|
Chyayla
| |
| Sunday, August 19, 2007 - 5:54 am: |
| 
|
नावे पहावी ठेवून ... नाही बा.. नाय जमणार आपल्याला... आपण काही समुद्रकिनार्यावर किंवा एखादी नदी, तलावाजवळ नाही रहात. त्यामुळे नावे ठेवण्यात अर्थ नाही. तसा म्हणायला एक छोटासा कालवा जवळच आहे पण त्यात नावे ठेवण्यासारखी नाही. कुणाला नावे ठेवण्याचा अनुभव असेल तर जरुर सांगा पुढे मागे कामात येइल. तस V&C आणी ईतर BB वर मायबोलीकराना नावे ठेवली जातात.. तेवढ मात्र सोडुन बोलायच बगा...
|
Disha013
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:03 pm: |
| 
|
अहो च्या,नाव म्हणजे नाम या अर्थाने घ्या इथे. BTW ,ते नदीत न्यायच्या नावेचे अनेकवचन नावा होते... नावे असे नाही.
|
Slarti
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:43 pm: |
| 
|
सोहम हे 'सः + अहम् = सोऽहम्' (तोच (पक्षी ब्रह्मन्) मी) असे आहे जे 'कः + अहम् = कोऽहम्' (मी कोण) या प्रश्नाचे उत्तर आहे. माझ्या माहितीप्रमाणे नाथपंथीयांचा मंत्र आहे.
|
Ravisha
| |
| Friday, August 24, 2007 - 3:28 am: |
| 
|
you are right slarti
|
Ajjuka
| |
| Friday, August 24, 2007 - 8:36 am: |
| 
|
स्लार्टी, नाथपंथीय की ते माहित नाही पण तो मुळात उपनिषदातला उद्गार आहे.
|
Hkumar
| |
| Monday, September 03, 2007 - 10:57 am: |
| 
|
अशोक जैन यांच्या पुस्तकातून्: मुलाचे नाव शिव आणि मुलीचे सेना. म्हणजे एकदम हाक मारायला सोपे जाते!
|
Mandarnk
| |
| Wednesday, October 03, 2007 - 10:00 pm: |
| 
|
माझ्या मित्राच्या ऑफीस मधे एक चायनिज आहे, त्याला सगळे Fred म्हणतात (तोच स्वतला तसे म्हणवून घेतो). तो एक रिपोर्ट द्यायला बॉस कडे गेला. रिपोर्ट साठी त्यांच्याकडे standard template होती, त्यात शेवटी initials लिहायचे होते. Template मधे तिथे X.Y.Z. असं लिहीलं होतं example म्हणून. त्या बॉस नी रिपोर्ट पाहीला, तर initials पाशी X.Y.Z. तसंच राहून गेलं होतं. तो वैतागला, आणी Fred ला म्हणाला की ही एक साधी असली तरी serious mistake आहे, परत असं झालेलं चालणार नाही, वगैरे वगैरे... तर Fred काळुकतीला येउन म्हणाला, अहो चूक नाही झाली, माझं नाव आहे Xing Yang Zho. (अर्थात तो हे मराठीत नाही म्हणाला, त्याच्या अगम्य इंग्लीश मधे म्हणाला).... पण मागच्याच आठवड्यात घडलेला खरा किस्सा आहे हा!
|
Fulpakhru
| |
| Thursday, October 04, 2007 - 12:03 am: |
| 
|
मी ऐकलेली काही विचित्र नावे सुरत, मुद्दत, अतिशय (सगळी मुलग्यांची नावे) आणि या अतिशय च्या आई चे नाव विद्युत
|
Dineshvs
| |
| Thursday, October 04, 2007 - 3:51 am: |
| 
|
फ़ुलपाखरु, सई परांजपेच्या अडोसपडोस CBDG सुधा चोप्राचे नाव विद्युत होते. आता त्या सिरियलला बरिच वर्षे झाली म्हणा. लावण्या असे खुपवेळा तामिळ मुलींचे नाव असते. लावण्य हा शब्द आलाय लवण वरुन, त्याला मीठ किंवा क्षार यापेक्षा दुसरा अर्थ नाही. मीठ जसे कमी किंवा जास्त असुन चालत नाही तसेच सौंदर्यही जास्त वा कमी असुन चालत नाही. सौंदर्याशीच निगडीत दुसरा शब्द व्यंकट. व्यंकट म्हणजे वक्र किंवा वाकडा. सरळ रेषेत सौंदर्य नसते. ते असते वक्र रेषेत. म्हणुन विष्णुचे एक नाव व्यंकट.
|
Karadkar
| |
| Thursday, October 04, 2007 - 5:54 am: |
| 
|
एका तमीळ मुलीचे नाव सैंधवी सैंधव म्हणजे मीठ ना हे काय असे नाव असेल?
|
Prajaktad
| |
| Thursday, October 04, 2007 - 9:36 am: |
| 
|
आत्ताच एकलेले मुलिचे नविन नाव ' तोशालय'..काय अर्थ आहे याचा?
|
मी अत्तापर्यंत 'लावण्या' हे नांव तेलगू लोकांमध्ये ऐकलेले आहे, पण ते नाव ठेवताना शोभेल असे ठेवलेले एकही मुलगी / बाई पाहिलेली नाही...
|
Arch
| |
| Thursday, October 04, 2007 - 3:23 pm: |
| 
|
आणि विनय, तुम्ही कशाला तेलगू बायका मुलींकडे एवढ निरखून पहाता हो? 
|
Dineshvs
| |
| Thursday, October 04, 2007 - 3:26 pm: |
| 
|
पुर्वीच्या सिंध प्रांतात खनिज मिठाचे डोंगर होते. त्यावरुन त्या मिठाला सैंधव हे नाव पडले. तोषोनी मज द्यावे पसायदान हे, हा संदर्भ घेतला तर जिथे समाधान मिळते ते घर, असा तोषालयाचा अर्थ घेता येईल ' विनयाने ' केलेले काहिही शोभते आर्च.
|
Shyamli
| |
| Thursday, October 04, 2007 - 6:16 pm: |
| 
|
व्यंकट नसेल दिनेशदा, व्यंकटेश किंवा व्यंकटरमण अस असतं ब-याचवेळा शीव-सेना काहीही करतात लोक :D
|
Dineshvs
| |
| Friday, October 05, 2007 - 5:38 am: |
| 
|
व्यंकट ला आणखी काहि जोडुन, नावं ठेवलीत झालं. श्यामले आपल्याकडचा रमझान तिथे रमदान, होताना कसं वाटतय ?
|
आर्च, खरं 'लावण्य' बघायला मिळेल म्हणून पहातो विनयाने.... पण होते काय..... 
|
Itgirl
| |
| Friday, October 05, 2007 - 1:23 pm: |
| 
|
..मी अत्तापर्यंत 'लावण्या' हे नांव तेलगू लोकांमध्ये ऐकलेले आहे, पण ते नाव ठेवताना शोभेल असे ठेवलेले एकही मुलगी / बाई पाहिलेली नाही... ... इथे बेंगलोरला आमच्या ऑफ़िसमधे पण आहेत खूप 'लावण्या'!! फ़क्त नावाच्याच
|
Shyamli
| |
| Friday, October 05, 2007 - 1:28 pm: |
| 
|
श्यामले आपल्याकडचा रमझान तिथे रमदान, होताना कसं वाटतय ?>>>> दिनेशदा रमादान आपला कसा हो? त्यांचाच ना मग आपल्याकडे आला
|
Dineshvs
| |
| Saturday, October 06, 2007 - 4:33 am: |
| 
|
वा आपली चिंच त्यानी खजुर म्हणुन खाल्ली ना. ( तमार ए हिंद ) मग खाल्ल्या खजुराला आणि एन्जॉय केलेल्या सुट्ट्याना स्मरुन आपलाच म्हणायचा. आणि सौंदर्य म्हणजे लावण्य, कसं बघणार्याच्या डोळ्यात असतं, सामान्य रुपाची लैला, मजनुला सुंदर दिसत होतीच ना. पुराणातलं उदाहरण जाऊ द्या, अंतरा माळी ( भूतकाळात ) आणि निशा कोठारी ( वर्तमानकाळात ) रामुला सुंदरच दिसते ना.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|