-)

या कार्यक्रमात लोक बरंच काही शिकले.. पण त्या पल्लवीला काही धड कपडे घालायला कोणी का नाही शिकवले????? worst dressed anchor म्हणून शोभेल ती!!!!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators