|
Psg
| |
| Wednesday, December 19, 2007 - 5:30 am: |
| 
|
खरंय, सायलीचा आवाज खूपदा नाकातला वाटतो, पण उंच स्वरातली गाणी सुरेख गाते ती. पण 'पल पल पल' अगदीच सो-सो झालं. 'असा बेभान हा वारा' मात्र मस्त. वैशालीचा आवाज सर्वात जास्त आवडतो मला. अजिबात इकडेतिकडे हलत नाही आवाज. श्वास येत होता, पण ते गाणंही तितकं अवघड आहेच ना.. पण काल मला वाटलं की ती थोडी टेन्शनखाली होती, किंवा बुजली होती. इतका आत्मविश्वास वाटला नाही तिच्या वावरण्यात. आणि अनिरुद्धचा तर केवळ टाईमपास चालू आहे असं वाटतय. त्याला स्वत:ला त्याचं कॅलिबर कळलंय त्या दोघींसमोर.. देवकी पंडित जाम बोअर झाल्यासारखी नाही वाटत?
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, December 19, 2007 - 5:37 am: |
| 
|
बरोबर आहे पूनम. पानसे असल्यामुळे असेल कदाचित. पण तरिही ती सुंदर गाते. तिचे वद जाउ कुनाला फार उच्च आहे. मला वैशाली चा आवाज सायली पेक्षा जास्त आवडतो. पण दोघी चांगल्या गायिका आहेत. ( आता उद्या यु ट्युब वर कालचे ऐपीसोड लोड होन्याची वाट पाहात आहे.) तो अनिरुध्द टिपी आहे अन ती ओक गेली का? तिचा आवाज चांगला असुनही ती बावळट वाटायची गाताना.
|
Himscool
| |
| Wednesday, December 19, 2007 - 6:37 am: |
| 
|
तीन मुलीच फ़ायनलला हे झी वाल्यांना पचले नसावे बहुतेक.. म्हणुन अनिरुद्ध ला परत आणले.. आणि आधी सुद्धा जर बघितले तर कॉल बॅक मध्ये तिनही मुलेच परत आली होती.. काहीही झाले तरी शेवटी एक तरी पुरुष स्पर्धक असायलाच पाहिजे असाच जर झी वाल्यांचा हट्टच असेल तर कोण काय करणार...
|
Manjud
| |
| Wednesday, December 19, 2007 - 8:13 am: |
| 
|
अनिरुद्धला संजीवनी वापरून परत आणल्यावर माझा गाणी ऐकायचा पण मूड गेला. त्याला परत आणल्याबद्दलचं देवकीचं एक्स्प्लनेशन अगदिच पुचाट आणि baseless होतं. आता सगळेच एपिसोड्स लिहिल्यासारखे वाटायला लागले आहेत. म्हणे 'रीऍलिटी शो'. देवकी काय अवधूत पण बोअर झालाय. काहीतरी पांचट विदुषकी करामती करत बसतो. ह्या वेळेचं शेड्यूल मागच्या शेड्यूलची सुधारीत आव्रुत्ती वाटते आहे, थोडासाच बदल केलाय फक्त. म्हणजे १० ऐवजी ११ स्पर्धक फायनलला, दोन मुलगे आणि एक मुलगी ऐवजी २ मुली आणि एक मुलगा महाअंतिम फेरीत, इतकच.
|
Dakshina
| |
| Wednesday, December 19, 2007 - 10:13 am: |
| 
|
वैशाली भैसने - माडे ला बहूतेक एस.एम.एस. कमी मिळाले म्हणून ती काल अशी टेन्स दिसत होती. अर्थात ते अतिशय स्वाभाविक आहे. कारण बिल्कूल आवाज आणि गाणं म्हणण्याची कला नसणार्या अनिरुद्धला इतके एस.एम.एस. मिळतात, आणि आपला आवाज इतका सुंदर असून आपण निव्वळ एस.एम.एस. मूळे मागे पडावं ही निराशा आणणारीच गोष्टं आहे. (आणि ४ वेळा बेस्ट performer चं awaard ) + ४ वेळा 'नी' मिळून सुद्धा.) आणि आता एस.एम.एस. चा मुद्दा हा थोडाफ़ार फ़ेवरिझमवर पण येऊ लागलाय, असं आजूबाजूचे लोक बोलतायत. कोल्हापूरचा कोसंबी जिंकला तेव्हा तो फ़क्त कोल्हापूरचा आहे म्हणून त्याला ढिग्गाने एस.एम.एस. मिळाले. सायली पानसे चं पण थोड्याफ़ार प्रमाणात तसंच आहे, सुदैवाने तिच्याकडे तितकं कॅलिबर पण आहे. पण अनिरुद्धला इतके एस.एम.एस. म्हणजे फ़क्त फ़ेवरिझम आहे. आणि अनिरुद्ध जोशी जणू आपणच महागायक होणार (होणार? already झालोय) अशाच अविर्भावात गात होता काल.
|
Zakasrao
| |
| Wednesday, December 19, 2007 - 10:50 am: |
| 
|
खरतर ह्या सगळ्यापेक्षा एक उच्च गाणारा होता जो दुरदर्शनच्या महारष्ट्र संगीत रत्न झाला. बिचारा. त्याला काहीच चान्स नाहिये पुढे. त्याच कार्यक्रमात मी पहिल्यांदा अभिजित कोसंबीला ऐकले होते. अर्थात त्याला हरवुन तो पुढे गेला. त्याच नाव आठवत नाहिये पण तो पुण्याचा होता. मग त्यानंतर झी वाल्यानी सारेगमपा सुरु केल. खरतर त्या दुरदर्शन वर हारल्याचा अभिजितला फ़ायदाच झाला. कारण त्याला एवढी प्रसिद्धी आणि पैसा मिळाला नसता )
|
Sameerdesh
| |
| Wednesday, December 19, 2007 - 11:07 am: |
| 
|
झकासराव , महाराष्ट्र संगीतरत्न झालेला अनिरुद्ध जोशीच. त्यात त्याने अभिजीत कोसंबीचा भाऊ प्रसेनजित कोसंबीला हरवले होते. अभिजीत आणि प्रसेनजित सारखे दिसतात. पुण्यात मागच्या वर्षी महाराष्ट्र संगीतरत्न व सा रे ग म प यातील अंतिम फेरीतील स्पर्धकांचा एकत्र कार्यक्रम झाला होता. त्यात अनिरुद्ध जोशीचे गाणे चांगले वाटले. आता मात्र त्याचे गाणे खास वाटत नाही.
|
Zakasrao
| |
| Wednesday, December 19, 2007 - 4:11 pm: |
| 
|
समीर देश धन्यवाद माहिती बद्दल. हा तोच अनिरुद्ध जोशी आहे का???? मग मला जो म्हणायचा आहे तो हा नव्हे. अजुन एक जण होता पुण्याचा. ज्याचे केस मोठे मोठे होते आणि जो खात्या पित्या घरचा होता. बराच क्लासिकल शिकलेला होता तो. खुप वेग वेगळी गाणी म्हणत होता. त्याला परिक्षक पुरुशोत्तम बोर्डे म्हणायचे की तुझ्या पोतात अजुन किती गाणी आहेत अस. तो कोण?? तो वेगळा होता का??? मी पुर्ण सगळे एपिसोड नाही पाहिलेले संगीत रर्नचे.
|
Dineshvs
| |
| Thursday, December 20, 2007 - 3:05 am: |
| 
|
अनिरुद्ध जोशीने परवा, चक्क व्याकरणाची चूक केली. कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा या गाण्यातल्या त्या ऐवजी तो या म्हणाला !!! कुणाच्याच लक्षात ते आले नाही.
|
Manuswini
| |
| Saturday, December 22, 2007 - 6:33 am: |
| 
|
सा रे ग म प ने तोंडात बोटे घालयला लावली. लोरियाच्या वडीलांनी कीती चीप लेवल ला येवून सगळी वोट जमा केली. काय हे मुलांना काय आदर्श देणार... शेवटी बिचारी मुलीला लाज. दहावी,बारावी पण असेच पैसे देवून पास केले असणार असा शेवटी संशय येतो. आणि वैशाली डोक्यातच जाते. कीती ते oversmartness , ह्या वयात हे मग ३-४ वर्षात बरेच दीवे लावणार. उर्मटपणे बोलणे. ते तीचे वडील अगदी कौतूक म्हणून बघतात. शेवटी आई वडीलांचे संस्कार काय आहेत वागा- बोलायचे दिसून येतातच. लहान असताना inoocence , आदर देणे मोठ्यांना तेच शोभून दिसते.
|
Dineshvs
| |
| Saturday, December 22, 2007 - 10:42 am: |
| 
|
मनुस्विनी, का बघायचे हे असले प्रोग्रॅम ? गाण्याचा निखळ आनंद कुठे देतात ? अनेकजण मराठी गाणी ऐकायला मिळतात, म्हणुन हे कार्यक्रम बघतात, मग हे कार्यक्रम बघण्यापेक्षा मूळ गाण्यांची सीडी लावुन, पुस्तक वाचत पडावे की. काय मत आहे ?
|
Uday123
| |
| Saturday, December 22, 2007 - 6:05 pm: |
| 
|
तिचे वडील झी वर सक्त नाराज दिसलेत. लोरियाला मते द्यायला काही लोकं रात्रंदिवस संगणकावर बसविली होती, पण त्यांची जवळपास सर्व मते (१ संगणक १ मत) बाद ठरलीत. झी ने आधीच तसे जाहीर केले असते तर या महाशयाने अजुन काही मार्ग काढला असता. किती हा अन्याय? (कष्टाने कमावलेले!) ७० हजार रुपये पाण्यात गेल्याच शल्य त्यांना बोचत होतं. काय आणी कसे हे पालक मुलांवर संस्कार घडवणार?
|
दिनेश, शम्न्बर टक्के अनुमोदन. सार्याच कार्यरमान्मध्ये ठरवून एखादा ड्रामा, एलिमिनेट झालेल्या मुलान्च्या आणी पालकान्च्या चेहेर्यावर रोखलेले क्यामेरे, त्यान्चे हेवे दावे, यासाठीच हे कार्यक्रम पाहिले जातात आणी मागणी तसा पुरवठा या न्यायाने टीव्ही वाले असाच आचरटपणा दाखवित रहातात.
|
स्टेज तोड perform करणारे राखी अभिषेक नाही जिंकले वाटलच होतं म्हणा ! संजिदा चांगली च होती पण अभिषेक पुढे आमिर अगदीच किरकोळ होता .. Anyways, बहुतेक reality shows चे results असेच लागतात !
|
Zakasrao
| |
| Monday, December 24, 2007 - 4:49 am: |
| 
|
डीजे मला मनापासुन वाटत होत की राखी आणि अभिषेक जिंकावेत अस. पण नाय जिंकले हा सिरियल वाल्यांचा फ़ंडा असेल का?? तिकडे सुद्धा प्राची जिंकली. इथे संजिदा. राखि ने बोंबाबोंब केली आहे पण त्यातुन काही फ़ायदा होइल अस वाटत नाही. असो बाकीचे जे अवार्ड्स दिले जसे की हांजी हांजी आवार्ड, बोलण्यासाठीचे अवार्ड त्यामुळे मज्जा आली सचिन आणि सुप्रिया ह्या वयात देखिल चान्गल नाचु शकतात सुप्रिया जाड झाल्यासारखी वाटते. ती झलकची फ़ायनल काल पाहिली मी रिपिट टेलीकास्टला. त्या ओम्काराच्या गाण्यावरचे बायकाना दिलेले कपडे बघताना मलाच लाज वाटुन मी चॅनेल बदलले
|
Dakshina
| |
| Monday, December 24, 2007 - 7:00 am: |
| 
|
बरं एव्हढे सत्तर हजार खर्च केले ते केले, मी म्हणते ऐपत होती, म्हणून खर्च केले, पण ते भर कार्यक्रमात बोलून कशाला दाखवायचं? वर ज्यावेळी आदित्य नारायणने सांगितलं की एका Computer चे एकच मत धरले जाते तर, तो माणूस म्हणे की, 'पहले बताना चाहीए था ना..' मी तर त्याची ती मुक्ताफ़ळं ऐकून अगदी गारंच झाले. ती मुलगी बिचारी स्टेज वरून त्याला खूणेनं सांगू नको, सांगू नको असं सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या (मूर्ख) बापाचा स्वतःवरचा जणू तोलच गेला होता..... टेलिव्हीजन वाले काय इतके मुर्ख आहेत का? की त्यांना माहीत असू नये, की पार्टिसिपंटसचे नातेवाईक दिवस रात्र एक करून जास्तीत जास्त मतं देतील? खरंतर इतर अलेल्या पेरेंटस नी पण आदित्यला तोच प्रश्न विचारला होता की, प्रत्येकाची मतमोजणी काय? बहूतेक त्यांना ही अंदाज घ्यायचा असेल, की आपली बोगस मतं फ़ळाला आली की कुजली? लोरिया च्या वडीलांनी केलेला प्रकार खरोखरी लज्जास्पद आहे. आणि तो त्यांच्यासाठी नसला तरी त्याचे पडसाद हे लोरियाला खूप भोगावे लागणार आहेत. भविष्यामधे संधी मिळायला काही अशा स्पर्धा जिंकणं क्रमप्राप्त आहे असं मला नाही वाटंत. एखादा हौशी जज्ज, जर त्याच्याकडे संधी असेल तर, avharage talent वाल्या मुलाला पण ब्रेक देऊ शकतो. आणि पूर्वी असं घडलेलं आहे. पण बिचार्या लोरियाने ती संधी पण निव्वळ वडीलांच्या मुर्खपणामूळे गमावली. बाकी तिचा आवाज काही वाईट नाही. i really feel sorry for her....
|
Vrushs
| |
| Tuesday, December 25, 2007 - 4:06 am: |
| 
|
सारेगमप चा फ़ायनल कधी आहे?
|
Ankyno1
| |
| Tuesday, December 25, 2007 - 4:41 am: |
| 
|
६ जानेवारी २००८ ला आहे मेगाफायनल
|
Dineshvs
| |
| Wednesday, December 26, 2007 - 3:07 am: |
| 
|
या स्पर्धेचा एक घृणास्पद चेहरा समोर येतोय. जर या स्पर्धा राज्य वा राष्ट्र पातळीवर घेतल्या जातात, तर मतांचा जोगवा मागताना, परत राज्य, भाषा, शहर असे मुखवटे का पुढे केले जातात ? उद्या जात आणि धर्माच्या नावावर पण आव्हाने केली जातील. पण तेही योग्यच आहे म्हणा, जिथे देशाच्या निवडणुका, कामगिरीपेक्षा असल्या घटकांवर लढल्या जातात, त्याचे प्राथमिक शिक्षण मिळायची सोय झाली !!!
|
Dakshina
| |
| Wednesday, December 26, 2007 - 5:11 am: |
| 
|
दिनेश, मी तुमच्याशी अगदी सहमत आहे. अनिरुद्ध जोशीला निव्वळ नागपूरकरांनी उचलून धरलेला आहे, अन्यथा तो (माझ्यामते) तरी स्पर्धेबाहेर जाण्यासच लायक होता. आता तो दोनदा जाऊन परत येतो म्हणजे, सरळ सरळ लोकांची कृपा आहे. कालचा एपिसोड मी पाहीला नाही. त्यात म्हणे देवकी पंडीत ने लोकांना 'चांगल्या आवाजाला' एस एम एस पाठवण्याचं आव्हान केलं. I missed it अर्थात, याला कारणीभूत अवधूत आहे, कारण तो सायली ला म्हणाला म्हणे की तूलाच सगळ्यात जास्त एस एम एस मिळणार आहेत. जज्जेस जर असं पुब्लिक ला बायस करत राहीले तर, चांगल्या आवाजाला कदापिही न्याय मिळणार नाही...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|