Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 05, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कथा old classics » शोले » Archive through January 05, 2008 « Previous Next »

Kedarjoshi
Wednesday, August 09, 2006 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरतर शोले वर मी काही लिहीने म्हणजे हिमालयाचे वर्णन घराशेजारचा डोंगराने करणे तरी पण

माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणी मला थेटरात दोन सिनेमे अनेकदा दाखविले. एक शोले दुसरा सत्ते पे सत्ता. दोन्ही मला आवडतात.

शोले चे डायरेक्टर रमेश सिप्पींचा हा पहीलाच मेगा हिट. तसा अंदाज व सिता ओर गिता आधी केल्यामुळे त्यांना डायरेकशन्चा अनुभव होता. पण शोले सारखी निर्मीती त्यांना नंतर जमली नाही.
शोले म्हणल्या वर एकदम गब्बरसिंग, ठाकुर, जय, विरु, बंसती, राधा आठवतात. कुठल्याही पिक्चरची आठवण काडअल्यावर ईतके कैरेक्टर्स आठवत नाहीत.

शोले करताना रिअल लाईफ मध्ये अनेक प्रेम प्रकरण पण चालु होती. घर्मेंद्र हेमा, फोटोग्राफी करणारा व एक लोकल मुलगी ई. या पिक्चर ने अनेकाना वर आणले अमजदखाण, सिप्पी घराणे (त्यांचावर आधीचे भरपुर कर्ज होते).

शोले वरच्या एका पुस्तकात एक जबरी किस्सा आहे.
जय मोसी कडे जाउन विरु साठी बंसतीचा हात मागतो ती नाही म्हणते, विरु पाण्याच्या टाकीवर जातो हाजो किस्सा आहे तो सलिम - जावेद च्या जिवनातील किस्सा आहे. ( फक्त जावेद टाकीवर चढला नाही एकढेच). जावेद चे हनी ईराणी शी लग्न सलिम ला मान्य न्हवते पण सलीमलाच हनी इराणी च्या घरी जाउन जावेद साठी खर्या जिवनात हात मागावा लागला आहे. तोच किस्सा त्यांनी वाढवुन शोले साठी लिहीला आहे.

आता थोडे कथे कडे वळतो. खरेतर मी कथा लिहीन्यासाठी शोले ची निवड केली नाहीये. कारण मी माहीत असलेली कथा परत काय सांगनार.

ठाकुर बलदेवसिंग - संजीव कुमार
जय - अमिताभ
विरु - धर्मेंद्र
राधा - जया भादुरी
बंसती - हेमामालीनी
गब्बर सिंग - अमजदखाण
रामलाल - सत्येन कपुर
इमाम साहेब - ऐ.के. ह्न्गल

ही मुख्य लोक व सोबत सचिन, लिला मिश्रा, आसरानी, मैक मोहण, विजु खोटे ई.

ठाकुर बलदेवसिंग हे एक नावाजलेले पोलीस ईंस्पेक्टर असतात. शेती करने हा जरी त्यांचा पिढीजात व्यवसाय असला तरी ठाकुरांच्या रक्तात असलेल्या देशसेवे साठी ते पोलीस होतात. त्यांचा कारकिर्दीत त्यांनी अनेक लहान मोठ्या गुंडांना पकडलेले असते. यातलाच एक म्हणजे गब्बरसिंग. गब्बर हा एका दरोडेखोरांच्या टोळीचा मुखीया असतो. ठाकुरांनी त्याला स्वत्:च्या जिवाची पर्वा न करता पकडेलेले असते त्यामूळे तो त्यांचावर चिडलेला असतो. काहीही करुन मी सुटनार व याचा बदला घेतल्याशिवाय राहानार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काही महिने जातात, अचानक एके दिवशी तो पळुन जातो व ठाकुरांच्या गावात येऊन त्यांचा कुटुंबियांचा खुन करतो. ठाकुर तेव्हा घरी नसतात व त्यांची धाकटी सुन तेव्हा घरी नसल्यामुळे ह्या हल्यातुन वाचते. गब्बर ने सर्वांना मारल्यावर ठाकुरचा नातु - दिपक (अंलकार जोशी) तिथे येतो, त्याला बधुन गब्बर एक विचित्र हास्य करतो व त्यालाही मारतो. (ह्या प्रसगांचे चित्रीकरण व दिग्दर्शन दोन्ही जबरी आहे.) ठाकुर घरी येउन बघतात तर राधा भयान अवस्थेत रामलाल च्या शेजारी उभी असते व तिच्या बाजुला काही प्रेत पडुन असतात. एक एक करुन ठाकुर पहातात. ति त्यांचा मुलांची, सुनेचे व नातवाचे शव अस्तात. रामलाल जेव्हा सांगतो की गब्बर येउन गेला तेव्हा रागाने बेभान होऊन घोड्यावर स्वार होऊन ठाकुर गब्बर ला पकडायला निघुन जातात. गब्बर ठाकुरची वाटच पहात असतो. अन्के दरोडेखोरांशी लढता ल्ढता ठाकुर कमी पडतात व गब्बर त्यांना जेरबंद करतो. त्याचा मनात ठाकुरचे हात तोडवे असे येते व तो ठाकुरचे हात तोडतो. तोडताना आठवण करुन देतो की ह्याच हातांचा तुला मला पकडताना गर्व होता आता हेच हात तोडतो. ( ये हात नही फासीका फंदा है असे ठाकुर ने गब्बर ला
१द०
पकडताना म्हंनले होते). हात तुटल्या अवस्थेत ठाकुरांना तो सोडुन देतो. ठाकुर गावात परत येतात व रामलाल च्या साह्याने सर्वांचे अंत्यविधी उरकतात.

ही झाली कथेची पार्श्वभुमी.

ठाकुरचे मन त्यांना स्वस्थ बसु देत नाही ते गब्बरचा बदला कसा घ्यायचा ह्याचा विचार करत असतात. विचार करताना त्यांना आठवते की दोन गुंड जे मनाने चांगले आहेत ते त्यांची मदत करु शकतील. ते एका जेलर ला बोलावतात व विचारतात की जय व विरु कुठे आहेत. जेलर त्यांना विचारतो की हेच दोघे का? ठाकुर त्याला एक जुनी आठवण सांगतो. ( येठे जय व विरु ची ऐन्ट्री मी अजुनही शिट्या मारतो या सिनला).

ठाकुर जय व विरु ला घेउन एका मालगाडीत बसुन दुसया गावातील पोलीस ठान्यात घेउन तात असतो. काही वेळानंतर दरोडेखोर त्या मालगाडीवर हल्ला करतात. ठाकुर एकटे असतात व त्यांआ मदत पाहीजे असते. विरु त्यांना मदत देउ करतो. ठाकुर त्यांना सोडतात. बराच बेळ विरु, जय व ठाकुर दरोडेखोरांशी लढतात व हल्ल परतवुन लावतात.. चुकुन एक गोळी ठाकुर ला लागते त्यांना अतिरक्तस्त्रावाने चक्कर येते.
विरु: जय क्या बोलता है.
जय्: अगर ईसे ईस हाल मे छोड देंगे तो ये मर जायेगा.
विरु: तो क्या करे. निकाल वही. सिक्का.
जय: हेडस रहेगे टेल्स जायेगे.
हेडस येते. ते दोघे ठाकुर ची मदत करतात. हे सर्व ठाकुर ऐकत असतो.
( हा भाग भारतीय पिक्चरच्या इतीहासातला महत्वाचा भाग आहे कारण मालगाडीवर लढाईचा सिन आहे आधी असे काही दाखविले न्व्हते. बर्नीग ट्रेन नंतर १९८० ला आला)

कट टु.

ठाकुर विरु व जय ज्या जेल मधे आहेत तेथे येतो. त्यांना मदत मागतो.
विरु हम कोई काम पैसे के बीना नही करते.
ठाकुर काम जो मै चाहु, पैसा जो तुम चाहो.
परत एकदा विरु व जय सिक्याची मदत घेतात व हो म्हनतात.ठाकुर त्यांना काही दिवसांअन्तर गावी यायला सांगतो.


जय व विरु गावाकडे येतात. रेल्वे स्टेशन पासुन त्यांना ठाकुर च्या गावी रामगढ ला जायचे असते म्हनुन ते वाहन शोधत असतात तितक्यात एक टांगेवाली त्यांचा कडेयेऊन विचारते की टांगा पाहीजे का?

ओ बाबु शहर से आये हो क्या. कंहा जाना है रामगड की बेलापुर. रामगड का देड, बेलापुर का दो. फिर न कहना बंसती ने बोलही नही.
विरु थक्क. जय असा पहातो की ही काय बला है. विरु म्हनतो हां हां हमे जाना है. असे म्हनुन टाग्यात बसतात. टांगेवाली म्हनजे हेमामालीनी (बंसती). ती म्हनते युं की आप आदमी तो अछे मालुम होते हो पर हमे पैसे तो लेने ही पडेगें. फिर न कहना बंसती ने कहा नही. विरु म्हनतो तुम लडकी होकर टांगा चलाती हो. बंसती चे उत्तर क्या करना बाबुजी जबसे मोसाजी गये तबसे य धन्नो को ओर टांगा मैनेही संभाला. बर्याचदा ती स्वत:चे नाव घेत असते या संभाषनात. व येथेच तो प्रसिध्द संवाद आहे " तुम्हारा नाम क्या है बंसती. " . बोलता बोलता रामगड येते. जय व विरु ठाकुरचे घर आले की उतरतात.
ठाकुर त्यांना पैसे देतो, पैसे देताना रामलाल तिजोरी उघडतो तेव्हा विरु त्यातील पैसे पहातो. रात्री तिजोरी साफ करायच बेत करुन ते दोघे झोपायला जातात. घर उघडताच त्यांचावर काही लोक तुटुन पडतात. जय विरु त्यांना मारामारीत हारवतात. ते लोक ठाकुरचेच माणस असतात्त. रागारागत ते दोघे ठाकुर कडे जाउन विचारतात की ती लोक कोण होती. ठाकुर म्हणतो ते त्याचेच माणस होते. तो म्हणतो की " वक्त की दिमक ने कंही तुम्हारी बाजुओंको खोखला तो नही कर दिया.
जय विरु रात्री उठुन तिजोरी कडे जातात. ते दार उघडताना तेथे राधा येते. ती तिजोरीच्या चाव्या देउ करते.
राधा ये लो ये चाविंया ओर ले जावो सब कुछ कमसेकम बाबुजी की झुटी उम्मीद तो खत्म हो जायेगी.
जय विरु ला पच्छाताप होतो ते चावी वापस करुन त्यांचा खोलीत येतात.
काही दिवस जातात. या दरम्यान जय ला राधा बद्दल व विरु ला बंसती बद्दल प्रेम उत्पन होते.
एकेदिवशी अचानक काल्या (विजु खोटे) व त्याचे दोन साथीदार रामगड ला अनाज गोळा करायला येतात. जय विरु ला हे कळते व ते त्यांचा विरोध करायला येतात व त्यांना परतवुन लावतात. गावकरी खुश.
काल्या व त्याचे साथीदार गब्बर ला सांगतात की दोन माणसांनी त्याना वापस पाठविले. गब्बर चिडतो बंदुकीत गोळ्या भरतो व विचारतो.

गब्बर कितने आदमी थे.
काल्या दो सरदार
गब्बर वो दो ओर तुम तिन. अरे ओ सांबा (मैक मोहण), कितेनी गोलीया है रे ईसमे.
सांबा ६ सरदार.
गब्बर आदमी तिन ओर गोलीया छे, बहुत नाईंसाफी है. असे म्हनुन तिन गोळ्या हवेत उडवतो. परत स्वत्:ला म्हणतो. अब बराबर. तिन आदमी ओर गोली भी तिन. काल्या ला उद्देशुन म्हन्तो. तेरा क्या होगा रे काल्या.
काल्या सरदार मैने आपका नम्क खाया है.
गब्बर तो अब गोली खा. असे म्हनुन तो तिघांवरी ही एकेक्दा ट्रिगर चालवतो, ते रिमामे खाणे असतात.
गब्बर तिनो बचगये. साले तिने बचगये असे म्हनुन हास्याचा गडग्डाट करतो. सरव्च हासतात. हास्य विरायचा आतच तो त्यांना गोळी मारतो ते मरतात. जोरात म्हणतो. " जो डरगया, समझो मरगया. "
स्वताच नादात जोरात म्हनतो " होली कब है कब है होली "

होई के दिन रंग खिल जाते है हे गाने लगेच चालु होते. रामलाल जय ला राधाची खानी सांगतो. राधाची व ठाकुर्ची भेट होळीच्या दिवशी होते. राधाचे वडील ठकुर चे मित्र असतात. ठाकुर राधाला सुन करुन घेतो पण लग्नाच्या काही दिवसात गब्बर ठाकुरच्या दोन्ही मुलांना मारतो त्यामुळे राधा विधवा होते.
गाणे संपता संपता गब्बर व ईतर लोक गावावर हल्ला करतात.तो हल्ला जय व विरु परतवुन लावतात. एका वेळी विरु कडे बंदुक नसते. ठाकुर च्या पायापशी एक बंदुक पडलेली असते. विरु ती उचल असे डोळ्याने सांगतो पण ठाकुर ती उचलत नाही. हला परतविल्यावर विरु रागाने ठाकुर ला विचारतो का बंदुक उचलली नाही म्हनुन. रामलाल मग पार्श्वभुमी सांगतो.


Mahesh
Thursday, August 10, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोशी, छान सांगत आहात कथा. पण का सांगत आहात ?
बोर्डाचे नाव मला असे वाटले आहे म्हणुन विचारले.


Kedarjoshi
Thursday, August 10, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोर्डाचे नाव मला असे वाटले आहे म्हणुन विचारलेमहेश,
चित्रपट कथा, ओल्ड क्लासीक्स असे असल्यामुळे मी शोले बद्दल लिहित आहे. या सोबतच आणखी चार कथा ही आहेत ह्या बिबि वर.


Kedarjoshi
Saturday, August 12, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होळी चे गाने संपता संपता गब्बर व त्याचे साथेदार रामगड्वर हल्ला करतात. काही वेळाचा झटापटी नंतर जय व विरु कडच्या गोळ्या संपतात व गब्बर चे साथीदार जय ला घेरतात. गब्बर विरु ला बाहेर बोलावतो व ठाकुर चि हेटाळनी करतो. गब्बर जय व विरु ला बुटावरची थुंक चाटायला बोलावतो. जय त्याचाकडे जातो व वाकुन त्याचा डोळ्यात धुळ फेकतो. परत एकदा झट्पट सुरु होते व गब्बर ला माघार घ्यावी लागते. तो निघुन जातो.

ईमाम साहेब व त्यांचा मुलगा अहमद हे त्याच गावात राहात असतात. ईमाम साहेबांना डोळे नसतात. अहमद त्यंना सोडुन दुसर्या गावी उपजिवीकेसाठी जायला तयार नसतो. ईतक्यात त्याच्या मामा चे पत्र येते. ईमाम साहेब अहमद ला त्या गावी जायला भाग पाडतात. अहमद गावी जायला निघतो पण वाटेतच त्याला गब्बर चे गुंड घेरतात व त्याला मारुन गावात त्याचे शव पाठवतात. सारे गावकरी ठाकुर व पर्यायाने विरु व जय वर चिडतात. ईमाम साहेब त्यांना शांत करतात व म्हणतात की बेटा मैने खोया है ओर मुझे उसका कोइ गम नही. आज पुछुंगा अल्ला से की गाव पे उपर शहीद होनेको उसने ऑर एक बेटा क्युं नही दिया.
गब्बर चे साथीदार व तो एक दुसर्या गावी बंदुका व त्याचा गोळ्या आनायला जातात. त्याचा पत्ता ठाकुर ला लागतो व तो जय व विरु ला त्या गावी गब्बर ला पकडायला पाठवतो. जय व विरु तिथे बॉम्ग्स्फोट घडवुन आनतात पण जय ला गोळी लागल्या मुळे ते वापस येतात.

विरु ला बंसती बरोबर लग्न करायची ईच्छा असते त्यामुळे तो जय ला मॉसी कडे पाठवतो लग्नाची बोलनी करयाला. मोसी नाही म्हनते त्यामुळे विरु एका पाण्याच्या टाकीवर जाउन जिव द्यायचे नाटक करतो. मावशी परवानगी देते.

काही दिवसांनंतर बसंती जेव्हा तळ्याकाठी जाते तिथे गब्बर चे गुंड असतात ते तिला पळवुन नेतात. ति बरीच झुंज देते पण शेवटी तिचे काही चालत नाही. पळवुन नेताना एक मुलगा पाहातो व तो विरु ला सांगतो. विरु गब्बर च्या अड्यावर जातो, पण ते त्याला पकडतात व बांधुन ठेवतात. जय पण लगेच तिकडे येउन पोचतो. तो विरु ला सोडवतो व बसंती ला जायला सांगतो. थोड्याश्या लढाई नंतर त्यांचा कडील गोळ्या संपत येतात. जय विरु व बसंती ला एका घोड्यावर गावात पाठवतो व येताना गोळ्या घेउन यायला संगतो. ते दोघे जातात. जय एक पुलाचा अलिकडे व गब्बरचे साथीदार पलीकडे असतात. जय तो पुल राखायचा प्रयत्न करत असतो पण एक गावठी बॉम्ब्च्या स्फोटामुळे त्याला खुप ईजा होते. विरु तो पर्यत गावातुन सगळ्यांना घेउन येतो. जय ला मरताना परत राधाला पाहवे लागते कारण मध्यंतरी च्या काळात तिला ही त्याचाबद्दल प्रेम उत्पन होते. जय जातो.

विरु बेभान होऊन गब्बरच्या साथीदारांशी लढतो व त्यांना मारतो. तो गब्बरशी पण लढा देतो व त्याला मारणार तितक्यात ठाकुर तिथे येऊन पोचतो. विरु गाब्बर ला मारनार ईतक्यात ठाकुर त्याला त्याचा वचणाची आठवण करुन देतात की सओदा गब्बर ला पकडायचा होता मारायचा नाही. विरु म्हणतो की त्याला काही वचण आठवत नाही कारण गब्बर ने जय ला मारले आहे. ठाकुर परत म्हणतात की जयनेच ते वचण दिले होते ते तुला पाळायलाच लागेल. विरु गब्बर ला सोडतो.

ठाकुर चे हात गब्बर ने तोडलेले असतात. ठाकुर पायात लोखंडी खिळे असलेले बुट घालुन येतात व गब्बरला पायाने मारतात. गब्बर खाली पडतो. " ये हात मुझे दे दे गब्बर " असे म्हणुन ठाकुर त्याचे हात तोडतात. त्याला मारुन टाकनार ईतक्यात पोलीस येतात व ते गब्बर ला पकडतात.

विरु सगळे झाल्यावर ते गाव सोडुन जायला निघतो. रेल्वेत पाहतो तर बसंती त्याचा आधीच बसलीली असते.

येथे पिक्चर संपतो.

शोले चा शेवट दोन्ही प्रकारे चित्रीत केला आहे. एकात ठाकुर ने गब्बर ला मारलेले दाखवले आते तर दुसर्यात पोलीसांनी पकडलेले दाखवलेले आहे. पण जनरल कॉपीत पोलीस दाखवतात व तोच शेवट दाखवतात. माझ्या कडील DVD त गब्बर ला मारलेले दाखवीले आहे.

मी आसरानीचा भाग लिहिलेला नाही. कारण त्यानी ईथे काही फरक पडत नाही.
कितीदाही पाहीला तरी शोले परत परत पाहावा वाटतो म्हणुन येथे लिहिन्याचा प्रपंच.

रमेश सिप्पींना रेल्वे दाखवुन पिक्चर स्टार्ट करने एवढे आवडले की त्यांनी नंतर दिग्दर्शीत केलेल्या शक्ती या पिक्चर मध्ये पण सुरुवातीला रेल्वे सिन दाखवीला.

आता २००७ मधे परत एक शोले येतोय.तो मी पाहील की नाही ह्याची खात्री नाही. ( हे म्हनजे रिमेक्स गान्यासारखे आहे). शोले सोबतच अमिताभचाच कभी कभी पण येनार आहे.


शोले ह्या पिक्चर ने अनेकांना वेड केले आहे. मी त्यातील एक.


Jadhavad
Tuesday, August 15, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक छोटीशी माहीती:
शोले चा शेवट कसा करावा ह्यात सिप्पिंमध्ये जम बसत नव्हता. मुख्य कलाकारांमध्ये आणि सलिम्-जावेद मध्ये पण क्लायमेक्स वरुन वाद व्हायचे. असे एकुण ३ क्लायमेक्स बनविले गेले.
१. जय मरतो, राधा विधवाच राहते, गब्बरला पोलिस पकडतात........ आपण सध्या जो बघतो, तो हा क्लायमेक्स
२. जय मरतो, राधा विधवाच राहते, ठाकुर गब्बरल मारतो.
३. जय जिवंत, राधा बरोबर लग्न, ठाकुर गब्बरल मारतो.

शेवटी सर्वानुमते वाईट प्रव्रुत्ती संपली पाहिजे म्हणुन गब्बर ला मारयच ठरविल आणि जय ला पन मारण्यात आले. शुटिंग होवुन पिक्चर ठरवीक ठिकाणी रीलिज झाला, पन नीट चालला नाही. ह्या आव्रुत्तीच्या जास्त प्रिंट बनविन्यात आल्या नाहीत. मग रमेश सिप्पी ने गब्बर ला जिवंत ठेवुन पिक्चर मोठ्या प्रमाणात रीलिज केला आणि मग Resr is History .

जय ला जिवंत ठेवुन पण एक क्लायमेक्स चे शुट झाले, पण एडिटींग मध्ये त्याल परत मारण्यात आले.

जय जेव्हा मरतो, तेव्हा राधा ठाकुरच्या खांद्यावर डोक ठेवुन रडते. हा सीन संजीव कुमारला इतका आवडला होता, की actual शुट च्या वेळेस संजीव चे हात बाहेर आले आणि राधा ला कुरवाळायला लागले होते. तेव्हा कुणालच समजले नाही की ठाकुरला हात नसतात. एडिटींग च्या वेळेस ही चुक लक्षात आली आणि मग री-शुट झाल.

भारतात मी शोधले पण मला पहील्या क्लायमेक्स ची (गब्बर मरतो) प्रिंट नाही सापडली. मागच्या मलेशिच्या ट्रिप ला मला ती प्रिंट Kuala-Lampur ला सापडली.

एक प्रसंगी, जेव्हा सचिन गब्बरच्या डेन मध्ये येतो, तेव्हा त्याला मारण्यात येते. मुख्य शुटींग म्ध्ये बरेच exchange of dialogs aahet . पन पिक्चर ची लांबी जास्त वाढली म्हणुन ते कट करण्यात आले. तीच गोष्ट सांभा ची. सगळ्याना पिक्चर दाखविल्या नंतर मक्मोहन बाहेर येवुन रडला होत, त्याच्यावर बरच शुट झाल, पण वेळे अभावी ते पण कट करन्यात आले होते. शेवटी त्याल अमिताभने समजविले की, जरी २ डायलॉग असले तरी सगळे ते लक्षात ठेवतील.





Kedar123
Thursday, January 03, 2008 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समजा शोले चा परत एकदा (अरे बापरे परत) रीमेक काढायचा ठरवला तर तो कसा बर असेल?

पहिल्या 'शोले' मध्ये गब्बर ठाकूरचे हात तोडून टाकतो.

दूसर्‍या शोले (राम गोपाल आणि मंडळी ची आग) मध्ये बब्बन ढासत ढासत ' गोबर्‍या' ठाकूरची बोट तोडतो.

आता जर शोले चा रीमेक परत आला तर (का नाही येऊ शकणार बर? त्सूनामी अशी सांगून थोडीच येते).

तर.....

त्यामधे गब्बर 'ठाकूरची' नख तोडताना दाखवायला लागेल (म्हणजे ओरीजीनल ' शोले' च्या नखाचीही सर ह्याला नाही असे कोणीच म्हणू शकणार नाही.)

चित्रपटाचा शेवट खूपच भन्नाट असेल.

कोणी एक ठाकूर गब्बर ला नखांनी (पायाच्या नखांनी हो. बोटांची नख आधीच कापलीयेत ना) ओरबाडून ओरबाडून काढतोय.

शेवटी पोलीस (म्हणजे ईफ्तीकार, कमल कपूर, जगदीश राज वगैरे मंडळी) येऊन म्हणतील रूक जावो ठाकूर ' कानून को अपने नाखूनसे मत खरवडो. उसको सेप्टीक हो जायेगा.'


Mrdmahesh
Thursday, January 03, 2008 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' कानून को अपने नाखूनसे मत खरवडो. उसको सेप्टीक हो जायेगा.' >>



Zakasrao
Friday, January 04, 2008 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार२३
केदार रेल्वेचा सीन जबरीच आहे. खरच त्याकाळात असे सीन्स हे खुप कठिण असाव. :-)
आजही शोले लागला तर पहावासा वाटतो. कंटाळा येत नाही. :-)
अगदी कोणताही सीन सुरु असु दे.
असरानी चे जेलरचे सीन धमाल.
शिवाय जगदीपचे सुरमा भोपाली सुद्धा जबराच आहे. फ़ार कमी वेळ असुनही हे लोक सुद्धा आपल्या लक्षात राहतात.
ग्रेट फ़िल्म.
भट्टी परफ़ेक्ट जमली होती.


Limbutimbu
Friday, January 04, 2008 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय बरोबर असणारे नाणे, जेव्हा तो मरतो तेव्हा वीरू बघतो
त्याच्या दोन्ही बाजुन्ना हेड अस्ते!
या प्रसन्गातून, दिग्दर्शकाला नेमके काय सुचवायचे असेल?


Nandini2911
Friday, January 04, 2008 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शोले अनेक वेळा पाहिलाय पण एकदा अजिबात विसरता येणार नाही असा पाहिलाय.
सलिम खानबरोबर बसून!!!!!


Shendenaxatra
Friday, January 04, 2008 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमिर खान व सलमान खान ह्यांचा कुठलातरी एक भिकार सिनेमा आहे. त्यातला एक डायलॉग मात्र मजेदार आहे.
सलमान खान शोलेच्या एका पोस्टरसमोर उभा असतो आणि तो क्या फिल्म थी की कायसेसे म्हणतो. तेव्हा आमिरखान त्याला म्हणतो "तेरे बापने लिखी है ना!" मग सलमानखान खवळून म्हणतो "मेरे बाप का नाम मत ले" वगैरे वगैरे.
पण बहुतेकांना हे माहितच आहे की शोलेची पटकथा लिहिणार्‍यातला एक सलीम हा सलमानचा खरंच बाप आहे.
नंदिनी,
सलिमखानबरोबर शोले बघताना त्यांनी काही अनुभव सांगितले का? खरोखरच अनोखा अनुभव असेल तुझा!

जाता जाता: जिथे शोलेचे शूटिंग झाले ती जागा (रामगड) कर्नाटकात आहे असे ऐकले आहे. ती कुठे आहे? हौशी लोक ती जागा बघायला जातात का?


Tiu
Friday, January 04, 2008 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमिर खान व सलमान खान ह्यांचा कुठलातरी एक भिकार सिनेमा आहे.
>>>
भिकार??? अंदाज अपना अपना मधला डायलॉग आहे हा. पण चित्रपट भिकार नक्कीच नाहीये! हा काहीही पांचटपणा दाखवलाय पण ३ तासाची करमणुक होते नक्की! :-)

Farend
Saturday, January 05, 2008 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT शोलेत प्रत्येक वेळा अमिताभच नाणे उडवतो आणि वरवर असे दाखवतो की जी बाजू वर येईल त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा. पण शेवटच्या या शॉट मधून असे निष्पन्न होते की (त्या नाण्याला दोन्ही बाजूला 'हेड' होते आणि म्हणून) प्रत्येक वेळेला जे त्याला करायचे असते तेच 'हेड' साठी ठरवून तो नाणे फेकतो. आधीचे डॉयलॉग पुन्हा ऐकले की ते लक्षात येते.

Psg
Saturday, January 05, 2008 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, अगदी शेवटीही 'गावात कोणी जायचं आणि इथे एकट्यानी राहून गब्बरचा मुकाबला कोणी करायचा' यावरही टॉस होतो, तेव्हाही जय हेडच मागतो.. आणि एक प्रकारे वीरु आणि बसंतीचं रक्षणच करतो, आणि स्वत:चा बळी देतो..

मी बरीच लहान होते हा सिनेमा पाहिला तेव्हा.. जेव्हा दोन्ही बाजूला हेडच आहे हे उघडकीला येतं, तेव्हा वीरु शोकाकुल होतो.. तेव्हा मीही खूप रडले होते.. अमिताभनी असं का केलं म्हणून! :-)


Manjud
Saturday, January 05, 2008 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोलेचं शूटिंग कुठे नक्की झालं माहीत नाही. पण धर्मेंद्रचा तो फेमस पाण्याच्या टाकीवरचा शॉट आहे तो म्हणे उरणला चित्रीत झाला होता. त्यावेळी उरण हे अक्षरश: खेडेगावच होतं. आता बर्‍यापैकी त्यचं शहरीकरण झालं आहे.

Ankyno1
Saturday, January 05, 2008 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंदाज अपना अपना हा सिनेमा 'भिकार'.....?



मी थक्क झालो हे वाचून.....
या भूतलावर हा सिनेमा न आवडणारा इसम ही असू शकतो


(का नसणार...
शोले न पाहिलेले लोक असतात,
आम्बा न आवडणारे लोक असतात,
जन्मात हातात बॅट न धरता सचिन तेन्डुलकर ला बॅटिन्ग चे सल्ले देणारे लोक असतात,
हिमेश रेशम्मिया चा आवाज आणि अभिनय आवडणारे लोक असतात,
थिएटर मधे सिनेमा पहाताना मोबाईल सायलंट न करणारे ही लोक असतात
......................

तसच
अंदाज अपना अपना न आवडलेले लोक ही असू शकतात हे मी लक्षात घ्यायला हवं होतं....)

असूदे....
असतो एकेकाचा.....

अंदाज... अपना अपना.....


Kedar123
Saturday, January 05, 2008 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंदाज अपना अपना भारी सिनेमा आहे.

त्यातल सलमान खान आणि शक्ती कपूरची लास्ट ची फायटींग एकदम खतरनाक आहे.



Farend
Saturday, January 05, 2008 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही 'अन्दाज...' एवढा ग्रेट वगैरे वाटला नाही, आवडला नाही असे नाही (आणि लोकांना एवढा आवडला असेल तर मला पुन्हा बघायला पाहिजे. माझे काही मित्र त्यातील संवाद वगैरे अधूनमधून 'टाकत' असतात) पण जेवढे कौतुक ऐकले तेवढा वाटला नाही.

Psg
Saturday, January 05, 2008 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंड, 'अंदाज..' थीयेटरला पहायला हवा रे.. असे सिनेमे पहिल्यांदातरी मॉबबरोबरच पहायचे :-) फ़ार सही सिनेमा आहे.. आमिरचा शहाणपणा आणि सल्लूचा आचरटपणा एकदम पॉश आहेत.. :-)

बाकी, Ankyno1 ला पूर्ण अनुमोदन :-)


Kedar123
Saturday, January 05, 2008 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम वैनी तूम्हाला मोदक

खरच पब्लीक बरोबर पिक्चर पहायला मजा येते.

मी असाच एक किस्ना म्हणून सूभाष घई चा पिक्चर पाहीलेला अनावधानाने.

त्यामधली एक ईशा शर्वानी म्हणून हीरवीण आहे ती कायम जीमनेस्टीक करत असते (आणि आपले विक्रम गोखले पोरीचे वडिल, पोरी कडे लक्ष न देता आपल गाण म्हणत असतात)

चित्रपटाच्या अंताला (प्रेक्षकांचा आधीच झालेला असतो अंत) दूसरी गोरी हिरवीण म्हातार पणी भारतात येते. त्यात किस्ना आधीच स्वर्गस्थ झालाय. गोरी हीरवीण विचारते "लक्ष्मी (म्हन्जी ईशा शर्वानी) किधर है?"
चित्रपटातल पात्र उत्तर द्यायच्या आधीच प्रेक्षकातल कोणी तरी ओरडल "लक्ष्मी अभी सर्कस मे है."

आमचे पैसे त्यानेच वसूल झाले.

धन्यवाद
ankino

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators